घाईगडबडीत पवन घरी आला. दरवाजा उघडताच त्याची बुबळ विस्फारली. दिवाणखान्यात चारही बाजूला अंधार आणि फक्त अंधारच होता त्याच्यामुळे विस्फारून अंधारात काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता त्याने समोर पाहिलं तर सुबोध खोलीबाहेर बसलेला. काहीही हालचाल न करता एका बाजूला मान टाकून तो व्हीलचेअर बसल्याचं त्याला जाणवले. दबक्या पावलांनी पवन हळूहळू अंधाराचा अंधारात तोल सावरत पुढे गेला. पण त्याला अचानक त्याच्या पाठी एक खुसपट आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी आपल्या पाठी असल्याची जाणीव त्याच्या शरीराने त्याला दिली. त्याच्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले.
समोर असलेल्या सुबोधकडे लक्ष ठेवून “आ पण आपल्या घरात एकटे नाही आहोत” हा विचार त्याच्या मनात चमकला. काही कृती करणार त्याच्या अगोदरच त्याच्या पायावर, घोट्याजवळ एक जोरदार वार झाला. जोरात ओरडून तो तसाच खाली पडला आणि नेमक त्याच डोकं सोफ्याच्या दांड्यावर आदळल.
त्याच्या कपाळावर खोप पडली आणि चेहर्यावरून रक्त वाहू लागले. त्याला जेवढे काही अंधारात दिसत होतं ते सुद्धा दिसण आता बंद झालं, तरी देखील हात हालवत तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हाताला कसलीतरी वस्तू लागली. त्याचा हात सोफ्या खाली गेला होता. पीठाने माखलेल्या त्याचा हाताला धाग्याने बांधले लिंबू आणि एक पिशवी लागली. ती पिशवी बाजूला सारण्याच्या नादात पिशवीतील समान बाहेर पडले. त्यात पवनच महागडं घड्याळ होतं, सुबोधच्या काही वस्तू आणि अझलानचा मोबाईल फोन होता.
पवनने तो फोन खोलण्याचा प्रयत्न केला पण पासवर्ड बरोबर येत नव्हता. मोबाईलच्या त्या लॉक स्क्रिनच्या प्रकाशात तो पुढे सरकला आणि उघड्या डोळ्याने समोरून एक हलणारी सावली त्याला दिसू लागली. अचानक व्हीलचेअर हलू लागली आणि त्यावर असलेला देह सुटण्यासाठी धडपड करू लागला. त्या सावलीने व्हीलचेअरला मागून पकडलं तसा पवनच्या कानावर एक आवाज आदळला. सुबोधचा आवाज,
“घरात कोणी आहे का? पवन, पवन कुठे आहेस तू? वाचव मला कुठे आहेस?”
पवनने मोबाईल तिथेच सोडला आणि एका हाताने आपली जखम दाबत, गुडघे जमिनीला घासत घासत आणि वर सरकवत उठण्याचा प्रयत्न करू लागला. जरा पाय हालवतात त्याला त्याच्या पायावर झालेल्या वाराची जखम ठनकत. तो डोळे फाडून अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला.
ती सावली आता पुढे व्हीलचेअर सरकवत घेऊन चालली होती. ती जंगलाच्या दिशेने चालली होती. आपली सगळी शक्ती एकवटून सरपटत कसाबसा पवन दरवाजाजवळ गेला. नेहमीप्रमाणे धुक्यात बुडालेल ते जंगल खूपच भेसूर वाटत होतं उंच उंच वाढलेला झाडातून त्यांच्या फांद्या आता हे ढगाळ वातावरण भेदतील की काय असं वाटत होतं. अंधार होता.
व्हीलचेअर सरकवत जंगलाच्या दिशेने ती सावली आत जंगलात चालत होती. ते पाहून दरवाजाच्या चौकटीचा आधार घेऊन पवन उभा राहिला आणि चालू लागला. पणमध्ये एक नजर त्याने आपल्या पायाकडे टाकली त्याचा घोटा फुटला होता. त्याला रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हत म्हणून तो अडखळत रांगत तो त्या सावलीचा पाठलाग करू लागला. झाडाच्या वाळलेल्या काटका त्याच्या तळव्यात घुसत होत्या.
काट्या-कुट्या त्याच्या गुडघ्याला टोचत होत्या. पवन लवकरात लवकर त्या सावली जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. अचानकपणे तो थांबला. कारण त्या सावलीने व्हाईलचेअर वर असलेल्या माणसाला खाली पाडल. तडफडत तो देह खाली पडला आणि पुढे काय होतं जे काही घडणार होता त्या अगोदर पवन जोरात ओरडला. पण तो आवाज तिथेच दबून राहिला. त्या सावलीने एक तीक्ष्ण, लांब, टोकदार, अणकुचीदार वस्तूने खाली असलेल्या देहावर वार करायला सुरूवात केली.
रात्रीच्या काळोखातून एक अगदी क्षीणसर आवाज पवनच्या कानावर आला होता. सुबोधचा आवाज. तो किंचाळला होता. त्या किंचाळीत प्राणभय होते. क्षणमात्र पवन होता तिथेच हबकून उभा राहिला आणि तो आवाज पुन्हा आला. काळोख्या रात्रीच्या वार्यावर तरंगत आलेली सुबोधची किंचाळी पवनसाठी रक्त गोठविणारी होती.
न जाणे किती वेळा पोटावर कधी छातीवर ती सावली त्या तीक्ष्ण, लांब, टोकदार, अणकुचीदार वस्तू भोकसत राहिली. नंतर ती आकृती त्या देहाच्या पायाला पकडून सरकवण्याचा प्रयत्न केला. पवन आता सावलीच्या खूपच जवळ आला होता. एका छोट्याशा खड्ड्यात त्या सावलीने तो देह ढकलून दिला आणि ती आत पळत सुटली. पवन देखील जोरात तिचा पाठलाग करत होता. शेवटी तो त्या सावलीच्या जवळ आला आणि त्याला हे कळून चुकलं होतं, की हा मानव निर्मित प्रकार आहे. त्या सावलीच्या खरा चेहरा आता लवकरच पवनसमोर येणार होता.
बाजूला असलेल्या झाडीतून, खाचखळग्यातून, वाळक्या पानाकाटक्यातून पवन एकदाही न थांबता, न अडखळता पळत होता. त्याचा आवाजाच्या दिशेचा अंदाज अचूक होता.
समोर एक वठलेलं झाड होतं. पवन विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होता. झाडाला एक हात टेकून ती काळी सावली उभी होती. नाही आता ती सावली नाही. एक व्यक्ती आहे. सावलीच रूप घेऊन हे सगळं कटकारस्थान करत होती. आपला जखमी घोटा सरकवत पवनने त्या सावलीला मागून करकचून मिठी मारली.
आपले दोन्ही हात त्या व्यक्तिच्या दोन्ही हात, छाती आणि पोटाभोवती गुंडाळले. तस ती व्यक्ती तडफडू लागली. आपलं खरं रूप समोर येईल या भीतीने पवनच्या गुडघ्यावर जोर जोरात लाथा मारू लागली. कधी डावीकडे कधी उजवीकडे झिडकारून त्या सावलीने पवनला पाठी पाडण्याचा प्रयत्न केला, पण पवने मिठी घट्ट केली.
त्या व्यक्तीला दुसरा काही पर्याय दिसला नाही. आपल्या हातातील धारदार शस्त्र तिने घट्ट पकडलं. त्या वक्तीने आपला हात कोपर्यात उचलला आणि पाठी असलेल्या पवनच्या पोटात आपले हत्यार घुसवले. एक दोन वेळा पवनच पोट फाडत आतड्यामध्येत घुसळत ती टोकदार वस्तू पवनच्या पोटात शिरली तसा पवन पाठी सरला. थरथरत पुढे पोटावर पडला. त्या व्यक्तीने पाठी वळूनही न पाहता पळून जाण्याचा प्रयत्न पण केला पवन आपल्या हातांनी त्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. तो व्यक्ती जोरजोरात पवनच्या तोंडावरती लाथा मारू लागला.
“तू सुबोधला मारलं मी सोडणार नाही तुला” पवन ओरडू लागला. त्या व्यक्तीने लाथा मारणं बंद केल आणि एक हिसका देऊन आपला पाय सरकवला आणि सरपटत अंधारात ती व्यक्ती सटकली.
पोटातील जखम सावरत पवन उठला. त्याला त्याच्या जखमांच्या विसर पडला होता. राग, दुःख, हतबलता त्याच्या सगळ्या भावना उंचावून आल्या होत्या. काहीही झालं तरी ती व्यक्ती कोण आहे हे माहित केल्याशिवाय तो शांत बसणार नव्हता.
एका हाताने आपल्या पोटावरची जखम घट्ट पकडत लंगडत लंगडत पवन त्या व्यक्तिच्या दिशेने जाऊ लागला. अचानक त्याला पालापाचोळा चुरडल्याचा आवाज ऐकू आला. तो थांबला. नक्कीच ती व्यक्ती असणार या आशेने त्याने येणार आवाजाच्या दिशेने पाऊल उचलले. त्याचा अंदाज बरोबर निघाला एक व्यक्ती झाडाला धरून उभ राहण्याचा प्रयत्न करत होती.
एक तीक्ष्ण, लांब, टोकदार, अणकुचीदार लाकूड त्या व्यक्तिच्या बाजूला खाली पडलं होतं. हाच तो पवन मनातल्यामनात म्हणाला. आपली सगळी शक्ती एकटवून सुबोधच्या किंकाळ्या मनात आठवून त्याने एका हाताने ते लाकूड उचललं आणि दुसर्या हाताने त्या व्यक्तिच्या दंडाला हात धरून तिला मागे फिरवल. क्षणाचा ही विलंब न करता आपल्या दुसर्या हाताने ते लाकूड तिच्या गळ्यात घुसवल. एक विचित्र चित्कार त्याच्या कानावर पडला. रक्ताची एक पिचकारी पवनच्या तोंडावर उडाली. ती व्यक्ती तडफडू लागली.
कसबस आपल्या गळ्यातून ते टोकदार लाकूड त्या व्यक्तीने बाहेर काढलं आणि स्वतःच अंग खाली झोकून दिल. तिथेच निपचित पडून राहिली. पवन पुढे आला. रक्ताने भरलेला चेहरा हात फिरवून साफ केला आणि त्या व्यक्तीकडे पाहू लागला. त्याच्या समोर टीन्या पडला. होता त्याचा गळा पूर्णपणे फाटला होता आणि डोळे सताड उघडे आकाशाकडे पहात होते. एवढे पाहून पवनला भोवळ आली आणि त्याने आपलं डोकं तसेच जमीन निश्चिंतपणे ठेवून दिलं. त्याचे अर्धवट श्वास चालू होते.
इकडे पवन आपल्या घरी येऊन गेल्याची बातमी रघुला कळाली होती त्याला अंदाज आला नक्कीच काहीतरी बरं-वाईट झाल असणार, म्हणून तो केव्हाच पवनच्या घराकडे येण्यासाठी निघाला होता. सोबत काही गावकरी देखील आले होते. घराजवळ जाताच त्यांना कळालं घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे अंधार आहे. सोबतीला आणलेल्या विजेरीच्या प्रकाशात दिवाणखान्यात शिरले घरातलं सामान अस्ताव्यस्त होतं. रघुने आपल्या विजेरीचा प्रकाश दिवाणखान्यात फिरवला.
त्या प्रकाशात त्याने पाहिलं की अंगभर जखमा आणि फाटके कपडे घेऊन सुबोध रांगत घराबाहेर येऊ पाहत आहे. सगळे गावकरी पुढे सरसावले “कोणीतरी पाणी आणारे” रघु ओरडला पण सुबोध हातवारे करून जंगलात जाण्याचा इशारा करत होता. दोन गावकरी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि बाकीचे आत जंगलात सुबोधने कसेबसे इशारे करत आपल्या खोलीतील डॉक्टर नेगीचे कार्ड गावकर्यांना दाखवून बोलण्याची विनंती केली आणि डोळे मिटून सुबोध बेडवर शांत झाला.
काही दिवस, काही महिने, काही रात्री चालली विचित्र घटनांची मालिका आता थांबली होती काल रात्रभर चाललेला अभद्र आणि रक्ताचा सडा पाडणारा प्रकार देखील शांत झाला होता.
गावकर्यांनी पवनच्या घराबाहेर तीन प्रेतं ठेवली होती. डॉक्टर नेगी आणि त्याच्या बाजूला उभे असलेले इन्स्पेक्टर हताश पणे त्या प्रेताकडे पाहत होते. पवन, टिन्या आणि अझलान विचित्र प्रकारे आणि खूप सार्या जखमांसोबत जंगलात गावकर्यांना सापडले. मृत.
टिण्या आणि पवनला अग्नी देण्यात आला. आणि अझलानला दफनभूमीत दफन करण्यात आले. यादरम्यान सुबोध बेशुद्ध होता चार-एक दिवसानंतर तो शुद्धीत आला. अंगावरच्या जखमा बर्यापैकी भरल्या होत्या. तो अजून त्याच घरात स्वतःच्या खोलीत होता डॉक्टर नेगी त्याच्या बाजूला चेहरा पाडून बसले होते. कसबसं उठत सुबोधने त्याच्याकडे पाहिल. काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज त्याला आला ओठ खेळवत त्याने डॉक्टरांना विचारलं,
“पवन कुठे आहे?”
डॉक्टर अडखळत म्हणाले “आ पण याविषयी नंतर बोलू तू सध्या आराम कर.”
सुबोध मोठ्या आवाजात परत तेच वाक्य म्हणाला,
“पवन कुठे आहे?”
त्याच्या लाल डोळ्यातून अश्रूंची धार टपकत होती, हाताच्या घट्ट केलेल्या मुठ्या पाहून डॉक्टरांना त्याला सांगणं भाग पडलं, “पवन आता या जगात नाही.”
ते ऐकताच सुबोधने एक जोरात हंबरडा फोडला. त्याने आपल्या आजूबाजूलाच सामान दोन्ही हाताने फेकून दिलं. उशा फाडून फेकून जोरजोरात ओरडू लागला “नाही नाही असं नाही होऊ शकत” तो जोरात भिंतीवर डोकं आपटायला जाणार तेवढ्यात डॉक्टर नेगीने त्याला पकडले आणि त्याला शांत करू लागले.
“हे बघ आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्या हातात नव्हतं, इस्पितळात जाण्या अगोदरच त्याचा आणि अझलानचा मृत्यू झाला.मी खरच तुझी माफी मागतो. पण तू काळजी करू नकोस त्या दोघांनाही निर्दयपणे मारणारा स्वतादेखील विचित्र प्रकारे मेला आणि या कामात त्यांना साथ देणार्याला माणसाला अटक देखील केली आहे.”
सुबोध गोंधळला डॉक्टर काय बोलतायत त्याला कळेना. “म्हणजे?”
“तू अजून बरा नाही झालास म्हणून मी म्हणालो की या विषयी आ पण आता नको बोलायला.”
“नाही! नाही हे जे काही प्रकरण आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळायला हव.” सुबोध हट्ट करून डॉक्टरांना म्हणाला.