पाच वर्षानंतर
विशाल: सारिका…
सारिका: (डोळ्यात अश्रू आणत) सॉरी विशाल…
विशाल: सारिका… प्लिज रडु नकोस.
सारिकाचे हुंदके थांबले नाहीत. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या.
विशाल: प्लिज… नको ना रडु… मला तुला हे आधीच सांगायचं होतं
सारिका: काय विशाल?
विशाल: मला हे सर्व आधीपासूनच माहिती होते.
सारिका: (तिच्या डोळ्यात पाहत) पण मला माहिती होतं की तुम्हाला माहिती आहे ते.
विशालला सारिकाच्या बोलण्याचा धक्का बसला. त्याला सारिकाला सर्व माहिती असल्याची कल्पनाच नव्हती. आणि विशेष म्हणजे ती कसलाही त्रागा न करत त्याच्याशी शांतपणे बोलत होती.
विशाल: काय??? तुला कळून सुद्धा… इतक्या वर्षात तू मला कधी जाब का नाही विचारलास?
सारिका: त्याने काय झालं असतं? मला माझा संसार तोडायचा नव्हता. आणि तशी पण मी तुम्हाला शिक्षा काय देणार होते… मी स्वतःच शिक्षेला पात्र आहे.
विशाल: तुला नक्की म्हणायचं काय आहे?
सारिका: (रडत) सॉरी विशाल… मला खरंच माफ करा. मी एक गोष्ट इतकी वर्ष तुमच्यापासून लपवून ठेवली. आपल्या आयुष्यात असे काही घडेल मला स्वप्नातही वाटले नव्हते.
विशाल: सत्य कटु असते… सारिका. आपल्याला हे सत्य स्वीकारलच पाहिजे. मला माहिती आहे ह्यात तुझी काय चुकी नाही आहे.
सारिका: मी कधीच स्वीकारलयं. आता तुम्ही पण ते स्वीकारा.
विशाल: मी पण कधीच स्वीकारलं आहे. मला खरंच माफ कर.
सारिका : पण तुम्ही का स्वीकाराल?? मी तुम्हाला कधीच सांगितलं नव्हतं की आपलं दुसरं बाळ हे तुमचं नाहीच आहे.
विशाल: सारिका… अरूप माझा मुलगा नाही?
सारिका: हो, अरूप तुमचा मुलगा नाही. आता सांगा. तुम्ही दुसर्या कोणाच्या बाळाचा का स्वीकार कराल? मी तुमच्याशी प्रतारणा केली हे तुम्ही का ऍक्सेप्ट कराल?? सांगा विशाल… मला माहिती आहे तुमच्याकडे उत्तर आहे ह्याचं आणि आज ते उत्तर मला ऐकायचंय.
विशाल: कारण…
सारिका: विशाल… पाच वर्ष झाली… आता तरी तोंड उघडा.
विशाल: कारण… कारण मीच आदेशला तुझ्याकडे पाठवले होते. मीच ती परिस्थिती निर्माण केली होती
सारिका: (कुत्सित हसत) फक्त आदेश??
विशालने सारिकाकडे अचंबित होऊन पाहिले.
सारिका: सांगा ना विशाल… फक्त आदेशलाच तुम्ही पाठवलं होतं?
विशाल: आणि राहुलला सुद्धा…
सारिकाचा अश्रूंचा बांध फूटला. ती ओक्शी बोक्शी रडु लागली. विशाल तिच्याजवळ जाऊन सांत्वन करू लागला.
विशाल: सारिका… आय एम सॉरी डियर… मी चुकलो. मी तुझा विश्वास तोडला.
सारिका: (मोठमोठ्याने रडत) असं का केलंत विशाल? मी तर तुमचीच होते ना… मग तुम्हाला हे सर्व करण्याची गरज काय होती?
विशाल: सॉरी सारिका… पण मला सांग… अरूप कोणाचा मुलगा आहे.
सारिका: तुम्हाला तर हे माहिती असायला हवं. तुम्हीच सर्व केलंत ना?
विशाल: खरंच नाही माहिती… आदेश… नाही तर राहुल?
सारिका: कळेल तुम्हाला… पण मला सांगा… तुम्ही माझ्याशी असं का वागलात? माझ्याविरूद्ध असा का कट रचलात?
विशाल: तुला खरंच ऐकायचय… तर ऐक.
विशाल: माझी बँकेतली कामगिरी खूप खालवली गेली होती. खातेधारकांंची संख्या पण खूप कमी झाली होती. इन्व्हेस्टर भेटत नव्हते. लोन अकॉउंट तर नसल्यातच जमा होते. मला हेड ऑफिस मधून एकदा-दोनदा नोटीस सुद्धा मिळाली. माझा जर परफॉर्मन्स सुधारला नाही तर मला कामावरून कमी करण्यात येईल असं सूचित करण्यात आले.
मग एक दिवस राहुल बँकेत आला.
राहुल: विशाल सर, किती दिवस असं छोट्या पोझिशन वर तुम्ही काम करणार. माझ्या भावाची ह्या शहरात मोठ्या मोठ्या लोकांची ओळख आहे. तो तुम्हाला चांगल्या डिल मिळवून देईल. मग तुमचे प्रमोशन नक्की म्हणून समजा.
विशाल: दॅट्स नाईस. पण तुझ्या ह्या मदतीचं कारण समजू शकेल?
राहुल: सारिका मॅडमसाठी. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय आणि आमचं पण कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करावं. आणि हे इन्व्हेस्टर दुसर्या बँकेत इन्व्हेस्ट करतात ना, आजपासून तुमच्या बँकेत करतील. नो बिग डिल.
दुसर्या दिवशीपासून मला इन्व्हेस्टरचे फोन येऊ लागले. लोनसाठी लोक समोरून भेटू लागले. सगळ्यांचे कागदपत्रे अगदी क्लियर असायचे. त्यामुळे लोन द्यायला काहीच प्रॉब्लेम आला नाही. फिक्स डिपॉजिटचीच्या रकमेतमध्ये वाढ झाली. माझ्या लाईफने यू टर्न घेतला. माझा जॉब सुरक्षित तर झालाच पण आदेशने माझे नाव प्रोमोशनसाठी सूचित केले. सर्व काही छान चाललं होतं. मी तुला सांगितलं तेव्हा खूप खुश होता. पण एक दिवस मला हेड ऑफिस मधून फोन आला.
आदेश: विशाल, तुझे इन्व्हेस्टर ही चांगली माणसं नाहीत. ते सर्व गुन्हेगारी जगतातले मोठे मोठे गुंड आहेत. बर्याच लोकांनी लोन सुद्धा डिफाॅल्ट केलं आहे. मोठा फ्रॉड करण्यात आला आहे. मला वाटतं तू पण त्यांना सामील आहेस. तुझं प्रोमोशन तर मी थांबवलय. पण सर्व सुरळीत नाही झालं तर तुला जेलची हवा सुद्धा खावी लागेल.
विशाल: नाही सर प्लिज, मी खरंच काही नाही केलंय.
आदेश: विशाल… तुला कल्पना नाही तुला केवढी मोठी किंमत चुकवावी लागेल. युअर करिअर इज फिनिश.
माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काहीच समजत नव्हतं. मी लगेच राहुलला फोन केला. राहुलने मला भेटायला बोलायला बोलवले.
विशाल: तुझी माणसं फ्राॅॅड निघाली. बँकेत खूप मोठा घोटाळा झाला आहे. माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते.
राहुल: रिलॅक्स सर, मला माहिती आहे ते सर्वजण क्रिमिनल आहेत.
विशाल: काय???
राहुल: हो, ते सर्वजण माझ्या भावाच्या इशार्यावर सर्व काम करत आहेत.
विशाल : पण असं का केलंस तू??
नंतर त्याने तुला जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला त्याला तुझ्यावर जबरदस्ती किंवा रेप करायचा नाही आहे. त्याला फक्त तुला सेड्युस करायचे होते. त्याने मला खात्री दिली की, तुझ्या इच्छेविरूद्ध तो तुझ्याबरोबर काहीच करणार नाही. आणि तू स्वतः त्याच्याबरोबर झोपायाला तयार झाली असती तरी मी सुद्धा काही करू शकत नव्हतो.
त्यावेळेस माझा मेंदूच काम करत नव्हता. मला फक्त ह्या सर्वातून बाहेर पडायचं होतं. मी राहुलच्या बोलण्यात आलो. मी त्याला चान्स देण्याचे मान्य केले. पण मी त्याच्याकडून कबूल करून घेतले की जे काही होईल ते सर्व मला तो इन्फॉर्म करत राहिल. आणि योग आलाच तर तो फक्त तुझ्याबरोबर एकदाच सेक्स करेल.
त्याच्यानंतर त्याचे सर्व इन्व्हेस्टर ट्रॅक वर आले. लोन अकाउंट सुद्धा सुरळीत झाली.आदेशने माझ्याबद्दलचा चांगला रिपोर्ट हेड ऑफिसला सबमिट केला. माझे प्रमोशन परत एकदा कन्फर्म झाले. मला अहमदाबादचा ब्रँच हेड बनवण्यात आले. राहुलने मला सतत प्रवासात राहायला सांगितलं. तो सांगत गेला मी ऐकत गेलो. कधी कधी मी मुंबईत लवकर आलो तरी हॉटेलमध्ये राहायचो. घरी यायचो नाही. पण तरी सुद्धा तो तुझ्या जवळ येऊ शकला नव्हता. मी खुश होता. त्याला संधी मिळूनही तो काही करू शकत नव्हता. पण त्याची इच्छा प्रबळ होत गेली.
एका रात्री मी अहमदाबादवरून लवकर आला होतो. मी रेल्वे स्टेशनंला पोचलो तेव्हा राहुलचा फोन आला. त्याने मला आणखी एक दिवस हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. मला वाटतं त्यारात्री तो बाथरूममध्ये लपला होता. त्यानंतर काय झालं मला खरंच माहिती नाही. तो खूप चिडला होता. तुला सर्व सांगण्याची त्याने मला धमकी दिली. मी खूप घाबरलो. मी त्याची गयावाया केली. तुला जर कळलं असतं तर त्यादिवशीच सगळं संपले असते. त्याने अजून एक संधी मागितली.
त्यानंतर तो एका संध्याकाळी आपल्या घरी आला होता. त्याने स्वतःलाच मारण्याचा प्लॅन तयार केला. त्याला तसं करून काय साध्य करायच होतं मला खरंच माहिती नव्हतं. माझे हात सुद्धा दगडाखाली होते. त्याला साथ दिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता.
एक दिवस आदेशने मला फोन करून एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले. त्याने फेसबुकवरचा तुझा फोटो दाखवला.