रविवार- (२५ फेब्रूवारी)
विशाल: सारिका एक प्रॉब्लेम झालाय.
सारिका: काय विशाल?
विशाल: आताच त्या मूवरस् अँड पॅकरसचा फोन येऊन गेला. ते म्हणालेत की त्यांची २७ आणि २८ तारखेला दुसरी एक मोठी ऑर्डर आहे. त्यामुळे त्यांना त्यादिवशी आपली शिफ्टिंग जमणार नाही.
सारिका : पण आ पण तर २ आठवड्या अगोदरच बुकिंग केली होती ना.
विशाल: आपली बुकिंग त्यांनी पेंडिंग ठेवली होती. त्यांच्या माणसाने चुकून रेकॉर्डमध्ये वेळ आणि जागा अपडेट केली नव्हती, आता त्यांच म्हणणं आहे की एकतर ऑर्डर कॅन्सल करा, नाही तर उद्या सकाळी ते येऊ शकतात.
सारिका: असं कस करू शकतात ते, त्यांची चुकी आहे, आ पण तर बुकिंग केल होतं ना. उदया सकाळी आपल्याला कसं जमणार. जरी सकाळी रेडी झालो तरी आ पण जायचं कुठे? हवं तर दुसरीकडे चेक करा.
विशाल: दुसरे मूवरस् अँड पॅकेरस एवढ्या कमी वेळात शक्य नाही आहे.
सारिका: शी बाबा!! मग आता काय करायचं?
सारिका आणि विशालची चर्चा चालू असताना दारावरची बेल वाजली, विशालने कीहोल मधून चेक केले. बाहेर राहुल उभा होता.
विशाल: बाहेर राहुल आलाय.
सारिका: राहुल? हा आता कशाला आला असेल, तुम्ही दरवाजा उघडा, आणि त्याच्यावर रागावु नका हा प्लिज.
विशाल: ओके.
विशालने दरवाजा उघडला, राहुल मान खाली घालुन दरवाजात उभा होता. त्याच्या हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ होता.
सारिका: हे राहुल, आत ये.
राहुल: गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग सर
विशाल: ह्म्म्म गुड मॉर्निंग
सारिका: तुझ्या हातात फुलं??
राहुल: तुमच्यासाठी आणलीत… मॅडम, विशाल सर मी काल खूप चुकीचं वागलो. तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय. आय एम रियली सॉरी, (फुलांचा पुष्पगुच्छ सारिकाजवळ पुढे करत)
सारिका: थँक यु राहुल.
राहुल: आय होप… तुम्ही दोघे मला माफ कराल.
विशाल: आय एम अल्सो सॉरी राहुल.
राहुल: नाही सर तुम्ही सॉरी नका बोलू. तुम्ही बरोबर बोलत होतात.
विशाल: तुला तुझी चुकी समजली त्यातच सगळं आलं.
सारिका: खरं आहे. तू आता वाईट नको वाटून घेऊस.
राहुल: नाही मॅडम… तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप काय केलंय तर मला पण तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. (सारिकाच्या हातात कागदाचे पाकीट देत)
सारिका: हे काय आहे?
राहुल: माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी एक छोटंस फेअरवेल गिफ्ट.
सारिकाने पाकीट ओपन केले. त्यामध्ये एअरपोर्टच्या जवळच्या ५ स्टार हॉटेलची दोन रात्री राहण्याची बुकिंग रिसिट होती.
सारिका: ओह माय, ही तर हॉटेल रिजन्सी २ स्टे नाईट बुकिंग रिसिट आहे.
विशाल: व्हाट?
सारिका: ह्याने आपल्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलसाठी रूम बुक केली आहे.
राहुल: मला माहिती आहे तुम्ही २७ तारखेला हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे. मला तुम्हाला जाताना काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी फाईव्ह स्टारमध्ये तुमच्यासाठी २ दिवसाचं बुकिंग करून टाकलं. आय होप तुम्हाला हे गिफ्ट आवडेल.
सारिका: नाही राहुल, मी हे नाही घेऊ शकत.
राहुल: प्लिज मॅडम, उद्या संध्याकाळी आम्ही तिघेही तुमच्या आणि विशाल सरांसोबत डिनरला हॉटेल मंध्ये येणार आहोत.
विशाल: अरे खूप कॉस्टली दिसतंय. एवढा खर्च का केलास?
राहुल: पैशाचं काय आहे सर… माझ्या भावाकडे भरपूर आहे. त्याचीच इच्छा होती जाताना तुम्हाला ग्रँड सेंडऑफ द्यावा.
सारिका: राहुल… पण
राहुल: प्लिज मॅडम नाही म्ह्णू नका.
विशाल: हा तर योगायोग समाजावा, आम्ही उद्या राहण्यासाठी आसराच बघत होतो, तू तर आमचा प्रॉब्लेमच सॉल्व केलास.
सारिका: विशाल तुम्हाला चालणार आहे असं एवढं मोठं गिफ्ट.
विशाल: तो एवढं प्रेमाने देतोय तर जाताना आ पण त्याला नाराज नको करू या.
सारिका: ओके बरं ठीक आहे… थँक्स राहुल.
राहुल: तुम्हाला पॅकिंगसाठी काही मदत हवी आहे का?
सारिका: नाही, तुम्ही तिघांनी शाळेत जायचं आहे. दांडी मारू नका, पॅकेरस सकाळी येणार आहेत. आम्ही सर्व आवरून दुपारी हॉटेल वर जाऊ. तुम्ही संध्याकाळी या, आ पण एकत्र डिनर करू.
विशाल: डिनरचे बिल मी देणार हा.
राहुल: नाही सर डिनर पूर्ण पॅकेजमध्ये इन्कलुड आहे.
विशाल: ओह ग्रेट.
राहुलने सर्व वातावरणातच एका क्षणात बदल घडवला होता.
दुपारी २ वाजता
सारिका: मी दोन बॅगस पॅक करून ठेवल्या आहे. एक हॉटेलसाठी आणि एक अहमदाबादसाठी.
विशाल: आणि आदीचे कपडे.
सारिका: त्याची सेपरेट एक बॅग आहे.
विशाल: माझा विचार आहे आदीला तीन दिवस तुझ्या आई बाबांकडे ठेवू या. तसं आज फेअरवेल पार्टीला जाताना त्याला तिकडे ड्रॉप करणारच आहोत.
सारिका: तीन दिवस??
विशाल: हो, अगं… उद्या आ पण पॅकिंग करून हॉटेलमध्ये जाणार आहोत. २७ला तुला काही तासासाठी शाळेत जायचं आहे. मला पण ऑफिसला जावं लागणार आहे. मग आदीला सांभाळायला कोणच नसणार आहे.
सारिका: तुम्ही बोलताय ते पटतंय मला. मला सुद्धा २७ला शाळेतल्या पूजेला जायचं आहे.
विशाल: पूजा कसली.
सारिका: अहो, निर्मला मॅडमनी मुलांच्या प्रगतीसाठी पूजा ठेवलीय.
विशाल: अरे त्यांना म्हणावं अशी पूजा ठेवून कोण पास होत नाही, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.
सारिका: तुमचा विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे. मी जाणार आहे.
विशाल: नशीब तू मला घेऊन जात नाही आहेस.
सारिका: मला माहिती होतं तुम्ही येणार नाही ते… म्हणून तुम्हाला विचारलच नाही.
विशाल: मग आ पण तुझ्या आई बाबानाच २८ला सकाळी आदीला घेऊन डायरेक्ट एअरपोर्टलाच बोलवू या.
सारिका: ओके, तेच ठीक राहिल. त्याला आजीआजोबा बरोबर काही दिवस रहाता तरी येईल.
विशाल: हो.
सारिका: आपल्याला पार्टीला किती वाजता निघायचय.
विशाल: सहा- साडे सहा वाजता निघु… आदीला ड्रॉप करून ७ वाजता आपल्याला पार्टीला पोचता येईल.
सारिका: मला आतापासूनच तयारी करायला लागेल.
विशाल: हो, तुला तयार होयला जास्त वेळ लागतो.
सारिका: कुठली साडी नेसू आज? ही चालेल का (कपाटातली साडी दाखवत)
विशाल: मला वाटतं तू आज पार्टी ड्रेस घालावा.
सारिका: पार्टी ड्रेस?
विशाल: राहुलच्या बर्थडेला तू तो घातला होतास ना.
सारिका: स्टुपिड… तो शॉर्ट स्कर्ट होता. तुमच्या ऑफिसच्या कलीगसमोर मी तो घालू काय?
विशाल: अरे… तू बर्थडे पार्टीला घातला तर चालतो?? जिममध्ये स्पोर्ट ब्रा चालते?? मग पार्टीला शॉर्ट स्कर्ट का नाही चालणार.
सारिका: (लाजत) काल तर मला ओरडत होतात, मुलांसमोर शॉर्ट स्कर्ट घातला म्हणून.
विशाल: ती मुलं तुझ्या चांगुलपणाचा फायदा उचलतात म्हणून ओरडलो होतो. शॉर्ट स्कर्ट घातला म्हणून नाही ओरडलो. मला तुला स्कर्टमध्ये बघायाला आवडतं.
सारिका: म्हणून काय ऑफिसच्या लोकांना सुद्धा बायकोला स्कर्टमध्ये दाखवायची इच्छा आहे की काय?
विशाल: मग त्यात काय झालं, तसा पण पार्टीचा ड्रेस कोड वेस्टर्न आहे. बर्याच स्टाफच्या बायका शॉर्ट स्कर्ट घालुन येतील. तू एकटीच नसणार आहेस.
सारिका: म्हणजे तुम्ही लोकांच्या बायकांच्या मांड्या बघणार आणि लोक तुमच्या बायकोच्या मांड्या. हे बरं आहे तुमच्या पुरूषांच.
विशाल: नो डियर, माझी बायको सगळ्यांमध्ये सुंदर आहे. मी कशाला लोकांच्या बायका बघू, आय जस्ट वॉन्ट टू फिल स्पेशल ऑन स्पेशल नाईट टुडे.
सारिका: परत विचार करा हा, तुमचा ऑफिस स्टाफ माझ्याकडेच टक लावून बसेल.
विशाल: अरे बघू दे की, साल्यांची जळून खाक झाली पाहिजे. त्यांना पण माझ्या बायकोच्या सौन्दर्याचं दर्शन घडू दे की. हाहाहाहा
सारिका: आज साहेबांचा मूड भलताच रंगीन दिसतोय, लाज नाही वाटतं बायकोला असं लोकांसमोर उघडं पाडायला.
विशाल: तस नाही ग, आज आपल्यासाठी पार्टी ठेवली आहे. त्यामुळे आजची तू चीफ गेस्ट आहेस. आणि तुझ्याबरोबर असं बाजूला उभं राहायला मला अभिमानच वाटणार आहे. आणि तू शॉर्ट स्कर्ट घातलास तर जाता जाता स्टाफला थोडं छेडता तर येईल.