सुगंधा | भाग ३

दोन दिवसानंतर गावातला जॉन फर्नाडिस वारला. त्याच्या अंत्यविधीसाठी विलासला कबरीस्तान जावे लागले. स्मशानात जॉनचे नातेवाईक आणि काही मोजकेच लोक होते. खरे म्हणजे विलासला या निमित्ताने सुगंधाच्या नवर्याला पाहायचे होते. खड्डा खणून तो वाट पाहत बसला होता. अंगाने धडधाकट, रंगाने काळा, पोट पुढे आलेले आणि सपाट दात मिशीतून पुढे डोकावणारे. त्याचे रूप पाहून विलासला सुगंधाची कणव आली. अनिता सारखी सुंदर बायको आपल्या नशिबात फक्त सहा महिने आली. पण सुगंधाच्या पदरी आयुष्यभरासाठी हे ध्यान! त्यातच लग्नानंतर त्याने सुगंधाशी केलेला शृंगाराचे चित्र विलासच्या डोळ्यासमोर आले. सुगंधाने त्यादिवशी काय भोगले असेल आणि नंतर रोज त्याच्याबरोबर घालवलेली प्रत्येक रात्र याची विलासला कल्पनाच करवत नव्हती. नियतीचा खेळ कोणाला समजला नाही. तो मनाची समजूत घालुन घरी परतला.

घरी आल्यावर त्याला आणखी गोष्ट ध्यानात आली, संपूर्ण अंत्यविधी उरकेपर्यंत तो विलासकडेच पाहत होता. त्याची बायको आपल्याकडे कामाला आहे हे नक्की त्याला माहित झाले असणार त्यामुळेच तो आपल्याकडे पाहत होता. असे त्याला वाटले. त्याची नजर तितकीशी त्याला स्वच्छ वाटली नाही. विलास तसा दिसायला तरूण आणि देखणा होता. चाळीशी म्हणजे काही वृद्धत्व नव्हते. विलासचे खानदानी रूप होते. आपली बायको याच्या बरोबर दिवसभर असते याचे वैषम्य तर वाटले नसेल??  यांचा परिणाम सुगंधाला त्रास देण्यात तर होणार नाही ना?? या अनेक प्रश्नांनी ओझे घेऊन विलास घरी परतला होता.

वाड्यावर येऊन त्याची अंघोळ आटोपेपर्यंत सुगंधाने ताट मांडले होते. विलासचे जेवून झाल्यावर ती स्वतःचे ताट घेऊन कोपर्यात जेवायला बसत असे. त्याने एकदा तिला त्याच्याबरोबर ताट मांडून घ्यायला सांगितले तेव्हा ती म्हणाली.

” सायेब, मला माझी पायरी कळते. माणसान आपली पायरी वळकून रहावं. जेवा तुमी… माझी नका काळजी करू.”

विलासचे जेवण संपत आले होते. तेवढ्यात दारावर टकटक  झाली. “बघते मी”  सुगंधा दार उघडायला गेली. नंतर ती कुणाशी तरी हुज्जत घालत असल्याचे त्याला लक्षात आले. कोणीतरी काहीतरी मागायला आला असावा. सुगंधा स्वतः संभाळते आहे म्हटल्यावर तो शांतपणे जेवण बसला. तोपर्यंत दार बंद करून सुगंधा आत आली.

“कोण  होतं” विलासने विचारले.

” हुत कुणीतरी, तुमी नका काळजी करू” सुगंधा म्हणाली. जेवण झाल्यावर विलास त्याच्या खोलीकडे वळला असता दारावर पुन्हा टकटक झाली. यावेळी सुगंधाला थांबवून तो स्वतःच दरवाजा उघडायला गेला. सुगंधा अस्वस्थपणे पाहत होती. दार उघडले तर समोर सुगंधाचा नवरा उभा होता. सकाळीच त्याची आणि विलासची स्म्शानात नजरानजर झाली होती. पण यावेळेस त्याच्या डोळ्यात सकाळची दहशत नव्हती तर याचना होती. केविलवाणा चेहरा करत म्हणाला.

“सायेब लई भुक लागलीया. तिला सांगा की काय तरी वाढाया.”

विलासला त्याचा चेहरा बघवला नाही. त्याने त्याला आत बोलावले. मागून सुगंधाने नाराजीचा हुकांर दिला. विलासने तिला जेवायला वाढायची खुण केली. पोटभर जेवून झाल्यावर समाधानाने ढेकर देत तो उठला.

” सायेब घरात कायबी न्हाय म्हंणून सुगंधा काहीच न करता इकडं निघुन आली. म्या सकाळपासून त्या मयतिच्याच माग  हाय. मयतीचा खड्डा खणन सोपं असतया व्हय. हाताला फोड येत्यात. पण करावं लागतय नव्ह. त्ये सगळं आटोपल्यावर घरात जाऊन बघत्यो तर सगळी गाडगी मडकी खाली व्हती. वाटत व्हतं येऊ नै. पण लई इचार केला आणि आलो. शेवटी पोटाची आग हैं. तुमास्नी कशी म्हाईत असणार म्हणा! असे म्हणत तो जायला निघाला.

खरं म्हणजे सुगंधा कामाला लागून काही दिवसच झाले होते. म्हणजे तिला पगार मिळण्याची शक्यता नव्हती. पण त्याची हालत बघून विलासला काही ऍडव्हान्स देणे भाग होते. सुगंधाने तर कधीच तस काही बोलून दाखवल नव्हत. परिस्थिती हालाखिची असली तरी ती स्वाभिमानी होती. विलासने पाचशेची नोट काढली आणि त्याच्या हातात देत म्हटले.

“जा, बाजारातून काहीतरी किराणा आणून ठेव”  यावर सुगंधाने त्याला अडवले.

“अवं… नका. नका देऊ पैसे त्याच्या हातात. म्या जाईन जाताना घेऊन ” सुगंधा म्हणाली. पण एव्हाना त्याने ती नोट खिशात कोंबली होती. आणि हात जोडत मागल्या पायानी त्याने दरवाजा ओलांडून निघुन गेला.

“सायेब काय केलया तुमी… आता पिऊन पडल उताणा!  सुगंधा कळवलुन बोलत होती. विलासला तिच्या डोळ्यातल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.

आता सुगंधाने जणू घराचा ताबाच घेतला होता.घराची मालकीण असल्यासारखीच वावरत होती. विलाससाठी हे चांगलच होतं. अगदी भाजीपाल्यापासून ते किराणा मालापर्यंत ती स्वतः खरेदी करत होती. असे असले तरी भोंगळ कारभार तिने ठेवला नव्हता. दिलेल्या पैशाचा ती चोख हिशेब देत होती. त्यामुळे विलास सुद्धा तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवु लागला होता. तसा सुगंधाचा सुद्धा विलास वरचा विश्वास जाणवत होता. कळत नकळत दोघांचे स्पर्श एकमेकांना झाले तरी सुगंधा कधी संवेदना दाखवली नव्हती. कदाचित तिच्या नवर्याच्या रोजच होणार्या किळसवाण्या स्पर्शाने तिच्या सार्या संवेदना नष्ट झाल्या असतील असे विलासला वाटले. सुगंधा सारखी सुंदर आणि मादक स्त्री एकांतात वावरत असताना विलासला त्याच्या बायकोची आठवण येणे स्वाभाविक होते. तिच्या साडीतून दिसणारा पोटाकडचा उघडा भाग दृष्टीस पडताच त्याच्या मनाची चलबिचल व्हायची. रात्री झोपताना तिच्या अंतर्गत अवयवाची कल्पना करून तो आपल्या उत्तेजित सर्पाला शांत करू लागला. स्वप्नामध्ये तिच्या सोबत शृंगार रंगवताना तिला उपभोगण्याची इच्छा त्याची तीव्र होत गेली. पण जेव्हा विलास सुगंधाविषयी या बाबतीत विचार करू लागे त्यावेळी त्याची विचार श्रूंखला तिच्या नवर्याच्या सहवासापर्यंत येऊन थांबत असे.

एके दिवशी सहा वाजताच अंधारून आले आकाशात दाटलेल्या काळ्या ढगांमुळे सारे वातावरण कुंद झाले होते. आता विजाही चमकू लागल्या होत्या. एक मोठा गडगडाट झाला आणि जमिनीवर आदळणार्या टपोर्या थेंबानी पडघम सुरू केली. बघता बघता पाऊस रपरपायाला सुरवात झाली आणि त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. सात वाजले तरी पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नव्हते. उलट जोर वाढत गेला. सुगंधा सारे काही आवरून निघायच्या तयारीत बसली होती. रात्रीचे आठ वाजले तरी पाऊस थांबला नाही. शेवटी विलास तिला म्हणाला.

“सुगंधा तू आतां माझ्याबरोबर जेवून घे, तोपर्यंत पाऊस थांबला तर मी येईन तुला सोडायला”

“नग, नग ” विलासला मधेच तोडत म्हणाली. ” तुम्ही कशा पायी येताय त्या नरकात, नायतर म्या जाईल एकली अन.बघा त्यो ईल मला न्यायला. त्याला न्हाई दम धरणार”

पण तिचा नवरा राघोजी काही सुगंधाला न्यायला आला नाही. विलासने जबरदस्तीने तिला स्वतः बरोबर जेवायला सांगितले. जेवण उरकल्यावर ती स्वतःच जायला निघाली तेव्हा विलासने तिला अडवले.

“थांब सुगंधा… मला वाटत ही वेळ तुझ्यासारख्या स्त्रीने एकटीला बाहेर पडायची नाही आहे.”

” माझ्या सारखी मंजी?? तिने आपल्याला काहीच समजले नाही असे भासावीत विचारले. तिच्या या अचानक प्रश्नाने विलास गडबडला. विलासच्या मुखातून भलतंच काहीतरी निघून गेले होते. कळत नकळत त्याने तिच्या सौंदर्याची तारीफ केली होती. पण विलासने स्वतःला सावरले.

“अग, बाहेर एवढा अंधार आहे. तुझ्यासारख्या एकट्या दुकट्या स्त्रीने बाहेर पडणे योग्य नाही आहे. मी येतो सोडायला म्हटले तर ते तुला नको आहे. राघोजी सुद्धा न्यायला आला नाही. मग एकच उपाय आहे. थांब इथंच. रात्र तर काढायची. बाजूची खोली तर रिकामीच आहे. झोप तिथं. आतून कडी लावून घे आणि झोप निवांत!”

“अवं कडी कशापायी? परत एकदा सुगंधाने अवघड प्रश्न विचारला. पण विलासने मात्र तिला ह्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. कदाचित ती म्हणत होती माझा तुमच्यावर नाही असे तुम्हाला वाटते का? असे विलासला वाटले. शेवटी रात्र काढण्यासाठी तयार झाली. विलास आपल्या बेडरूममध्ये येऊन बिछान्यावर पडला आणि सुगंधाच्या विचारात त्याला कधी झोप लागली हे त्याला समजले नाही.

रात्री मध्यरात्री कधीतरी विलासला जाग आली. पावसाची रिप रिप कानावर पडत नव्हती. म्हणजे पाऊस थांबला होता. उत्सुकतेपोटी तो उठून खिडकीपाशी आला. दार उघडून पाहिले. बाहेरचा क्षीण चंद्रप्रकाश आपले अस्तित्व दाखवत होता. आजूबाजूंच्या घरांच्या सावल्या अधिक गर्द झाल्या होत्या. खूप पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा ऊबदार वाटत होता. काही क्षण तो तसाच उभा राहिला. स्वयंपाक घरात कसली तरी चाहूल त्याला लागली. कदाचित सुगंधा पाणी प्यायला उठली असावी असे त्याला वाटले.

अचानक एक किंकाळी कानावर पडली आणि विलास खिडकीपासून दूर झाला. स्वयंपाक घराच्या दिशेने तो पाहू लागला. तेवढ्यात झपाटल्यासारखी पळत सुगंधा आली आणि त्याच्या गळ्यात पडली. ती अतिशय घाबरलेली होती. काय झालंय हे समजण्यासाठी तिला त्याने  दूर करण्याचा प्रयत्न केला. तर ती अधिकच त्याला बिलगली. आपली मिठी अधिक घट्ट करत ती म्हणाली.

” तिथं कुणीतरी हाय? ” तिचा स्वर रडवेला झाला होता.

“कुठं??” विलासने निरर्थक प्रश्न केला.

” तिथं – सैपाक घरात. कोपर्यात. म्या तिला पाहिलं.”

“कोणाला पाहिलंस तू??”

सुगंधा | भाग ६

विलासने डोळे उघडले. समोर अनिता नव्हती. अंगण साफ रिकामे होते. पण उंबरठा ओलांडण्याचे धाडस काही विलासच्याने झाले नाही. त्याच्या पायातली शक्ती संपून गेली होती. शक्तीहीन होऊन तो खाली बसला. सुगंधा त्याच्याकडे हताश नजरेने पाहत राहिली. “नाही ते शक्य नाही. चल ती बॅग आत ठेव."...

सुगंधा | भाग ५

मोठ्यांचा सल्ला हा सल्ला नसून आदेश असतो. काही तरी अघटीत घडू नये म्हणून स्वानुभवाने त्यांनी ते सांगितलेले असते. स्मशानातून परतताना तो सुगंधाला समजावू लागला. पण सुगंधाला रडु कोसळले. "खरं हाय तुमचं म्हणणं पण म्या एकली त्या मसणात कशी राहु? म्या तुमच्याकड येणार नसल तर तुमी...

सुगंधा | भाग ४

विलासला सर्व प्रकार लक्षात आला. मनातल्या भीती पोटी तिला भास झाला असावा. पण लगेच आणखी एक विचार मनात आला. चोवीस तास स्मशानात राहणार्या एखाद्याला एखाद्या प्रेतात्म्यापासून कसली भीती? आणि कसले भास- ती नाटक तर करत नसेल? पण आता वेळ निघुन गेली होती.तिच्या मादक शरीराची उब...

सुगंधा | भाग २

विलासने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले. ही बाई मसनात राहते. म्हणजे नक्की खिल्ली उडवत असणार म्हणून त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारले. "कुठं"? "म्हणते नव्ह... ख्रिस्ती लोकांच्या मसनात" ती म्हणाली तिच्या चेहर्यावर आतां अपराधी भाव होता. " माझा दादला...

सुगंधा

गावाच्या वेशीवरच संपतराव पाटलांचा चौसेपी वाडा होता. पाटलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. त्याबरोबर जोडधंदा म्हणून घरात सहा दुभत्या गाई पाळल्या  होत्या. गावाबाहेर गोपाळ डेअरी चा  मोठा प्लांट होता. सकाळी रोजच्या रोज दुधाचा टॅंकर गावात येत असे आणि सर्व दूध घेऊन...

error: नका ना दाजी असं छळू!!