आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली…
“माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून… आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन…”
प्रेरणाच्या मागणीने आकाश विचारात पडला. ‘बुमरँग’ ह्या शब्दाशी त्याचा जवळुन परिचय झाला. त्याची मागणी तिने पूर्ण केल्याने तिची मागणी रास्त होती. तसेही तिची कुठलीही मागणी पूर्ण करायला तो नक्कीच तयार झाला असता. पण आत्ताची वेळ चुकीची होती. एक महिन्याच्या संयमाची आता समाप्ती होऊ घातली होती आणि अशावेळी ‘भात शिजेस्तोवर धीर धरवतो, वाफ निघेस्तोवर नाही…’ त्याचे तल्लख डोके कामाला लागले आणि काही क्षणात त्याच्या चेहेर्यावर स्मित पसरले. त्याला उखाणा आठवला किंवा त्याने एखादा उखाणा बनवला हे त्या स्मितावरून प्रेरणाला समजले. उत्सुकतेने ती ऐकू लागली…
प्रेरणा आणि आकाश – जोडा दिसेल सगळ्यात उठून लवकर घरात प्रवेश कर, माझा धीर चाललाय सुटून
त्यानेही खुबीने गुंफलेली दोघांची नावे, तिची पूर्ण केलेली मागणी आणि उखाण्यातून प्रकट केलेली आतुरता तिला भावली आणि घरात प्रवेश करून तिने स्वतःला आकाशच्या बाहुपाशात झोकून दिले. पायाने कसेबसे दार लोटुन आकाश प्रेरणाच्या मिठीत आणि चुंबनात बुडाला. तसेही प्रेरणा त्याला रोखत नव्हतीच आणि आता त्याला स्वतःला सुद्धा संयम बाळगायची आवश्यकता नव्हती. पण हीच ती रात्र होती ज्यासाठी आकाश इतके दिवस तरसत होता. त्याला ही नुसती उरकून टाकायची नव्हती तर त्याला क्षण न क्षण उपभोगायचा होता. एक सुंदर
चुंबन वसूल करून त्याने प्रेरणाला मिठीतून सैल सोडले. थोडासा मागे होऊन तो प्रेरणाला म्हणाला…
“आपले वैदिक पद्धतीने किंवा व्यवस्थित विधीवत लग्न झाले असते तर मला तुला मस्त सुंदर साडीत बघता आले असते. हा ड्रेस जरी छान असला आणि लग्नासाठी तू नवीन घेतला असलास तरी मला तुला आज रात्री साडीत बघायचे आहे. आत बेडच्या बाजूच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात एक बॉक्स आहे. त्यात मी आजच्यासाठी एक साडी आणली आहे. अंदाजाने तुझ्या मापाचा रेडीमेड ब्लाऊज आणि मॅचिंग परकर सुद्धा आहे. त्यावरच मोगर्याचा एक टपोरा गजरा सुद्धा आहे. आता पटकन आत जाऊन फ्रेश हो आणि मस्त साडी नेसून तयार हो. मग मला हाक मार”
त्याची ती तयारी आणि अपेक्षा ऐकून प्रेरणा हबकूनच गेली. आकाशचे तिच्यावर प्रेम आहे हे तिला माहीतच होते पण तो इतका रोमॅन्टीक असेल असे तिला वाटले नव्हते. तिला बोलायला शब्दच सुचत नव्हते. काही न बोलता त्याच्या ओठांचे एक पुसट चुंबन घेऊन ती आत निघून गेली. ती आत गेल्यावर येऊ घातलेल्या प्रसंगाच्या कल्पनेनेच आकाश उत्तेजीत व्हायला लागला. खास ह्या दिवसासाठी खपून त्याने काही निवडक गाणी गोळा
ती. पटकन जाऊन त्याने ती सीडी लावली आणि घर रफी आणि लताच्या आवाजाने भरून गेले…
दो सितारो का जमीं पर है मिलन आज की रात मुस्कुराता है उम्मीदो का चमन आज की रात रंग लायी है मेरे दिल की लगन आज की रात सारी दुनिया नजर आती है दुल्हन आज की रात
रफीच्या आवाजात स्वतःचा स्वर मिसळून आकाश एका वेगळ्याच बेहोश मुड मध्ये शिरला. किचनमध्ये जाऊन त्याने एक ग्लास दूध पटकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून त्यात थोडी साखर आणि दुधाचा मसाला टाकला. दूध हलवून ग्लास रेडी करेस्तोवर त्याला बाथरूम आणि मग बेडरूमच्या दारांचा आवाज आला. प्रेरणा बेडरूममध्ये गेल्याची चाहूल घेऊन आकाश लगबगीने बाथरूममध्ये शिरला. केसांची साफसफाई आधीच करून ठेवली असल्याने त्याने एक क्विक शॉवर घेतला आणि अंगावर डीओडरंट फवारून आणि चेहेर्यावर आफ्टरशेव्ह फासून त्याने शरीर एकदम सुगंधीत केले. हॉलमध्ये येऊन त्याने आपले लपवून ठेवलेले आतले कपडे आणि झब्बा सलवार काढले. आत प्रेरणा त्याच्यासाठी सजत होती. इथे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अझीझच्या स्वरात स्वर मिसळून आकाश स्वतः सजायला लागला.
कितने दिनो के बाद है आयी सजना रात मिलन की अब हमसे ना सही जाये जुदाई आयी सजना रात मिलन की
तनहाई के रुसवाई के हम कितने गम झेले
कहने को तो साथ रहें हम फिर भी रहें अकेले मेरी हो के भी रही मुझसे परायी आयी रात मिलन की
दो रूहोंके मिलन का ये वक्त गुझर ना जाये मेहकी मेहकी रात मिलन की जाके फिर ना आये मिल जायेंगे हम राम दुहाई आयी रात मिलन की
गाण्यातील प्रत्येक शब्दातील अर्थ शोधत आणि त्यात आपल्याला शोधत आकाश तयार झालाच होता आणि त्याला आतून प्रेरणाची हाक आली. नुसत्या तिच्या आवाजानेही आकाशची उत्तेजना वाढली. इतके वर्षाचा उपास आज सुटणार होता. इतक्या प्रतिक्षेनंतर त्याची प्रिया आज खर्याअर्थाने ‘त्याची’ होणार होती. एकदा शेवटचे आपल्या सजलेल्या गुलजार रुपाकडे बघून आकाशने दुधाचा ग्लास उचलला आणि तो आतल्या खोलीकडे निघाला. दार ढकलून आत गेला तर आतमध्ये अंधार होता. अंदाजाने टेबलावर ग्लास ठेऊन आकाश मागे आला आणि त्याने बेडरूमचे दार बंद केले आणि नेहेमीचा ट्यूबलाईट न लावता त्याने वरचे झुंबर लावले. त्याचा प्रकाश भगभगीत न ठेवता रूम मधले सगळे दिसेल इतपत ठेवला. त्या हेलकावत्या मंद प्रकाशात आकाशने पलंगाकडे बघितले.
लाल साडीत डोक्यावरून धुंघट घेऊन प्रेरणा पलंगावर निश्चल बसली होती. बेडरूममध्ये एसीचा थंडावा आणि मोगर्याच्या फुलांचा मंद धुंद करणारा गंध पसरला होता. त्या वातावरणाने आकाशची उत्तेजना शिगेला पोहोचली. नकळत आकाशच्या मनात मुकेशचा आवाज स्त्रवला..
कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की जैसे तुजको बनाया गया हैं मेरे लिये तू अबसे पहेले सितारों में बस रही थी कहीं तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिये
त्या दृश्याने आपला बिघडलेला श्वास नियंत्रित करायचा प्रयत्न करत आकाश पुढे सरकला. बेडच्या कडेला अर्धवट बसत त्याने आपली उत्तेजना काबूत आणण्याचा प्रयत्न केला. किंचित खाकरून त्याने प्रेरणाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याच्या चाहुलीने प्रेरणा किंचित हलली पण काहीही न बोलता आकाशच्या पुढच्या क्रियेची वाट बघत राहिली. तिच्याकडून बाकी काही प्रतिक्रिया न आल्याने आकाशला पुढची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर आल्याची जाणीव झाली.
थोडासा आत सरकून बसत आकाशने तिचा धुंघट अलगद धरला आणि हळुवारपणे वर उचलायला लागला. जसजसा धुंघट वर जायला लागला तसतसा प्रेरणाचा चेहेरा दृष्टिक्षेपात यायला लागला. हलकाच साजशृंगार आणि आत्ताच्या क्षणाची लज्जा… त्यावर पडणारा झुंबराचा मंद धुंद प्रेकाश… ह्यामुळे तिचा चेहेरा सुंदर दिसत होता. आपल्या चेहेर्याकडे आकाश रोखून बघतोय ह्या जाणीवेने प्रेरणा संकोचली आणि नजर खाली करून अजुन सावरून बसली. तिचा तो सुंदर चेहेरा, त्यावरची लाली, लज्जेची नजाकत बघून आकाशच्या हृदयात सप्तसूर उमटायला लागले.
कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की जैसे बजती है शहनाईया सी राहों मे
सुहागरात है घुघट उठा रहा हुँ मैं सिमट रही है तू शरमा के अपनी बाहों में
धुंघट बाजुला करून आकाशने प्रेरणाचा चेहेरा ओंजळीत धरला. चेहेरा वर झाला तरी तिची नजर लज्जेने खाली झुकली होती. अलगद पुढे होऊन आकाशने आपले ओठ तिच्या पापण्यांवर टेकवले. तो त्याचा स्पर्श तिच्या शरीरभर उत्तेजना पसरवून गेला. तिच्या चेहेर्याकडे इतक्या जवळुन बघताना आकाशला तिचे लिपस्टीकच्या हलक्याशा स्पर्शाने लाल झालेले आणि कामोत्तेजनेमुळे थरथरणारे ओठ दिसले. न राहवून आकाशने आपले ओठ त्या मुलायम ओठांवर टेकवले. आजपर्यंतचे सर्व स्पर्श पुसले जावून हा स्पर्श ‘प्रथम स्पर्श’ असल्याचा फील दोघांना आला आणि ‘पहिल्या रात्रीच्या’ ओठांच्या पहिल्या मिलनाने दोघेही शहारले.
ओठांच्या त्या मिलनात गुंग होत आकाशने हात तिच्या डोक्यामागे नेला आणि तिच्या केसांची क्लिप काढ्न टाकली. तिचा भरगच्च केशसंभार क्लीपचा अडसर दूर होताच तिच्या खांद्यावर दोन्हीकडे पसरला. प्रेरणाच्या ओठांचे रसपान चालूच ठेऊन आकाशने तिचे केस पुढे घेतले आणि दोघांच्या चेहेर्यावर आणून सोडून दिले. ते चुंबनमग्न प्रणयी जोडपं त्या केसांच्या धुंदकुंद वासात आणि स्पर्शात झाकले गेले. आकाशने तिचा चेहेरा ओंजळीतून सोडून तिला आपल्या हलक्या मिठीत घेतले.
कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की ये बदन ये निगाहे मेरी अमानत है ये गेसंओ की घनी छांव है मेरी खातीर ये होठ और ये बाहें मेरी अमानत है