दुसर्या दिवशी सकाळी उत्तमची भेट राजाराम शी झाली परंतु उत्तमला राजारामच्या चेहर्यावर तेज दिसले नाही… उत्तमने राजारामला विचारलं पण राजाराम वेळ मारून नेत होता…
उत्तम अजून अस्मितापासून दूर राहत होता… राजाराम एकटा सापडल्यावर अस्मिता मॅडम ने त्याला गाठलं आणि कामाची आठवण करून दिली… तसा राजाराम ने अस्मिता मॅडमला शब्द दिला… राजाराम दिवसभर त्याच विचारात होता… आणि उत्तम राजारामला अस्वस्थ पाहून स्वतः टेन्शन मध्ये होता… मिटकरी सर आणि जगदाळे सर सुद्धा या सर्वांचे वागणे पाहून चक्रावले होते आणि आपसात कुजबुजू लागले होते… अशात दिवस संपला आणि राजाराम उत्तमला चुकवून आपल्या घरी गेला… राजाराम आता पुन्हा तयार होऊन बाहेर पडला अन थेट रंगरावाची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोचला… रंगराव बाहेर झोपाळ्यावरच बसला होता… राजाराम येताच रंगराव खुश झाला त्याला समजले की हा काहीतरी बातमी असल्याशिवाय येणार नाही… त्यामुळे रंगराव मोठ्याने म्हणाला, काय रे राजाराम काय काम काढलंस इथे बोलण्यासारखं आहे की आतमध्ये जाऊया… तसा राजाराम बावरला आणि म्हणाला दादा इथे नको आतच जाऊया… दुर्लभ आणि अर्णव माडीवरून हा खेळ पाहत होते… त्यांनाही उत्सुकता होती की राजाराम नक्की काय सांगतोय पण बापासमोर ते नेहमी शांत असायचे त्यामुळे दुरूनच पाहत होते… रंगराव राजारामला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, हम्म मग काय खबर आणलीस…? तसा राजाराम हळू आवाजात सांगू लागला… अहो तो नवीन शिक्षक आहे ना उत्तम ज्याला आपण भाडेकरू ठेवलंय, तो चक्क आपल्या बहिणीवर लाईन मारतोय… मी त्याला बर्याचदा सांगितलं की ती तुमची बहीण आहे तरीदेखील तो सवय काही मोडत नाही…
त्या दिवशी तर दुपारच्या सुट्टीत चक्क तिच्या घरी गेला… तुमची बहीण काही बोलणार नाही कारण तुमचा राग तिला माहीत आहे ना… रंगरावच्या चेहर्याचा रंग आता लालबुंद होत चालला होता… त्या भाडेकरूची एवढी मजल थेट माझ्याच बहिणीवर लाईन मारतो… रंगराव रागाने उसळतो… आणि तलवार शोधायला जातो… तसा राजाराम त्याला सांगतो… दादा जरा शांत घ्या उगाच रागाच्या भरात नको ते करण्यापेक्षा याचा बदला तुम्ही खूप भारी पद्धतीने घेऊ शकता… आणि पोलिसांची झंजट सुद्धा पाठी लागणार नाही… तसा रंगराव म्हणाला, म्हणजे काय करायचं म्हणतोयस तू… राजाराम म्हणाला, मी काय म्हणतो एकाच्या बदल्यात बरच काही मिळवता येईल कसं… तसं रंगरावाची ट्यूब पेटली अन म्हणाला, राजाराम तसा हुशार आहेस तू… आलं लक्षात माझ्या. आणि तसही त्या मास्तुरड्याला चिरडून काय मिळणार त्यापेक्षा त्याला वेगळी शिक्षा देऊ… तू एक काम कर त्या मास्तुरड्याला आताच बोलावून आण इथे… घाबरू नको मी काही त्याला करणार नाही… एवढ्या केस झाल्या आहेत आता उगाच केस चढली तर तडीपार नोटीस काढतील… जुना रंगराव तुला तर माहीतच आहे… तसा राजाराम म्हणाला, हो तर अहो तुम्ही म्हणजे एकदम डेंजर… रंगराव मिशीला पीळ देत म्हणाला, चल चल कामाला लाग…
राजाराम धावत पळत उत्तमच्या घरी गेला अन दरवाजा ठोठावला… उत्तम बाहेर आला, राजारामला पाहून म्हणाला, अरे राजाराम तू इथे कसा काय. तशी मागून गीतांजली सुद्धा आली अन ती सुद्धा चकित झाली… तसा राजाराम म्हणाला, काही नाही ओ रंगराव ने तुम्हाला जरा बोलावलंय… काही भाड्या संदर्भात बोलायचे असेल… तसा उत्तम थोडा चपापला, आणि म्हणाला पण भाड तर मी देतो नेहमी… राजाराम म्हणाला, ” तसं काही गंभीर नाही आणी वहिनी तुम्ही जा आतमध्ये मी येतो लगेच उत्तमरावना घेऊन… अन दोघे रंगरावच्या घरी आले…
दुर्लभ आणि अर्णवच्या मात्र हे प्रकरण काय चाललय हे लक्षात येईना तरी ते लक्ष ठेऊन होते… उत्तम आल्यावर रंगराव ने त्यांना आत मधल्या खोलीत नेले… अन दरवाजा लावून घेतला. उत्तम आता पुरता घाबरला होता… रंगरावने तलवार आपल्या बाजूला ठेवली होती… तलवार पाहताच उत्तमचे हातपाय कापायला लागले होते तसा रंगराव म्हणाला, ” हे बघा उत्तम सर तुम्ही आजपर्यंत आमच्याकडे भाड्याने राहता. तसेच ज्या शाळेचे आमचे पूर्वज संस्थापक आहेत त्या शाळेत तुम्ही शिक्षक म्हणून नोकरीला आहात… तर या रंगरावाचा इतिहास कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मी काय सांगतो ते नीट ऐका या राजाराम ने मला काहीही सांगितलं नाहीय… मला तुमच्यातील शिक्षकांनी हे सांगितलंय आणि या राजारामला मी बोलावून घेतल्यावर दोन फटक्यात हा कबुल झालाय… रंगराव ने आता बाजू पालटली होती… ” आणि हो तुम्ही थेट माझ्या बहिणीवर लाईन मारली हे मला त्यांनीच सांगितलंय… आता मुकाट्याने तुम्ही कबूल करताय की तुम्हाला वेगळे फटके देऊ… तसा उत्तम त त फ फ करू लागला त्याची भीतीने जाम गाळण उडाली होती… रंगराव त्याला म्हणाला हे बघा मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही जर कबुल झालात तर तुमचा फायदा आहे आणि झालं गेलं विसरून तुम्ही इथे राहू शकता… पण खोटं बोलला तर गाठ माझ्याशी आहे… तसा उत्तम घाबरत घाबरत हो म्हणाला, ” आता कसं शॉल्लीड” अस म्हणून रंगराव ने उत्तमला पाठीत थाप मारली… आणि म्हटलं खर बोललात म्हणून सुटलात… पण खेळ यापुढे आहे तुम्ही साक्षात आमच्या बहिणीवर लाईन मारली म्हणून तुम्हाला सहज कसं सोडणार… तसा उत्तमचा थरकाप उडाला, म्हणजे अजून काही बाकी आहे तर अस मनाशी तो म्हणाला, एवढ्यात रंगराव सांगू लागला, तुम्हाला आता एकच शिक्षा… तुम्हीं स्वता हा विषय आता तुमच्या बहिणीला आणि बायकोला सांगायचा… आणि रंगराव किती दयावान आहे आणि मी तुम्हाला एवढं समजून कसं माफ केल हे सांगायचं. तसा उत्तम रडायला लागला, अहो नको प्लिज माझी वाट लागेल आणि बायको मला शिल्लक ठेवणार नाही ती सोडून जाईल… तसा रंगराव म्हणाला, ते कसं सांगायचं ते तू बघ पण जर हे तू केले नाहीस तर तुझी नोकरी जाईल… आणि तू जरी बायकोला नाही सांगितलं तरी आम्ही सांगूच ते वेगळं आणि मग आमच्या रागाने तुमचं काय वाईट होईल ते वेगळंच… एवढं सगळं करण्यापेक्षा मी सांगितलेलं सोपं ना… तसा उत्तम रडवेल्या चेहर्याने उठला अन कसाबसा ठीक आहे असं म्हणून घरी आला…
घरी अपर्णा आणि गीतांजली तर वाट पाहतच होती… तसं गीतांजली म्हणाली, ” काय हो एवढा वेळ काय सांगत होते रंगराव, मला बाई त्यांची नजर नीट दिसत नाही… तसा उत्तम रडवेला झाला अन त्याचा बांध फुटला… गीतांजली आणि अपर्णाला काय झालंय हे कळत नव्हतं. त्या म्हणाल्या काय झालंय अस का रडताय… तसं उत्तमने दोघांकडून शपथ घेतली की मी खर सांगेन पण तुम्ही मला सोडू नका माझी काही चूक नाही हे सगळं अनावधानाने घडलंय… तशी गीतांजली म्हणाली, अहो देवाधर्माच्या साक्षीने सात फेरे घेतलेत ते काही सोडून जाण्यासाठी नाही जे काही असेल ते सांगा आम्ही त्याला सामोरे जाऊ… तसा उत्तमने सगळा वृत्तांत सांगितला… हे ऐकून गीतांजलीला तर बोलायला शब्द फुटत नव्हते… तरी तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली तुम्ही आता जरा आराम करा आणि रंगराव शांत राहिला यात समाधान माना… मला तर तुमचा खूपच राग आलाय पण काय करायचं अस झालंय… मी आधीच शब्द देऊन बसलेय पण यापुढे अस काही झालं तर मी शांत बसणार नाही… अपर्णा सुद्धा खूप रागावली होती पण तिला पुढची काळजी सुद्धा वाटत होती तिने हा विषय आपण इथं थांबवूया अस म्हटलं अन त्या रात्री सर्वांनी आपापल्या पद्धतीने कॉम्प्रमाईज केलं…
दुसर्या दिवशी सकाळी उत्तम लवकर शाळेत निघून गेला… उत्तम आता जास्त कुणाशी बोलत नव्हता… अस्मिता मॅडम कडे तर ढुंकून पाहत नव्हता… ती करायला गेली एक अन झालं भलतंच होत… ती मनातून चडफडत होती… अन राजारामला एकटं गाठून तिने जाब विचारला तसा राजाराम म्हणाला, तुम्ही जस सांगितलं तसं मी केलं पण पुढे शेवटी रंगराव ठरवणार तसच होणार ना… तशी अस्मिता गप्प झाली आणि नवीन काय करायचं या विचारात पडली…
इकडे अपर्णा नेहमीप्रमाणे क्लासला गेली पण गीतांजलीचा जीव लागत नव्हता ती सारखी बेचैन होवुन फेर्या मारत होती… अन एवढ्यात दारावर टकटक ऐकू आली… अन ती घाबरली, तिने घाबरत दरवाजा उघडला… समोर पाहते तर रंगराव मिशाना पीळ देत उभा होता…, मॅडम आत यायचं का…? तशी ती बावरली अन न बोलता आत आली आणि रंगराव पुन्हा न विचारता आत आला… अन दरवाजा लावून घेतला… तशी गीतांजली घाबरली, अन म्हणाली, अहो दरवाजा का लावताय…? अन बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली, तसा रंगराव म्हणाला, अहो घाबरू नका मी काय म्हणतोय आधी ऐकून तरी घ्या… तुम्ही बसा बघू आधी इथे… तशी गीतांजली दूर बसली… अन रंगराव बसून सांगू लागला, अहो जे काय घडलंय ते तुम्हाला कळलंच असेल… तशी गीतांजली ने खाली मान घातली…