हॅपी बर्थडे | भाग ३

“नाही बट स्टिल फायनली एव्हरीथिंग्स गुड! राईट?” तो

“बट इट वूड हॅव बीन बेटर! डोन्ट यू थिंक?” तिची नजर भेदक होती. ऐश्वर्या म्हणजे कमालीची कॉन्फिडन्ट मुलगी होती

“ऐशू तू खुश नाहीस कपिलबरोबर?” त्याने थेट मुद्द्याला हात घातला.

“चल रे! असं कसं वाटलं तुला?” ती

“तुझ्या बोलण्याचा एकंदरीत रोख तसाच वाटतोय!” तो

“नाही रे. मी बर्याचदा विचार करते. आ पण दोघे जर तेव्हा जवळ आलो असतो तर आज काय काय आणि किती वेगळं असतं!” ती

“अरेच्या! हा विचार माझ्या डोक्यात आला नाही कधी! खरंच! इंटरेस्टिंग!” तो

“तिच्यासाठी तू तुझा स्वभाव बदललास. तुझ्या मनाला मुरड घालायला सुरवात केलीस तू. अर्थात चांगलंच आहे ते. पण तुला वाटतं माझ्यासाठी तुला हे करावं लागलं असतं?” ती

“ते मात्र १०० टक्के बरोबर आहे हं तुझं!” तो

“मृन्मयीबद्दल माझ्या मनात बिलकुल काही नाही. पण आय डिझरव्हड यू!” ती

“नक्कीच! यात वाद नाही!” तो

“कपिल सुद्धा मला डिझरव्ह करतो पण मी काय डिझरव्ह करते हे आता मॅटर करत नाही! सेम विथ यू गाईस!” ती

“कशाला एवढा विचार करतेस ऐशू?” तो

“कसं असतं, खूप झालं की माणसाला सुखही बोचू लागतं! मग तो त्यात दुःख शोधू लागतो!” ती

“च्यायला! जरा जास्तच झाली हं तुला. तू असलं कधी बोलशील असं वाटलं नव्हतं मला!” तो

“का रे असं बोलतोस. मला फीलिंग्स नाहीयेत का रे?” ती

“तसं नाही गं!असं फिलॉसॉफिकल वगैरे! त्याबद्दल बोलतोय मी.

“निळ्या, मृन्मयी जे तुला बाबू म्हणून हाक मारते ना ते नावही मीच ठेवलं होतं! मी माझ्या नोट्सवर कुणाला कळू नये म्हणून बाबू बाबू लिहायचे आणि ते वाचून एक दिवस मृन्मयी मला म्हणाली की ती तुला बाबूच म्हणणार!” तिने तिच्या पाणावलेल्या डोळ्याची कड अलगद पुसली.

तो झटकन उठला आणि तिला धरून गादीवर बसवलं. तो ही तिच्या शेजारी बसला.

“हेऽऽऽss ऐशू! तू रडतेयस? वेडी आहेस का तू?” तो

“निळ्या एवरी सिंगल टाईम शी कॉल्स यू बाबू ना इट लिटरली टिअर्स माय हार्ट अपार्ट! काळीज जळतं रे माझं!” तिला हुंदका अनावर झाला.

“ए ऐशू! रडणं बंद कर.तुला शोभत नाही ते!” तो

“आणि तुलाही काही वाटत नाही ना माझ्याबद्दल आता. त्याच्यामुळे जास्त त्रास होतो मला!” ती

“काहीही काय बोलतेस ऐशू? मला काहीच वाटणार नाही तुला त्रास झाल्यावर?” तो

“हो पण हे वेगळं आहे निळू! तू फील करत नाहीस माझ्यासाठी आता! माझ्याजागी आत्ता मृन्मयी असती तर तुझं काळीज पिळवटून निघालं असतं. हो ना!” ती

“ते आताही निघतंय ऐशू!” तो समोरच्या भिंतीकडे पाहत बोलत होता. तिने तिचा मोबाईल दोघांच्यामध्ये ठेवला होता आणि उजवा हात गादीवर टेकून ती बसली होती.

“मला सांगायचं नव्हतं हे तुला निळ्या पण आता नाही राहवत. दोन वर्षं मी कसं सवरलंय स्वतःला ते कळणार नाही तुला! मी आणि कपिलने कालच ब्रेकअप केलंय! मला त्याला फसवायचं नव्हतं रे. माझ्या मनात त्याच्यव्यतिरिक्त आणखी कुणीतरीही कायमचा राहणार हे मला त्याला फसवण्यासारखंच वाटलं!” ती.

“काय बोलतेयस तू हे ऐशू? तुम्ही दोघेही मूर्ख आहात. हे काय केलंत तुम्ही? आणि दोघांपैकी एकालाही मला सांगावंसं नाही वाटलं?” तो

“फक्त सुमित्राला माहिती आहे. आम्ही विचार केला आमच्या या निर्णयामुळे आपली सगळ्यांची मैत्री नको तुटायला! तुला कळतंय का काय होईल सगळ्यांना कळल्यावर? आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आता दोन महिने नाटक करत रहायचं. आणि नंतर फॅमिली ऍक्सेप्ट करत नाहीये म्हणून वेगळं झाल्याचं जाहीर करायचं!” ती हुंदके देत देत बोलत होती

“मला किती अपराधी वाटेल आता. माझा भाऊ आहे कपिल! माझ्यामुळे त्याचं आयुष्य उद्धवस्त झालं हे ओझं घेऊन जगावं लागेल मला आता!” तो

“बघ तुला त्याची काळजी वाटते, त्याच्याबद्दल वाईट वाटतं पण याचा मला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे का तुला.” तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

“माझं डोकंच चालत नाहीये!” त्याने त्याचं डोकं गच्च धरलं

“आणि म्हणूनच तुला मृन्मयीसारखीच जोडीदार हवी!” ती

“म्हणजे?” तो

“निळू तुला आजपर्यंत असं वाटत होतं ना की मृन्मयीने तुला प्रपोज करायच्या आधीपासून कपल्या आणि मी एकत्र आहोत? तसं नाहीये निळ्या! तू तिच्याबरोबर गेलेला कळल्यानंतर मी ढासळले आणि तेव्हा कपिलने मला सावरलं आणि त्याच्या उपकाराची जाण आणि त्याचं प्रेम बघून मी त्याला स्वीकारलं. वाटलं त्याचं प्रेम मला तुला विसरायला भाग पाडेल. पण नाही झालं रे तसं! त्यालाही पहिल्यापासून सगळं महिती होतं त्यामुळे त्याला तसा जास्त त्रास झाला नाही वेगळं व्हायला!” ती.

“हे काय बोलतेयस तू ऐशू?” “मृन्मयी!” त्याने रागाने मुठी आवळल्या

“नाही निळू! तिचा काय दोष यात? तीही माझ्याएवढंच प्रेम करते ना तुझ्यावर. फक्त आ पण दुसर्यासाठी आपलं प्रेम जाऊ दिलं आणि तिने ते मिळवण्याची हिम्मत दाखवली! आणि म्हणून तिला ते मिळालंही! तिच्यावर कशाला चिडतोस? हे माझं अपयश आहे आणि तुझंही! खूप चांगली आहे मुन्नी आणि हुशारही!” ऐश्वर्या आपल्या मनातलं सगळं भडाभडा ओकत होती.

“देव हे असले खेळ माझ्याशीच का खेळतो नेहमी मला कळत नाही!” तो

“बट येस! मी खरंच मनापासून खुश आहे तुझ्यासाठी आणि आपल्या मुन्नूसाठी!” तिने आणलेलं उसनं अवसान ढासळलं आणि वाक्य पूर्ण होईपर्यंत पुन्हा तिचा हुंदका दाटून आला.

“आणि मी खूप दुःखी आहे तुझ्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठीही!” त्याने तिचा हात आपल्या दोन्ही हातांत घट्ट धरला. त्याच्या स्पर्शातूनच तिला जाणवलं की त्याला किती वाईट वाटत होतं. तिला ते सहन झालं नाही आणि तिने तिचा दुसरा हात त्याच्या हातांवर ठेवत छातीशी कवटाळलं आणि डोळे गच्च मिटून मान खाली घालत तिने आपले अश्रूंनी भिजलेले ओठ त्याच्या हातांवर टेकवले आणि हुंदके देऊ लागली. तोही मनातून आता पुरता ढासळला होता. तिच्या हातावरची आपली पकड घट्ट करत तो त्याच्या मनात उठलेलं वादळ तिच्यापर्यंत पोचवत होता. तिने मन वर करून अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहिले. त्याचेही गच्च भरलेले डोळे पाहून तिचा बांध फुटला आणि तिने पुन्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याने आपले हात सोडवत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला आणि अंगठ्याने तिच्या धारा पुसून टाकल्या.

“बास ऐशू! प्लीज! माझ्यासाठी!” त्याचाही स्वर कातर झाला होता. तिने हुंदका आवरला आणि पटकन दोन्हीही डोळे पुसले. खोटं खोटं हसत ती बोलली, “तुमच्यासाठी काय पण!” त्याच्या चेहर्यावर रडू आणि हसू एकाचवेळी झळकलं! त्यानेही डोळे पुसले. तो उठून आत गेला. मृन्मयी गाढ झोपली होती. तिच्या कपाळावर त्याने एकदा हात फिरवला आणि वाकून कपाळावर हलकेच एक चुंबन घेतलं.

“सॉरी मुन्नू!” तो एवढंच बोलला आणि उठून बाहेर आला.

ऐश्वर्या तिथेच बसली होती.

“सॉरी निलेश! मला माफ कर मला तुमच्या दोघांमध्ये कटुता आणायची नाहीये! हे सगळं ऐकून तू कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलणार नाहीयेस!” ऐश्वर्या त्याच्याकडे न पाहताच बोलत होती. तो पुन्हा जाऊन तिच्या शेजारी बसला.

“ऐशू! या सगळ्यावर आपल्या चौघांना बसून बोलावं लागणार आहे!” तो

“वेड लागलंय का तुला! तू उगाच मृन्मयीच्या मनात अपराधीपणाची भावना भरतोयस.” ती

“जर तिने अपराध केला असेल तर तिला सहन करावं लागेल. आपल्या तिघांच्या चुका नसताना आ पण तिच्या अपराधाची शिक्षा भोगणारच आहोत ना?” तो

“यालाच तर प्रेम आणि मैत्री म्हणतात!” ती

“हे सगळं कथा कादंबर्यांमध्ये असतो. त्या पात्रांसारखं जीवन आ पण प्रत्यक्षात नाही जगू शकत. कारण त्यांचं अस्तित्व, त्यांचं जीवन त्यांच्या लेखकाच्या मनावर असतं. आ पण म्हणजे कुणा लेखकाच्या कल्पना नाही आहोत. आ पण माणसं आहोत! जिवंत!” तो.

तिने त्याचा हात दोन्ही हातात धरला आणि त्याच्या डोळ्यांत पाहत ती बोलली, “काहीही झालं तरी मृन्मयीला तू अर्ध्यात सोडून जाणार नाहीयेस! कळलं?” ती

“आणि तुला?” तो ही तिच्या नजरेला नजर भिडवत बोलला.

“माझा हात तू मुळात धरलाच कधी होतास? सोडून जाण्याचा प्रश्नच नाही.” ती

“मग आता धरतोय. ऐशू! माझ्या जीवनात आता फक्त आणि फक्त तुला जागा असेल. मला कुणाचीही पर्वा नाही.”  तो

“काय बोलतोयस तू?” ती

“तू माझ्यासाठी नेहमीच एका मैत्रिणीपेक्षा काहीतरी जास्त होतीस! आज त्या काहीतरीला नाव द्यायचं मी ठरवलं आहे.” तो

“काय?” ती

“माहिती नाही.” तो

तो काहीही न बोलता तिच्याकडे पाहत होता अन ती त्याच्याकडे. दोघांचे चेहरे एकमेकांसमोर होते. त्याने एका हाताने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा तिरका केला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर अलगद टेकविले. तिच्या सून्न शरीरात चैतन्याचा झरा पाझरू लागला आणि ती त्यात विरघळू लागली. ज्या प्रेमासाठी ती दोन वर्षे तळमळत राहिली त्यात आता ती ओलीचिंब भिजत होती. तो सगळंकाही विसरून तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी हळुवारपणे कुरवाळत होता. ती स्तब्ध होती. तिला काहीच सुचत नव्हतं. तिचं एक मन त्याच्यापासून दूर हो म्हणून सांगत होतं. तिने तिचे दोन्ही हात त्याला दूर ढकलण्यासाठी सरसावले होते पण दुसरं मन त्या आनंदाला मुकण्यास तयार नव्हतं. तिचे हात हवेतच थांबले होते. तो पुढे सरकून सरकून तिच्यावर अखंड प्रेम बरसवत होता.

हॅपी बर्थडे | भाग ४

अखेर तिने सगळे विचार मनातून झटकून टाकले आणि तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले. त्याने तिच्यात भरलेली उत्कटता ती त्याला परत करू लागली. आपल्या टपोर्या ओठांनी ती त्याच्यावर हल्ला चढवू लागली. तिची मान हातात घट्ट धरून तो तिला जवळ ओढत वरवर आणखीच उत्कटपणे तिच्यावर बरसू...

हॅपी बर्थडे | भाग २

सर्वांनी मिळून केक कापला एकमेकांना भरवला. केकचा कार्यक्रम उरकेपर्यंत कपिल आणि सुमीतने प्यायची तयारी केली. निलेश आणि मृन्मयी दारू पीत नसत. तसं निलेश पूर्वी पीत असे पण दोन वर्षापासून त्याने बंद केली होती. पेग भराभर रिकामे होऊ लागले. धुराडी पेटली. हे दोघं वगळता सगळे...

हॅपी बर्थडे

त्याचं एमबीएचं शेवटचं वर्ष होतं यंदा. आणखी दोन तीन महिन्यांत त्यांची शेवटची परीक्षा  त्यानंतर ते सगळे नोकरीधंद्याला लागणार होते. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वतःला जगाच्या मार्केटमध्ये स्वतःला आजमावणार होते. त्यांचा सात जणांचा ग्रूप म्हणजे अगदी सिनेमातल्या...

error: नका ना दाजी असं छळू!!