हॅपी बर्थडे

त्याचं एमबीएचं शेवटचं वर्ष होतं यंदा. आणखी दोन तीन महिन्यांत त्यांची शेवटची परीक्षा  त्यानंतर ते सगळे नोकरीधंद्याला लागणार होते. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वतःला जगाच्या मार्केटमध्ये स्वतःला आजमावणार होते. त्यांचा सात जणांचा ग्रूप म्हणजे अगदी सिनेमातल्या सारखाच होता. सुमीत-निशा, कपिल-ऐश्वर्या, निलेश-मृन्मयी ह्या तीन प्रेमवीरांच्या जोड्या आणि सुमित्रा असे वेगवेगळ्या शहरातून आलेले सात जण! ह्या जोड्या तर त्या शैक्षणिक संकुलातल्या सगळ्या कॉलेजांमध्ये सर्वप्रसिद्ध आणि सगळ्यांच्या लाडक्या! ह्यातल्या कुणालाही कुणी कधी एकटं पाहिलं नव्हतं. हे सगळे कुठेही जाताना एकत्रच जात असत. वर्गातही ते एकत्रच बसत. ह्या जोड्यांनी आपले स्पेशलायझेशनही आपल्या एकमेकांच्या विचारानेच घेतलं होतं. अभ्यास असो, खेळ असो किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असो ह्या सात जणांशिवाय कॉलेजचं पण हलत नसे. त्यांच्यापैकी सुमित, निशा आणि सुमित्रा मुंबईचे होते. निलेश आणि ऐश्वर्या पुण्याचे, सुमित्रा नाशिक आणि मृन्मयी  रत्नागिरीची होती.

त्यांचं कॉलेज म्हणजे शिक्षणसम्राट खासदार अनंतराव राजमानेंच्या प्रसिद्ध शिक्षणसंकुलातील सगळ्यात नवं सुरू झालेलं कॉलेज. थोड्या मार्कांवरून शहरातली कॉलेज ज्यांना मिळत नसत अशा विद्यार्थ्यांची पहिली पसंती राजमानेंच्या एकलव्य ग्रूप ऑफ इंस्टीट्यूट्सलाच असे. पंचतारांकत कॉलेज असं उपहासाने त्यांच्या कॉलेजांना म्हटलं जायचं. त्याचं कारणही तसंच होतं. एका तालुक्याच्या ठिकाणी अगदी अमेरिकेत शोभाव्या अश्या सुंदर इमारती, बगीचे, खेळाची मैदानं आणि एका शिक्षण संस्थेत ज्या ज्या म्हणून सुविधा असाव्यात त्या सगळ्या जागतिक दर्जाच्या सुविधा विध्यार्थ्यांना येथे मिळत मग तो साधा बीएचा विद्यार्थी असो किंवा आर्किटेक्चरचा! वैद्यकीय कॉलेज सोडून सगळी कॉलेजेस या संकुलात होती. तसं या कॉलेजांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती पण शहरातून आलेले विद्यार्थीही बरेच असत. जोपर्यंत संकुलाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आ पण पुण्या-मुंबईत असल्यासारखंच वाटत असे.

जरी ते सात जण नेहमी एकत्र राहत असले तरी ते सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून राहत असत आणि त्यामुळेच ते सर्वांचे लाडके होते. छोट्या गावांमध्ये प्रेमप्रकरणं जरा लपून छपूनच होतात पण या लोकांनी कधी ती लपविली नाहीत. तरीही ते सगळीकडे आपल्या मर्यादांचं भान ठेऊनच वागत. आता कॉलेज संपणार आणि सगळे वेगवेगळे होणार याची जाणीव सगळ्यांनाच झाली होती. म्हणून ते प्रत्येक दिवस काहीतरी निमित्त काढून साजरा करण्याचा प्रयत्न करत असत.उद्या निलेशचा वाढदिवस होता. निलेश म्हणजे या ग्रूपमधलाच नव्हे तर आख्ख्या कॉलेजातला एक नंबरचा अवली मुलगा. त्याला टेन्शन म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. एकदम बिनधास्त मुलगा. एखादी सुंदर मुलगी दिसली की तो थेट जाऊन तिला ‘तुम्ही खूप सुंदर दिसता!’ किंवा ‘ हा ड्रेस तुम्हाला अगदी शोभून दिसत आहे’ वगैरे कंप्लीमेंट देत असे. कुणी मुलगा जर मनातल्या मनात कोणत्या मुलीवर मरत आहे असं त्याला समजलं की लगेच तो त्या मुलीकडे जाऊन तिला त्याच्याबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. बोलण्यात अगदी चतुर आणि तेवढ्याच साफ मनाचा! अभ्यासात हुशार पण त्याला कधी अभ्यास करताना कुणी पाहिलं नव्हतं. जेव्हा सगळे अभ्यास करायचे तेव्हा हा येऊन थेट सगळ्यांना शिकवायला सुरवात करायचा, कुणाला कुठल्या विषयाची शंका असेल तर सरांकडे जाण्याआधी ते निलेशला पकडायचे. तोही सगळ्यांना मनापासून मदत करायचा. पण कुणी काही सांगितलेलं त्याला आवडायचं नाही. त्याची लाईफ तो त्याच्या आणि फक्त त्याच्याच मर्जीने जगायचा. हे कर किंवा हे करू नको असं कुणी त्याला सांगण्याचा प्रयत्नही करत नसत. थोडक्यात तो त्यांच्या कॉलेजातला थ्री इडियट्स मधला रँचो होता. त्याच्यासारखंच ह्याच्या वौयक्तिक आयुष्याबाबत त्यांचा ग्रूप वगळता कुणाला जास्त माहिती नव्हती. अशा अवलीयाचा उद्या कॉलेज जीवनातला बहुधा शेवटचा वाढदिवस होता. उद्या संध्याकाळी त्यांच्या कँटीनमध्ये त्याने सर्वांसाठी छोटीशी पार्टी ठेवली होती.

या उरलेल्या सहा जणांनी मात्र आज रात्रीच बारा वाजता त्याच्या फ्लॅटवर सेलिब्रेट करायचं असा सरप्राईज प्लॅन बनवला होता. सुमीत आणि कपिल एकत्र एका फ्लॅटवर रहायचे. निलेश एकटाच एका फ्लॅटमध्ये राहायचा आणि सगळ्या मुली कॉलेज हॉस्टेलमध्ये राहायच्या. कॉलेजमधल्या बाहेरगावाहून आलेल्या सगळ्या मुलींना हॉस्टेलमध्ये राहणं कम्पल्सरीच होतं. मुलींनी होस्टेलच्या वॉर्डन मॅडमना त्याच्या वाढदिवसाची कल्पना देताच मॅडमनी त्यांना लगेच एक रात्र बाहेर राहण्याची परवानगी दिली. ती मुलं इतक्या जबाबदारीने वागत की आख्ख्या संकुलाच्या स्टाफचा त्यांच्यावर स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त विश्वास होता. आठ वाजता त्या चौघींनी कपिलच्या फ्लॅटवर यायचं आणि तिथून रात्री बरोबर बारा वाजता सगळ्यांनी निलेशच्या फ्लॅटवर जायचं आणि सरप्राईज द्यायचं असं ठरलं होतं.

ठरल्याप्रमाणे त्या चौघी बरोबर आठ वाजता फ्लॅटवर आल्या. सुमीत बेडवर पसरून लॅपटॉपवर काहीतरी करत होता. आल्या आल्या ऐश्वर्याची नजर कपिलला शोधू लागली.

“तो नाहीये! शोधू नकोस!” सुमीत लॅपटॉपवरची नजर न हटवताच बोलला. आणि ऐश्वर्या सोडून सगळे मोठमोठ्याने हसू लागले.

“कुठेय तो? खोटारडा आत्ता मला मेसेज केला फ्लॅटवरच आहे म्हणून! हा बघ!” हातातला मोबाईल नाचवत ती बोलली.

“अगं! सामान आणायला गेलाय तो. येईल. एवढी उतावळी का होतेयस?” सुमीत

“केक आणून ठेवलाय ना पाच वाजता?” ऐश्वर्या

“आग पोटापाण्याची सोया नको का? की फक्त केक खाऊन झोपणारेस?” सुमित्रा मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत बोलली.

नंतर ते सगळे गप्पा मारत बसले. तासाभराने सुमीत आला.

त्याच्या हातात बर्याच पिशव्या होत्या.

“ए महामयांनो! धरा ना जरा. मी काय हमाल आहे का तुमचा? ए म्हशी उठ ना!” तो निशाला बोलला.

“तुझ्या आयटमला उठाव ना कुत्र्या!” निशाने त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलं आणि त्याच्या हातातल्या पिशव्या घेतल्या!

“हे काय आणि?” त्यातली काळी पिशवी सुमीतच्या तोंडासमोर धरत निशाने विचारले.

“मी आणलय का ते? त्याला विचार ना!” वैतागत त्याने पिशवी बाजूला केली आणि लॅपटॉपमध्ये तोंड गाडले.

“कपल्या काय आहे हे?” निशा ओरडली. बाकीच्या तिघी इतर पिशव्या उचकून त्यात काय काय आहे हे बघत होत्या.

“दिसत नाही का? दारू आहे!” कपिल बाथरूम मधून चेहरा पुसत बाहेर आला.

“एवढी??” निशा

“निळ्याचा बर्थडे आहे तो ही शेवटचा! एकदम सुपर झाला पहिजे ना!”

“बेवड्याला निमित्त पाहिजे फक्त” ऐश्वर्या बोलली

“त्या निळ्याचं शिक जरा! थेंबाला स्पर्श करत नाही तो कधी!” मृन्मयीने एकदाचं तोंड उघडलं.

“अहाहा! आली मोठी कौतुकाची. बिड्या फुकून फुकून छातीचा पिंजरा झालाय आणि म्हणे निळ्याचं शिका!” ऐश्वर्यानेही लगेच कपिलची बाजू घेतली. निशा आणि सुमीत बेडवर शेजारी शेजारी बसून त्यांचे संभाषण ऐकून हसत होते.

“ए त्याला बोलू नको हा काही. मी तुझ्या कपल्याला काही बोलते का कधी? तूच बेवड्या म्हणालीस त्याला. कपल्या सोडून दे तिला” मृन्मयी

“मी काहीही बोलेन त्याला. तू नाहीस बोलायचं! आणि मारून टाकेन त्याला त्याने तसा विचार जरी केला तरी.” ऐश्वर्या फुत्कारली.

“ओ लव्हबर्डस! शांती!” सुमित्रा बोलली

“ते सोडा हे बघा सुमीतने किती छान व्हिडिओ बनवलाय निळ्यासाठी!” निशा बोलली. सगळे व्हिडिओ पाहत होते. एक त्यांचे कॉलेजातले फोटो आणि व्हिडिओ एकत्र करून सुमीतने एक तासाभराच्या व्हिडिओ बनवला होता. सगळे विडीओ बघायला बसले. गप्पांच्या नादात साडेअकरा कधी वाजले कळलंच नाही.

“मित्रहो, चला निळूभाऊंकडे जाऊयात आता!” सुमित्रा.

“होहो! चला उठा म्हणत सुमीतने लॅपटॉप बॅगेत कोंबला आणि बॅग पाठीला अडकवली.

सगळ्यांनी पिशव्या उचलल्या आणि निलेशच्या फ्लॅटकडे निघाले. त्याचा फ्लॅट दहा मिनिटांच्या अंतरावरच होता.

“मुन्ने तू त्याला काही सांगितलं नाहीस ना सरप्राईजबद्दल?” कपिलने मृन्मयीला विचारलं. ती फोनवर बोलत होती

“नाही!” तिने थोडावेळ फोनवर हात धरला आणि उत्तर दिलं. बोलत बोलत ते बिल्डिंगमध्ये पोचले. जिना चढू लागले

“ए बाई! आलो ना त्याच्या घरी ठेव ना आता फोन!” ऐश्वर्या मृन्मयीला बोलली. तिने नुसतंच नाक मुरडलं आणि पुन्हा बोलू लागली. निलेशच्या फ्लॅटच्या दारात उभे राहत त्यांनी बेल दाबली. निलेशने दरवाजा उघडला.

“हॅपी बर्थडे बाबू!” म्हणत मृन्मयीने निलेशला मिठी मारली.

“थँक यू मुनु!” निलेशनेही तिला हलकेच मिठी मारली.

“हां सोडा आता! बस!” म्हणत सुमित्राने मृन्मयीला ओढले.

“हॅपी बर्थडे निल्या!” म्हणत सुमित्रानेही त्याला मिठी मारली. “थँक्स! थँक्स!” निलेश.

“ए सुमे! सुरक्षित अंतर ठेवा! आमच्या मुनुला राग येईल हं!” ऐश्वर्या मृन्मयीला चिडवत बोलली

“तू गप हां ऐशे! मला नाही काही वाटत. माझा निलेश तुझ्या कपल्यासारखा नाही!” मृन्मयी

“हो का? मग तो काल त्या फार्मसीच्या अंकिताबरोबर इतका वेळ काय गप्पा मारत होता गं?” ऐश्वर्या

“निळ्या. काय बोलतेय ती?” मृन्मयीचे गाल फुगले.

“अगं मस्करी करतेय ती!” असं म्हणून कपिलने निलेशला मिठी मारली “मेनी हैप्पी रिटर्न्स ऑ द डे भावा!”

“थँक यु ब्रदर!” निलेश

सगळ्यांनी दारातच त्याला शुभेच्छा दिल्या आणि आत गेले.

हॅपी बर्थडे | भाग ४

अखेर तिने सगळे विचार मनातून झटकून टाकले आणि तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले. त्याने तिच्यात भरलेली उत्कटता ती त्याला परत करू लागली. आपल्या टपोर्या ओठांनी ती त्याच्यावर हल्ला चढवू लागली. तिची मान हातात घट्ट धरून तो तिला जवळ ओढत वरवर आणखीच उत्कटपणे तिच्यावर बरसू...

हॅपी बर्थडे | भाग ३

"नाही बट स्टिल फायनली एव्हरीथिंग्स गुड! राईट?" तो "बट इट वूड हॅव बीन बेटर! डोन्ट यू थिंक?" तिची नजर भेदक होती. ऐश्वर्या म्हणजे कमालीची कॉन्फिडन्ट मुलगी होती "ऐशू तू खुश नाहीस कपिलबरोबर?" त्याने थेट मुद्द्याला हात घातला. "चल रे! असं कसं वाटलं तुला?" ती "तुझ्या...

हॅपी बर्थडे | भाग २

सर्वांनी मिळून केक कापला एकमेकांना भरवला. केकचा कार्यक्रम उरकेपर्यंत कपिल आणि सुमीतने प्यायची तयारी केली. निलेश आणि मृन्मयी दारू पीत नसत. तसं निलेश पूर्वी पीत असे पण दोन वर्षापासून त्याने बंद केली होती. पेग भराभर रिकामे होऊ लागले. धुराडी पेटली. हे दोघं वगळता सगळे...

error: नका ना दाजी असं छळू!!