सुगंधा | भाग ६

विलासने डोळे उघडले. समोर अनिता नव्हती. अंगण साफ रिकामे होते. पण उंबरठा ओलांडण्याचे धाडस काही विलासच्याने झाले नाही. त्याच्या पायातली शक्ती संपून गेली होती. शक्तीहीन होऊन तो खाली बसला. सुगंधा त्याच्याकडे हताश नजरेने पाहत राहिली.

“नाही ते शक्य नाही. चल ती बॅग आत ठेव.” म्हणत तो उठला आणि दाराला कडी घातली. विषण्ण अवस्थेत दोघे घरात परतले.

न्याहरी झाल्यावर विलास बाहेर पडला. एकट्याला मात्र अनिताने अडवले नाही. सुगंधाला घेतल्याशिवाय हा कुठेही जाणार नाही हे अनिताला माहित होते. दिवसभर तो भटकत राहिला. भटकत थकत देवळाच्या पारावर विसावला. त्याला एक कल्पना सुचली. एक निर्णय घेतला. एक शेवटचा प्रयत्न आर या पार. तिच्यासमोर शृंगार करायचा. जास्तीत जास्त ती काय करेल? चिडेल, भीती दाखवेल, अंगावर येऊन ओरबाडेल. प्रसंगी जीवसुद्धा घेईल. पण त्याला सामोरे जायचे.

तो घरी पोहचला. सुगंधाला सारे समजावून सांगितले. तिलाही काहीतरी शेवट हवा होता. ती आनंदाने तयार झाली.

रात्री जेवण झाल्यावर विलास पलंगावर आडवा झाला. सुगंधा पहिल्या रात्रीचा शृंगार करून येणार होती. तो तिची वाट पाहत होता.शेवटी ती आली. नववधूचा शृंगार करून. त्यांच्या लग्नानंतर ही त्यांची पहिली मिलनाची रात्र होती. त्याला सुगंधाचे कौतुक वाटले. हातात हिरवाकंच चुडा, अंगावर तसाच चमचमणारा हिरवा शालू  आणि चेहर्यावर हातभर पदर ओढलेला. ती आली पलंगाच्या पायाकडल्या कोपर्यात बसली. अगदी अंग चोरून. काही क्षण तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याने तिचा हात पकडत स्वतःकडे ओढले. तशी सुगंधा चुंबकासारखी तिच्या आकर्षित होत गेली.  संकोचुन तिने आपला हात आकसून घेतला. आणि म्हणाली,

“सोडा मला.”

तिचा हात त्याने सोडून दिला. तिचा स्पर्श बर्फासारखा थंड होता आणि आवाज – अनिताचा!

” अनिता?” अभावितपणे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.

” होय, मी अनिताच” चेहर्यावरचा पदर बाजूला करत ती म्हणाली. आणि त्याच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पाहू लागली.

“आणि सुगंधा?”

ती खदखदुन हसली. ” तुम्हाला आठवतं, राघोजीच्या अस्थीविसर्जनाच्या वेळेस तुम्ही सुगंधा बरोबर स्मशानात आला होता. त्यावेळी ती ठेच लागून पडली व काही क्षणासाठी ती मूर्च्छित झाली. त्याच वेळी मी तिचा जीव घेतला. ती गेली आणि मी तिच्या शरीरात प्रवेश केला. तुमच्या बरोबर परत आलेली सुगंधा नाही मी आले, त्या दिवसापासून सुगंधाच्या रूपात मी वावरतेय.” ती पुन्हा खदखदुन हसली. यावेळचे तिचे हसणे अधिक भयानक होते.

“म्हणजे अनितापासून सुटका करून घेण्यासाठी मी अनिताशी सल्लामसलत करत होतो!

” पण हे तू का केलेस? आत्यंतिक वेदना लपवत तो म्हणाला, आणि तेही वीस वर्षानंतर?”

” होय, वीस वर्ष मी आपल्या घरात येण्यासाठी स्मशानात भटकत होते. पण वाहक मिळत नव्हता. वाहक तो ही थेट आपल्या घरात येणारा आणि तो शेवटी सुगंधाच्या रूपात मला मिळाला.”

“आणि तुझ्यावर झालेला अग्नीसंस्कार?”

” मला सरणावर ठेवण्याआधीच मी सुटका करून घेतली होती. स्वाहा झाला तो माझा फक्त देह.  माझा अग्नी संस्कार मी दूर राहून शांतपणे पाहत होते.” ती पुन्हा खदखदुन हसली. प्रत्येक हसण्यागणिक तिचे हसणे भेसूर होत चालले होते.

“सुगंधाचा जीव घेताना तुला काहीच कसे वाटले नाही? ” मोठ्या संयमाने स्वतःला शुद्धीवर ठेवत त्याने विचारले.

“प्रेमात आणि युद्धात सार काही माफ असतं.” अनिता निर्विकारपणे म्हणाली, ” मी विस वर्ष वाट पाहत असताना ही सुगंधा अचानक कुठून उपटली, मी परत आले ते तुमचे प्रेम प्रकरण संपवायला आणि माझे प्रेम पुन्हा मिळावायाला.

विलासला आश्चर्य वाटलं. आ पण अजून शुद्धीवर कसे आहोत हे तो समजू शकला नाही. त्याने विचारले, ” सुगंधाच्या शरीरात तू वावरतेस आणि तिचा आत्मा?

“तोही तिथंच स्मशानात भटकत आहे. कदाचित तुमचीच वाट पाहत! ” परत ती खदखदुन हसली. अनिता एवढी क्रूर असेल असे स्वप्नातही त्याला वाटले नव्हते.

“तू एका मृत आणि परक्या शरीरात आणि मी जिता जागता माणुस. आपले प्रेम कसे जुळणार? ” त्याने विचारले.

“त्यावर उपाय आहे. पण तुम्हाला मी सांगेन तसेच वागायला लागेल.” तिच्या आवाजात जरब होती.

“मी काय करू?”  त्याने हताशपणे विचारले.”

“मी सुगंधाच्या देहाचा त्याग करीन, पण त्याचवेळी तिचा इतके दिवस कुजलेला सडलेला दुर्गंधीयुक्त देह पाहावा लागेल. मी तिच्या देहात वास करते म्हणून अशी ताजी, टवटवीत आहे. तू आता गावात जाऊन सांग सुगंधा झटका येऊन मेली. गावकरी तिला स्मशानात नेण्यासाठी येतील त्यावेळी मी सुगंधाला मृतावस्थेत ठेवीन. ती सरणावर जाईपर्यंत तिचा देह शाबूत ठेवेन. म्हणजे कोणालाही कसलाच संशय येणार नाही. तूला मात्र मी सांगेन तसंच वागावे लागेल.” अनिता आता तुम्ही वरून तू वर आली होती. आणि तिचा आवाज विलक्षण घोगरा आणि अधिक भयावह झाला होता.

“आणि ऐक, माझ्या आज्ञा बाहेर गेलास तर तुला नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल.” बोलत असतानाच तिच्या चेहर्यावर मोठाले फोड उभारून ते फुटले आणि त्यातून दुर्गंधी रस वाहू लागला. डोक्यावरचे सर्व केस गळून गेले.आणि तिथे मोठी मोठी टेंगळे आली.

” ही एक झलक आहे तुझी खात्री पटविण्यासाठी. ” परत सुगंधाच्या मुळ रूपात येत ती म्हणाली. “जा आता. गावकरी आल्या आल्या मी सुगंधाच्या मृत अवस्थेत पडून राहील.”

“शक्तीहीन पायाने तो वाड्याबाहेर पडला. त्याची बुद्धी, विचारशक्ती नष्ट झाली.त्याला ऐकू होती ती फक्त अनिताची आज्ञा. तो गावभर सांगत सुटला. गावकर्यांना वाटले सुगंधाच्या मरण्याने, तिचा वियोग सहन न झाल्याने त्याची अवस्था अशी झाली आहे. सहानभूती व्यक्त करत ते वाड्यात जमू लागले.

सर्व विधी यथासंग पार पाडीत सुगंधाचा देह स्मशानात नेला. अनिताने सांगितले होते सुगंधा सरणावर गेली की मी तिचा देह सोडेन, मग आ पण घरी येऊ. मग फक्त तू आणि मी, मी आणि तू.

चिता नीट रचली जाऊन सुगंधाचे शरीर पांढर्या कपड्यापर्यंत झाकले जाईपर्यंत अनिताला तिच्या देहात थांबणे भाग होते. ती घाई गडबडीत बाहेर आली असती तर गावकर्यांना तिचा सडलेला देह नजरेस पडला असता. मग संशयाचे धुके निर्माण झाले असते. इतके दिवस सुगंधाचा देह लपवून ठेवण्याचा ठपका विलासवर आला असता.

चिता पूर्णपणे रचली गेली. शेवटचे लाकूड सुगंधावर ठेवण्यापूर्वीच चितेने पेट घेतला. खरं तर चितेला अग्नी विलासच्या हातून दिला पाहिजे होता. पण तो अनपेक्षितपणे दुसर्या कोणीतरी दिला किंवा ती आपोआप पेटली. क्षणार्धात लवलवत्या ज्वालांनी चितेला घेरले. अनिताची वेळ चुकली.त्या होरपळणार्या ज्वालातून अनिताची केविलवाणी धडपड निष्फळ ठरली आणि तिचा आत्मा जळून राख झाला. तिची धडपड फक्त विलासलाच दिसत होती. अनिता आता पूर्णार्थाने अनंतात विलीन झाली.

विलास नदीवर अंघोळ करून घरी पोहचला. त्याला थकवा जाणवत होता. त्याने दरवाजा उघडला तर समोरची व्यक्ती पाहून तो स्तब्ध झाला. समोर सुगंधा बसली होती. सुगंधाच्या रूपात परत अनिता तर नाही ना आली असे त्याला वाटले. पण तिने मनातले वाचल्यासारखे म्हणाली,

” नाही रे… मी तुझी सुगंधाच आहे, खरीखुरी पण फक्त शरीराशिवाय. माझ्या शरीराला कधीच मोक्ष मिळाला आहे. जणू काही ती आपली बोली भाषा विसरली होती. ती म्हणाली,

“राघोजीच्या अस्थीविसर्जनाच्या दिवशी अनिताने माझा जीव घेतला. तेव्हापासून मी स्मशानात भटकते आहे. तुझीच वाट पाहत होते. पण तुझ्याबरोबर अनिता असेपर्यंत ते शक्य नव्हते. स्मशानात माझे प्रेत पाहिले आणि मला तिचा डाव ध्यानी आला. तुला प्रश्न पडला असेल ना चिता कोणी पेटवली. ती मीच पेटवली. चिता पेटण्यापूर्वी ती बाहेर पडली असती तर ती कायमची सुटली असती.”

भारवलेल्या अवस्थेत तो तिच्याजवळ गेला. तिला हलकेच जवळ घेतली. त्याचा विश्वास बसला नाही. ती खरीखुरी सुगंधा होती. त्याने आश्चर्याने त्याला विचारले.

तू तर खरीखुरी माझी सुगंधा आहेस?

“नाही रे राजा, हे मायावी रूप आहे. माझा देह जळताना स्मशानात तू प्रत्यक्ष पाहिलास ना? मग मी कुठली खरीखुरी सुगंधा असायला. तुझी मी रात्रं दिवस सेवा करीन. तुला हवं तेव्हा हे मायावी रूप धारण करेन. तुझ्या सेवेत कसलंही अंतर येणार नाही फक्त तू मला एक वचन दे.”  तिच्या आर्जवात विलक्षण आत्मीयता होती.

” कसले वचन?”

” तू मला कधीच अंतर देणार नाहीस.” तिने हात पुढे केला.

तोच हात ओढून घेत तिला जवळ घेतली आणि म्हटले, नाही गं राणी, आता कोण आहे इथं आपल्यामध्ये?”

आता ती त्याच सगळं करते. कुठेही उणे पडू देत नाही.दिवसभर तो तिच्याशी संवाद साधत असतो. खिडकीत बसून सूनसान रस्त्याकडे पाहत राहण्याची सवय मात्र तशीच ठेवलीय, सुगंधाला हे आवडत नाही तिची भुणभूण चालू असते, पण तो फारसे लक्ष देत नाही. कारण हे मात्र आयुष्यभर- आयुष्यभर.

एक सांगायचं मी विसरूनच गेले. काही दिवसापूर्वी विलास पाटीलाने आत्महत्या केली. सुगंधाच्या विरोधाला न जुमानता. कारण ते  दोघे वेगवेगळ्या योनित कसे निखळ प्रेम करणार होते. आत्महत्या करताना त्याने गावकर्यांच्या लक्षात येण्यासाठी दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला होता. जितक्या लवकर गावकर्याना समजेल तितक्या लवकर आपल्या देहाला अग्नीसंस्कार मिळावा हीच काय ती त्याची शेवटची इच्छा. चितेवर त्याला मोक्ष मिळाला असता, पण त्याचा मोक्ष त्याच्या घरीच, त्याच्या सोबत होता –  त्याची सुगंधा!

सुगंधा | भाग ५

मोठ्यांचा सल्ला हा सल्ला नसून आदेश असतो. काही तरी अघटीत घडू नये म्हणून स्वानुभवाने त्यांनी ते सांगितलेले असते. स्मशानातून परतताना तो सुगंधाला समजावू लागला. पण सुगंधाला रडु कोसळले. "खरं हाय तुमचं म्हणणं पण म्या एकली त्या मसणात कशी राहु? म्या तुमच्याकड येणार नसल तर तुमी...

सुगंधा | भाग ४

विलासला सर्व प्रकार लक्षात आला. मनातल्या भीती पोटी तिला भास झाला असावा. पण लगेच आणखी एक विचार मनात आला. चोवीस तास स्मशानात राहणार्या एखाद्याला एखाद्या प्रेतात्म्यापासून कसली भीती? आणि कसले भास- ती नाटक तर करत नसेल? पण आता वेळ निघुन गेली होती.तिच्या मादक शरीराची उब...

सुगंधा | भाग ३

दोन दिवसानंतर गावातला जॉन फर्नाडिस वारला. त्याच्या अंत्यविधीसाठी विलासला कबरीस्तान जावे लागले. स्मशानात जॉनचे नातेवाईक आणि काही मोजकेच लोक होते. खरे म्हणजे विलासला या निमित्ताने सुगंधाच्या नवर्याला पाहायचे होते. खड्डा खणून तो वाट पाहत बसला होता. अंगाने धडधाकट, रंगाने...

सुगंधा | भाग २

विलासने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले. ही बाई मसनात राहते. म्हणजे नक्की खिल्ली उडवत असणार म्हणून त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारले. "कुठं"? "म्हणते नव्ह... ख्रिस्ती लोकांच्या मसनात" ती म्हणाली तिच्या चेहर्यावर आतां अपराधी भाव होता. " माझा दादला...

सुगंधा

गावाच्या वेशीवरच संपतराव पाटलांचा चौसेपी वाडा होता. पाटलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. त्याबरोबर जोडधंदा म्हणून घरात सहा दुभत्या गाई पाळल्या  होत्या. गावाबाहेर गोपाळ डेअरी चा  मोठा प्लांट होता. सकाळी रोजच्या रोज दुधाचा टॅंकर गावात येत असे आणि सर्व दूध घेऊन...

error: नका ना दाजी असं छळू!!