आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा विषय निघाला की ती भरभरून बोलायला लागायची. किंबहूना, तिला बोलते करण्याची चावी म्हणजे तिच्या करिअरचा विषय. पण त्याबाबतीत ती आणि आकाश समदुःखी होते. गुणवत्ता, ज्ञान आणि लायकी असुनही दोघेही आपापल्या करिअर मध्ये प्रगती करू शकत नव्हते.
असे गांजलेले दोन जीव कामाच्या निमित्ताने एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्र झाले. प्रेरणाच्या मदतीने लोनचे काम जरी झाले तरी त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही पण शिरावर आणखी एक कर्ज वाढले. प्रेरणा स्वतःच्याच करिअरच्या बाबतीत काही करू शकत नव्हती. अशा वेळेस आकाशने तिच्याकडून अजुन मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे ‘उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला’ अशीच गत झाली असती.
पण आता आकाश प्रेरणा सर्रास एकत्र दिसू लागले. आकाशने त्याच्या मित्रमंडळीमध्ये प्रेरणाची ओळख करून दिली. प्रेरणाच्या मैत्रिणी देखील आकाशला ओळखू लागल्या. पण ग्रुप्स आणि पायांशिवाय आकाश प्रेरणाच्या भेटी होऊ लागल्या. आकाशला प्रेरणा – तिचा स्वभाव आवडलाच होता. सहवासाने प्रेरणाला आकाश आवडू लागला. आकाशची पर्सनॅलिटी समोरच्यावर छाप पडणारी होतीच पण त्याच बरोबर त्याचा स्वभाव तिच्यासारखाच होता. कुणाशीही पटकन जुळवून घेणे त्यालाही तिच्यासारखेच जमायचे. तो ही तिच्याप्रमाणेच करिअरच्या बाबतीत महत्वाकांक्षी होता. मराठी माणुस असुनही नोकरीच्या गुलामगिरीत आणि महिन्याच्या ठराविक तारखेला मिळणार्या ठराविक पगारावर समाधान न मानता स्वतःचा बिजनेस करून तो वाढवून प्रगती करण्याची त्याची
दुर्दम्य इच्छा होती. हे त्याच्यातील पैलू तिला आकर्षित करायला लागले.
असेच एका रम्य संध्याकाळी ते दोघे समुद्रकिनारी एकमेकांना खेटून बसले होते. दोघांच्याही नजरा समोरच्या दृश्यावर खिळल्या होत्या. सूर्य आपली दिवसभराची कामगिरी संपवून जाताजाता आसमंतात रंगांची उधळण करत
चालला होता. त्याच्या त्या किमयेने विविधरंगी रांगोळीचे फर्राट्टे मारल्यासारखे क्षितीज उजळून निघाले होते. त्या मंत्रमुग्ध करणार्या सूर्यास्ताच्या देखाव्यावर नजर रोखून दोघेही आपल्या भविष्याच्या उज्वल सूर्योदयाची स्वप्न रंगवत होते. दोघेही सारख्याच विवंचनेत होते. करण्यासारखे सगळे प्रयत्न करून झाले होते. तिचे बँकींग क्षेत्रातील
करिअर आणि त्याचा बिजनेस एका ठराविक लिमिटच्या पुढे जातच नव्हते.
बोलता बोलता सहजतेने तिने हात त्याच्या मांडीवरील त्याच्या हातावर ठेवला. त्यानेही एखादा आधार मिळावा तसा आसुसून तो हात घट्ट धरून ठेवला. त्या स्पर्शानी दोघांनाही एकमेकांच्या आधाराच्या गरजेची जाणीव झाली. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ या उक्तीप्रमाणे दोघांना एकमेकांची… एकमेकांच्या आधाराची गरज जाणवली आणि त्या गरजेतून त्यांना एकमेकांबद्दल असलेल्या अव्यक्त प्रेमाचा शोध लागला. ह्या नविन साक्षात्काराने दोघांचीही मने क्षितिजावरील रंगांनी न्हाऊन निघाली.
आकाशने प्रेरणाचा हात आपल्या हातातून सोडवून स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि स्वतःचा हात उचलुन तिच्या खांद्यावर ठेवला. प्रेरणाने आपल्या दुसर्या हाताने त्याचा खांद्यावरचा हात थोपटला आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. वातावरण भावूक झाले होते. आकाशने खांद्यावरील हात तसाच ठेवून दुसर्या हाताने तिची हनुवटी वर केली आणि दोन भावूक पुष्करणींशी त्याचा सामना झाला. त्या नजरेत नजर रोखत आकाशच्या तोंडून पण मनाच्या खोल गाभ्यातून शब्द निघाले
“प्रेरणा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू… ह्यापुढील आयुष्यात मला तुझी साथ हवी आहे. कायम… पावला पावलावर… देशील? मला ठाम विश्वास आहे की एकमेकांच्या साथीने आ पण एक छान आयुष्य जगू शकू. पुढील आयुष्यात कधीही ह्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. तुलाही तसे वाटते? करशील मला मदत एक सुंदर आणि सुखी आयुष्य निर्माण करायला?”
त्याच्या शब्दातील सच्चाईचा ओलावा तिच्या मनाच्या टीपकागदाने चटकन शोषून घेतला. सूर्य क्षितिजा आड गेला होता पण ती लाली प्रेरणाच्या चेहेर्यावर पसरली होती. तिची नजर खाली झुकली. तोंडातून एकही शब्द बाहेर पडू शकला नाही. त्याऐवजी तिची मान हलकेच हलली… होकारार्थी… आणि पुढच्याच क्षणी तिने त्याच्या कुशीत स्वतःला लपवले. दोघेही स्वतःला धन्य समजत तसेच बसून राहिले. आकाश तिच्या केसांवरून हात फिरवत राहिला. प्रेरणा नकळत गुणगुणायला लागली
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते!
स्वर्ग मिळे धरणीस येथे रंग नवे गगनांगणी
सप्तसुर लेवून यावी रागिणी अनुरागिणी तुझीयासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित मागते!
भरलेल्या तृप्त मनाने दोघेही तिथुन निघाले आणि प्रथमच प्रेरणा आकाशच्या घरी आली. त्याचा वनरूम किचन ब्लॉक हा सर्वसामान्य बॅचलर प्रमाणे अस्ताव्यस्त नसून चक्क नीटनेटका टापटीप होता. बघूनच प्रेरणा प्रसन्न झाली. घरात फर्निचर मोजके पण त्याच्या निवडीची साक्ष देणारे होते.
“वेलकम होम. ‘आपल्या घरात’ आपले स्वागत असो. चहा घेणार की कॉफी की काही थंडगार? का काही थंड जे पिऊन गरम वाटते?” प्रेरणाकडे मिस्कील नजरेने बघत आकाशने विचारले.
“चहा… आणि तोही मी करणार” प्रेरणाने हक्काने सांगितले आणि ती किचनकडे वळली.
“चल, मी तुला दाखवतो कुठे काय ठेवले आहे ते” म्हणत आकाश तिच्या मागे जायला लागला
“माझ्या किचनमध्ये कुठे काय ठेवले आहे ते मला कुणी दाखवायची गरज नाही. तू बाहेर जाऊन बस” प्रेरणा फणकार्याने म्हणाली आणि केसांचा शेपटा उडवत किचनमध्ये निघून गेली. तिची मालकी हक्काची भावना बघून आणि मनोमन एन्जॉय करून आकाश बाहेर आला. चहा येईपर्यंत वातावरण प्रसन्न करण्यासाठी त्याने सीडी प्लेयर ऑन केला. रॅकवर नजर टाकली आणि आर डी बर्मन स्पेशलवर नजर पडताच त्याच्या तोंडून हलकेच शिळ बाहेर पडली. स्लॉट मध्ये सीडी टाकुन त्याने आवाज सेट केला आणि रफीच्या सुरावटींनी घर भरून गेले
ओ हसीना जुल्फोवाली जानेजहान ढुंढती है काफिर आंखे किसका निशां… मेहेफील मेहेफील अये शमा फिरती हो कहा…!
चहा घेऊन बाहेर येणारी प्रेरणा देखील गाण्याने आणि तिथल्या वातावरणाने प्रसन्न दिसत होती. दोघांची अजुन एक आवड जुळलेली बघून दोघेही अजुनच खुष झाले. सोफ्यावर बसुन दोघेही गाण्याचा आस्वाद घेत चहापान करायला लागले. प्रथमच आकाश स्वतःच्या घरात आयता चहा पीत होता, तो ही त्याच्या भावी पत्नीने बनवलेला. नवल नाही त्याला चहाची चव अमृतासारखी अवीट लागत होती. प्रेरणाच्या चेहेर्यावर देखील टिपीकल भारतीय स्त्रीचे भाव होते जिने आपल्या भावी नवर्याला आपल्या हक्काच्या घरात चहा बनवून दिला होता आणि तो आवडल्याचे भाव आकाशच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होते.
चहा पिऊन समोरच्या टेबलवर कपबशा ठेवून दोघेही एकमेकांकडे बघायला लागले. आकाशने पुढाकार घेऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिथुन शब्दांची भाषा बंद झाली आणि नजरेची भाषा सुरु झाली. नविन भाषेचे आकलन करून घेताना आणि अर्थ लावताना दोघांचीही धांदल उडत होती पण येणारी मजा काही औरच होती. तेव्हढ्यात सीडी प्लेयरच्या सराऊंड साऊंड स्पीकर मधुन आशा भोसले आणि शैलेन्द्र सिंगचे शब्द झिरपले
जाsss नेsss दोsss नाsss
पाsssस आsss ओsss नाsss छुओ ना छुओ ना मुझे… छुओ ना छुओ ना.. देखो… छुओ ना छुओ ना छुओ नाsss
छोडो कलाई देखो रो दूंगी…
जाओ मैं तुमसे नही बोलुंगी… मान भी जाओ मेरी बात सनम… हातो मे रहेने दो ये हात सनम…
गाण्यातील शब्दांनी पाहता पाहता वातावरण मदहोश झाले आणि त्या सुरांची झिंग दोघांवर चढली. हात तसेच एकमेकांत गुरफटलेले राहिले आणि दोघांची नजर एकमेकांच्या नजरेत गाण्यातील बोल शोधायला लागली. अंतर कमी व्हायला लागले आणि तो क्षण आला जेव्हा आकाशने तिचे हात सोडले. आपले हात वर केले आणि हातांच्या
ओंजळीत तिचा चेहेरा धरला, पुढे झुकला आणि तिच्या थरथरत्या ओठांवर अलगदपणे आपले ओठ टेकवले.
तो तिच्या ओठांचा मऊ लुसलुशीत स्पर्श त्याला वेडावून गेला. इतक्यावेळ त्याच्या नजरेत अडकलेली तिची नजर तिथुन सुटली आणि पापण्यांच्या अलगद आवरणाखाली तिचे डोळे मिटले गेले. मिटल्या डोळ्यांनी तिने एक मंद हुंकार दिला आणि तिचे ओठ हलले. तिच्या ओठांचा प्रतिसाद मिळताच आकाशने आपल्या ओठांचा दाब वाढवला आणि ओठ विलग केले. आपल्या विलग ओठांत तिचे लुसलुशीत ओठ तो चोखू लागला. त्याची जीभ कार्यरत झाली आणि तिच्या ओठांवरून फिरली. दोघांचेही उफाळते श्वास एकमेकांत मिसळून गेले आणि तिचे ओठ विलग झाले. त्याच्या जीभेला वेगळ्या आमंत्रणाची गरज नव्हती.