सारिका बराच वेळ बाथरूममध्ये बसून रडत होती. राहुल गेल्याची खात्री करून ती बाहेर आली. तिने दारे खिडक्या लॉक करून घेतल्या. आणि विशालची वाट पाहू लागली. विशाल १२.३० वाजता रूम वर आला.
विशाल: सॉरी बेबी… लेट झाला.
सारिका: ह्म्म्म.
विशाल: तुझा चेहरा का रडका दिसतोय?
सारिका: नाही… झोप लागली होती. तुम्ही जेवलात.
विशाल: हो मी खाऊन आलोय. बँकेत मागवलं होतं.
सारिका: ओके. मी झोपायला जाते.
विशाल: अगं थांब, आज मौका भी, दस्तूर भी हैं अँड फाईव्ह स्टार हॉटेल भी हैं. आणि तू झोपतेस.
सारिका: माझा मूड नाही आहे.
विशाल: काय यार, २ महिने झाले… आज तर करूया.
सारिका: काँडम आणलेत?
विशाल: नाही. का?
सारिका: आय एम इन माय फर्टाईल पिरियड.
विशाल: काय यार, मुद्दामून करतेस ना.
सारिका: मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं.
विशाल: माझ्यावर रागावली आहेस ना.
सारिका त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच बेडरूम मंध्ये जाऊन झोपून गेली.
२७ फेब्रूवारी
सारिकाला सकाळी ७.३० वाजता जाग आली. विशाल तिच्या आधीच उठून तयार होता. टेबलावर ब्रेकफास्ट रेडी होता. विशालने तिच्याकडे बघून स्माईल केली. तिने सुद्धा त्याच्याकडे पाहून स्मित केले.
विशाल: सॉरी… काल ऑफिसमध्ये खूपच लेट झाला. खूप काम संपवायचं अजून बाकी आहे.
सारिका: मला वाटलं तुम्ही डिनरला तरी वेळेत याल.
विशाल: नाही गं, खरंच नाही जमलं, मुलांना आज परत डिनरला बोलवायचं का?
सारिका: नको. त्यांना अभ्यास करू दे. ते उद्या एअरपोर्टला येणार आहेत
विशाल: तू त्यांना किती वाजता यायला सांगितलं आहेस.
सारिका: ९ वाजता… का?
विशाल: नाही म्हणजे आपल्याला १० वाजता बोर्डिंग करायचं म्हणून विचारलं. उगाच चुकामुक नको व्हायला.
सारिका: ओके.
विशाल: मी थंड होईल म्हणून तुझ्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर नाही केला.
सारिका: इट्स ओके. मी जाताना रेस्टॉरंटमध्ये काहीतरी खाईल.
विशाल: गुड… मग मॅडम, आजचं शेड्युल काय आहे.
सारिका: ९.३० वाजेपर्यंत शाळेत पोचायचं आहे. लंचच्याआधी काम संपवून २-४ दरम्यान पूजेला जायचं आहे. कसं ही करून मी सहाच्या आधी परत येणार आहे
विशाल: (सॅन्डविचचा तुकडा तोंडात कोंबून) पूजा शाळेतच आहे ना.
सारिका: नाही. निर्मला मॅडमनी ऍड्रेस मेसेज केलाय. पूजा आधी निर्मला मॅडमच्या घरीच ठेवली होती. बहुतेक पूर्ण स्टाफ येणार असेल म्हणून त्यांनी जागा चेंज केली असावी.
विशाल: मग आता कुठे आहे?
सारिका: कुठल्या तरी फार्महाऊसचा ऍड्रेस आहे. कदाचित ट्रस्टींचा फार्महाऊस असेल.
विशाल: ओके. निघताना मला फोन कर.
सारिका: नाही… मी तुम्हाला फोन करणार नाही.
विशाल: मॅडमचा राग अजून गेला नाही वाटतं.
सारिका अजून कालच्याच घटनेत अडकून राहिली होती. विशाल काल जर वेळेवर आला असता तर राहुलबरोबरचा तो प्रसंग घडलाच नसता असे सारिकाला मनापासून वाटत होते. सारिकाचा राहुलने परत एकदा विश्वासघात केला होता. त्याचे वागणे एखाद्या गुन्हेगार्यासारखे होते. त्याच्यामुळे तिच्या मनाला खूप वेदना होत होत्या. तिला हे सर्व विशालला सांगूसं वाटत होते. पण शहर सोडून जाताना आता कुठलाच वादावाद नको म्हणून ती गप्प होती. विशाल सुद्धा काल फोनवर तिच्याशी तिरसटासारखा वागला होता. त्याचा तिला अजून मनात राग सलसलत होता.
सारिका: नाही… काल बघितलं तुमचं… फोनवर नुसते खेकसत होतात. तुम्हाला किती वाजता यायचं तेव्हा या. मी फोन नाही करणार.
विशाल: सॉरी ना यार, आता एक दिवस तर थांबायचं आहे. आणि काम संपल नाही तर आदेश सर माझ्या डॉक्युमेंटस वर साईन नाही करणार.
सारिका: का नाही करणार? प्रोमोशन दिलं म्हणून काय झालं. तुमची मेहनत बघूनच प्रमोशन दिलं असेल ना. असं कोणालाही बँक प्रोमोशन देणार आहे का?
विशाल: तुला नाही समजणार… खूप राजकारण असतं. आदेश सर नसते तर कधीच एवढी मोठी पोस्ट मिळाली नसती.
सारिका: बस्स झालं तुमच्या बॉसचं कौतुक… विशाल तुम्ही खूप साधे आहात. तुम्हाला काय कळत नाही.
विशाल: अगं एवढी चिडतेस काय?
सारिका: चिडू नाही तर काय करू. माणसं ओळखायला शिका आता.
विशाल: तुला भांडायचं आहे का? काल उशीर झाला तर एवढा राग.
सारिका: तुम्हाला दोन दिवस बँकेत उशीर होणार होता तर मला आधी सांगायचं. मी आपल्या आईकडे राहिली असती. काय गरज होती राहुलला हॉटेलसाठी हो बोलायची. फार फार तर घरातून लवकर निघालो असतो.
विशाल: हे बरं आहे… एक तर विद्यार्थी तुझा. त्याने तुला ऑफर दिली. तू पण तयार झालीस ना.
सारिका: तुम्ही हो म्हणालात म्हणून तयार झाली. आपलं कोणी फुकट दिलं की हो म्हणायचं.
विशाल: तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस.
सारिका: कारण… कारण…
सारिका विशालशी वाद करताना खूप हायपर झाली होती. तिच्या पूर्ण अंगाची लाही लाही होत होती. पण तिने स्वतःला सावरलं. विशालला विषय वाढायचा नव्हता. तो तिला शांत करण्याच्या प्रयत्नात होता.
विशाल: बापरे… कालचा बॉम्ब आज फुटतोय. छोड ना यार… आज येतो लवकर. आता निघताना भांडण नको.
सारिका: मला असं झालंय कधी हे शहर सोडते.
विशाल: उदया नक्की सोडूया. हेहेहेहे.
सारिका: ह्म्म्म.
विशाल: आता जाताना स्माईल तर देशील?
सारिकाने त्याला खोटं खोटं हसून दाखवलं. विशाल निघून गेला. सारिकाने अंघोळ केली आणि शाळेच्या शेवटच्या दिवसासाठी तयार झाली. तिने पूजेसाठी नारंगी बॉर्डरची शुभ्र साडी नेसली. रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करत तिने शाळेत जाण्यासाठी कॅब पकडली.
निर्मला मॅडम: हे सारिका, कशी आहेस? आज तुझा शेवटचा दिवस ना.
सारिका: फायनली हा दिवस आला.
निर्मला: हो फायनली, सगळं व्यवस्थित झालं ना.
सारिका: हो. घर खाली केलं आणि आता उद्या सकाळी फ्लाईट आहे.
निर्मला: आणि तुझा मुलगा?
सारिका: आदीला आईकडे ठेवलाय. आम्हाला सुद्धा आमची काम संपवायची होती ना.
निर्मला: गुड… साडी छान आहे. तुझ्यावर उठून दिसतेय.
सारिका: थँक्य यू.
निर्मला: तू पूजेला येणार आहेस ना?
सारिका: हो.
निर्मला: तुला जागा बदलल्याचा मी मेसेज केला होता.
सारिका: हो मॅडम. कालच तुमचा मेसेज मिळाला.
निर्मला: मी ११ वाजता निघणार आहे. तू हवं असेल तर माझ्याबरोबरच निघ.
सारिका: नाही मॅडम, तुम्ही जा पुढे… मला स्टाफला भेटायचंय.
निर्मला: ओके. पण एकटी नको येऊस. थोडा निर्जन एरिया आहे. एअरपोर्टच्या जवळच आहे. तुला हॉटेल वर जायला सुद्धा सोपं पडेल.
सारिका: ओके. बघते.
सारिका प्रिंसिपलच्या ऑफिसमधून बाहेर पडत स्वतःच्या केबिनमध्ये आली. थोड्या वेळाने जयराम तिच्या केबिनमध्ये आला.
जयराम: मॅडम आत येऊ?
सारिका: अरे जयराम, या ना. कसे आहात तुम्ही?
जयराम: काय मॅडम, तुम्ही आम्हाला कायमचं सोडून चालात. तर कसा असणार.
सारिका: आयुष्य असच असतं. माणसं भेटतात आणि ओळख होते. आणि परत पुढचा प्रवास चालू राहतो.
जयराम: मला तुमची खूप आठवण येईल, माझ्या कठीण समयी तुम्ही मला खूप मदत केली.
सारिका: एवढं काही नाही त्यात. मी तुम्हाला माणुसकीच्या नात्यानेच मदत केली.
जयराम: तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.
सारिका: मी सुद्धा विसरू शकणार नाही. तुमचा हा निरागसपणा सदैव माझ्या लक्षात राहील.
जयराम. तुमचे खूप उपकार आहेत मॅडम. कधी वाटलं तर तुमच्या उपकाराची परत करण्याचा मौका जरूर द्या.
सारिका: मग एक काम करा, आजपासून गुटखा खाणं पूर्ण बंद करा. म्हणजे मी समजेल तुम्ही उपकार फेड केली.
जयराम: आतापासून बंद करतो मॅडम.
सारिका: गुड.
जयराम: चला येतो मॅडम, तुम्ही काम करा.
जयराम सारिकाच्या केबिन मधून निघून गेला. सारिका कामात व्यस्त झाली. तिने आपला फायनल रिपोर्ट बनवून निर्मला आणि मॅनेजमेंटला मेल केला.