दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त “लवकरच भेट्” इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर टॅक्सीवाल्याला पाचशेची नोट दिली आणि आकाशला हवे तिकडे नेऊन सोडायला सांगितले. टॅक्सी निघताच आकाशने प्रेरणाला फोन करून फक्त निघाल्याचे कळवले. टॅक्सीवाला भय्या असला तरी त्याच्यासमोर काहीही बोलायला आकाश तयार नव्हता. फोन ठेऊन त्याने मागे मान टेकली. नकळत त्याच्या ओठावर शब्द रेंगाळले…
हम बेवफा हरगीज ना थे पर हम वफा कर ना सके… हमको मिली उसकी सजा हम जो खता कर ना सके…
घरी पोहोचल्यावर आकाशने बेल दाबली. त्याला शंभर टक्के खात्री होती की प्रेरणा आज कुठेही न जाता घरीच असेल. बेलचा आवाज संपूर्णपणे विरायच्या आतच आतमधून धावण्याचा आवाज आला. पाठोपाठ धडपडत दरवाजा उघडला गेला. समोर प्रेरणा उभी होती. तिच्या चेहेर्याकडे बघताच कुणीही सांगितले असते की ती रात्रभर झोपली नव्हती. डोळे झोपेने आणि रडून लाल झाले होते. चेहेरा उतरला होता. अंगावरील गाऊन चुरगळला होता. फक्त तिच्या डोळ्यात एक चमक होती. आकाशच्या चेहेर्याकडे लक्ष जाताच हळूहळू ती चमक विझली. डोळ्यांच्या गारगोट्या झाल्या. चेहेर्यावर सर्वस्व गमावल्याचे भाव आले. निर्णय तिचाच असल्याने फक्त ती रडत नव्हती.
तिने आकाशला काहीही विचारले नाही. हाताला पकडून तिने त्याला घरात घेतले. दार लावून ती मागे आली. दाराच्या आतच तिने आकाशला उभे केले. एकएक करत ती त्याच्या कपड्यांवर तुटून पडली. प्रत्येक कपडा तिने त्याच्या अंगावरून काढला आणि चिमटीत पकडून बाजुला टाकला. तिच्या मनस्थितीची कल्पना असलेला आकाश काहीही न बोलता तिला हवे ते करू देत होता. कुणाला तरी ‘पोहोचवून’ आल्यावर एखाद्याला वागवावे तसे तिचे वागणे होते. इथे आकाशही आपल्या एकनिष्ठतेला तिलांजली देऊन आला होता.
आकाशला संपूर्ण नग्न करून ती बाथरूममध्ये घेऊन गेली. आकाशला तिने तसेच शॉवरखाली उभे केले. स्वतः पुढे झाली आणि स्वतःच्या कपडयांची परवा न करता तिने आकाशला साबण लावायला घेतला. आकाशला संपुर्ण अंगभर खसाखसा चोळून ती साबण लावत होती. जणुकाही त्याच्या शरीराला झालेला प्रत्येक स्पर्श तिला धुवून काढायचा होता. आकाशच्या गुप्तांगावर तर ती इतकी खसखसून रगडत होती की आकाशला वेदना व्हायला लागल्या. तिच्या भावना समजुन घेऊन आकाश होणार्या वेदना पचवत राहिला.
शेवटी प्रेरणा त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. तसाच नागड्याने त्याला बेडवर झोपवून ती त्याच्या कुशीत शिरली. अजिबात आवाज येत नसूनही आकाशला अश्रु जाणवले. तिला तसेच कुशीत घेऊन तो पडून राहिला. मूक अश्रु गाळत दोघेही कधीतरी झोपेच्या ग्लानीत गेले. झालेल्या प्रकाराने दोघांनाही भुकेची जाणीव नव्हती. पण शरीरधर्म कुणाला चुकला आहे? दुपारी उशिराने उपाशी पोट टाहो फोडायला लागले आणि दोघांना जाग आली. इच्छा नसूनही दोघेही उठले. काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी खायला आणायला प्रेरणा किचनमध्ये गेली. आकाश घरचे कपडे घालुन बाहेर आला. तेवढयात आकाशचा मोबाईल वाजला. अजिबात इच्छा नसूनही फोन आपल्याच ऑफिसमधुन आला असल्याने आणि प्रेरणाही घरीच असल्याने झकत फोन उचलणे भाग पडले. फोनवर आकाशचा सेल्समधला विश्वासू माणूस होता जो आकाशला त्याच्या अनुपस्थितीत सेल्समध्ये मदत करायचा.
शेवटी प्रेरणा त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. तसाच नागड्याने त्याला बेडवर झोपवून ती त्याच्या कुशीत शिरली. अजिबात आवाज येत नसूनही आकाशला अश्रु जाणवले. तिला तसेच कुशीत घेऊन तो पडून राहिला. मूक अश्रु गाळत दोघेही कधीतरी झोपेच्या ग्लानीत गेले. झालेल्या प्रकाराने दोघांनाही भुकेची जाणीव नव्हती. पण शरीरधर्म कुणाला चुकला आहे? दुपारी उशिराने उपाशी पोट टाहो फोडायला लागले आणि दोघांना जाग आली. इच्छा नसूनही दोघेही उठले. काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी खायला आणायला प्रेरणा किचनमध्ये गेली. आकाश घरचे कपडे घालुन बाहेर आला. तेवढयात आकाशचा मोबाईल वाजला. अजिबात इच्छा नसूनही फोन आपल्याच ऑफिसमधुन आला असल्याने आणि प्रेरणाही घरीच असल्याने झकत फोन उचलणे भाग पडले. फोनवर आकाशचा सेल्समधला विश्वासू माणूस होता जो आकाशला त्याच्या अनुपस्थितीत सेल्समध्ये मदत करायचा.
“सर, सपकाळ बोलतोय. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण काम अर्जंट होतं. प्लीज तुम्ही ऑफिसला येऊ शकता?
आत्ता? ‘रॅविशिंग इंडस्ट्रीज’ मधुन आपल्या मालासाठी कोटेशन हवे आहे. पार्टी खूप मोठी आहे म्हणुन तुम्हाला सांगितले.”
सपकाळचे म्हणणे बरोबर होते. ‘रॅविशिंग’चे बरेच नाव होते. हा क्लायंट घालवणे परवडण्यासारखे नव्हते. विशेषतः ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’च्या भरोशावर उभारलेले सगळे इमले पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतर तर नाहीच नाही. मनातल्यामनात शिव्या घालत आकाशने सपकाळला येण्याचे कबुल केले. तसेही घरी बसून करण्यासारखे काही नसल्याने प्रेरणासुद्धा तयार झाली आणि दोघे ऑफिसला पोहोचले. आकाशने मन लावून सगळ्या गोष्टींचा विचार करून एक कोटेशन बनवले आणि फॅक्स पाठवला. काम झाले म्हणुन निघायची तयारी करत असताना चक्क फोन आला. ‘रॅविशिंग’चा पर्चेसिंग मॅनेजर स्वतः बोलत होता. त्याने किमतीवरून घासाघीस करायला सुरवात केली. तो माणुस स्वतःच्या पोझिशनला अत्यंत लायक होता. त्याने आकाशला त्याचा प्रॉफ़िट कमीतकमी ठेवायला भाग पाडले. केवळ मोठे नाव आणि मोठी ऑर्डरच्या आशेने आकाश तयार झाला. नविन किमतीचे कोटेशन पाठवून दोघे घरी परतले.
रात्र गुमसुम गेल्यावर दुसर्या दिवशी ऑफिसला पोहोचले आणि त्यांना धक्का बसला. ‘रॅविशिंग’ची पर्चेस ऑर्डर येऊन पडली होती. सगळेच वाईट होत असताना काहीतरी चांगले घडले होते. सगळीकडे काळोख असताना कुठेतरी आशेचा किरण दिसला. ‘बुडत्याला काडीचा आधार’ मिळाला होता. ऑर्डरची प्राईज जास्त नसेल तरी क्वांटिटी जास्त होती. आश्चर्य म्हणजे किमतीवरून इतकी घासाघीस करणारी कंपनी चक्क ऍडव्हान्स दयायला तयार झाली. मुरझलेल्या झाडाला पालवी फुटली. आकाश आपल्या कामात हुशार होताच. त्याला प्रेरणाच्या व्यवस्थितपणा आणि चोख व्यवहाराची साथ मिळाली. एक महिना दिवसरात्र काम काम आणि फक्त काम केले गेले आणि बुडीतखाती कंपनी बघता बघता वाचली. आता कमीतकमी दोन वेळच्या जेवणाची आणि कंपनी जप्त होण्याची भ्रांत नव्हती.
अजुन एक महिना गेला आणि आता आकाश आणि प्रेरणा आश्वस्थ झाले. आपल्यातही स्पार्क आहे आणि आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवू लागला. एकांतात बोलताना राजश्री प्रकरणाबद्दल आणि एकूणच तेव्हा घेतलेल्या डिसिजन बद्दल दोघांना वाईट वाटत असे. त्यातून राजश्रीचा तेव्हापासुन एकदाही साधा फोनही नसल्याने जाणवणारे दुखः वाढतच असे. पण पॉझिटीव ऍटिट्यूडमुळे दोघेही तो प्रसंग एक स्टार्टीग पोईंट म्हणुन बघत असत. त्याच दिवसानंतर ही ऑर्डर मिळाली म्हणुन दोघांनी तो प्रसंग मागे टाकून पुढे वाटचाल सुरु केली होती.
आणि तब्बल दोन महिन्यांनी प्रेरणाचा फोन वाजला. नंबर ओळखीचा नसल्याने जरा साशंकतेने तिने फोन उचलला. बायकी आवाजही ओळखीचा नाही, पण बोलणे एखादया जुन्या मैत्रिणी प्रमाणे. जरावेळ टाईमपास केल्यावर शेवटी तिने सांगितले
“अग प्रेरणा, मी राजश्री बोलते आहे… दिल्लीहून… उदया येते आहे मुंबईला. संध्याकाळी माझ्या हॉटेलवर भेटू…”
अचानकपणे राजश्रीचा फोन, तिचे आमंत्रण? आणि त्यात आकाशचा उल्लेखही नाही. आमंत्रण फक्त प्रेरणासाठी होते का दोघांसाठी? का फक्त आकाशसाठी? गेल्या वेळी घेतलेल्या मजेची परत आठवण झाल्याने आलेलं? बंड करणार्या शरीराला थंड करण्यासाठी परत आकाशची आठवण आली? पण मग आकाशच्या फोनवर फोन न करता प्रेरणाच्या फोनवर का केला फोन? आणि जर तिने परत आकाशची मागणी केली तर? एकदा ते दिव्य केलं… त्यातून काहीही मिळाले नाहीच, वर मनस्ताप झाला तो वेगळा… परत करू धजू आपण? एक संपूर्ण दिवस आणि रात्र दोघेही ह्याच विषयावर काथ्याकूट करत बसले. शेवटी प्रेरणाने तिला जाऊन भेटावे आणि आकाशने काहीतरी जाऊ नये असे ठरले.
घाबरतच प्रेरणाने राजश्रीच्या सुटच्या दारावर नॉक केले. दारात उभ्या असलेल्या राजश्रीला बघून प्रेरणा चाट पडली. आकाशच्या वर्णनावरून राजश्री सुंदर आहे हे कळले होते पण तिचे सौंदर्य इतके लोभस असेल असे वाटले नव्हते. शिवाय प्रेरणाच्या बायकी नजरेने एक गोष्ट अचूक टिपली. आकाशने वर्णन केल्याप्रमाणे राजश्रीच्या कपाळाला आत्ताही टिकली होती, अगदी ती जीन्स टी-शर्ट मध्ये असुनही. तिला तशा रुपात बघताच प्रेरणाला तिच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण झाला. थोडयाशा पूर्वग्रहदूषित मनाने प्रेरणा बळेच हसली. राजश्रीने मात्र प्रेरणाकडे बघून एक स्वच्छ शुभ्र हास्य केले. त्या मनमोकळ्या हास्याने नकळत प्रेरणाच्या मनातील गाठ किंचित सैल झाली. प्रेरणाच्या हाताला धरून एखाद्या फार जुन्या जवळच्या मैत्रिणीप्रमाणे राजश्रीने तिला आत नेले.