“आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे. आपल्यासाठी… आपल्या भविष्यासाठी… प्लीज आकाश… मला समजुन घे… मी खूप विचारांती हा निर्णय घेऊ धजावले आहे… दुसरा कुठलाही उपाय उरला नाही…”
“उपाय का नाही? मी पर्सनल लोन काढेन… मग सगळे व्यवस्थित होईल…” आकाशने एक प्रयत्न केला.
“वेडा का रे तू? मी बँकिंग क्षेत्रातील आहे. ‘पर्सनल लोन मिळवण्यासाठी कागदपत्रांवरून प्रथम हे सिध्द करावे लागते की तुला त्या लोनची गरज नाही आहे आणि तू कधीही ते लोन परत करू शकशील…’ आहेत आपल्याकडे कागदपत्रं? देईल कुणी आपली गॅरेंटी? कुणाकडूनही ‘निरपेक्ष मैत्रीची अपेक्षा’ ठेऊ नकोस… शिवाय पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट जास्त असतो. आधीच हे लोनचे हप्ते परवडत नाहीत… कुठून आणणार त्या लोनच्या हप्त्यांसाठी पैसे?”
“प्रेरणा, शहाण पण आणि मुर्खपणा ह्यात हाच फरक आहे… शहाणपणाला सीमा असते…”
“म्हण तू मला मुर्ख… आय डोन्ट माईंड… पण मला तुला यशस्वी झालेलं बघायचं आहे… मगच मी समाधानी होईन”
“प्रेरणा, ‘जे हवसं वाटतं ते मिळवणे म्हणजे यश, पण जे मिळते आहे ते हवेसे वाटणे म्हणजे समाधान’…”
“हे जरी मान्य असेल तरी तुला यशस्वी झालेलं बघण हा माझा हक्क आहे… प्लीज माझा हक्क असा डावलू नकोस… जर त्यासाठी मी इतकी मोठी किंमत मोजायला तयार आहे तर प्लीज तू माघार घेऊ नकोस… विचार कर… ‘कालची चुक आणि उद्याचे स्वप्न यामध्ये आजची संधी आहे’… लोकांच्या चुकांवरून आ पण शिकावे आकाश… त्या सगळ्या रिपीट करण्याएवढे आयुष्य नसते आपले…” प्रेरणाची भाषेवरील हुकुमत आणि कन्विन्सिंग पॉवर वादादित होती… आपल्या बोलण्याचा आकाश कमीतकमी विरोध तरी करत नाही हे प्रेरणाचे यश होते…
“विचार कर आकाश, जर तू ही एक संधी घालवलीस तर काय होईल… आपल्याला लोनचे हप्ते भरणे जमत नाही… पर्सनल लोन मिळणार नाही… मिळाले तरी परवडणार नाही… फॅक्टरी गहाण आहे जी जप्त होईल… कदाचित हे घरही… मी परत त्याच दळभद्री पॉलीटीक्स आणि त्या घाणेरड्या लोकांमध्ये परत जाईन… पण तू? इतक्या उमेदीने तू बिजनेस सुरु केलास… तुझी जिद्द तुझी धडाडी तुझा आत्मविश्वास… काय करणार ह्याचे? बासनात घंडाळन ठेवणार? आणि ‘मराठी माणसाला धंदा जमत नाही’ ह्या वाक्याला पष्टी देत कठेतरी मान मोडून नोकरी करणार? लक्षात ठेव, ‘यश मिळाल्यावरच गतकाळातील उपेक्षेला किंमत येते’…” प्रेरणा बोलत होती आणि आकाश फक्त ऐकत होता…
“आणि विचार कर, तुला ही ऑर्डर मिळाली… ह्या एका ऑर्डर नंतर तुला इतक्यात कुठेही जायची गरज नाही… तू प्रॉडक्शन आणि क्वालिटी कडे लक्ष देऊ शकशील… प्रोडक्शन वाढेल… ह्या ऑर्डरमुळे येणार्या पैशात आ पण फक्त लोनचे हप्ते नाही तर संपुर्ण लोन चुकवू शकू… एकदा ते झाले की तुला बिजनेस वाढवण्यासाठी वेळ देता येईल… माणसे नेमता येतील… ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’ आपले क्लायंट आहेत म्हटल्यावर आपल्याला बाकीच्या कंपन्यांचा बिजनेस मिळायला काहीच अडचण नाही… आणि एकदा इतक्या ऑर्डर्स आल्या की मिळणार्या पैशातून तुला अशी माणसे नेमता येतील जी त्यांच्या क्षेत्रात एक्सपर्ट्स आहेत… तुला आणि मला मग काम फक्त एकच… त्यांच्यावर लक्ष ठेवताना आपले आयुष्य मनसोक्त उपभोगायचे… ज्या माझ्या शरीराचा तुला इतका मोह आहे त्याचा हवा तेव्हा हवा तसा उपभोग तू तुला हवा तेव्हा घेऊ शकशील… आणि त्यासाठी कुठली किंमत मोजणार आहेस तू? तर राज मल्होत्राचे शरीर… जे शरीर गेले कित्येक वर्षे उपाशी आहे त्या शरीराला शांत करणार आहेस तू… बिचारी राज… गेले कित्येक वर्षे ह्या शरीराच्या आगीत जळत असेल… तिलाही मदत होणार नाही का? म्हटले तर हे स्वार्था बरोबर परमार्थ साधणे नाही का?”
‘लॉजिक म्हणजे पद्धतशीरपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने चुकीच्या निर्णयाला पोहोचणे’
आकाश ऐकतो आहे आणि आपल्या बोलण्याने कन्विन्स होतो आहे हे बघून प्रेरणा आपले लॉजिक वापरत होती. तिचे ते लॉजिक ऐकून आकाश स्तंभित झाला. तिच्या वक्तृत्वाचा प्रभाव इतका होता की त्याला इतर काही सुचेनासे झाले आणि तिचे बोलणे पटायला लागले. तरीही त्याच्यातील सद्सद्विवेकबुद्धी प्रतिकार करू बघत होती.
“अगं पण त्यासाठी सेक्स ची काय गरज आहे? इतर गोष्टी आहेत की…”
“ह्या जगात सेक्सपेक्षा काही चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत तर सेक्सपेक्षा वाईट गोष्टी देखील आहेत… पण आकाश… सेक्स सारखी दुसरी गोष्ट कुठलीही नाही… स्पेशली त्या स्त्रीसाठी जी गेले कित्येक वर्षे उपाशी आहे…”
” पण माझ्यात असे काय आहे की ती मला पटेल? कशावरून मी तिला सेक्ससाठी तयार करू शकेन? मी काही मदनाचा पुतळा नाही. माझ्यात काहीही सेक्स अपील नाही.” आकाशने आपली शंका मांडली. त्याच्या ह्या बोलण्यात त्याचा ‘ह्या’ गोष्टीसाठी होकार होता… आपला नवरा दुसर्या स्त्री बरोबर रत होणार ह्या कल्पनेच्या डागण्या मनाच्या खोल कप्प्यात गाडून प्रेरणा त्याचे शंका निरसन करायला सरसावली.
“आकाश, लक्षात ठेव – ‘सेक्स अपील म्हणजे ५०% जे तुमच्याकडे असते आणि ५०% जे इतरांना वाटते की तुमच्याकडे आहे’. ‘राज’ ही एक अत्युच्यपदी पोहोचलेली यशस्वी स्त्री आहे. तुम्ही जितके यशस्वी होऊन उंच उंच जाता तितके एकटे पडता. आपल्या यशाच्या बुरख्याआड ती एक अत्यंत एकाकी स्त्री आहे. तिचा हा बुरखा फाडून तिच्यापर्यंत पोहोचणे कुणाही यशस्वी अथवा सहजप्राप्य पुरुषाला जमणार नाही. ते तुझ्यासारख्या विवाहित सामान्य आणि पत्नीशी एकनिष्ठ माणसालाच जमू शकेल. विश्वास ठेव, हा जरी विरोधाभास असला तरी ह्याला ‘ह्युमन सायकोलॉजी’ म्हणतात…”
” पण ती ‘राज’ मी काळी का गोरी बघितली नाही…” आकाशने आपला त्रागा मांडला
“तुला तिथे एखादया संदरी बरोबर मजा मारायला जायचे आहे का एक ठराविक लक्ष समोर ठेऊन ते साध्य करायला जायचे आहे? राज तुझे साधन आहे का साध्य आहे?” प्रेरणाच्या ह्या चपराकीने आकाशला आपली चूक लक्षात आली. त्याचा मुड जरा डाऊन झाला. त्याचा बदलता मुड बघून प्रेरणाला धोका जाणवला
“तसेही, एकदा दिवा बंद झाला की प्रत्येक स्त्री सुंदरच दिसते” आकाशकडे बघत प्रेरणाने डोळा मारला.
त्याक्षणी ती इतकी मारू दिसत होती की सगळे संदर्भ विसरून आकाश तिच्याकडे झेपावला आणि पुढच्याच क्षणी प्रेरणाची तिच्या नाईट गाऊनशी फारकत झाली. इतक्यावेळ राज संदर्भात झालेल्या बोलण्याने आकाश उत्तेजीत झाला होता. त्यात गाऊन काढून टाकल्यावर समोर दिसणार्या नग्न प्रेरणाने त्याच्या शरीरात भडकलेल्या आगीत इंधन टाकले. आपली लुंगी सोडून आकाश प्रेरणावर तुटून पडला.
आपला नवरा आपणहून परस्त्रीच्या स्वाधीन करायच्या आधी त्या संभोग होमात प्रेरणाने नवर्यावरील आपल्या एकाधिकाराची आहुती दिली. आकाश प्रेरणाचा देह उपभोगत राहिला तर प्रेरणा आकाशच्या ‘अस्पर्शित स्पर्श’ साठवून घेत राहिली. आपला नवरा शेअर करण्याचे दुःख नजरेआड करून नवर्याचे आणि त्याच्या भविष्याचे स्वप्न रंगवत ती अर्धांगिनी हसर्या चेहेर्याने नवर्याच्या रतिसुखात आपला वाटा उचलू लागली.
भरल्या दुपारी आकाशच्या चोटाची आणि मग पोटाची भूक भागवून झाल्यावर प्रेरणाने आकाशला आपल्या शिकवणीत घेतले. गेले काही दिवस तिने ‘राज मल्होत्रा’ विषयी काढलेल्या प्रत्येक गोष्टीची आकाशला माहिती करून दिली. आकाशही एका चांगल्या विद्यार्थ्या प्रमाणे, शिक्षिकेच्या पदराला हात न घालता, सगळ्या गोष्टी माहित करून घेत होता. राजच्या आवडीनिवडी सवयी यांची आकाशला माहिती झाली. दोघांनी मिळून पुढील सर्व संध्याकाळ चर्चेत घालवली.
तिच्याबद्दल प्रेरणाने मिळवलेली माहिती बघून आकाश अवाक झाला. प्रेरणा किती मनःपूर्वक ह्या गोष्टीच्या मागे लागली आहे हे त्याला नव्याने उमगले. त्याचबरोबर तिच्याशी चर्चा करताना मनाच्या एका कोपर्यात आणि प्रेरणाच्या खोल डोळ्यात त्याला तिच्या यातना जाणवल्या. केवळ आपल्या प्रेमापोटी, आपल्या धेय्यासाठी आणि आपल्या यशासाठी आपल्या पत्नीचा हा त्याग त्याच्या मनात खोल रुतून गेला. तिच्या ह्या त्यागाची सव्याज परतफेड करून तिला सर्व सुखे द्यायचीच ही खुणगाठ आकाशने मनाशी बांधली. तोही सर्वतोपरी ह्या प्लॅनच्या मागे लागला.
प्रेरणाच्या माहिती प्रमाणे ‘राज’ काही कामासाठी दिल्लीहून मुंबईला आली होती आणि रविवारी रात्रीच्या विमानाने परतणार होती. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रविवारी सकाळी प्रेरणाने राजला तिच्या एअरपोर्ट जवळच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये फोन लावला आणि एका ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ देऊन संध्याकाळी डिनरसाठी यायची गळ घातली. प्रेरणाचे रीडिंग तंतोतंत जुळले आणि भिडस्त स्वभावाच्या राजने तिचे आमंत्रण मान्य केले. एका पुरुषाचे आमंत्रण बेधडक नाकारणार्या राजला ओळखीने आलेल्या एका स्त्रीला ‘नाही’ म्हणणे जमले नाही. रात्री दहाचे फ्लाईट असल्याने संध्याकाळी सात वाजता तिच्या हॉटेलमध्ये यायचे प्रेरणाने कबुल केले