बराच वेळ वेगात धावल्यानंतर अचानक थांबल्यावर जसं छातीत दुखत तसंच माझं झालं. बस मधून उतरल्यापासून जाडजुड बॅग घेऊन बसस्थानका बाहेर चालत आल्यामुळे माझ्या छातीत दुखत नव्हतं. तर कार घेऊन माझा नवरा मला न्यायला आला होता. जी व्यक्ती कार चालवत होती त्या व्यक्तीला पाहून माझ्या छातीत दुखत होतं.
तो दामू होता. माझ्या आयुष्यात ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं, तो व्यक्ती. आमच्या कारमध्ये बसून दामू मलाच न्यायला आला होता. ही काय भानगड आहे हे मला कळेना. त्यामुळे मला भीती वाटली.
“हे दामोदर पाटील, आपल्या एरियाच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहेत. आत्ताच बदली झाली आहे. ती चौथी कॉट रिकामी होती ना आपल्यात, ती यांना दिली मी”कार मधून उतरत माझ्या हातातून बॅग घेत राहुल म्हणाला.
ती बॅग उचलायलाही राहुलला जड जात होतं, तरीही ती त्याने उचलली आणि ओढत नेत मागच्या डिकीत भरली. लग्न झाल्यावर चार वर्षांनी त्याचा अपघात झाला होता. अगोदरच तो डोळ्याने आधु होता पण अपघातानंतर त्याला व्यवस्थित चालता यायचंही बंद झालं. तो उजवा पाय ओढत लंगडत लंगडत चालत असे.
दामूबद्दल राहुलला माहिती नव्हतं असंच वाटत होतं. मी मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. त्याच्या नजरेस नजर द्यायचं माझं धाडस होत नव्हतं. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. त्याच्या पाहण्यामुळे मला विचित्र भावना जाणवू लागल्या होत्या. एक तर इतक्या वर्षानंतर मी त्याला पाहत होते. तो दिसायला अजूनही तसाच किंबहूना अधिकच रूबाबदार आणि राजबिंडा झाला होता.
कॉलेजला पहिल्यांदा पाहिल्यावर मला असं जाणवलं होतं तसंच आताही वाटत होतं पण ही आमची पहिली भेट नव्हती. कॉलेजला असताना आम्ही दोघांनी एकमेकांना पुरतं जाणून घेतलं होतं. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंत आमच्या गोष्टी गेल्या होत्या, पण त्या अगोदरच सगळं बिनसलं. माझ्या घरच्यांना कुठून तरी कळालं आणि मग माझं त्यांनी राहुल सोबत लग्न लावून दिलं.
घरी जाताना दामू वारंवार माझ्याकडे चोरटे कटाक्ष टाकत होता. त्याच्या त्या नटखट नजरेने माझ्याकडे पाहत होता. हळूच गालातल्या गालात हसत होता. मला त्याचा खूप राग येत होता पण रागाबरोबरच ते जुनं प्रेमही उसळून वर येऊ पाहत होतं. राहुल बरोबर लग्न होऊन आता बारा वर्षे झाली होती. त्याला पुन्हा एकदा पाहिल्यानंतर मला त्याच्याबद्दल इतकं प्रेम, इतकी ओढ जाणवायला नको होती, तरीही ती जाणवत होती.
घरी गेल्यावर मी माझ्या कामात व्यस्त झाले. दामू माझ्या मनाच्या पार्श्वभूमीवर सतत वावरत होता त्याच्याबद्दल असणारी ओढ क्षणाक्षणाला वाढत होती पण मी मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होते. कारण त्याला बोलले, त्याच्या जवळ गेले तर काय होईल याची मला शाश्वती नव्हती.
आमच्या घरची परिस्थिती तशी बरीच होती. राहुल अपघात झाल्यापासून कोणतंच काम करत नव्हते पण घर व्यवस्थित चाललं होतं. वरच्या मजल्यावर कॉट बेसिसवर चार भाडेकरू ठेवायचो. तीन दुकाने होती जी भाड्याने दिली होती. त्याचंही भाडं भरपूर यायचं. मी स्वतः शिवणकाम वगैरे करायचे पण त्याचीही फारशी गरज पडायची नाही. आमच्या पाच जणांचं कुटुंब तेवढ्या पैशात आरामात जगायचं.
मी, श्रेयांश, वेदांश, राहुल आणि राहुलच्या आई असं पाच जणांचं कुटुंब खालच्या मजल्यावर रहायचो. वरच्या मजल्यावर असलेल्या एका मोठ्या हॉलसारख्या खोलीत चार कॉट टाकल्या होत्या जिथे चार भाडेकरू असायचे. वरच्या मजल्यावरच एक टॉयलेट आणि बाथरूमही भाडेकरूंसाठी बांधलं होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं पण त्या दामूने सगळं बिघडवलं. तो आल्यापासून माझं दैनंदिन आयुष्य बदलून गेलं.
जवळपास महिना उलटला तरी मी त्याला व्यवस्थितपणे बोलले नव्हते. मला त्याच्याशी बोलायचंही नव्हतं. एकदा बोलू लागली तर पुढच्या गोष्टीही आपोआपच होतील हे मला माहिती होतं. राहुल समोर असताना दामुशी तेवढ्यास तेवढं बोलायचे बाकी बोलायचं टाळायचे. इतर तीन कॉटवर विद्यार्थी होते. तिघेही बारावीला होते. जेईई किंवा नीटच्या क्लासेस त्यांनी लावल्या होत्या.
दामू मात्र मुद्दाम माझी गोची करायचा. वेळोवेळी मला एकटं गाठून बोलायचा प्रयत्न करायचा. माझ्याजवळ यायला पहायचा, पण मी त्याला कधी संधी दिली नाही. त्याला बोललेच नाही. इतक्या जवळ येऊन पण मला धडपणे बोलता येत नव्हतं त्यामुळे तो चिडला होता. मागच्या काही दिवसापासून तर त्याने माझ्याकडे बघणंही बंद केलं होतं.
त्या दिवशी त्याची डे शिफ्ट होती. त्याने दिलेला डबा मी भरत होते. नेहमीप्रमाणे राहुलच्या हातून डबा त्याच्याकडे पाठवायचा किंवा सरळ आमच्या दाराच्या बाहेर नेऊन ठेवायचा, जाताना तो घेऊन जाईल असा माझा विचार होता. पण ऐनवेळी राहुल बाहेर गेला. सासूबाई शेजारी कुणाकडे तरी गेल्या होत्या. दोन्ही मुलंही शाळेत होती.
दामूने ते ओळखलं असावं. मी जेव्हा दाराबाहेर डबा ठेवायला आले तेव्हा तो वरच्या मजल्यावरून पळतच खाली आला आणि मला काही बोलायची संधी न देता सरळच घरात शिरला आणि माझा दंड पकडून मला भिंतीवरती ढकलत तो बडबड करू लागला.
तो बराच वेळ बरंच काही बोलत होता. तो काय बोलत होता हे मला कळतच नव्हतं. माझं लक्ष त्याच्या ओठांच्या हालचालीवर होतं. त्याच्या चेहर्यावर होतं. त्याच्या हातांचा माझ्या दंडाला होणारा स्पर्श माझ्या मनात नको त्या भावना जाग्या करून जात होता. आणखी काही वेळ तो माझ्याजवळ तसाच राहिला तर काय होईल या विचारानेच माझ्या पोटात खड्डा पडला. मला ते नको होतं. ते चुकीचं होतं.
“सोड मला…”मी माझा हात सोडवून घेतला आणि आतल्या खोलीत निघून गेले. मग तोही डब्बा घेऊन निघून गेला.
त्या दिवसानंतर एक गोष्ट बदलली. दामू आता उघडपणे माझ्याशी बोलू लागला, जवळिक साधायचा प्रयत्न करू लागला. राहुलला काही कळलं नाही. तो आहेच तसा भोळा. मलाच वाईट वाटू लागलं. त्यातून अजून सासूबाई मलाच म्हणाल्या”सूनबाई त्या पोलिसांपासून जरा संभाळून रहा बर का, कशा वखवखल्या नजरेने पाहतो माहितेय तुझ्याकडे!”
मग मात्र मी ठरवलं. दामुशी काय असेल ते बोलायचं आणि सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा. त्याला तिथून घालवल्या शिवाय मला माझा संसार नीट करता येणार नव्हता. तो जोपर्यंत तिथे असणार होता, तोपर्यंत माझ्या मनात त्याचे विचार येणारच.
मी बोलायचं असं ठरवलं पण माझ्या मनाने आणि शरीराने त्या निर्णयाचा भलताच अर्थ घेतला. त्याच्याबरोबर एकांत मिळवण्यासाठी ते धडपडू लागलं.
‘ काय असेल ते एकांतात बोललेलं बरं, कुणी ऐकलं म्हणजे ‘ माझ्या मनाची कारणेही तायर होती. मी माझ्याही नकळत कशाची तयारी करत होते हे मला माहिती होतं तरीही मी मागे सरायला तयार नव्हते.
तो एक परपुरूष होता. नवरा असताना त्याचे विचार माझ्या मनात येत होते. ते चुकीचं नाही असं माझं मन मला बजावत होतं. ‘ मुळात तो परका पुरूष नाहीच. आतापर्यंत फक्त त्याच्यावरच तू प्रेम केलं आहे, फक्त तोच तुझा पुरूष आहे ‘ असं माझं मन माझी समजूत घालत होतं.
काही अंशी ते खरं होतं. कॉलेजला असताना मुलांनी माझ्या मागं मागं फिरलेलं मला आवडायचं. काही जणांच्या प्रपोजला मी होकार दिला होता पण ते फक्त गंमत म्हणून. माझं त्यांच्यावर प्रेम नव्हतं.
दामुच्या मात्र तसं नव्हतं. त्याला पहिल्यांदा पहिल्यापासून माझ्या मनात त्याच्याविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली होती. पुढे त्याने प्रपोज मारला तेव्हापासून मी फक्त आणि फक्त त्याचीच झाले. इतरांकडे नजर वर करून पाहायचं सुद्धा मी बंद केलं. दामूही तसाच होता. पूर्णपणे माझ्यात गुंतलेला. माझ्यासाठी वेडा झालेला. आमच्या दोघांचं प्रेम म्हणजे चित्रपटातील नायक नायिकांपेक्षाही जास्त खोल आणि गुंतागुंतीचं होतं.
पुढे माझ्या घरच्यांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी माझं राहुल बरोबर लग्न करून टाकलं. तसं पाहायला गेलं तर राहुल हा परका होता. त्याच्यासोबत मी संसार करत असले तरी तो खर्या अर्थाने माझा नव्हता. त्याच्यासोबत मला दोन मुले झाली असली तरीही माझं आणि त्याचं नातं एक समजुतीच आणि सामंजस्याचं होतं. ते प्रेमाचं नक्कीच नव्हतं.
राहुल व माझ्या नात्यात प्रेम नव्हतं. होती ती काळजी, मला त्याची काळजी वाटायची. त्याच्या प्रकृतीची काळजी वाटायची. त्याच्या भविष्याची काळजी वाटायची, पण त्याच्यावरती प्रेम कधी झालंच नाही. दामु व माझ्या बाबतीत मात्र उलट होतं. पहिल्यांदा त्याला पहिल्यापासून मनात निर्माण झालेली ओढ हळूहळू वाढतच गेली आणि इतक्या वर्षानंतर भेटल्यावरसुद्धा ती अजूनही होती.
त्यात शारीरिक आकर्षणाचा भाग होता हे मला मान्य आहे पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आमचं एक नातं होतं, जे नशिबाची साथ असती तर फुललं असतं. त्यातून आमच्या दोघांची मुलेसुद्धा जन्मली असती. आम्ही सुखाने संसार केला असता, पण ते कधी झालंच नाही. त्यामुळेच कदाचित इतक्या वर्षानंतर भेटल्यावरसुद्धा असणारी ओढ कमी झाली नव्हती.
मी ज्या संधीची वाट पाहत होते ती काही आठवड्यांनी मला मिळाली. आई मुलांना घेऊन त्यांच्या भावाकडे दोन दिवस राहायला गेल्या होत्या. बारावीची मुले सकाळी गेली की संध्याकाळीच परत येत असत. राहुल त्यांच्या मित्रा बरोबर बसायला गेले होते. आज ते फुल टाईट होऊनच घरी येणार हे माहिती असल्यामुळे मी त्या दिवशी ते धाडस केलं.
काल नाईट शिफ्ट करून तो आला होता. सकाळी नाश्ता झाल्यानंतर तो झोपला. काही वेळापूर्वी उठून त्याने नुकतीच आंघोळ केली होती. आता जेवायला मागण्यासाठी तो मला हाक मारणार हे माहिती होतं. म्हणून मी अगोदरच जेवणाचं ताट करून त्याला द्यायला म्हणून वर गेले.
रूमचं दार फक्त पुढं केलं होतं. त्याला कडी लावलेली नव्हती. मी पायाने ते हळूच ढकललं आणि आत गेले. रूमच्या दुसर्या बाजूला असलेल्या कॉट वरती अंगावर चादर घेऊन तो झोपलेला दिसला. मी तिथेच असणार्या टेबलावरती जेवणाचं ताट ठेवलं आणि चालत त्याच्याकडे गेले. काय करणार होते, कशासाठी तिकडे चालले होते याविषयी माझ्या मनात द्वंद्व चालू होतं, पण मला अजून या गोष्टी ताणायच्या नव्हत्या हे नक्की होतं.