घनदाट जंगलात त्याने प्रवेश केला होता, ट्रॅकिंग आणि जंगल सफारी ही त्यांची आवडती गोष्ट… त्याच्या धकधकीच्या जीवनातून तो २० दिवस दर वर्षी राखीव ठेवायचा ते ही त्याची ही आवड जपण्यासाठी… आणि आज ही तो खूप उत्साहात त्याच्या २५ व्या ट्रेकसाठी सज्ज होता… खूप आनंदात आणि उत्साहात त्याने प्रवासाची सुरूवात केली… त्याने जंगलात प्रवेश केला तसा त्याला खूप सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला… तो खूपच आनंदी फिल करायला लागला…
इकडे रती मात्र भयानक खुश होती, कारण तिची शेवटची ३२ वी शिकार तिच्या जाळ्यात अडकला आली होती, आणि ही शिकार खूप खास होती, कारण तो ३२ वा नंबर होता, आणि ती सगळ्यातून मुक्त होणार होती…
रक्षत हळू हळू पुढे सरकत होता, त्याने बरेच फोटो वैगेरे काढले
ऊन वाढल तसा तो एका झाडा खाली बसला… त्याने त्याची बॅग काढली आणि त्यातून पाणी पिल, थोड फार खाल्ल आणि आराम करायला बसला… ४ला त्याने पुन्हा चालायला सुरूवात केली…
रात्र खुलत होती, आणि रतीचा त्याच्या वरचा अंमल वाढत होता, त्याच्या ही नकळत…
त्याने टॉर्च चालू केली आणि आणि आता टेंट साथी तो चांगली जागा शोधू लागला… पण एकाएकी जोरात पाऊस चालू झाला…
हवा जोरात वाहायला लागली… आणि आता तरी त्या पावसात टेंट लावण शक्य नव्हत… त्याने झाडाचा आडोसा शोधला आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागला… पण पाऊस काही थांबत नव्हता, उलट जोर जास्तच वाढत होता… काय करावं हे रक्षतला समजत नव्हत… त्याला असे प्रसंग नवीन नव्हते, पण आसा पाऊस त्याने कधी अनुभवला नव्हता, त्याला आता खूपच थंडी भरून आली…
वाट बघण्या शिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता…
तितक्यात त्याला लांबून प्रकाश दिसला… नक्की काय होत ते समजल नाही, पण तो प्रकाश हळू हळू जवळ येतो आहे ते मात्र नक्की जाणवलं… त्या भयानक वातावरणात त्याला भीतीची एक लहर मनात उमटली…
हळू हळू पैजनांचा आवाज यायला लागला… आणि अगदी जवळ आल्यावर त्याची नजर जणू कोणीतरी बंदिस्त केली अस वाटलं…
रक्षत तिच्या सौंदर्यात अवडकून पडला…
तीचे लांब सडक केस तिने वेणी बांधून पुढे टाकले होते, तिचा कमनीय बांधा, हिरवेगार डोळे, लालचुटुक ओठ, गोबरे गाल, गव्हाळ वर्ण, मध्यम उंची, घनदाट पापण्या तिने केलेला फुलांचा शृंगार, तो ते बघतच राहिला तिच्याकडे…
पावसामुळे ती भिजली होती, पण तिच्याकडे असणारा कंदील मात्र बरोबर उजेड देत होता, तिने त्याला आवाज दिला तरी ही तो तिच्यात हरवला होता, तेव्हाच जोरात वीज कडाडली… आणि तो भानावर आला… तेव्हा तिने विचारले…
“कोण तुम्ही?? आणि इतक्या रात्री इथे काय करता आहात??”
“मी, मी रक्षत, या जंगलात ट्रकसाठी आलो आहे, टेंट ठोकणार होतो पण त्या आधीच पाऊस सुरू झाला, आणि थांबायच नावच घेत नाहीये… त्यामुळे इथे थांबलो होतो… पण तुम्ही कोण आणि अश्या रात्रीच्या जांगणालात कश्या काय?”रक्षत बोलला…
“मी इथे कशी म्हणजे, मी इथेच राहते, जवळच माझं घर आहे, लाकड तोडायला गेले होते, आणि फळं काढताना उशीर झाला, आणि पाऊस पण सुरू झाला…”तिने मागे झोळीत ठेवलेली फळ आणि लाकड दाखवली.
“ओ, पण जंगलात तुम्ही एकट्या राहता?”त्याने कुतूहलाने प्रश्न विचारला, आणि तुम्हाला मराठी येत?”कारण तो भाग आपला नव्हता, तिथली भाषा वेगळी होती, पण तिला मराठी बोलताना बघून त्याला नवल वाटलं…
“हो येत, मी इथली नाहीये, माझे पूर्वज खूप आधी आले होते इथे, आणि इथेच राहिले, त्यामुळे भाषा येते, आणि हो मी एकटीच राहते, म्हणजे मी आणि माझे वडील, ते काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले आहेत, येतील काही दिवसांत”तिने ही सांगितल…
“भीती नाही वाटत इथे?”त्याने पुन्हा प्रश्न विचारला…
“भीती कसली? इथे फक्त प्राणी आहेत, माणस नाही घाबरून जायला, ती थोड हसून बोलली, आणि रक्षतला टोमणा समजला…
“मान्य आहे माणसांनी जंगलं, निसर्गाची वाट लावली आहे, पण सगळेच तसे नसतात ना”त्याने ही उत्तर दिलं…
“हो नसतात, आणि मी ही सगळ्यांना नाहीच बोलले, बर चला तुम्ही माझ्या घरी हापासून रात्रभर थांबणार नाही… इथे भिजत थांबव लागेल”…
“नाही नको, अस तुम्ही एकट्या असताना घरी येणं बर दिसत नाही”
तो थोडा संकोचून म्हणाला…
“इथे गाव किंवा वस्ती नाही कोणी काही बोलायला, तुम्हाला तुमच्या वर विश्वास आहे ना मग झालं तर चला, “रती बोलली…
तिने बरेच समजुन सांगितले तेव्हा रक्षत तिच्या मागे निघाला…
काही अंतरावर तीच घर होत, ते घर बघून त्याचे डोळेच दिपून गेले…
घनदाट जंगलात असलेलं ते लहान घर, लाकडाने बनवलं होत, जमिनीवरून काही अंतरावर ते बांधल गेलं होत, त्यामुळे प्राण्यांचा धोका नव्हता, त्याला रे घर खूप आवडल… आणि तो आनंदात आत गेला.
तिने गेल्या गेल्या घरात सगळीकडे आधी कंदील आणि दिवे लावले… त्यामुळे घर खूप छान दिसू लागलं…
तिने चूल पेटवली आणि पाणी उकळत ठेवल आणि त्यात भाज्या फळ वैगरे चिरून टाकला… आणि ते निखार्यावर हळू हळू शिजायला टाकला… तिने त्याला बदलायला तिच्या वडिलांचे धोतर आणि दिले, त्याने पटकन कपडे बदलले, त्याच्याकडे त्याचे कपडे होते ते त्याने घातले… २ खोल्या होत्या तिच्या घराला… इतका पाऊस होता, पण जराही हवा किंवा पाणी आता येत नव्हत… चुलीच्या आगीमुळे घराला चांगली ऊब मिळाली होती… तो तिच्या चुली शेजारी बसायला जाणार होता, तर तिने आडवले… म्हणून तो गप्प बसला.
तर तिने काही जळते निखारे एका पत्र्याच्या शेकोटीत टाकून आणले आणि ते दोघे आतल्या खोलीत बसले… ते त्याला खूपच आवडलं… तिने त्याच्यासाठी आत अंथरूण घातक आणि स्वतःसाठी बाहेरच्या खोलीत घातलं… रक्षत पटकन अंथरूणात शिरला…
तिने शेकोटी आणली होती त्याची ऊब लागत होती, चालून थकला होता तर झोप ही येत होती, पण भूक ही कागली होती… तोपर्यंत बसून राहण त्याने पसंत केलं… रती तीच आवरून आत आली आणि शेकोटी शेजारी बसली… आणि त्यांचा गप्पा सुरू झाल्या…
“थोडा वेळ लागेल जेवण शिजायला, हळू हळू शिजल की सगळा रस चांगला उतरतो पाण्यात…”रती
“काही हरकत नाही, मला इतकी ही भूक नाहीये, तुमचं घर खूपच छान आहे”रक्षत घराचं निरीक्षण करत बोलला…
त्यांच्या गप्पा हळू हळू फुलत होत्या, रक्षत आता चांगलाच खुलला होता… तिने चुलीवर जे काही शिजायला टाकल होत त्याचा वास पसरला होता, आणि त्याची भूक वाढत होती… तिने ते बरोबर ओलखल आणि ती जेवणाची तयारी करायला गेली… काही वेळाने तिने रक्षतला आवाज दिला…
तिने गरम गरम भाज्या फळ टाकून केलेलं सुप त्याला दिलं, अंडी उकडली होती ती दिली, भात दिला… त्याने जेवणाचा आस्वाद घेतला
, पहिल्यांदा त्याने इतकं रूचकर जेवण खाल्ल होत, खूप जास्त भूक लागली की जेवणाची चव अगदी काळजाला जाऊन भिडते, तसच त्याच झालं होत, तो खूप कौतुक करून जेवण करत होता, त्यामळे रती ही खूप खुश झाली…
पण रक्षतला येणार्या संकटाची अजिबात चाहूल नव्हती…
रक्षतने त्या चविष्ट जेवणाचा आनंद घेतला होता… आता त्याच्या
डोळ्यांवर झोप यायला लागली होती, पण का कोण जाणे त्याला आत्ता झोपायच नव्हत… एक वेगळीच भावना त्याच्या मनात घेर्या घालत होती… आज कदाचित तो वेगळ्या नशेत गेला होता, आणि तो हे जग सोडून जाणार आहे, आजचा दिवस त्याच्या लाईफचा शेवट आहे अशी भावना मनात येत होती… त्याने थोडा वेळ बाहेर जाऊन यायचं ठरवलं, नशिबाने पाऊस ही थांबला होता… त्याने बाहेरच्या खोलीत हळूच पाहिलं तर रती झोपली होती…
ती त्याकडे पाठ करून झोपली होती… पण तिची झोपलेली पाठमोरी प्रतिमा रक्षतला संमोहित करू लागली होती…
तिचे लांब रेशमी केस वेलवेट सारखे मागे अंथरूणावर पसरले होते…
तिची नाजूक, कमनीय उघडी कंबर त्याच्या काळजचा ठाव घेत होती… त्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात तिची कांती उजळून निघाली होती… पायात असलेले पैंजण ही त्याला कमालीचे आकर्षित करत होते… तिच्या शरीराची लयबद्ध ठेवण त्याला त्या थंडीत कमालीची उष्णता देत होते… त्याला त्याच्या अश्या वागण्याचं आश्चर्य वाटलं होत… इतक्या थंडीत त्याला आता घाम फुटायला लागला होता… त्याला तिची नशा चढत होती आणि तो भयंकर उत्तेजीत होत होता… त्या अवस्थेत जर रतीने त्याला बघितल असत तर त्याची किती पंचायत झाली असती…
त्याने त्याच्या विचारांना खूप कष्टाने आवर घातला आणि बाहेरचा रस्ता पकडला… त्याने मोठा श्वास घेत गळ्यात असलेलं नरसिंह देवाचं
लॉकेट पकडून धावा केला आणि दरवाजा उघडला… बाहेरून हवेची शहारा आणानरी एक मोठी झुळूक आली… आणि त्याची पावलं पुन्हा एकदा थांबली, काही क्षण बाहेर नको जाऊया असा विचार आला मनात… पण पुन्हा त्याचा त्याच्या विचारांचा विजय झाला आणि तो बाहेर पडला…
त्याने बाहेर पाऊल टाकलं आणि इकडे रती भयानक रागाने पेटून उठली… तिचे डोळे आग ओकत होते, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या…
पूर्ण जंगल जरी तिच्या अंमला खाली असेल तरी ती रक्षतला कोणत्या ही प्रकारची जबरदस्ती करू शकत नव्हती… म्हणून त्याला तिच्या सुंदरतेने, आणि तिच्या त्या नशिल्या जेवणाने त्याला वश करण्याचा प्रयत्न करत होती, पण यात त्याच्या गळ्यात असलेलं लॉकेटमध्ये आलं होत, ती त्याला थांबवण्यासाठी निसर्गाचे नियम बदलू शकत नव्हती, पण ती निसर्गाला वश नक्कीच करू शकत होती… म्हणून तो मुसळदार पाऊस पडला होता, आता ही हवा सुटली होती, ती सगळे प्रयत्न करणार होती, कारण तिची हे शेवटची शिकार होती…