सुषमाच्या लग्नाला आज जवळपास तीन वर्षे होत आली होती. एक साधी गावाकडची पोर ती… लग्न करुन सासरी दुसऱ्या गावात आली. तिचा नवरा दिनकरराव अतिशय प्रेमळ आणि लाघवी स्वभावाचा माणूस. नोकरीनिमित्त दिनकरराव शहरातच राहात असे. काही काम असेल तरच तो गावाकडे येई. नोकरीला तो चांगल्या कंपनीत होता, शिवाय त्याला मोठ्या हुद्द्याची आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती. गावाकडे शेतीवाडी आणि चांगलं घर होतं. घरी आई-वडील आणि दादा-वहिनी हा सगळा शेतीचा कारभार बघत असे. एकूणच कुटुंब सुखवस्तू होतं. दिनकररावसाठी ही मुलगी स्वतः त्याच्या वडिलांनी पसंत केलेली.
लग्न उरकलं आणि नव्याचे नऊ दिवस गावाकडे हसता-खिदळता गेले, त्यानंतर या जोडप्याने मात्र शहराकडे प्रस्थान केले. आज जानकीची अन शहराची नव्याने ओळख झाली. पहिल्यांदाच ती शहरात आलेली. नवा संसार, नवीन शहर, नव्या ओळखी, शहरात पण चाळीत असणारं नवीन घर आणि त्या घरात या नव्या जोडप्याला हवाहवासा वाटणारा भरपूर एकांत…
या सगळ्या गोष्टींनी जणू ती सुखाच्या सागरातच आनंदाने डुंबत होती.
तिला शरीरसुखाची काहीच माहिती नव्हती. सासरहून निरोप घेताना तिच्या आईने मात्र बजावून सांगितलेलं की, नवऱ्याची मर्जी अजिबात मोडायची नाही. त्या गोष्टी तिने व्यवस्थित पार पाडलेल्या. पहिल्यावेळी जेव्हा त्या दोघांत संबंध आलेला तेव्हा रक्ताने भिजलेलं अंथरूण बघून दिनकरराव जणू स्वतःवरच खूष झालेला. तिची कपड्या-लत्त्यापासून खाण्या-पिण्यापर्यंत सगळी हौस तो पुरवत होता. दोघे कुठेही सोबत बाहेर गेले की, पुरूषांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या… पण ती मात्र त्याला भीक घालत नसे. समोर सुंदर स्री बघितली की, पुरूष तिला डोळ्यांनीच उघडी करुन बघतो. कित्येक पुरूषांना ती स्वप्नांची भुरळ घालून पुढे जात असे. दिनकररावाला मात्र मनात उकळ्या फुटत असत. कारण जे लोकांंच्या डोळ्यात त्याला स्वप्न बघायला मिळायचं, ते स्वप्न तो रोजच साकार करत होता. तिला रात्रभर कपडे घालायची परवानगीच तो देत नसे. तिलाही ह्या सुखाची सवय होऊन गेलेली. रात्री जेवणं आणि भांडी आवरली की, ती स्वतःच आतली कपडे काढून फक्त गाऊनवर झोपायला येत असे.
तिच्या सौंदर्याने दिनकरराव पुरता वेडा-पिसा झालेला होता. दररोज कामावरून घरी यायची एक अनामिक ओढ त्याला लागून राहात असे.. सुषमाच्या सहवासात त्याच्या रात्र-रात्र प्रणयात रंगून जात होत्या, तरीही त्याला जणू ते कमीच पडत असे. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं पण सुखावह होतं…
तिचा सुंदर केशसांभार, जो अगदी कमरेच्या खालपर्यंत, तीर-कमानीसारख्या सुंदर भुवया, पतिव्रतेचे पावित्र्य राखलेले तिचे शालीन डोळे, सरळ अन सुबक नाक.. जणू त्या नाकामुळे चमकी नावाच्या अलंकाराला ही शोभा यावी, गुलाबाला लाजवतील असे गुलाबी रेखीव ओठ, व्यायाम करूनही कमावता येणार नाही इतका तंतोतंत आणि सुडौल बांधा, साडी नेसावी तर सुषमानेच…. कारण साडीमध्ये तिच्या सौंदर्याला अजूनच बहर चढत असे आणि तिला बघणारा हा तिला बघतच रहात असे.
रसरशीत यौवनाची देणगीच जणू देवाने तिच्यावर मुक्तहस्ताने उधळून दिली होती.
सगळं खरं… पण…
तिचं हे सौंदर्यच आज तिच्यासाठी शाप बनून गेलेलं.
दिनकररावाला बढती मिळाली पण कामाचा व्याप हळूहळू वाढत चाललेला. घरी उशिरा येणं, अवेळी जेवणं या मुळे सगळा दिनक्रम बिघडून गेलेला. दिनकररावाचा संभोगातला उत्साह जणू हळूहळू मावळत चाललेला. कारण त्याला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. पण तरीही सुषमा खूष होती, तो तिच्यासाठी आणि भविष्यात होणाऱ्या त्यांच्या मुलाबाळांसाठीच कमवत आहे ह्या विचाराने ती समाधानी होती. तो घरी आल्यावर सुषमा त्याची मनापासून काळजी घ्यायची.
नवऱ्याची मर्जी राखायची हे संस्कार तिला माहेरहून मिळाले होते आणि त्याप्रमाणेच ती वागत होती. त्याच्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी, कपड्यांच्या आवडी-निवडी, एवढंच काय तर चेहऱ्यावरुनही ती त्याचा मूड ओळखत असे. त्याला काय हवं-नको पाहण्यातच तिचा सगळा वेळ जात असे. एका नवऱ्याला ह्यापेक्षा आणखी काय हवं असतं?…
अशाच या सुखाच्या दिवसांचं सुख दिवसेंदिवस तिला मानवत चाललं होतं. तिचा बांधा अजूनच रेखीव आणि डौलदार झाला होता.
दररोज ती आतली कपडे काढूनच त्याच्या शेजारी झोपत असे पण दिवसभराच्या थकव्याने तो लगेच घोरायला लागे. त्यांच्यामधले संबंध खूप कमी झालेले पण ती रात्री त्याचे हात पाय चेपायची, डोकं चेपायची, केसांना मालिश करायची आणि तिच्या स्पर्शाने तो पटकन झोपून जायचा.
हळूहळू तिची शेजारी-पाजारी ओळख होत होती. आजूबाजूला चांगली कुटुंब राहात होती. पण त्यातल्या त्यात दिनकरराव कामावर गेले की, आपलं घरकाम आटोपून ती शेजारीच्या घरी म्हणजेच रमाबाईच्या घरी वेळ घालवायला जात असे. रमाबाई साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस वयाची गृहिणी. तिच्याकडे गेलं म्हणजे सुषमाला आपण आईसोबतच बोलतोय की काय असं वाटून जाई. सुषमा रमाबाईंना काकू म्हणून तोंडभरुन हाक मारत असे. त्यांचं चांगलं जमू लागलेलं. जेवणात काही खास बनवलं तरी दोन्ही घरांमधून एकमेकांना दिलं जाई. रमाबाईचा मुलगा मनोहर आणि नवरा आत्माराम कामावर गेल्यावर घरकाम आटोपून ती शिवणकाम करत असे. तिचं शिवणकाम उत्तम होतं. दररोज बायका काही ना काही शिवणकामाचं घेऊन बायका तिच्याकडे येत असत. सुषमाने ते पाहिलं अन तिला सुद्धा आता शिवणकाम शिकण्याची इच्छा वाटू लागली, तिने तसं दिनकररावाना विचारलंही. त्यांचा या बाबतीत काहीच विरोध नव्हता. शिवाय रमाबाईंना ही तिला शिकवण्याबाबत काहीच हरकत नव्हती.
आता दररोज दुपारी जाऊन ती शिवणकाम शिकू लागली. तिचं काकूकडे जाणं-येणं वाढलेलं.
सुखाचा प्रवास इथपर्यंतच होता. आता आपली संसाररुपी होडी किनाऱ्याला लागली असं तिला वाटत होतं. परंतु तिची होडी अजूनच अथांग पाण्यात, वादळी वाऱ्यावर हेलकावे खात होती.
एकाएकी सुषमाची तब्बेत खालावू लागली. तिला कशाचेही भान राहात नव्हते. दिवस-दिवस ती शुन्यात नजर लावून खिन्न होऊन बसे. नैराश्याने जणू तिला झपाटलेलं पण नैराश्य म्हणावं तर ते येण्याचंही काही कारण नव्हतं. तिला स्वतःला ह्या गोष्टीचं मूळ सापडत नव्हतं. तिच्या सोबत सतत कुणीतरी आहे असं तिला वाटायचं. अंघोळीच्या वेळी तर तिला उघड्या अंगाला चक्क स्पर्श जाणवायचे. मनात भिती घेतली होती म्हणून तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.
तिच्या अशा वागण्याने दिनकररावाचेही कशातच लक्ष लागेनासे झालेले.
चांगल्या चाललेल्या संसाराला कुणाचीतरी भयंकर दृष्ट लागावी असं झालेलं..
एके दिवशी दिनकरराव कामावर गेल्यावर रमाबाई अचानक सुषमा कडे आल्या. सुषमाला तिच्याकडे पाहून थोडं हायसं वाटलं. ‘काकू’ असं म्हणत तिने रमाबाईला मिठीच मारली. तिचा काही दु:खाचा भार हलका झाल्यासारखा वाटला. पण याउलट रमाबाई तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसली. असं हसणं तिने आज पहिल्यांदाच पाहिलेलं. त्या हसण्याकडे तिने दुर्लक्ष केलं. कारण तिला पाहूनच बऱ्यापैकी सुषमाला हलकं वाटू लागलेलं.
रमाबाईने मागे वळत पहिला दरवाजा लाऊन घेतला आणि दात-ओठ खात ती सुषमावर जणू मारायला धावून गेली. भितीने तिच्या तोंडून, काकू हे काय करताय? एवढंच बाहेर आलं आणि ती मटकन खाली बसली. रमाबाईच्या अशा अवताराने ती अक्षरशः बुचकळ्यातच पडलेली. मेंदूने काम करणं जणू बंदच केलेलं. तिने गुडघ्यात मान घातली अन ओक्साबोक्शी रडू लागली.. सुषमाला वाटलं की, तिच्या अशा वेडसर वागण्याने काकू कदाचित नाराज असतील म्हणून हक्काने त्यांनी हात उचलला असावा. रडून थोडं मन मोकळं झालं अन हुंदके आवरत रमाबाईकडे बघून ती बोलू लागली…
काकू, हल्ली मला काय झालंय हे काहीच कळत नाही…
मला रात्रीची झोप येईनाशी झालीय, सतत असं वाटतं राहतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेऊन आहे की काय… माझ्या शेजारी सतत कोणीतरी असल्याचा भास होतो. मला स्पर्श देखील जाणवतात.
मी झोपले तर मला काही होईल की काय अशी भिती वाटत राहतेय…
तुम्ही आलात तर मला खूप आधार मिळाला असं म्हणून सुषमाने काकूला परत मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी केली.
सुषमा रडून आणि कळवळून तिचं दु:ख सांगत होती, मन हलकं करत होती पण रमाबाईला त्याच्याशी काहीच घेणं-देणं नव्हतं. तिचं दुःख ऐकून मात्र तिला आसुरी आनंद मिळत होता. तिची अवस्था बघून रमाबाईला अजून हसू येत होतं…
रमाबाईने गळ्यात पडलेल्या सुषमाला ढकललं आणि पुढे होऊन रागातच तिला बोलू लागली..
सुशे, पुरुषांना वेड लावायला आवडतं ना तुला? चापून-चोपून साडी नेसून पुरुषांपुढून ढुंगण हलवत चालायला जास्तच आवडतं ना गं तुला?
घे ना घे… अजून पुरुषांना वेड लावून सुख घे… असं म्हणून ती मोठमोठयाने हसू लागली.
सुषमाला काहीच उलगडा होत नव्हता, ती फक्त काकूकडे आश्चर्याने बघत होती… उलट काकू आज अशा का वागत आहेत याचा तिला प्रश्न पडलेला.