मी अरूण, माझे वय आता ३० वर्षे आहे. गेली १५ वर्षे मी सिडींग करतोय. माझ्या शरीरावर फक्त चेहरा आणि पाय सोडले तर कुठेपण केस नाहीत. रेग्युलर डायट मेंटेन करून मी स्वतःची फिगर मेंटेन केलेली आहे. ह्या सिडींगमध्ये १५ वर्षाचा कालावधी कसा गेला हे मला समजलेच नाही. सिडींग ही माझी आता हॉबी न राहता माझ्या जीवनाचा एक भाग होऊन गेलाय.
मी पुण्यामध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय. चांगला ५ आकडी पगार, स्वतः चा २ बेडरूम फ्लॅट, गाडी, लाईफ पूर्ण व्यवस्थित झालेली. आई बाबा गावी होते घराची तशी काही जबाबदारी माझ्यावर नव्हती आणि सिडींगमुळे लग्नाचा विचार अजून तरी केलेला नव्हता. माझी लाईफ मी मस्त एंजॉय करत होतो.
पण अचानक त्या दिवशी सोमवारी सकाळी एका मेलने माझे लाईफ बदलून टाकले. ती मेल होती माझ्या सिडींग ग्रूपकडून. गेल्या १५ वर्षांत माझा एक क्रॉसड्रेसर मित्रांचा घनिष्ट ग्रूप झाला होता आणि आम्ही दर महिन्यातून एकदा ड्रेसिंगसाठी कोणा ना कोणाच्या घरी जमत असू आणि मस्त ड्रेसिंग करून आमची सिडी लाईफ एंजॉय करत असू.
झाले असे की आमच्या या ग्रूपला पुढच्या आठवड्यात १० वर्षे पूर्ण होणार होती आणि त्या निमित्ताने ग्रूपने २ दिवसासाठी म्हणजे शनिवार आणि रविवार वीकएंडला महाबळेश्वरला एका रिसॉर्टवर गेट टुगेदर आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रत्येकी दहा हजार काँट्रीब्युशन होते आणि या भेटीची थिम होती ‘कपल’.
‘कपल’ हा शब्द वाचून काय करावे हेच मला समजत नव्हते, एकतर गेली १५ वर्षे मी सिडींग करत असून मी बॉयफ्रेंडपासून दूरच राहले होते. मला कोणीही बॉयफ्रेंड नव्हता, आणि मी ग्रूपमध्ये खूप वेळा गप्पा मारताना मोठ्या फुशारकीने खोटंच सांगितले होते की माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि माझा हा खोटेपणा माझ्या फ्रेंड्सच्या समोर येणार होता. काय करावे हेच मला समजत नव्हते.
मी डोक्याला हात लावून काहीतरी मार्ग काढायचा विचार करत होते आणि माझ्याकडे फक्त ४ दिवस होते. मी माझ्या समोरील ऑपशन्स पाहत होते. ऑनलाईन फ्रेंड्समध्ये कोणाला नेण्यामध्ये धोका होता आणि मी कोणावर विश्वासपण ठेवू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या माहिती मधील कोणाला तरी सोबत न्यायचा विचार पक्का केला.
एप्रिल महिना असल्यामुळे माझ्या स्टाफची प्रमोशन लेटर्स माझ्या समोर येऊन पडली होती. मी प्रमोशन लेटर्सवरून नजर फिरवली आणि माझे लक्ष अजयच्या प्रमोशन लेटरवर गेले. माझ्या डोळ्यासमोर अजयचे प्रतिबिंब आले.
२५ वर्षांचा अजय, गोरा रंग, पिळदार मिश्या, क्लीन ढाढी, उंची ६ फूट आणि अंदाजे ७५ किलो वजन. जिम करत असल्यामुळे भरदार छाती आणि स्वभाव खूपच मनमिळाऊ कोणालाही मदत करायला लगेच तयार.
मी अजयला सोबत न्यायचे मनोमन ठरवून टाकले. एकतर तो माझ्या चांगला ओळखीचा होता आणि माझा जुनियर असल्यामुळे मला एका प्रकारची सेफ फिलिंगपण येत होता. मी लगेच अजयला कॉल करून माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले,
“मे आय कम इन सर?”
“अरे अजय ये ना. बस, अजय कसा आहेस? काम कसे सुरू आहे?”
“मी ठीक आहे सर, कामपण चांगले सुरू आहे.”
“बाय द वे तुझे प्रमोशन लवकरच करावं लागणार आहे मला, तुझे काम पाहता.”
“थँक्स अ लॉट सर.”
“अजय खरं तर मला तुझी थोडी पर्सनल हेल्प हवी होती. त्यासाठी मी तुला बोलावले होते.”
“सांगा ना सर, काय हेल्प हवी आहे तुम्हाला?”
“अरे मला तुझी पर्सनल हेल्प हवी आहे, तर आपण ऑफिसमध्ये चर्चा न करता बाहेर करूयात. तू संध्याकाळी फ्री आहेस का?”
“हो सर मी आहे फ्री संध्याकाळी.”
“मग एक काम कर. आज संध्याकाळी माझ्या घरी ये तू साडेसात वाजता. तिकडेच बोलूत आपण.”
“ठीक आहे सर. मी येईन. अजून काय सर?”
“काही नाही.”
“सर मी निघू का आता?”
“हो.”
अजय निघून गेल्यावर मी विचार करू लागलो की ‘आता अजयला माझा प्रॉब्लेम सांगायचा कसा? आणि तो मला हेल्प करायला तयार होईल का??’ मी तर आता त्याला बोलावले होते तेव्हा विचार केला ‘पाहू काय होतेय ते’.
संध्याकाळी लवकरच मी माझे काम उरकून घरी निघालो. मी आज खूप वर्षानंतर स्वतःला खूपच नर्व्हस फिल करत होतो. मी सरळ घरी आलो, काय करावे हेच मला समजत नव्हते. मी घड्याळाकडे पाहिले ६ वाजले होते, तेव्हा माझ्यापाशी फक्त दीड तास होता.
मी अजय समोर लेडी गेटअपमध्ये जायचे ठरवले आणि तयारीला सुरवात केली. अगोदर मी माझा वॉर्डरॉब ओपन केला व ड्रेसचे सेलेशन करू लागले. काय नेसावे हेच समजत नव्हते. शेवटी मी साडी नेसायचे ठरवले व मी माझ्या आवडीची केशरी रंगाची साडी सिलेक्ट केली आणि मी अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो.
गरम पाण्याचा शॉवर सुरू करून मी शॉवर खाली १० मिनिटे उभी राहलो. गरम पाण्यामुळे मला आता खूप छान व रिलॅक्स वाटू लागले होते. अंघोळ उरकून मी माझ्या बेडरूममध्ये आलो अंग पुसून घेतले व माझी अंतर्वस्त्रे घातली आणि माझ्या शरीरातल्या स्त्रीने माझ्या शरीराचा ताबा घेतला.
मी पूर्ण शरीरावर बॉडी लोशन लावले. बॉडी लोशनचा सुवास पूर्ण रूममध्ये दरवळू लागला आणि मी उत्साहीत झाले. मग मी परकर व ब्लाउज घातला आणि आरशासमोर बसून मी माझा मेकअप करू लागले.
आज मी खूप लक्षपूर्वक मेकअप करत होते. मला हा चान्स अजिबात हातामधून जाऊ द्यायचा नव्हता. मेकअप झाल्यावर मी चापून चुपून साडी नेसली. नेमक्या ठिकाणी पिनअप केले. मग मी दागिने घातले आणि शेवटी मी विग घातला. माझ्या डोक्यावर विग नीट एडजस्ट केला आणि स्वतःला आरशासमोर पाहू लागले.
मी माझ्या लुकबद्दल पूर्ण सॅटिसफाय झाले. परत एकदा हलकासा मेकअपचा हात चेहर्यावर लावला. मग माझ्या मानेवर व दोन्ही काखांमध्ये हलकेसे लेडीज पर्फ्युम छिडकले. मी माझ्या सॅन्डेल घालून थोडे वॉकिंगची प्रॅक्टिसपण केली. आज मला गेली १५ वर्षे करत असलेल्या मेहनतीचा उपयोग होत होता.
या सर्वामध्ये दीड तास कधी झाला हे मला कळलेच नाही. साडेसात वाजत आले होते आणि डोअर बेल वाजली. माझी छाती आता परत धडधड करू लागली. मी दरवाज्याकडे जाऊ लागले. माझे हात थरथरत होते. मी मनामध्ये १ ते १०पर्यंत आकडे मोजले आणि दरवाजा उघडला.
“येस आपण?”
“मी अजय, अरूण सरांनी बोलावले होते.”
समोर लेडी पाहून अजय थोडा गोंधळला होता.
“ओह्ह या ना आत, या.”
मी दरवाज्यापासून बाजूला झाले, अजय आत आला.
“बसा ना.”
“हो थँक्स.”
“काय घेणार तुम्ही टी, कॉफी?”
मी त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून मनोमनी हसत होते.
“चहा चालेल, सर कुठे आहेत?”
“तुम्ही बसा, तुमचे सर थोडे बाहेर गेले आहेत, येतील थोड्या वेळात.”
मी गाणे गुणगुणत किचनमध्ये आले व चहा बनवू लागले. तसे मला ड्रेसिंग केल्यावर घरची कामे करायला खूप आवडते. दोन कप चहा बनवून मी परत हॉलमध्ये गेले व अजयला चहा दिला.
“चहा घ्या.”
“थँक्स, मिस.”
“माझं नाव आरोही आहे.”
“थँक्स, आरोहीजी.”
“वेलकम अजयजी, काय काम होते तुमचे दादाकडे?”
“खरं तर सरांचे काहीतरी पर्सनल काम होते. त्यांना माझी हेल्प हवी होती.”
“ओह्ह बरं काय काम करता तुम्ही?”
“मी कस्टमर रिलेशन डिपार्टमेंटमध्ये आहे आणि तुम्ही?”
“नेमके काय काम करता तुम्ही?”
“आमच्या एन्ड कस्टमरचे प्रॉब्लेम सोडवितो मी. कोणाचीही कोणतीही नाराजी होता काम नये.”
“हम्म. तर खूपच किचकट काम आहे तुमचे.”
मी चेहर्यावर हलकेसे हसू ठेवत बोलत होते.
“तुम्ही काय करता आरोहीजी?”
“मी लेक्चरर आहे आणि एम.फिल करतेय.”
“तुम्ही एम.फिलला कोणता विषय निवडला आहे?”
“मी भारतीय ट्रॅडिशनल लेडीज ड्रेसिंगवर शोध निबंध लिहतेय. चहा घ्या थंड होतोय.”
“हो, घेतो ना.”
“नाहीतर दादाला नंतर सांगाल की मी थंड चहा दिला म्हणून.”
“आरोहीजी खरंच चहा छान झाला आहे आणि खूप दिवसांनी मी असा घरचा चहा पितोय.”
अजय माझ्याकडे चोरून चोरून पाहत होता आणि मनातून मला खूप छान वाटत होते. आज खरंच मला माझ्या ड्रेसिंग स्किल्सचा अभिमान वाटत होता. अजयच्या शेजारी माझ्या क्रॉसड्रेसिंग फोटोशूटचा एक अल्बम पडला होता.
“कप द्या तो.”
कप मी घेण्यासाठी अजयसमोर वाकले. अजयची नजर माझ्या ब्लाउजकडे होती. मी काही न बोलता कप्स घेतले आणि किचनमध्ये गेले. किचनच्या दारामागून अजय काय करतो आहे ते पाहू लागले.
अजयचे लक्ष त्या अल्बमकडे गेले. अजय माझा अल्बम पाहत होता आणि चोरून किचनच्या दाराकडेपण पाहत होता. मला वाटत होते की अजय थोडा एक्साईट झालेला आहे. मी मग ५ मिनिटांनी माझ्या पदराला हात पुसत बाहेर आले.
“कसे वाटले माझे फोटोस तुम्हाला?”
अजयची चोरी पकडली गेली होती. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता.
“ते? मी? छान आहेत.”
मी माझ्या चेहर्यावर माफक हसू ठेवत त्याला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत विचारले,
“खरं का की उगाच माझी खोटी स्तुती करताय?”
“खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. एक बोलू राग मानू नका.”
“हो का? बोला ना.”
“हो. ही साडीपण तुम्हाला छान दिसते.”
“इश्श! काहीतरीच काय? मी इतकीपण सुंदर नाहीय.”
“सॉरीपण मॅडम तुम्ही ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला तर नक्की जिंकाल.”
“थँक्स फॉर कॉम्प्लिमेन्ट्स.”
माझे गाल अजयच्या तारिफेने लाल झाले होते.
“यु आर वेलकम मॅडम.”
“तुम्हाला बोलायला छान जमते.”
“मी खरे तेच सांगितले.”
आता मला अजयला कस सांगायचे हेच समजत नव्हते आणि मी निर्णय घेतला की अजय आता थोडा खुलला आहे तर आता या नाटकांवर पडदा टाकूयात. आता नाही तर कधी नाही.
माझ्या मेल टोनमध्ये विचारले, “अजय कसे वाटले सरप्राईझ?”
माझा पुरूषी आवाज ऐकून अजय माझ्याकडे तोंड आ वासून पाहू लागला. काय बोलावे हेच त्याला समजत नव्हते. त्याची ती अवस्था पाहून मी किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आले आणि त्याला पाणी दिले. अजय घटाघट पाणी प्यायला आणि त्याने स्वतःला सावरून घेतले.
“सर तुम्ही? आणि हे काय तुम्ही असे साडीमध्ये?? मी ओळखलेच नाही तुम्हाला सॉरी मॅडम, आय मीन सर.”
“इट्स ओके अजय, रिलॅक्स हो अगोदर.” मी हसत म्हटले.
“सर काय काम होते तुमचे? आणि तुम्हाला काय मदत हवी होती माझी??”
“अजय याचसाठी मी बोलावले आहे तुला. मला असं लेडीज सारखं ड्रेसिंग करायला आवडते. क्रॉसड्रेसिंग ही माझी हॉबी आहे. अजय मला ही हॉबी १५ वर्षांपूर्वी लागली. त्यावेळी मी ८वीत होते. एका नाटकामध्ये मी एका मुलीचा रोल केला होता, पूर्ण मुलीचा गेटअप. माझा अभिनयपण छान झाला होता. सर्वानी खूप तारीफ केली नंतर त्या नाटकाचे फोटोस आले, त्या फोटोसमध्ये मी बिलकुल मुलगी दिसत होते आणि ते फोटोस पाहून घरी कोणी नसताना मी गुपचूपपणे ड्रेसिंग करू लागले.”
“कोणाला समजले नाही का सर? आणि ड्रेसेस व बाकीचे सामान??”
“घरी ताईचे ड्रेसेस होते, मेकअप किट होते आणि आईच्या साड्यापण होत्या, त्यामुळे मला घरात ड्रेसिंग करायला काही प्रॉब्लेम नाही आला. कॉलेज पूर्ण करेपर्यंत मला वाटत होते की मी एकटीच अशी अबनॉर्मल आहे. पण कॉलेज पूर्ण केल्यावर मी फेसबुकवर माझे सीडी अकाऊंट ओपन केले आणि मला समजले की मी एकटी नाहीय की जिला अशी सवय आहे, खूप लोक आहेत ज्यांना क्रॉसड्रेसिंगची आवड आहे.”
“मग सर? सॉरी मॅडम.”
“मग काय? कॉलेज पूर्ण झाले जॉब मिळाला, पगार येऊ लागला. माझी स्वतःची पर्सनल क्रॉसड्रेसिंग लाईफ मी एंजॉय करू लागले. खूप सारे लाईक माईंडेड फ्रेंड्सपण भेटले. मग आमचा एक छोटासा ग्रूप तयार झाला, ६ जणींचा. आम्ही दर महिन्यातून एकदा भेटून मस्त ड्रेसिंग करतो आणि आमची सीडी लाईफ एंजॉय करतो. आमच्या या ग्रूपला आता दहा वर्षे पूर्ण होणार आहेत आणि त्या निमित्ताने ग्रूपने दोन दिवसासाठी शनिवार आणि रविवार वीकएंड पकडून महाबळेश्वरला एका रिसॉर्टवर गेट टुगेदर ठेवले आहे.”
“छान ग्रूप आहे तुमचा, पण माझी हेल्प यात कुठे लागणार आहे तुम्हाला?”
“अजय गेट टुगेदरची थिम ‘कपल’ आहे. तिकडे प्रत्येक क्रॉसड्रेसरने आपल्या मेल पार्टनर किंवा बॉयफ्रेंड सोबत जायचे आहे आणि माझा कोणी पार्टनर नाहीय. तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू येशील का माझ्या सोबत? माझा मेल पार्टनर म्हणून?”
“मी? मला का सोबत नेताय तुम्ही?”
“अजय मला तुझे हेल्पिंग नेचर माहीत आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते आणि हो मला वाटते की तू हे सर्व दुसरा कोणाला सांगणार नाहीस.”
“माझ्याबद्दलचे तुमचे मत ऐकून मला छान वाटले मॅडम. पण मला याचा काय फायदा?”
“तू खूप एंजॉय करशील ही ट्रिप आणि महत्त्वाचे म्हणजे तुझ्या प्रमोशनसाठीपण मी बोलले आहे हेड ऑफिसमध्ये.”