हॅपी बर्थडे | भाग २

सर्वांनी मिळून केक कापला एकमेकांना भरवला. केकचा कार्यक्रम उरकेपर्यंत कपिल आणि सुमीतने प्यायची तयारी केली.

निलेश आणि मृन्मयी दारू पीत नसत. तसं निलेश पूर्वी पीत असे पण दोन वर्षापासून त्याने बंद केली होती. पेग भराभर रिकामे होऊ लागले. धुराडी पेटली. हे दोघं वगळता सगळे टुन्न झाले होते. त्यांच्यात ऐश्वर्या आणी सुमित्रा काही प्रमाणात शुद्धीवर होत्या.

“ए मुन्ने घे ना थोडी!” सुमित्रा बड्बडली

“नको मला!” मृन्मयी

“अगं घे ना!” कपिल आणि सुमित एकदाच बोलले आणि विनाकारण मोठमोठ्याने हसू लागले.

“न… को… य!” मृन्मयी

“सगळे म्हणत आहेत तर घे ना थोडी” निलेश बोलला

“नको ना बाबू!” ती

“प्लीज माझ्यासाठी… थोडी. ट्राय करन बघावं सगळं एकदा.” निलेश

“ओके पण थोडीच!” तिला टाळता येईना. तिच्या बाबूचा बर्थदे होता ना

निलेशने एक हार्ड पेग बनवला आणि तिच्या हातात दिला, ” गटकन पिऊन टाकायचं औषधासारखं. कडू लागेल थोडं.”

तिने ग्लास घेतला आणि डोळे गच्च मिटून संपवून टाकला.

“याक! किती घाण आहे! कशी पिता तुम्ही!” गळा दोन्ही हातात धरत ती तोंड वेंगाडत बोलली. सगळे मोठमोठ्याने हसू लागले. एका ग्लासतच तिला ग्लानी आली.

“बाबू! चक्कर येतेय! मला झोपयचंय!” तिला बोलताही येईना! निलेशने तिला धरून आतल्या खोलीत नेऊन झोपवलं.

आता सगळे टाईट झाले होते. सुमित्रा अजूनही पीतच होती.

“सुमे काय झालंय बास की!” ऐश्वर्या

“नाही आज पिणार! सुमित्रा आज पिणार! जे पाहिजे ते आयुष्यात पहिल्यांदा सुमित्राला मिळवता आलं नाहीये! सुमित्रा यू आर या लुजर!” म्हणत सुमित्राने एका घोटात ग्लास सम्पवला आणि पुन्हा भरला.

“काय झालं बाळा!” निशा तिच्या हातातून ग्लास ओढू बघत होती पण तिने घट्ट धरून ठेवला होता. कपिल आणि सुमीत केव्हाच आडवे झाले होते.

“हा निळ्या आहे ना? हा निळ्या?” सुमित्रा बरळू लागली.

“काय केलं त्याने?” ऐश्वर्या

“तो माझा होता माझा! मुन्नीनं हिसकावून घेतला त्याला माझ्याकडून!” तिने आणखी एक ग्लास संपवला.

“काय?” निशा आणि निलेश यांची प्रतिक्रिया एकदाच उमटली.

“हाहाहा! घाबरलात ना! मस्करी केली रे निळ्या! भाऊ आहेस तू माझा! घाबरलास ना?” सुमित्रा दात काढत बोलली.

“सुमे झोप बरं आता!” निलेश बोलला

“वेड लागलंय तिला!” ऐश्वर्या

“ए कपल्या, सुम्या उठा माकडांनो. पसारा आवरा हा!” निशा कपिल आणि सुमीतला हलवून उठवू लागली.

“ए कपल्या आ पण जाऊ आपल्या फ्लॅटवर! इथे कोण ग्रामस्वछता अभियान करत बसेल!” सुमीत डोळे न उघडताच बोलला.

“होहो! तिकडेच जायचं! नो ग्रामस्वच्छता!ऐशू चल उठ!” कपिलने उठून चप्पलही घातली.

“चालते व्हा लवकर! दोघेही! आम्ही झोपतो इथेच! त्याचा वाढदिवस आहे आज आणि त्याच्या उरावर या पसारा ठेऊन आरामात झोपायला निघालात का तुम्ही?” निशा चिडली.

“जाऊदे निशा मला सवय आहे. पार्टीत न पिण्याचे काही तोटेही असतात. त्यापैकी हा एक असं म्हणत निलेशने बाटल्या गोळा करायला सुरवात केली. कपिल निलेशजवळ आला आणि त्याला मिठी मारली.

“भावा सॉरी! तुला माहिती आहे ना! तू असंच राहूदे सगळं! आम्ही सकाळी नक्की साफ करू. गळ्याशप्पथ!” गळ्याला हात लावत कपिल बोलला.

“असूदे कपल्या जा तुम्ही. का येऊ सोडवायला?” निलेश

“बघ! बघ! आपला भाऊ आहे तो. दिलदार आहे. तुझ्यासारखा कुचका नाहीये तो. भाऊ कुणाचा आहे शेवटी!” सुमीत

“माझा आहे! मी बोलले ना माझा भाऊ आहे!” हात उंचावत सुमित्रा बोलली.”

“निघतो का आता?” बाजूला पडलेली चप्पल उगारत निशा बोलली.

ते दोघे हलत डुलत निघून गेले. निशाने दार लाऊन घेतलं.

“निळू तू आणि मुन्नी झोपा आत. आम्ही तिघी झोपतो इथे सगळं साफ करून!” निशा बोलली

“तू बस जरा सुमीला धरून बाजूला! ऐशू आ पण पटकन साफ करून घेऊ मी झोपतो इथे तुम्ही सगळ्या आत झोपा!” निलेशने सगळं गोळा करून एका पिशवीत भरलं.

“नको तूच आत जा! आम्ही तिघी झोपतो इथे!” असं म्हणत ऐश्वर्याने झाडायला सुरवात केली.

“अगं ऐक माझं! ती झोपी गेलीय आता. आम्ही थोडी गप्पा मारणार आहोत आता. आणि इथे पंखा खूप आवाज करतो तुम्ही झोपा आत!” त्याने सुमीला धरून उठवलं आणि आत नेलं! निशा भिंतीचा आधार घेत उभी राहिली. भिंतीचा हात सोडताच ती धाडदिशी जमिनीवर आदळली. शेवटी ऐश्वर्या आणि निलेशने धरून तिलाही आत नेऊन झोपवलं. दीड वाजत आले होते. निलेश फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. ऐश्वर्याने निलेशसाठी अंथरूण केलं.

“अरे कशाला एवढं मी केलं असत ना! असंही लगेच झोपणार नाहीये मी.” निलेश

“असुदेत झोपशील तेव्हा झोपशील!” ऐश्वर्या उठून उभी राहत बोलली.

“ओके थँक यु!” निलेशने शर्ट काढला. तो नेहमी शॉर्टस आणि बनियनवरच झोपत असे.

“निलेश!” ऐश्वर्या

“हा?” निलेश मागे वळला.

“मेनी हॅपी रिटर्न्स ऑ द डे! हॅव अ वंडरफुल इयर अहेड!” असं म्हणत तिने त्याला मिठी मारली

“थँक्स ऐशू! आता झोपा निवांत! मी आहे इथे!” निलेश गादीवर भिंतीला टेकून बसला

“गुड नाईट!” ऐश्वर्या गोड हसली आणि झोपायला आत गेली.

निलेशची विचारचक्रे फिरू लागली तो भूतकाळात गेला. जेव्हा तो इथे प्रवेश घ्यायला निघाला होता तेव्हा येताना बसमध्ये त्याची आणि ऐश्वर्याची ओळख झाली. ऐश्वर्या आणि निशा पुण्यात एका कॉलेजात शिकायला होते आणि निशा आणि सुमीत पूर्वीपासून एकमेकांवर प्रेम करायचे. इथे आल्यावर मृन्मयी ऐश्वर्या आणि सुमित्राला होस्टेलमध्ये एक रूम मिळाली आणि लेट ऍडमिशनमध्ये सुमित्रा त्यांच्या रूममध्ये येऊन पडली. इकडे सुमीत आणि कपिल एका रूममध्ये! निलेशने हॉस्टेल घेतलंच नाही पण अशा लिंक लागत लागत त्यांचा ग्रूप तयार झाला. खरं तर बस मध्येच तो ऐश्वर्यावर फिदा झाला होता सवयीप्रमाणे तिला 👌 असा इशाराही त्याने केला. तो नेहमीप्रमाणेच तिला विसरूनही गेला. पण कॉलेजात जेव्हा ती पुन्हा दिसली तेव्हा मात्र त्याच्या नकळत तो तिच्याकडे आकृष्ट झाला होता. पण ती आणि कपिल कॉलेजच्या रेसेप्शनवर गप्पा मारत असलेले पाहिल्यावर त्याने तिचा विचार झटकून टाकला. तिच्या मागोमाग आली मृन्मयी! गोरीपान, निळ्या डोळ्यांची, मंजुळ आवाजाची एक टिपिकल कोकणी मुलगी! तिला पाहिल्यावर आ पण ऐश्वर्याशी बोलण्याची घाई केली नाही याचं त्याला समाधान वाटलं. आणखी कुणीतरी येऊन धडकण्याच्या आत काहीतरी केलं पाहिजे हा विचार करून तो तिच्याकडे गेला आणि ओळख करून घेतली. त्यानंतर सगळ्यांच्या ओळखी होईपर्यंत ते दोघेच एकत्र असायचे नंतर त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे मृन्मयीच त्याच्याकडे ओढली गेली. खरं तर तेव्हा कुणाचंच काहीही नव्हतं पण सगळ्यांनी आपापल्या मनात सगळ्यांच्या जोड्या ठरवल्या आणि घोळ झाला. घोळच! कारण ऐश्वर्यालाही निलेश मनापासून आवडला होता. कपिल आणि ऐश्वर्या तेव्हा फक्त मित्र होते हे रूममेट असल्यामुळे मृन्मयीला माहिती होतं पण निलेशला नाही. निलेशबद्दल ऐश्वर्याचाही तसाच गैरसमज झाला आणि मृन्मयीने तो गैरसमज जाणीवपूर्वक तसाच राहू दिला. ऐश्वर्यानेही मग निलेशचा विचार काढून टाकला. आणि या सगळ्यामुळे ऐश्वर्या कपिलच्या आणि मृन्मयी निलेशच्या जवळ आली. नंतर जेव्हा सगळे एकमेकांचे चांगले मित्र झाले तेव्हा हा घोळ सगळ्यांना कळला आणि तो आठवून ते कितीतरीवेळ हसत बसायचे. पण आता त्याच्या मनात काहीही नव्हते. मृन्मयी खूप चांगली होती अगदी ‘MM’! ती निलेशसारख्या बेफिकीर माणसाला इतकं सांभाळून घेई, त्याची इतकी काळजी घेई कुणी पाहिलं तर तिला त्याची बायको समजलं असतं. याउलट ऐश्वर्याचं तीही बर्याच अंशी निलेशसारखी होती आणि कपिलला तिला नेहमी संभाळावं लागे. एकूण काय तर देवानेच जणू तो घोळ घालून प्रत्येकाच्या पदरात योग्य जोडीदार टाकला होता.

हे सगळं आठवून तो स्वतःशीच हसला.

“गॉड गिव्हज यू व्हॉट यू डिझरव्ह!” तो स्वतःशी बोलला!

समोरच्या दरवाज्यात ऐश्वर्या उभी होती. तिच्याकडे लक्ष जाताच तो तिला म्हणाला, “अगं ऐशू! झोपली नाहीस अजून?”

“नाही! तहान लागली म्हणून उठले होते इथली लाईट चालू दिसली म्हणून आले इकडे तर तुझी तंद्री लागली होती. कसला एवढा विचार करत होतास?” ऐश्वर्या

“काही नाही गं फर्स्ट इयर आठवलं!” तो हसत म्हणाला.

“किती वेळा?” तिला कळलं तो काय विचार करत होता ते.

“अच्छा! म्हणून तू म्हणालास होय गॉड गिव्हज यू व्हॉट यू डिझरव्ह?” ती त्याच्यासमोरच्या भिंतीला टेकून दारातच मांडी घालून खाली बसली.

“हो ना! खरं आहे ना ते?” तो

“असेल!” तिने कॅन्डीक्रश चालू केली.

“आवाज बंद करशील तो? ते म्युजिक अगदी इरिटेट करतं मला!” तो

“मलाही!” असं म्हणत तिने आवाज बंद केला.

“तू असेल असं उत्तर का दिलंस?” तो

“कारण हे देवानं नाही तुझ्या लाडक्या देवीनं घडवून आणलं!” ती

“म्हणजे?” तो

“म्हणजे जर मृन्मयीचा स्वभाव तुझ्यासारखा किंवा माझ्यासारखा असता तर हे घडलं असतं?” तिने त्याच्याकडे खोचक कटाक्ष टाकत विचारलं.

हॅपी बर्थडे | भाग ४

अखेर तिने सगळे विचार मनातून झटकून टाकले आणि तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले. त्याने तिच्यात भरलेली उत्कटता ती त्याला परत करू लागली. आपल्या टपोर्या ओठांनी ती त्याच्यावर हल्ला चढवू लागली. तिची मान हातात घट्ट धरून तो तिला जवळ ओढत वरवर आणखीच उत्कटपणे तिच्यावर बरसू...

हॅपी बर्थडे | भाग ३

"नाही बट स्टिल फायनली एव्हरीथिंग्स गुड! राईट?" तो "बट इट वूड हॅव बीन बेटर! डोन्ट यू थिंक?" तिची नजर भेदक होती. ऐश्वर्या म्हणजे कमालीची कॉन्फिडन्ट मुलगी होती "ऐशू तू खुश नाहीस कपिलबरोबर?" त्याने थेट मुद्द्याला हात घातला. "चल रे! असं कसं वाटलं तुला?" ती "तुझ्या...

हॅपी बर्थडे

त्याचं एमबीएचं शेवटचं वर्ष होतं यंदा. आणखी दोन तीन महिन्यांत त्यांची शेवटची परीक्षा  त्यानंतर ते सगळे नोकरीधंद्याला लागणार होते. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वतःला जगाच्या मार्केटमध्ये स्वतःला आजमावणार होते. त्यांचा सात जणांचा ग्रूप म्हणजे अगदी सिनेमातल्या...

error: नका ना दाजी असं छळू!!