पंधरा दिवस खूप विचार करून, मेंदुंची पार सालपटे काढून तिने शेवटी होकार दिला. पंचवीस वर्षांच्या तरण्या युवतीचे लग्न त्या एकोणचाळीस वर्षाच्या पुरूषाशी संपन्न झाले. ते दोघे सुखाने महाबळेश्वर येथे राहत्या घरात संसार करू लागले. तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग उडाला आणि तिने त्याच्या बरोबर मेडिकल जॉईन केले. पुढच्या एका वर्षात तिने त्याच्या बरोबर राहून सगळे छोटे छोटे काम मेडिकलमध्ये शिकून घेतले. कोणते औषध कसे शोधायचे, कोणते औषध कोणत्या ड्रॉवरमध्ये भेटेल, कोणते औषध संपत असेल तर ते वहीत नोंद करून त्याचा स्टॉक डिस्ट्रब्युटरकडे मागवयाचा यात तिचा हात बसत होता. पुढे पुढे भास्करराव बिनधास्तपणे मेडिकल तिच्या ताब्यात देऊन काही नवीन औषधांची फ्रेंजयाझी घ्यायला ते दुसऱ्या जिल्ह्यात बोलणी करण्यासाठी जात असे. रात्री दमून आल्यावर राधिका ही भास्कररावांच्या कुशीत शिरून झोपी जात असे. भास्करराव आपल्या वयाप्रमाणे आणि स्वभावामुळे सेक्समध्ये उच्च कोटींचे इच्छुक नव्हते. पण नवीन नवीन लग्नानंतर तिच्या कोवळ्या सौंदर्यात भाळून काही महिने त्यांनी छान सेक्स केला. त्या सेक्स तोंड ओळखीमुळे राधिकाच्या कामजीवनाची कवाडे खुली झाली होती. तिला या सेक्स नावाच्या नव्या अध्यायात रस वाटत होतापण जितके तिच्या ओंजळीत नवरा प्रेम देईल तेच निमूटपणाने घ्यावे अशी तिची विचारांची धाटणी होती. शेवटी आपल्या नशिबात असेल तेच भेटेल या जुन्या पुराण्या भाकड कथेतील वाक्यावर तिचा गाढ विश्वास होता. तिच्या नवऱ्याचा अपूर्ण कामशृंगार जणू काही त्याच्या वयाचा इफेक्ट असावा असेही लैंगिक शिक्षणाचा अभाव असलेल्या राधिकास वाटले. पण या तिच्यासाठी असणाऱ्या क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर इतर गोष्टी तिच्या नवऱ्यामुळे तिला मुबलक भेटत होत्या. घरात आता बऱ्यापैकी पैश्याची रेलचेल सुरू झाली होती. राधिका आणि भास्कर यांचा संसार उत्तमपणे सुरू होता.
राधिका आणि भास्कर यांचे लग्न होऊन एक वर्ष उलटले. आता या सुखी दाम्पत्याला आजूबाजूचे ओळखीचे लोक घरात पाळणा कधी हलणार असे आवर्जून विचारू लागले. तसे पाहिले तर आपल्या आयुष्याची चिंता आपल्या पेक्षा आपल्या शेजारच्या लोकांना जास्त असते. जर आपले लग्न होत नसेल तर सारखे लग्न ठरले का या प्रश्नांची सरबत्ती होते. एकदा लग्न झाले की कधी घरात लहान पाहूणा येईल या प्रश्नाने नवऱ्या मुलींवर भडीमार केला जातो. असाच भडीमार राधिकावर होऊ लागला. पण गेली एक वर्ष त्या दोंघांनी प्लनिग केले होते म्हणून एक वर्ष घरात पाळणा हलला नाही. नवीन लग्न होते तेव्हा त्याचा आठवड्यातून चार ते पाच वेळा सेक्स होत होता. पण आता एक वर्ष उलटल्यावर आठवड्यातून एकदाच सेक्स होत असे. तो एकदा सेक्सपण राधिकाच्या पुढाकारामुळे होत असे. मेडिकल घरचेच होते त्यामुळे कंडोम सहज उपलब्ध होत असे. काही नवीन जोडप्यांमध्ये कधी कधी कंडोम उपलब्ध नसतो किंवा ते जवळ आल्यावर त्यांना कल्पना येते की ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या कंडोम बॉक्समध्ये कंडोम संपले आहेत आणि त्याच्या काम वासनेचा किडा वळवळू लागतो. अशात मग ते विनानिरोध सेक्स करतात. जेव्हा सेक्सचा परमोच्च बिंदू गाठताना तो पुरूष आपले लिंग बाहेर काढून त्याचे वीर्य तिच्या योनित नाही जाणार यासाठी प्रयत्नशील असतोपण ऐन तारूण्याच्या भरात आणि टायमिंगच्या घोळात त्याचे अजस्त्र हत्यार तिच्या योनित आपल्या प्रेमरसास अर्पण करतो. मग कोवळ्या वयातील त्या जीवांच्या प्रेमबिजांचे मिलन होऊन त्या मादीची मासिक पाळी बंद होते. अर्थातच त्याच्या घरी एक नवा पाहुणा येणार असतो. प्लानिग करणारे नवीन दाम्पत्य यास चूक म्हणतात. पण या चुकीमुळे घरात चैतन्याची पालवी फुटते. घरातील ज्येष्ठ मंडळी यावर त्या दांपत्यास समजावतात आणि मग सर्व संमतीने सर्व कुटुंब नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज होते. हा साधारण सर्वच नवीन लग्न झालेल्या दाम्पत्य मधील प्रोसेस जो अनेक वर्षापासून अखंडपणे कार्यरत आहे. हा सगळा प्रोसेस सांगण्याचा उद्देश हाच होता की राधिका आणि भास्करराव यांच्या घरात कंडोम सहज उपलब्ध असल्याने त्याच्या कामशृंगारात चूक होणे शक्य नव्हते त्यामुळे गेली एक वर्ष प्लॅनिंगच्या गोठ्यात काही नवीन वासरू जन्माला येण्याच्या आशा नव्हत्याच.
राधिका आपल्या नवीन संसारात रमली होती आणि भास्करराव आपला बिझिनेस एक्सपांड करण्यात मग्न होते. सर्व काही सुरळीत सुरू होतेपण इतक्यात नियतीने घात घातला. राधिकाने स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता असा काही तिच्या जीवनात उतार आला. हे उतार काळाच्या ओघात अधिकच जीवघेणे होणार होते. उतार नंतर चढ, रात्री नंतर दिवस, ओहोटी नंतर भरती हा निसर्गाचा नियम असला तरी तिच्या जीवनात जो उतार सुरू झाला होता तो थेट रसातळाला जाईल असे तिला वाटू लागले होते. लग्नाला जेमतेम एक वर्ष उलटून गेले होते. एके दिवशी भास्करराव कामानिमित्त बाहेरगावी म्हणजे पुणे येथे गेले होते. इतक्या लांब ११० सीसी असलेल्या त्याच्या ॲक्टिवाने जाणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी प्रायव्हेट गाडी बुक केली. गाडी वाल्याने त्यांना सुखरूप पुण्याला पोहचवले. पुण्यात त्याची एक मीटिंग होती ज्यात त्यांना एका आयुर्वेदिक कंपनीशी टाय अप करायचे होते. त्याचे काम पाहून आणि त्या कंपनीची गरज पाहून त्या कंपनीने भास्करराव यांच्या बरोबर टायअप केले. सर्व काही मनासारखे झाले म्हणून ते खूप खुश होते. या आंनदापोटी त्यांना कधी घरी जाईल असे झाले होते. त्यांनी पुण्यावरून येताना राधिकास कॉल केलापण मेन गोष्ट सरप्राइज म्हणून सांगितली नाही. घरी येऊन तोंड गोड करून तिला सांगणार होते. त्या आनंदापोटी त्याचा रात्री एक सेक्सचा डाव सुद्धा झाला असता असा विचार येऊन भास्करराव गालातल्या गालात हसू लागले. इतक्यात परतिच्या प्रवासासाठी त्याची भाड्याची गाडी आली. गाडीत विराजमान झाल्यावर त्यांनी ड्रायव्हरला हुकूम सोडला की डायरेक्ट महाबळेश्रर. गाडीने महामार्ग पकडला आणि छोटी छोटी गावे मागे टाकत परतीचा प्रवास सुरू झाला. भास्करराव यांना कधी घरी पोहचतो असे झाले होते त्यामुळे पुणे ते महाबळेश्रर हा प्रवास येताना जितका लहान वाटला तितकाच आता मोठा वाटत होता. पण सध्या वाट पाहणे इतकेच त्याच्या हातात होते. मग कंटाळून त्यांनी झोपायचे ठरवले. मागच्या सीटवर मान मागे ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. लगेच नाहीपण काही वेळाने त्यांना यश आले आणि त्यांना झोप लागली. इकडे ड्रायव्हर गाडी चालवत चालवत एक एक गाव पालथी घालत होता. इतक्यात अर्थाचा अनर्थ झाला. समोर चार रस्ते एकत्र येणाऱ्या चौकात डाव्या बाजूने एक ट्रक आला. तो ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात येत होता. तो ट्रक भरधाव वेगात येऊन भास्करच्या गाडीवर आदळला. त्या अजस्त्र ट्रकच्या धक्क्याने ती इवलिशी चार चाकी गाडी बाजूच्या झाड झुडपात पडली. हा धक्का इतका तीव्र होता की ड्रायव्हर जागच्या जागीच खल्लास झाला. ट्रकवाला अपघात पाहून पळून गेला. बराच वेळ मदत भेटली नाही. काही वेळाने ट्रॅफिक पोलीस आला आणि अपघात पाहून त्याने पोलिसांना आणि रूग्णवाहिनीला बोलावले.
भास्करराव बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले. त्याची तब्येत चिंता जनकच होती. राधिकाला जेव्हा कॉल आला तेव्हा तिला धक्काच बसला. तीपण शेजाऱ्याच्या मदतीने इस्पितळात पोहचली. त्याची अवस्था पाहून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिला एकट्याने हा लढा द्यायचा होता. जो तिचा नवरा होता तो त्या बेडवर धारातीर्थ पडला होता. काही नातलग मंडळी आलेपण ते विचारपूस करून गेले. खरे मदत करणारे कोणीच नव्हते. राधिकाने मेडिकल बंदच ठेवले होते. तिचा पूर्ण दिवस इस्पितळात जात होता. तिने सर्व बचत तोडून, दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. काही दिवसानंतर भास्करराव शुद्धीवर आले. पण त्यांना नीट बोलता येत नव्हते. त्याचे शब्द उच्चार होत नव्हते. पण त्याहून मोठा धक्का म्हणजे त्याचे दोन्ही पाय अपघातात अधू झाले होते. त्यांना आधार देऊन एक महिना चालवण्याचा प्रयत्न केलापण व्यर्थ सारे. भास्कररावांच्या पुढच्या प्रवासाला आता व्हीलचेअर उपयोगी पडणार होती. व्हीलचेअर शिवाय आता त्यांना गत्यंतर नव्हते. पुढच्या आयुष्यात त्याची तीच सखी होती. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पैसा पाण्यासारखा टाकलापण काहीच उपयोग झाला नाही. फक्त त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे भास्करराव अपघातात वाचलेपण त्याचे पाय अधू झाले. राधिकाने एखाद्या हिरकणी प्रमाणे या दुःखाचा सामना केला. त्यात ती कुठेच कमी पडली नाही. तिच्या नवऱ्यालापण बरे वाटले तिचे श्रम आणि तिचे प्रेम पाहून. काही दिवसांनी भास्करराव यांना हलवून महाबळेश्रर येथील इस्पितळात सामील केले. तिथे त्याच्यावर उपचारानंतर त्याचे अधू पाय सोडून बरीच सुधारणा झाली. त्याची अडखळणारी जीभ आता स्पष्ट शब्द उच्चार करत होती. तिथे असताना त्याचे बरेच शेजारी त्यांना पाहायला आणि विचारपूस करायला इस्पितळात आले. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज भेटला. जवळ जवळ दोन महिन्यांनी ते घरी आले. आपले घर पुन्हा पाहायला भेटेल का याची आशा भास्कर रावांनी पूर्णपणे सोडली होतीपण देवाच्या कृपेने आणि त्याच्या राधिकाच्या अथक प्रयत्नांनी ते आज घरी आले होते. राधिका त्याच्या औषधांच्या वेळा टळू देत नव्हती. नित्य नियमाने त्याची औषधे देत असे. पंधरा दिवसांनी त्यांना एकदा इस्पितळात जाऊन डॉक्टरकडून तपासून घ्यावे लागे. गरज असेल तर डॉक्टर औषधे बदलून देत असे. असे करून एक मोठे संकट राधिकामुळे टळले होते. पण राधिकास जे संकट समोर दिसत होते ते बहुधा इतरांना दिसत नव्हते. या उपचारात त्याच्या जवळचा सगळा पैसा अडका संपला होता आणि दागिने गहाण होते. गेले दोन महिने मेडिकल बंद होते. मेडिकल मधली औषधे कोणती वाया गेली आणि कोणती नवीन मागवावी लागतील याचा तिलाही अंदाज नव्हता. आता या मेडिकलची लढाई तिला एकट्याने लढायची होती. कारण पाय अधू झाल्याने तिचा नवरा काही मेडिकलमध्ये येऊ शकत नव्हता.
तिने दुसऱ्या दिवशी गणपतीची पूजा करून मेडिकल ओपन केले. अर्धा दिवस साफ सफाईमध्ये गेला. बरेच जण काम नसताना देखील तिथे विचारपूस करायला येऊ लागले. त्यांना आळा देऊन तिने मेडिकल साफ केले. दुपारी कोणती औषधे आहेत आणि कोणती औषधाची एक्सपायरी डेट निघून गेली हे तिने चेक केले. यानुसार कोणता स्टॉक मागवायचे ते तिने लिस्टिंग केले. आता प्रमुख प्रश्न हा होता की नवीन स्टॉक मागायला तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून तिने आपले गहाण ठेवलेले दागिने विकून त्यातून येणाऱ्या पैश्याने औषधे मागवून तिने आपल्या मेडिकलचा पुनश्च श्रीगणेशा केला. घर, मेडिकल, घरातील जेवण, बाजारहाट या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडल्या. पण जबाबदाऱ्या पडल्या की माणूस उभा राहतो नेमके तशीच ती उभी राहिली. अनेक गोष्टी ती समर्थ पणाने पेलत होती. एक दोन महिन्याने तिचे मेडीकल सुरळीत चालू लागले. मेडिकलमुळे घर सुरळीत सुरू झाले. तिची दिवसभर मेहनत पाहून भास्कररावांना वाईट वाटत असे तसा आपल्या बायकोचा अभिमान सुद्धा वाटत असे. त्यांनी सुद्धा घराच्या स्वयंपाकात लक्ष द्यायला सुरूवात केली. ती मेडिकल सांभाळत असे तेव्हा ते घरी जेवण बनवत असे. त्याच्या लग्नाला दोन आणि भास्कर रावांच्या अपघाताला एक वर्ष उलटले. आता कुठे हरवलेली आणि मोडकळीस आलेली संसाराची घडी पुन्हा बसविली होती. गेली एक वर्ष अपघात या विषयामुळे आपले मूल हा त्याचा विषय बाजूला झाला होता. आता पुन्हा राधिकाला आपले हक्काचे मुल असावे असे प्रकर्षाने जाणवत होते. कधी कधी ती आपल्या नवऱ्या समोर हा विषय काढत असेपण नवरा काही मनावर घेत नसे. शिवाय अधू झालेला पायाने तो तिच्या समोर कसे सेक्ससाठी स्टँड घेईल आणि त्याला सेक्स करायला कसा जमेल यावर प्रश्नचिन्ह उभे होते. पण सगळ्या प्रश्नांचे उत्तर प्रयत्नांत लपले असते असे राधिकाला वाटत होते.