बहिणीकडून निरोप मिळताच आनंदराव विचारात पडला. बाळासाहेब आपल्या मोहिमेत सहभागी होणार नाहीत हे त्याने आधीच गृहीत धरले होते परंतु किमान त्यांनी तटस्थ राहावे अशी त्याची माफक अपेक्षा होती व ती देखील धुळीस मिळाल्याने स्वारीचे नियोजन बर्यापैकी बदलणे आता भाग होते.
“कसल्या विचारात पडला दादासाहेब?” काही वेळाने सावरून राणूबाईनेच प्रश्न केला.
“कसल्या नाही ताईसाहेब. आम्हाला खात्री होतीच तुमच्या यजमानांची. पण ते आमच्या शत्रूला जाऊन मिळतील असे वाटले नव्हते… ठीक आहे. आता आमच्या स्वारीचे बेत बदलणे आम्हाला भाग आहे. मला वाटते आता आ पण तळाकडे परत जायला हरकत नाही.”
“किती खुल्या दिलाने बोलत आहात तुम्ही.” राणूबाईच्या आवाजात कौतुक दाटले होते. “आपल्या शत्रूपक्षाच्या व्यक्तीसमोर लढाईचे डावपेच उलगडून सांगणे.”
“शत्रूपक्षाच्या? आम्ही तुम्हाला तसे कधीच समजले नाही ताईसाहेब. व समजणारही नाही.” राणूबाईला मध्येच तोडत आनंदराव म्हणाला.
“अस्स का? मग मघाशी बरे तुम्ही उत्तर देण्याचे टाळले.” गालातल्या गालात हसत राणूबाई म्हणाली.
“जी. तसे नाही काही.” लाजेने खाली मान घालून आनंदराव तिची नजर व प्रश्नाचे उत्तर टाळू लागला.
“बाई बाई. आमचे दादामहाराज असे लाजतात देखील. आम्हाला माहिती नव्हते. आता वहिनींना सांगितले पाहिजे.” राणूबाई हसत हसत उद्गारली. त्यामुळे आनंदरावाची स्थिती आणखी विचित्र होऊन कसाबसा तो म्हणाला, “ताईसाहेब. संध्याकाळ होत आली आहे. आ पण परत निघूया का?”
आनंदरावाच्या चेहर्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून राणूबाईने संमतीदर्शक मान डोलावली.
दोघे प्रथम रानुबाईच्या घोडीजवळ गेले. तिथे जाताच आनंदराव खाली गुडघ्यावर बसला व त्याने आपल्या दोन्ही हातांची ओंजळी केली. तशी राणूबाई त्याच्या हाताच्या ओंजळीत आपला डावा पाय ठेवून घोडीचा लगाम धरत स्वार झाली.
राणूबाई घोडीवर स्वार होत असताना आनंदरावाचे लक्ष तिच्याकडेच लागून राहिले होते. ज्यावेळी तिने त्याच्या हातांच्या ओंजळीत आपला डावा पाय ठेवला त्यावेळी नकळत त्याची नजर तिच्या लुगड्यात घट्ट आवळल्या गेलेल्या मांड्याकडे लागून नितंबापर्यंत गेली. राणूबाईला याची कल्पना असल्याने तिही काही क्षण तशीच रेंगाळली व नंतर एक झटका मारून ती घोडीवर स्वार झाली. त्यानंतर आनंदराव आपल्या घोड्यावर बसला व अंधार पडण्याच्या वेळेस दोघेही राणूबाईच्या तळावर पोहोचले.
राणूबाईच्या छावणीत पोहोचताच दोघेही आपपल्या घोड्यांवरून खाली उतरले व तिथेच तिचा निरोप घेण्याच्या इराद्याने आनंदराव म्हणाला, “ताईसाहेब, आता आम्हाला आज्ञा द्यावी. हवे तर उद्या सकाळी आम्ही तुमच्या भेटीस येतो अथवा तुम्हीच तिकडे निघून यावे.”
“दादासाहेब. आमचे तिकडे येणे होणे नाही. आमची इच्छा आहे कि, तुम्ही आज येथेच मुक्काम करावा.”
“पण.ताईसाहेब. तिकडे आमची छावणी.”
“असू द्या. पाटलांची स्वारी शत्रूच्या नाही तर त्यांच्या बहिणीच्या तळावर आहे, हे काही तुमच्या सैन्याला माहिती नाही? आवश्यकता वाटल्यास आ पण आपली माणसे तिकडे पाठवू शकता किंवा बोलावून आणू शकता. परंतु आजची रात्र तुम्हाला इथेच काढावी लागणार आहे आणि हि आमची आज्ञा आहे.” निग्रहपूर्वक स्वरात बोलून राणूबाई तिच्या तंबूच्या दिशेने निघून गेली.
स्वतःशीच अचंबा करत आनंदरावही त्याच्याकरता तात्पुरत्या उभारलेल्या बैठकीच्या तंबूकडे निघाला.
आत गेल्यावर बैठकीच्या आसनावर बसत त्याने प्रथम आपल्या सोबत आलेल्या शिपायांच्या प्रमुखाला बोलावत, आ पण आजची रात्र इथेच मुक्काम करत असल्याची बातमी छावणीत पाठवून देण्यास सांगितले.
सोबत आलेला शिपाई बाहेर जाताच आनंदराव परत एकदा राणूबाईच्या वर्तनाचा विचार करू लागला.
‘कशासाठी आज आपणांस थांबवून घेतले असावे? दाजीसाहेबांचा निरोप तर मघाशीच मिळाला. मग आता आणखी काय असे काम असावे. कि ज्यासाठी. अरे हो. शर्यतीचे पारितोषिक अजून राणूबाईने आपल्याला मागितले नाही आणि आपणही दिले नाही. कदाचित त्यासाठी तरी नसेल ना. पण असे काय ती मागणार. तिच्या नवर्याचा बचाव कि. कि आपले पिढीजाद वतन. पण राणू मागेल का?. काय सांगावे कदाचित लग्न झाल्यावर मुलींना माहेरची तितकीशी ओढही राहत नसावी. नाहीतर उद्या छावणीकडे येण्याचे निमंत्रण देऊनही तिने नकार का द्यावा.’
तंबूच्या प्रवेशद्वाराशी सेवकाचा आवाज आल्याने आनंदरावाची तंद्री भंग पावली. आत येत सेवकाने, ताईसहबांच्या तंबूकडे भोजनास यावे, अशी वर्दी दिली. तेव्हा त्यला ‘आलोच थोड्या वेळात’ म्हणून आनंदरावाने परत पाठवले व बैठकीवरून उठत त्याने आपल्या सोबत आलेल्या शिपायांच्या प्रमुखाला आत बोलावत भोजनासाठीच्या वस्त्रांची व्यवस्था करण्याचा हुकूम दिला.
काही वेळातच एक नवी कोरी धोतरजोडी व उपरणे घेऊन राणूबाईचा सेवक आणि आनंदरावाचा शिपाई आत आला. सेवकांनी आणलेले कपडे अंगावर चढवत असताना परत एकदा आनंदरावाचे विचारचक्र सुरू झाले.
‘काय असावे राणूबाईच्या मनात? आज ती अशी का वागते? इथे येताच प्रथम बैठकीत बोलणे अधुरे ठेवले. नंतर शर्यतीचा विषय. त्यासाठी तेच स्थळ जिथे आपण. सोबतीला कोणालाही न घेण्याचा निर्णय. कशासाठी? तिला काही बोलायचे होते कि काही करायचे. बोलायला तर तिने तोच विषय काढला आणि संपवला. मग तेवढ्यासाठी एवढ्या दूरवर. आणि आता मुक्कामाची गळ. हे सर्व कशासाठी? वतनासाठी कि. कदाचित आपल्या जीवाला धोका तर नाही ना.’
शेवटच्या कल्पनेने आनंदरावला घाम फुटला. तशी तिही शक्यता नाकारता येत नव्हती. त्याच्या जोडीला फारसे शिपाई देखील नव्हते. जर राणूबाई किंवा तिच्या सोबतच्या शिपायांनी दगाफटका करायचे ठरवले तर
‘काय करावे? भोजनास जावे कि न जावे? कि भोजन झाल्यावर मुक्कामाला आपल्या तळावर परत जावे? कि आणखी पथके जोडीला बोलवून घ्यावीत?’ असे अनेक प्रश्न मनात घोळवीत आनंदरावाची पावले राणूबाईच्या तंबूकडे वळली.
राणूबाईच्या तंबूमध्ये एका बाजूला भोजनासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. एक छोटीशी बैठक घालून त्यासमोर एका चौरंगावर जेवणाचे ताट वाढून ठेवले होते. ताटातील सर्व पदार्थ आनंदरावाच्या आवडीचे असून मुद्दाम राणूबाईने ते आपल्या देखरेखीखाली बनवून घेतले होते.
स्वतः राणूबाईने समोर बसून आनंदरावास आग्रह करून जेवायला घातले. जेवण झाल्यावर सेवकांनी ताट उचलून नेले व विड्याचे तबक आणून ठेवले. त्यातील एक विडा उचलून आनंदरावाने आपल्या तोंडात टाकला. काही क्षण विडा चघळून झाल्यावर शेजारच्या पिकदाणीत पिंक टाकून आनंदराव म्हणाला, “आजच्या जेवणाचा बेत मस्त झाला.ताईसाहेब.”
“मग होणारच. शेवटी यातला प्रत्येक पदार्थ आम्ही खास आमच्या देखरेखीखाली बनवून घेतला होता.”
“अच्छा. ” असे म्हणून आनंदराव काही काळ गप्प बसला व पुन्हा काही वेळाने बोलता झाला. “ताईसाहेब, आपली छावणी लाहानखुरी. इथे आमचा बंदोबस्त होणे नाही. तेव्हा आता भोजनोत्तर निद्रेसाठी आम्ही तळावर परतावं म्हणतोय.”
“छे छे!! अहो दादासाहेब छावणी लहानशी असली तरी आमचे मन मोठे आहे.” गालातल्या गालात हसत राणूबाई म्हणाली, “आम्ही तुमची व्यवस्था खास आमच्या तंबूमध्ये केली आहे.”
“अहो पण.”
” पण नाही बिन नाही. एकदा त्यात प्रवेश करून तरी पहा. आणि मग बोला.”
राणूबाई असे काही तरी बोलेल याची आनंदरावला कल्पना नव्हती. आधी त्याला वाटले होते कि, रात्री झोपेत आपल्यावर मारेकरी घातले जातील पण आता खाशा स्वारीच्या मुक्कामाच्या तंबूत आपली सोय केल्याने तिही शक्यता दूर झाली होती. मग हिचा नेमका बेत आहे तरी काय?
“दादासाहेब, तुम्ही मुक्कामाच्या तंबूत जावे. जेवण होताच आम्ही पाठोपाठ येतो.” आनंदरावाची विचारमग्न चर्या पाहून राणूबाई म्हणाली व तिने सेवकाला हाक मारून त्याला, आनंदरावाच्या मुक्कामची व्यवस्था दाखवण्यास सांगितले.
ते दोघे निघून जाताच राणूबाई जेवायला जाण्यासाठी उठली, त्यावेळी तिचा मनोमन निश्चय पक्का झाला होता.
‘आजची रात्र,. फक्त आजची रात्र आणि.’ मनातले विचार कोणी ऐकेल म्हणून मनातच दाबत ती झट्कन भोजनाकरता बनवलेल्या दालनाकडे वळली.
सेवकासोबत मुक्कामाच्या तंबूत आनंदराव शिरला. खास जनानखान्यासाठी या तंबूची रचना केली असून प्रथम सभोवती एक कापडी पडदा उभारून आतमध्ये तंबू ठोकण्यात आला होता. या तंबूचे आतील कापड गडद गुलाबी रंगाचे असून आतमध्ये राणूबाईकरता दोन तीन दालने बनवण्यात आली होती. ज्यात तिची सौंदर्य प्रसाधन, वस्त्रांतर तसेच शयनाची व्यवस्था होती.
तळावर खाशी व्यक्ती एकच असल्याने आनंदरावाकरता दुसरा तंबू नसल्याने राणूबाईच्या सौंदर्य प्रसाधनाच्या दालनातच आनंदरावाकरता एक लाकडी मंचक टाकून व त्यावर बिछायत अंथरूण तात्पुरते शयनगृह बनवण्यात आले होते. आपल्या मुक्कामाची व्यवस्था बघताना आनंदरावाच्या लक्षात आले कि, त्याच्या दालनाला लागूनच राणूबाईचे शय्यागृह असून दोघांच्यामध्ये दोन तीन जाडसर पडदे सोडून एक भिंत निर्माण करण्यात आली आहे.
दालनातील समया मंद करायला सांगून आनंदरावाने सेवकास निरोप दिला व अंथरूणावर अंग टाकले. झोप तर त्याला तशी येत नव्हती. राहून राहून त्याच्या मनी राणूबाईचाच विचार येत होता व चार वर्षांपूर्वीचा प्रसंग नजरेसमोर तरलत होता.
. त्या दिवशी बारशाच्या निमित्ताने आलेल्या राणूबाईची व त्याची घोडदौडीची शर्यत लागली. वाड्यापासून ते गावाच्या हद्दीवरील लिंबाच्या जुनाट वृक्षापर्यंत जो प्रथम पोहोचेल तो विजेता मानला जाईल असे ठरले. त्यावेळी मोहिमांचा प्रसंग नसल्याने सोबतीला अंगरक्षक न घेताच दोघे दौडत निघाले. संपूर्ण मार्गावर राणूबाई आनंदरावाच्या पुढे होती. तिच्या घोडीपेक्षाही जास्त ताकद, वेग असलेला त्याचा अरबी घोडा आज मागे पडत होता. पण एके ठिकाणी राणूबाईच्या घोडीचा वेग मंदावला. आणि तीच संधी साधून आनंदरावाने आपला घोडा पुढे पळवत ती दौड जिंकली.