“रक्षत किती ही पळ किंवा काहीही कर तुला आज तुझा नरसिंह ही नाही वाचणार… एकदा का तू आणि मी एक झालो की, तुला पूर्ण वश करता येईल”… रती मोठ्याने हसली… तीच ते भयानक राक्षसी हास्य जर आता रक्षतने बघितल असत तर तो जागीच बेशुद्ध झाला असता…
रतीने तिच्या मायावी शक्तीने पुन्हा एकदा पावसाळा आवाहन केलं… आणि वार्या सह पावसाने रतिच्या आदेशाच पालन करत जोरात बरसायला सुरूवात केली… त्यामुळे रक्षतला पुन्हा एकदा रतिच्या घराचा आधार घ्यावा लागला… त्याने आत येवून भिजलेले केस पुसले आणि त्याच्या अंथरूण जाऊन पडला… झोप काही केल्या त्याला येत नव्हती… परत तशीच परिस्थिती त्याला जाणवत होती…
रतीची मायावी शक्ती त्याला भासत होती…
पण आता रतीने पुन्हा एकदा तिचा असर दाखवायला सुरूवात केली… तिने आधी त्याला गाढ निद्रेत बंदिस्त केलं… आणि त्याच्या शेजारी जाऊन पडली… तिला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करता येणार नव्हती… त्यांचं मिलन हे पूर्णपणे रक्षतच्या इच्छेने होन गरजेचं होत…
तिने झोपेचं दान काढून घेतल तशी रक्षतची झोप उडाली… त्याने डोळे किलकिली करून उघडले तर शेजारी रती झोपली होती…
तिला बघून त्याचे श्वास जड झाले, हृदय प्रचंड धडधड करायला लागलं… रतीचा चेहरा अगदी त्याच्या जवळ होता…
तो तिच्या बंद पापण्यांच्या सावलीत हरवून गेला होता जणू…
तिचे नाजूक मुलायम गुलाबाच्या पाकळी सारखे ओठ, घनदाट बंद पापण्या, धारदार चाफेकळी नाक, ओठांच्या काठावर असलेला तीळ, तिच्या श्वासांची उष्णता, हे सगळ बघून रक्षत खूपच उत्तेजित झाला, त्याला आता स्वतःला रोखन खूप कठीण होऊन बसलं होत…
तिचा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध त्याला प्रणयाच्या गर्क नशेत लोटत होता…
त्याने आता स्वतःवर असलेला सगळा संयम सोडला आणि तिचा सुगंध श्वासात भरून तिच्या ओठांवर ओठ टेकवले…
आणि रतिच्या ओठांवर विजय हास्य उमटले…
रतीने रक्षतला आता पूर्णपणे तिच्या प्रभावा खाली आणलं होत… रक्षतला कशाची सुध बुध नव्हती… पण अचानक तिच्या घराचा दरवाजा हवेने जोरात उघडला गेला… त्यामुळे काही क्षण का असेना रक्षत भानावर आला… रतीला आता तरी त्याला सोडायचं नव्हत… हे दुसर्यांदा होत होतं की तिची शिकार हातातून जात होती,
पण आता तर घास अगदी तोंडात आला होता, पण काही गोष्टी होत्या ज्या तिला अडवत होत्या, तिला समजत नव्हत नक्की का अस होत आहे… कारण या शिकारीसाठी, याच नाही तर तिच्या आतापर्यंतच्या सगळ्या शिकारीमध्ये निसर्ग तिच्या वशमध्ये होता… पण आता मात्र तिला खूपच अडचणी येत होत्या… तिने मात्र पुन्हा एकदा तिच्या सर्व शक्तीने ते दार लावून घेतलं आणि रक्षतच्या डोळ्यात पाहिलं, तो पुन्हा एकदा तिच्या वशमध्ये आला… तिने त्याला त्याच्या गळ्यात हात घालुन स्वतःजवळ ओढल तेव्हा तिला काहीतरी तिच्या बोटाना टोचल, त्यातून थोड रक्त ही आल्, म्हणून तिने जरा नीट बघितल तर त्याच्या गळ्यात नरसिंहच सोन्याचं लॉकेट होत आणि हीच शक्ती कधीपासून
रक्षतच रक्षण करीत होती, आणि निसर्ग ही तिच्या वशमध्ये राहत नव्हता… तिने एका झटक्यात ते लॉकेट काढून टाकलं… तेव्हा मात्र
रक्षत पूर्णपणे रतिच्या वशमध्ये गेला… त्याचा वाचण्याचा शेवटचा पर्याय ही तिने बंद करून टाकला होता… तिच्या चेहर्यावर असुरी आनंद झळकत होता…
तिने रक्षतचे ओठ ओठांत घेतले तेव्हा तिच्या जीभेच्या स्पर्शाने
रक्षत त्याची शुद्ध हरपू लागला… त्याला ग्लानी यायला लागली…
एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्याला भेटत होता… एखाद्या व्यक्तीला
नशा केल्यावर जसा आनंद भेटतो तसं काहीसं त्याला होत होतं, पण ते मेंदूपर्यंत ही जात नव्हत… इतका तो ग्लानीत गेला होता…
तिच्या त्या जादुई स्पर्शाने तो बेशुद्ध झाला आणि तिथे एक प्रकाश झोत उफाळून आला…
त्या काही मिनिटांत रक्षत बेशुद्ध होता, पण रती मात्र तिच्या कामात व्यस्त होती, तीच ते जुन छोटेखानी लाकडी घर एका मोठ्या महालात परावर्तित झालं, तिची छोटी खोली मोठ्या आलिशान अश्या खोलीत बदलली होती, सगळीकडे सुगंध दरवळत होता, पूर्ण खोली हिरे मोती, सोन चांदीने सजवली होती, उंची वस्त्र वापरून पडदे, पलंग अस सगळ छान सजवल होत, चारही बाजूने मिणमिणत्या पणत्या उजळल्या होत्या…
त्या सगळ्या वातावरणाचा आपसूकच रक्षत वर परिणाम होणार होता… त्याला शुद्ध आली तेव्हा तो तिच्या त्या आलिशान महालात होता…
ते सगळ सौंदर्य पाहून त्याचे डोळे दिपले होते, तो बेड वर उठून बसला… तिथला तो वेगळाच सुगंध त्याला वेडावत होता, त्याला आता फक्त एक स्त्री हवी होती अशी त्याची परिस्थिती झाली होती,
त्याला प्रणयाची इतकी नशा चढली होती की त्याच्या ताठर झालेल्या अवयवाचा विस्फोट होतो की काय असं त्याला वाटायंला लागलं होत.
रती तिच्या चालीत जिंकली होती… तिची शिकार स्वतःहून त्या खेळात आहुती द्यायला तयार होती, आणि तिच्या नियोजनानुसार तो स्वतःहून प्रणयासाठी तयार होता…
रक्षत अगदी व्याकूळ झाला होता रतीसाठी… त्याला आतापर्यंत काय काय झालं हे काहीच आठवत नव्हत… पण रती मात्र नीट आठवत होती… तो तिची आतुरतेने वाट बघत होता…
काही वेळाने खोलीचं दार उघडण्याचा आवाज आला, दारावर असणारा पडदा बाजूला झाला, रक्षतच हृदय धडधडत होत, जलद गतीने स्पंदन निर्माण होत होती… पडदा बाजूला सारून रती आत आली… तिला बघून रक्षतच तोंडचं उघड राहील…
दैवी सौंदर्य लाभल होत तिला… तिचा देह जणू मलमल रेशमाचा झाला होता, कमनीय बांध्याच्या देहाला साजेसे दागिने घातले होते, सगळे शृंगार तिने केले होते, सगळ्या अप्सरा ना लाजवेल अस बावन्न काशी सोन होत तीच रूप… तिच्या त्या देखण्या लोभस सौंदर्यात रक्षत हरवून गेला होता… तिला आता तिची मोहिनी विद्या वापरायची काही गरजच नव्हती…
तीचे ते पाचू सारखे असणारे हिरवे गार डोळे, त्यात तिने लावलेलं गडद काजळ, तिचे गुलाबी रंगाचे रसरशीत ओठ, तिचे भरीव वस्त्रातून अर्धे दिसणारे स्तन, कमनीय नाजूक कंबर, सपाट पोट आणि खोल नाभी, जणू कर्दळीच्या फांदीवर कोणी झुंबर टांगले आहे अस वाटत होत, इतकं अभिजात रूप रक्षतने या आधी ना कधी पाहिलं होत ना अनुभवलं होत, तिने पायाच्या नखपासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्याच्यासाठी केला साज शृंगार ही तिच्या नैसर्गिक रूपा समोर फिका पडेल इतकी सुंदर दिसत होती ती… अगदी एखद्या राजाची पट्ट राणी भासत होती…
आणि आता तिच्या त्या भरलेल्या देहाचा राजा, रक्षतच होता…
तिच्या शरीराचा अवयवनी अवयव ओरडून त्याला आमंत्रण देत होता…
तिने त्याच्या खोल डोळ्यात बघत कानाच्या पाळीला कसलस अत्तर लावल… त्याच्या शरीरावर असलेले एक एक वस्त्र काढायला सुरूवात केली… ते करत असताना तिने त्याच्या तोंडात गोड पान टाकला… आणि त्याला घेऊन ती स्नान गृहात गेली…
तो हे सगळ आनंदाने करत होता, तिची प्रत्येक कृती त्याला हवीहवीशी वाटत होती… तो आता फक्त आणि फक्त रतीचा होता…
रात्र चढत जाणार होती, तशी तशी रती तिच्या सगळ्या चाली पूर्ण करणार होती, शिकारी तिच्या मायावी शक्तीने अडकला होता…
रात्रीचा अमंल त्यांना प्रणयाच्या गर्क नशेत लोटणार होता…
रती आणि रक्षत एक होणार होते… आता कोणतीच शक्ती किंवा बाधामध्ये येणार नव्हती… त्याच्या मिलन सोहळ्यास आता सुरूवात झाली होती… आणि रती राणीने तिची बत्तीस वी शिकार हाती घेतली होती…
रक्षतने आजपर्यंत कधीच अस चविष्ट पण खाल्ल नव्हत…
त्याच धुंदीत तो कधी त्या मोठ्या स्नान गृहात पोहचला ते त्याला समजलच नाही… तिथे मोठा गोलाकार गरम पाण्याचा लाकडी टब होता… त्या वाफाळत्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगर्याच्या कळ्या होत्या… सगळीकडे मेणाच्या पणत्या उजळल्या होत्या… तिथले पांढरे पडदे आणि त्यावर छोट्या छोट्या काचेच्या आरश्यामुळे पडणारे प्रतिबिंब यामुळे ते स्नान गृह उजळून निघालं होत…
रक्षत तर भान हरपून ते दृश्य बघत होता… रतीने त्याचा हात अलगद पकडला आणि त्याला पाटावर बसवलं… शेजारी सोन्याच्या तबकात सुगंधी उटणे, चंदन मुलतानी माती, सुगंधी तेल असे अनेक सौंदर्य प्रसाधनचे पदार्थ होते…
रक्षतच्या गहू वर्णीय पिळदार शरीरयष्टीच रतीला फारच कौतुक वाटतं होत… तो पाटावर बसला तेव्हा त्याचे ते पिळदार शरीर बघून रतीला काही क्षण तिचं सगळं प्रयोजन बाजूला ठेवून त्याला शरण जावं अस वाटलं, पण तिने वेळीच स्वतःला आवरलं आणि तिच्या कामाकडे लक्ष केंद्रित केलं…
सगळयात आधी तिने त्याच्या शरिसाची सुगंधी तेलाने मालिश केली… तिच्या नाजूक मुलायम हाताचा बोटांचा निकटचा स्पर्श रक्षतला वेड लावत होता… त्याने डोळे बंद करून तिच्या स्पर्शाची गोड अनुभूती घेतीली… त्याची ती समाधी भंगली ते गरम पाण्यामुळे…
तिने गरम पाणी ओतून मग उटण्याचा लेप लावला… तिचे फिरणारे हात त्याच्या शरीरावर शहारे फुलवत होते… तिने त्याच्या गालाला चंदन लावलं आणि त्याच्या डोळ्यांत बघितल… खूप बोलके डोळे होते त्याचे… आपसूकच तिचे हात थरथर करायला लागले… त्याची नजर कोणाच्याही काळजाचा ठाव घेणारी होती… तीच हृदय प्रचंड गतीने धडधड करायला लागलं…
“हे काय होतंय रती तुला, अशी त्याच्या नजरेत हरवून जातो नको, नाहीये पुन्हा एकदा या बत्तीस चालीच्या चक्रात अडकून पडशील, नाही मला स्वतःवर ताबा ठेवला पाहिजे”तीच अस्वस्थ मन तिच्याशी हितगुज करत होत…
तेव्हाच रक्षतने त्याचा गाल तिच्या तिच्या गळ्यावर फिरवला… त्यामुळे रती भानावर आली… तिने त्याच्याकडे बघून कामुक हसत त्याच्या अंगावर पाणी ओतलं… त्यामुळे त्याच शरीर एकदम हलकं झालं होत… एकतर रतीने छान मालिश करून दिली होती… आयुर्वेदिक सुगंधी उटणे चंदन लावून तिने त्याला अंघोळ घातली होती… त्यामुळे तो खुपचं आनंदी झाला होता…
तिने पटकन त्याला उठायला लावल आणि त्या गरम पाण्याच्या टबकडे घेऊन गेली… त्याने ही हसत त्यात प्रवेश केला… त्याच्या शरिराभोवती असणार्या सुगंधी गरम पाण्याने त्याला थोडी गुंगी यायला लागली…
बाजूने सुंदर संगीत ऐकू येत होत त्याचे डोळे जे बंद झाले ते उघडायचे नाव घेत नव्हते… तितक्यात त्याला त्याच्या शरिराभोवती काहीतरी लपेटल्याच जाणवलं… त्याने डोळे उघडले तर रतीने त्याला मिठी मारली होती… तिचे खोल श्वास त्याच्या उघड्या छातीवर जाणवत होते… त्याने ही तिला घट्ट मिठीत घेतलं… ही वेळ कधी संपूच नये अस त्याला वाटत होत… तीच त्याच्या मिठीत असंन त्याला खूप सुखावून गेलं होत… अगदी स्वर्ग सफर करत होता तो…
रती ही त्या क्षणामध्ये हरवून गेली होती… त्याच्या मजबूत मायेच्या प्रेमळ बाहूमध्ये ती स्वतःला विसरू पाहत होती… तिची शिकार वैगरे हे सगळ नंतर, आता या क्षणी तिला सगळ विसरून फक्त रक्षतसाठी सर्वस्व द्यायचं होत…
शेवटी प्रणय म्हणजे तरी काय???… एकमेकांसाठी सर्वस्व देत घेत त्या परमोच्च क्षणाचा आनंद घेणं, आपल्या जोडीदाराचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तनाने आणि मनाने एक होण, शारीरिक घर्षण तनाची भूक शमवण्यासाठी पुरे होत, पण तो प्रयण फक्त एक यांत्रिक पद्धतीने होतो… पण मनाने एकमेकांत समरस होऊन त्या व्यक्तिच्या आनंदाचा विचार करून मनाने एक होण म्हणजे प्रणय…
कामदेव ज्या जोडीवर प्रसन्न असतो ती जोडी सदा काम रसाचा
आस्वाद घेतात… या काम शृंगाराचा आनंद हा वेगळाच अनुभव असतो… सगळे विचार, दुःख वेदना सगळ काही विसरून जात त्या क्षणी… आणि समोर जर रती सारखी अप्सरा असेल तर दुग्धशर्करा योग…