धुकं… धुकं… धुकं… आणि फक्त धुकं दिसत होत खिडकी बाहेर. मी खिडकी खोलून बाहेर गेलो. पण ते धुकं जवळपास नव्हतं. मी जसा जवळ जात तस ते लांब पळत होत. खूपच विचित्र स्वप्न होत ते. थंडीने उठलो मी स्वप्नातून. तशी थंडी आहे खूप पण खिडकी-दरवाजा बंद आहे म्हणून काही जाणवत नाही. त्यात नर्सने माझ्या अंगावर शाल टाकली.
ती स्वेटर घाला म्हणून आग्रह करत होती पण मला नाही आवडत ते. मी नको बोललो. मग तिने माझ्या अंगावर शाल ओढली. आज तर ती औषधांसाठी पण काही बोलली नाही पण मी स्वतःहून मागितली तिला औषध. खुश झाली ती. अशीच रोज आठवणीने गोळ्या घेत जावा म्हणाली. मी वयाने खूप लहान आहे तिच्यापेक्षा तरी पण ती मला मोठ्या माणसांसारखं बोलावते. माझी खूप काळजी घेते ती.
आज मी जाणार म्हणून उदास आहे ती. मला पण वाईट वाटलं. मी तिला सांगितलंय की मी तिच्या प्रत्येक बर्थडेला येईल भेटायला. आता ती माझं सामान भरत असेल. नऊ महिने, नक्की किती? नऊ की दहा महिने झाले असतील मला इथे येऊन. डॉक्टर नर्स सगळेच माझी खूप काळजी घेत होते आणि आत्ताही घेतात. माझ्यासाठी त्याने वयक्तिक नर्स ठेवली. काल मी जरा बाहेर काय गेलो लगेच मला आत घेतलं. म्हणे खूप थंडी आहे लगेच आजारी पडाल. त्यांना काय माहीत मी, काका, बाबा, माझे मित्र भर थंडीत नदीत पोहायला जायचो.
आज हा शेवटचा दिवस आहे माझा इस्पितळातला. डोळे फाडून बघतोय मी खिडकीतून केव्हा पवन मला घ्यायला येतोय. तीन महिन्यांपूर्वी तो येऊन गेला तेव्हा मी ओझरत पाहिलं त्याला. मी बेशुद्धावस्थेत होतो तेव्हा. मी माझं सगळं काम उरकून लवकरात लवकर येईल असं बोलला तो. मला एवढंच ऐकू आल. परवा त्याने कॉल करून कळवलं की मी येतोय. तेव्हापासून मी रोज वाट पाहतोय. आज तो दिवस उजाडला.
माझं लक्ष लागत नव्हत. काही खावंसं पण वाटत नाही, म्हणून आज डायरीमध्ये काहीतरी लिहत बसलोय. दिवस उजाडला पण खिडकीतून धुक्याशिवाय काही दिसत नव्हतं. मी सारखा दरवाजाकडे बघतोय. आता कोणी तरी येईल आणि तो आल्याची बातमी देईल. मग आम्ही घरी जाऊ. खूप गप्पा होतील आमच्या. रात्र पण कमी पडेल एवढ्या गप्पा. म्हणून मी आज सकाळी सकाळीच मी डायरी लिहायला घेतली. मला अजून ही आठवतंय जेव्हा मी आणि पवन…
दरवाज्यावर झालेल्या टकटक आवाजामुळे सुबोधने हातातील पेन तसाच डायरीमध्ये ठेवला आणि डायरी बंद केली. आपल्या दोन्ही हातांनी व्हिलचेअरची चाक फिरवत तो पुढे सरकला
“दरवाजा उघडाच आहे आत या” सुबेधने आतून आवाज दिला तस नर्स आत डोकावली. सुबोधची नेहमीची नर्स नव्हती ती दुसरीच नर्स होती.
“सुबोध बाबा, पवन सर आलेत”.
“माझ्या नर्सला बोलवा तिने माझी बॅग नक्कीच तयार करून ठेवली असेल” सुबोध आनंदाने म्हणाला पण तो आनंद त्याच्या चेर्यावर नव्हता दिसत. “कुठे आहे तो मी आतच भेटायला जातो.”
“ते डॉ.नेगी सोबत बोलत आहेत. तुमच्या नर्स येऊन इथल्या वस्तू गोळा करतील, तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर चला डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत त्या करून झाल्या की तुम्हाला डिस्चार्ज मिळेल” ती हसतमुख होऊन म्हणाली.
“अजून टेस्ट” सुबोधने तोंड वाकडं केलं.
“जास्त वेळ नाही लागणार” नर्सने त्याला विश्वास दिला.
“चला” सुबोध सरळ बसत म्हणाला.
डॉ. नेगीच्या केबिनमध्ये पवन आणि डॉ.नेगी बसले होते.
“हे बघा ही डाव्या पायाच्या हाडांमध्ये जी भेग दिसतेय ती सध्या भरून आली आहे.” डॉ.नेगी दोन्ही एक्सरे हातात धरून सांगत होते.
“सुबोधच्या पायचं ऑपरेशन आम्ही लगेच केलं होतं. तो दाखल झाला त्याच्या एक आठवड्या नंतर. त्यामुळे काळजी करायचे काही कारण नाही. पण तरी ही एक गोष्ट आहे ज्यामुळे सुबोध अजून स्वतःच्या पायावर उभा नाही राहू शकत.”
“काय डॉक्टर?” पवनने विचारलं.
“त्याच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तो ज्यादिवशी दाखल झाला त्याच रात्री ऑपरेशन झालं. पण त्यानंतर तो काहीच बोलला नाही.”
“काय?”
“हो. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही पण तो एक शब्द ही बोलला नाही. मी खूप प्रयत्न केले. पण तो शांत बसायचा काही म्हणायचं नाही. हा! त्याची एक डायरी आहे त्यामध्ये लिहत बसायचा.”
“म्हणजे तो बोलू शकतो ना? मला खूप वाईट वाटतंय की आशा वेळी मी त्याच्या सोबत नव्हतो” पवन पुढे झुकून म्हणाला.
“अहो तो बोलू शकतो. तुम्ही समजता तसं नाही. तो बोलत नाही म्हणजे त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. स्वतःच्या आई-वडिलांना अपघातात जाताना त्याने स्वतः पाहिलं. त्यावेळी आपण पण तिथे होतो. एकाच गाडीत. आ पण मात्र वाचलो. त्यात तो त्यांच्या कोणत्या विधीला ही तो हजर नव्हता. याच त्याला प्रचंड वाईट वाटते.”
“माझ्याकडे पर्याय नव्हता. पोलिसांच्या तपासामुळे खूप विलंब झाला होता. त्यात सुबोधचे उपचार चालू होते. मला त्याला यात नव्हतं ओढायच. त्याला नक्कीच माझ्या या कृतीचा राग आला असणार.”
“तुम्ही जे केले ते योग्य केले. तो अजून लहान आहे त्यामुळे त्याच तुमच्यावर राग धरणे साहजिक आहे.”
“तुमच्यावर खूप जीव आहे त्याचा. तुम्ही येणार हे कळल्यावर जरा कुठे तो बोलला. मला वाटत आता माझं काम संपलंय इथे. त्याच्या शारीरिक जखमा मी बर्या केल्यात, आता राहिल्यात त्या मनावरील जखमा. त्याला या मानसिक धक्क्यातून तुम्ही सावरू शकता अस मला वाटत.”
“अहो तुम्ही स्वतः मानसशास्त्र एवढं जाणता तुम्ही त्याचे उपचार करावे.”
“प्रश्न उपचारांचा नाही पवन. ही केस वेगळी आहे. या जगात सुबोधच आता कोणी उरलंय तर ते म्हणजे तू. हे सुबोधला देखील ठाऊक आहे. त्यामुळे जो मानसिक आधार तू देऊ शकतोस तो कोणताही डॉक्टर नाही. माझी एक इच्छा आहे तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर सांगू का?”
“हा बोला ना डॉक्टर”
“तुम्ही इथेच स्थायिक का नाही होत? म्हणजे भारतात.”
“माझे प्रयत्न चालू आहेत सध्यातरी मी साहेबांशी बोलून भारतातील काही प्रोजेक्ट हातात घेतली आहेत आणि सुबोधसाठी मी घरातूनच काम बघणार आहे जेणेकरून मी त्याला जास्त वेळ देऊ शकेल.”
“मला आशा आहे की तुझ्यामुळे सुबोधची स्तिथी नक्कीच सुधारेल.”
“हो. मी मधून अधून त्याला आणत जाईल तपासणीसाठी त्याला इथे. आता मला निघायला हवं.”
इकडे सुबोध हळूहळू व्हिलचेअरची चाक फिरवत इस्पितळाच्या बाहेर आला. त्याच्या पाठी नर्स होती. तिने सुबोधच सगळं सामान पवनच्या गाडीत ठेवलं.
पवन सुबोध जवळ आला.
“निघायचं?” खाली झुकून हलकस हसत म्हणाला तो.
“हो.” सुबोध कंपित आवाजने म्हणाला.
सर्वांचा निरोप घेऊन ते दोघेही तिथून निघाले. गाडीने वेग पकडला. सुबोधने खिडकीची काच खाली घेतली आणि पाठीमागे जाणार्या झाडांकडे तो पाहू लागला. गाडीत रेडिओ चालू असूनसुध्दा अस्वस्थता जाणवत होती. पवनने गाडी सांभाळत सुबोधकडे एक कटाक्षाने चोरटी नजर टाकली.
“थोड्याच वेळात आ पण हॉटेलमध्ये पोहचू हा!” पवन म्हणला
सुबोध गप्पच होता. निर्विकार चेहरा ठेऊन.
थोड्यावेळाने गाडीतील शांतता तोडण्यासाठी पवन म्हणाला “मला माहित आहे दादा वहिनीच्या अपघातामुळे…”
“मला नाही बोलायचं त्या विषयावर” सुबोध नजर खिडकीतून बाहेर ठेवत म्हणाला.
गाडी हॉटेलच्या आवारात आली. ते हॉटेल म्हणजे एक तीन मजल्याची इमारत होती. जुनी. साध्या लाकडाच्या ओंडक्याच कुं पण होत तिच्या भोवती, तर बाहेरून चढलेले पिवळसर सुकलेले शेवाळ, भिंतीचे निघालेले पोपडे, उगड्या पडलेल्या विटा त्या इमारतिच्या जुनेपणाची साक्ष देत होत्या. इमारत बघताच पवनला हायसे वाटलं.
ते दोघे पण हॉटेलच्या रूममध्ये गेले. बाहेरून जस होत तसच आत हॉटेल होत. साधी एक खोली होती. तिला कामलीची अवकळा आलेली. दार किलकिल झालेले, चौकटी उखडून वर आलेल्या, एकच खिडकी त्यात तिच्या फुटक्या काचांमधून थंड हवा आत येत होती. भिंतीवर शेवटचा हात केव्हा फिरवला हे तर त्या भिंतींना पण ठाऊक नसेल. दूरदूर पर्यन्त काही पर्याय नाही म्हणून पवनने हे हॉटेल निवडलं. खोलीच्यामध्ये बेड होता. भिंतीला लागून एक सोफा आणि त्याच कोपर्यात छोटासा चौकोनी टेबल. सुदैवाने खोलीच्या आतच न्हाणीघर घर होत.
“तू हात पाय धुवून घे मी चहा आणतो” पवन बॅग एका कोपर्यात ठेवत म्हणाला.
सुबोध हळूहळू पुढे सरकू लागला. त्याच्या व्हीलचेअरचा कुरकुरत आवाज त्या खोलीत पसरला. पवनला आ पण काय बोललो ते कळून चुकलं. तो स्वतः उठून न्हाणीघरात जाऊ शकत नव्हता. पवनने सुबोधला न्हाणीघरात नेलं, त्याचे हात-पाय तोंड धुतले आणि चहा आणायला बाहेर गेला. थोड्याच वेळात तो एक पेला हातात घेऊन आला. त्याने तो पेला चौरस टेबलवर ठेवला.
“तू चहा पिऊन घे मी अंघोळ उरकतो” पवन शर्ट काढत म्हणला.
“आता?” सुबोधने विचारलं.
“हा. मला थकल्यासारख झालंय. लगेच आवरतो मी. पवनने कपडे काढले ते खुर्चीवर टेकवले आणि टॉवेल गुंडाळून न्हाणीघराकडे वळाला.” त्याच्या पाठमोर्या देहाकडे सुबोध पाहत होता.
नळ चालू झाल्याचा आवाज येताच सुबोध न्हाणीघराच्या दिशेला सरकला. पाण्याच्या मार्याने कुजलेला दरवाजा मधून भेगाळला होता. त्याला लहान सहान फटी होत्या. त्याच एका फटीतून कुणी चोर नजरीने पाहिलं असत तर त्याला आत एक मदन कुमार स्वतःच अंगावर पाण्याचा वर्षाव करत दिसला असता.
त्या छोट्याश्या न्हाणीघरात पवनच गोर अंग उजळत होत. न्हाणीघरातील खिडकीतून मावळतीच ऊन त्यावर पडल होत. पवनने पाण्याचा तांब्या उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर रिकामा केला. सूर्यप्रकाशत ती पाण्याची धार सोनेरी झाली होती. थंड पाण्यामुळे त्याचे त्वचा आकसली. ते दृश्य पाहणार्याला पवनच्या शरीरावरून खाली ओघळणार्या प्रत्येक थेंबाचा हेवा वाटला असता. डोक्याच्या काळ्या केसांतून घसरत पाणी पवनच्या माथ्यावर आलं त्याच्या पसरट कपाळावर पसरत ते त्याच्या धारधार नाकाच्या शेड्यांवरून थेंब थेंब टिपकू लागलं.
डोळ्यावर पाणी पडताच पवनने पापण्या चाचपल्या. काही थेंब चोर पावलांनी नाकाला धरून चोरून त्याच्या मिशीत शिरले. नक्कीच ते गुदगुदुन थरथरले असणार! कोणी पण त्याच्या मिशांच्या स्पर्शाने असच थरथरल असत. मिशांमधून ओघळत ते थेंब ओठांवर थांबले. ओठांबरोबर तेही गुलाबी झाले. त्यानं खाली जाण्याची इच्छा नसावी, तेवढ्यात पवनचाने स्वतःच्या चेहर्यावरून हात फिरवला आणि ते थेंब खाली घसरले.
घसरले ते जाऊन सरळ छातीवरील केसात जाऊन अडकले. काही थेंबानी तर सरळ त्याची स्तनाग्रे पकडली. भरदार गोलाकार छातीवरून ते निप्पलच्या टोकावर जाऊन अडकले. एखादया हिर्या प्रमाणे ते सूर्यप्रकाशात चमकत होते. छातीवरून खाली केसांची रांग पकडत ते थेंब सपाट पोटावर आले. बेंबीची दरी पार करत ते पुढे गेले. ओटीपोटी वरून रांगत ते खाली सरकले. पण बेचारे पवनच्या अंडरवेअर मधेच जिरले. तिथे एखादा असता तर केव्हाच ती अंडरवेअर ओढून काढली असती.