जीव गुंतला तुझ्यात भाग : १२

आज सकाळी उठल्यावर मला खूपच छान वाटत होते. काल रात्री अजय सोबतचा रांगडा प्रणय अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. प्रणय क्रिडेमध्ये अजय खरोखर खूपच तरबेज होते याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येत होता. काल अजयनी माझ्यातील स्त्री व पुरूष दोघांचे पूर्ण समाधान केले होते.

पुढचे काही आठवडे मी व अजय प्रत्येक वीकएंडला भेटत होतो. सप्ताहातील ६ दिवस मी पुरूष म्हणून आणि रविवारचे २४ तास मी स्त्री म्हणून घालवत होते. मला आता माझे दोन्हीही रोल्स खूप आवडू लागले होते, त्यामुळे माझी रविवार सोडता इतर दिवशी ड्रेसिंग करायची इच्छा पूर्ण बंद झाली होती.

आता आम्ही एकमेकांना आत बाहेरून पूर्णपणे ओळखू लागलो होतो. आमच्यामध्ये एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. सर्व काही एकदम ठीक चालले होते. मी माझ्या दोन्हीही रोलमध्ये खूप खुश होते आणि एके दिवशी मला माझ्या घरून लग्न बद्दल विचारणा झाली.

आई बाबा आता माझ्या लग्नाबद्दल बोलणी करू लागले होते. जवळच्या नातलगांमध्ये माझ्यासाठी पूरक असे वधू शोधणे सुरू केले होते. काही जणांनी तर मुलींचे फोटोस सुद्धा मला व्हाट्सअॅप केले होते. या सर्व उलाढालीमध्ये माझ्यातील अरूण पुन्हा जागा झाला होता.

माझी अवस्था आता खूपच बिकट झाली होती. एकीकडे अजय मला पार्टनर म्हणून खूपच आवडत होता आणि दुसरीकडे समाजामध्ये मला एक पुरूष म्हणून सन्मानाने पण जगायचे होते. या रविवारी मी माझ्या प्रॉब्लेमबद्दल अजय सोबत चर्चा करायचे ठरवले. सकाळी अजयचाच मला कॉल आला.

“हॅलो सर.”

“अजय, बोल ना.”

“सर, आज मला तुमच्या सोबत काही महत्त्वाची चर्चा करायची आहे.”

“अॅक्चुअली, अजय मलापण तुझ्याशी काही बोलायचे होते.”

“ठीक आहे, मग कुठे भेटूयात?”

“ठीक आहे. मग ये तू घरी.”

“ठीक आहे सर, आज दुपारी येतो मी.”

“बाय अजय.”

“बाय सर.”

आज माझा रविवार असून देखील मूड काही चांगला नव्हता, त्यामुळे मी आज ड्रेसिंग न करण्याचा निर्णय घेतला होता. अजय दुपारी आला. अजयचा चेहरा आज ऑफ होता. काही वेळ आम्ही दोघेपण गप्पच बसून होतो. विषयाला सुरवात कशी करायची तेच आम्हा दोघांनाही समजत नव्हते पण शेवटी मीच सुरवात केली.

“अजय बोल काय झाले? एनीथिंग सिरीअस? मूड खूप ऑफ दिसतोय तुझा.”

“हो सर, आईने माझ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरू केले आहे.”

“ओह्ह अरे अजय हे तर कधी ना कधी होणारच होते ना?”

“पण सर, तुम्हाला तर सर्व माहीतच आहे.”

“अजय आपले जे रिलेशन आहे, अश्या रिलेशन्स ना अजून या समाजाने मान्यता दिलेली नाही.”

“माझ्या आवडी थोड्या वेगळ्या आहेत.”

“अजय पर्सनल आवड वेगळी गोष्ट आहे आणि सामाजिक व्यवस्था वेगळी आहे. कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा भक्कम पाया आहे, त्यामुळे आपल्याला समाजाने तयार केलेल्या रीती पाळल्याच पाहिजेत.”

“सर, मला ते समजतेय पण.”

“अजय अॅक्चुअली माझ्या घरचेपण माझ्यासाठी मुलगी पाहत आहेत.”

“सर काय सांगताय? म्हणजे आपली परिस्थिती एक सारखीच आहे.”

“हो आणि तुला एक सांगू मी फक्त आरोही बनून पूर्ण आयुष्य नाही काढू शकणार. मला माझ्यातील अरूणला पण पूर्ण न्याय दिला पाहिजे ना.”

“सर तुम्ही म्हणताय ते पटतंय मलापण मन मानत नाही.”

“म्हणजे तुला कळतंय पण वळत नाही.”

“सर आरोही शिवाय राहणे याची कल्पनाच करवत नाही मला.”

“तिच्या शिवाय अगोदर राहताच होतास की तू? आणि आरोही तुला हवी तशी कायम मिळणार नाही रे.”

“सर तुम्ही म्हणताय तेपण बरोबर आहे. मग काय विचार केला आहे तुम्ही?”

अजयचा मूड खूपच ऑफ होता मला सुद्धा मनातून कुठे तरी खूप वाईट वाटत होते.

“मला वाटतेय तुझे आणि आरोहीचे भेटणे आता कमी करावे लागेल आपल्याला, हेच आपल्या दोघांसाठी ठीक होईल आणि आपण आपले नॉर्मल लाईफ जगू शकू.”

“बरं सर ठीक आहे पण हे थोडे अवघड आहे असे नाही वाटत का तुम्हाला?”

“मी निश्चित काही सांगू शकत नाही तुला. पण एक आश्वासन देतो की ज्या वेळी संधी मिळेल त्यावेळी आरोही स्वत: होऊन तुला भेटेल.”

“सर खरं का? लग्न झाल्यावर आरोहीला वेळ मिळेल का माझ्यासाठी?”

“अजय काळजी करू नकोस जेथे इच्छा असते तेथे मार्ग नक्कीच मिळतो.”

“बरं ठीक आहे सर. तुम्ही बोलता त्यातपण पॉइंट आहे.”

“अरे अजय आता यापुढे आपल्याला डबल लाईफ जगावी लागणार आहे आणि काळजी करू नकोस आरोही तुझीच आहे.”

“सर समजले नाही मला.”

“बघ आपली पहिली लाईफ ही नॉर्मल लाईफ असेल आणि संधी मिळाली की आपण आपली दुसरी लाईफपण एंजॉय करू.”

“हो पण सर.”

“अरे अजय आरोहीच तुझ्यावर प्रेम आहे. तिच्या आयुष्यातील पहिला व शेवटचा पुरूष तूच असशील.”

“सर ऐकून बरं वाटलं.”

“अजय मला वाटतेय की आपल्या दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे.”

“हो सर. थँक्स तुम्ही मला खूप प्रॉपर गाइड केले त्याबद्दल.”

“इट्स ओके अजय.”

अजय निघून गेला.

अजय सारख्या तरूणाला योग्य मार्ग दाखवल्यामुळे आज मला मनात कुठे तरी हलके हलके वाटत होते तर कुठे तरी अजय सारखा पार्टनर दुरावल्याचे खूप दु:ख सुद्धा होत होते. पण मी काहीच करू शकत नव्हते. हे असे कधीतरी होणार याची मला अगोदर पासून पुसटशी कल्पना होती आणि मग मी माझी नॉर्मल लाईफ सुरू केली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी माझा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला, त्यामुळे मला ड्रेसिंग करायला वेळच मिळत नव्हता. मी माझ्यातील आरोहीला खूप दिवस दाबून ठेवले होते. अजय सुद्धा त्याच्या आईने सुचवलेली स्थळे पाहत होता. त्यामुळे काही वीक एंड्सला इच्छा असून देखील आम्ही भेटू शकलो नव्हतो. ऑफिसामध्ये अजयचा मूडपण ऑफच दिसत होता.

आज अजय माझ्या केबिनमध्ये आला व मला मिठाई दिली.

“अजय मिठाई कशाबद्दल रे?”

“सर माझे लग्न ठरलेय.”

“अभिनंदन अजय छान बातमी दिली आहेस तू आज, पण तुझा मूड का ऑफ आहे रे?”

“तसे काही नाही सर मी खुश आहे.”

“मग तुझ्या होणार्‍या बायकोबद्दल सांग.”

“सर, निकिता नाव आहे तिचे, माझ्या लांबच्या नात्यातील आहे. ग्रॅज्युशन झालंय. दिसायला पण सुंदर आहे.”

“ओह्ह छान आहे मग.”

“सर तुमचे कुठपर्यंत आलेय? काही हालचाल?”

“शर्मिला म्हणून माझ्या नात्यातील आहे. एमबीए केलाय तिने. इकडे पुण्यातच असते. लवकरच बोलणी फायनल होतील.”

“सर अभिनंदन.”

“थँक्स अजय.”

“सर आज संध्याकाळी काय प्लॅन आहे?”

“का रे अजय?”

“काही नाही, मस्तपैकी सोबत डिनर घेऊयात?”

“ठीक आहे चालेल.”

“लास्ट टाइम गेलो होतो त्याच रेस्टोरेंटला जाऊयात.”

“ओके डन.”

अजय निघून गेला. आज खूप दिवसांनी आम्ही भेटणार होतो तेपण नॉर्मल त्यामुळे अजयशी मनमोकळ्या गप्पा मारता येतील असा विचार मी केला. रात्री मी रेस्टोरेंटमध्ये गेलो. अजय माझ्या अगोदरच तिकडे पोहचला होता त्याने एका कोपऱ्यातील एक टेबल निवडले होते. मी जाऊन अजयला जॉईन झालो.

“मला जास्त वेळ तर नाही ना झाला?”

“नाही, फक्त ५ मिनिटच अगोदर आलो आहे मीपण.”

“ओह्ह मग ठीक आहे. मला वाटले तुला माझी खूप वाट पाहावी लागली.”

“नाही, काय ऑर्डर देऊयात?”

“व्हिस्की घेऊयात, ब्लॅक डॉग की टीचर्स?”

“टीचर्स ठीक आहे सर.”

अजयने ड्रिंक्स ऑर्डर केले. काही वेळात ड्रिंक्स आले आणि आम्ही ड्रिंक्स घेऊ लागलो.

“सर पुढच्या आठवड्यामध्ये शनिवार व रविवारला जोडून ४ दिवस ऑफिसला सुट्टी आहे तर काही प्लॅन आहे का तुमचा?”

“प्लॅन असा अजून काही ठरवला नाही, तुझा काही प्लॅन आहे का?”

“सर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आरोहीला भेटून खूप दिवस झालेत. तिच्या सोबत मला हे ४ दिवस मनसोक्त घालवायचे होते.”

“आयडीया काही वाईट नाही. लग्ना अगोदर आरोहीला पण तुला भेटायचेच होते. काय प्लॅन काय आहे तुझा?”

“मला आरोही सोबत सिक्रेट लग्न करायचे आहे.”

“ओह्ह आणि?”

“आणि मग ४ दिवसासाठी तिला बाहेर घेऊन जायचे आहे.”

“ओह म्हणजे लग्न आणि हनिमून असा प्लॅन आहे तर?”

“हो सर तुम्हाला काय वाटते?”

“चालेल ना छान आयडीया आहे.”

“थँक्स सर,फक्त आरोहीला माझ्या सोबत पाठवून द्या, बाकीचे सर्व मी पाहतो.”

“चल आता डिनरची ऑर्डर दे.”

अजयने ऑर्डर दिली. जेवण करता करता अजय ने त्याचा सर्व प्लॅन मला सांगितला. या ट्रिपसाठी सर्व खरेदी अजयचा करणार होता, मला फक्त त्याच्या सोबत जायचे होते. मलापण तो प्लॅन खूप आवडला आणि नेक्स्ट वीकमध्ये अजय सोबत ४ दिवस आरोही बनून जायला मी तयार झालो.

घरी येऊन मी बेडवर पडले आणि अजयच्या प्लॅनबद्दल विचार करू लागले. अजयने खरोखरच खूप छान प्लॅन बनवला होता. या वेळी त्याने अलिबागला जायचे ठरवले होते. तिकडे समुद्रकिनारी बीचवर खूप सारे बंगले भाड्याने मिळतात त्यामुळे प्रायव्हसीपण खूपच मिळत होती.

अजयने आमच्या लग्नासाठी एक मंदिरपण शोधून ठेवले होते. आजपर्यंत आमच्यामध्ये जे नाते होते त्याला आम्ही काही नाव देऊ शकत नव्हतो आणि लग्नाशिवाय हे नाते पूर्णच होऊ शकत नव्हते.

अजयला मला नऊवारी साडीमधील एक सोज्वळ मराठमोळ्या बायकोपासून ते बिकिनीमधील एक हॉट आणि बोल्ड बेड पार्टनर या सर्व रुपांमध्ये पाहायचे होते. आम्हाला ४ दिवस खरोखर नवरा बायको प्रमाणे जगायचे होते. हे येणारे ४ दिवस आम्हा दोघांच्या आयुष्यातील खूपच संस्मरणीय ठरणार होते.

दुसर्‍या दिवशी अजयने मला फोन करून मापासाठी माझे ब्लाउज मागून घेतले. अजयने सर्व खरेदी करायला सुरवात केली होती. मला फक्त माझ्या मापाचे ब्लाउज अजयला द्यायचे होते आणि मी ते ऑफिस टाईमिंग मध्ये त्याला गुपचूपपणे दिले. माझ्यासाठी टेलरकडून नवीन ब्लाउज त्यानेच शिवून घेतले.

मी व अजय बुधवारी संध्याकाळीच अलिबागसाठी निघालो. तसा आमचा प्लॅन गुरूवार ते रविवार होता. बुधवारी रात्री आम्ही अलिबागला पोहचलो. आज आम्ही एकत्र झोपणार नव्हतो, त्यामुळे मुख्य बेडरूममध्ये मी तर शेजारील बेडरूममध्ये अजय झोपायला गेला.

अजयने माझ्यासाठी आणलेले सर्व सामान माझ्याकडे दिले. अजयने माझ्यासाठी खूप सामान खरेदी केले होते आणि ब्लाउज तर खूपच सुंदर शिवून घेतले होते. मी ते सर्व सामान बेडरूमच्या वॉर्डरोबमधे नीटपणे लावले.

उद्याची काही तयारी मला आजच करायची होती ती मी केली, मेहंदी काढण्यासाठी काही स्टेन्सिल्स माझ्यापाशी होत्या त्याच्या मदतीने मी माझ्या हातावर मेहंदी काढली आणि उद्याचा दिवसाचा विचार करत मी निद्रादेवीच्या अधीन झाले.

गुरूवारी सकाळी मी उठले व सर्व नित्यकर्मे आवरली. मी व अजय आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला. नाश्त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या गालावर थोडी हळद लावली व आमचा हळदी समारंभ पूर्ण केला. पुढची तयारी करण्यासाठी आपापल्या रूममध्ये आलो.

गुरूजींनी दुपार नंतरचा मुहूर्त काढला होता. आज मी व अजय एक नवीन नात्यामध्ये प्रवेश करणार होतो. माझ्या मनामध्ये एक प्रकारची हुरहूर मला वाटत होती. आज आम्ही दोघांसाठी पण एक महत्त्वाचा दिवस होता. आज मी व अजय एका सुंदर नात्यामध्ये बांधले जाणार होतो.

मी बाथरूममध्ये आले आज माझ्या नागि‍णीनी काही वळवळ करू नये म्हणून मी अगोदर तिला शांत केले. मी मग मस्त शॉवर घेतला. नागि‍णीला टोपी चढवली. मग बाहेर येऊन आजच्या दिवसासाठी निवडलेली गुलाबी रंगाची सॅटिन ब्रा व निकर घातली.

अजयनी माझ्यासाठी आणलेली आंबा रंगाची नऊवारी साडी व ब्लाउज मी वॉर्डरोबमधून बाहेर काढले. मी ब्लाउज घातला ब्लाउजची फिटिंग एकदम परफेक्ट होती. मी माझ्या तयारीला लागले तसे सिडींग करताना अगोदर ४-५ वेळा मी नऊवारी साडी नेसली होती त्यामुळे मला साडी नेसायला येत होती.

मी आज ब्राह्मणी पद्धतीने नऊवारी साडी नेसली. पायात जोडवी व पैंजण घातली. रात्री अजयने सुचवल्या प्रमाणे हातावर मी मेहंदी सुद्धा काढली होती. मेहंदी छान रंगली होती. हातामध्ये पूर्ण हिरवा चुडा घातला. गळ्यामध्ये मोजकेच पण ड्रेसिंगला शोभणारे दागिने, नाकामध्ये नथ घातली, केसांचा अंबाडा व त्यावर गजरा माळला होता.

आज एक महाराष्ट्रीयन नवरी प्रमाणे नटले होते. स्वत:ला आरशामध्ये पाहून माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पाहता पाहता ३-४ तास कधी निघून गेले व कधी दुपार झाली हे मला समजलेच नाही.

अजयनी माझ्या रूमचा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला मला पाहून अजय पाहताच राहले.

“काय झालं?”

“काही नाही. झाली का तुझी तयारी?”

“हो झाली, निघायचं का?”

“हो चल निघूयात.”

मी व अजय तयार होऊन मंदिराकडे निघालो. अजय कार ड्राईव्ह करत होते. अजयनी आज हलक्या निळ्या रंगाचा शेरवानी घातला होता, क्लीन शेव, गोरा चेहरा. आज खूपच सुंदर दिसत होता. या शेरवाणीमध्ये अजयचे व्यक्तिमत्व अजूनही खुलून दिसत होते. मंदिर गावापासून थोडे दूर होते.

“अहो कुठे आहे मंदिर?”

“अग थोडे दूर व निवांत आहे मंदिर.”

आम्ही मंदिरामध्ये पोहचलो. हे श्री गणेशाचे मंदिर होते. आम्ही अगोदर श्री गणेशाचे दर्शन घेतले मग आम्ही लग्नवेदीकडे गेलो.

जीव गुंतला तुझ्यात

मी अरूण, माझे वय आता ३० वर्षे आहे. गेली १५ वर्षे मी सिडींग करतोय. माझ्या शरीरावर फक्त चेहरा आणि पाय सोडले तर कुठेपण केस नाहीत. रेग्युलर डायट मेंटेन करून मी स्वत:ची फिगर मेंटेन केलेली आहे. ह्या सिडींगमध्ये १५ वर्षाचा कालावधी कसा गेला हे मला समजलेच नाही. सिडींग ही माझी...

जीव गुंतला तुझ्यात भाग : २

अजयला विचार करत बसलेला पाहून माझा जीव गळ्यात आला होता. माझी स्थिती परीक्षेचा निकाल ऐकणाऱ्या विद्यार्थ्यासारखी झाली होती की मी पास होतेय की नापास. शेवटी अजयने स्वत:चे डोके वर केले. “ठीक आहे. मी येईन तुमच्या सोबत मॅडम. पण काही प्रॉब्लेम नाही ना येणार?” अजयचा होकार ऐकून...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ३

अजयला मी ‘अहो-जाओ’ करत होते आणि त्यामुळे त्याला एक समाधान वाटत होते, ते अजयच्या चेहऱ्यावरून मला जाणवत होते. अजयचा मेल इगो सुखावला गेला होता आणि त्यालापण या सर्वामध्ये मजा येत होती. “म्हणजे समजले नाही मला आरोही.” “अहो जर माझ्या फ्रेंड्सने तुम्हाला माझी फिगर साईझ काय...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ४

मी मागे वळून पाहिले, माझ्या लक्षात यायला थोडा उशीर झाला आणि वेळ निघून गेली होती. मला यांचा नागोबाच्या साईझची आता परफेक्ट कल्पना आली कारण मी आता बरोबर त्याच्यावरच बसले होते, इनफॅक्ट अजयने मोठ्या चलाखीने मला त्यांच्या नागोबावर व्यवस्थित बसवले होते. मी तर मंत्रमुग्ध झाले...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ५

आम्ही सूटच्या बाहेर आलो. आता साडे आठ वाजले होते, बाहेर थंडीपण पडली होती आणि या पार्टीवेअर ड्रेसमुळे मला ती थंडी अजूनच जाणवत होती. अजय माझी परिस्थिती पाहत होते. त्यांनी माझा हात पकडला व माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आता आम्ही एकमेकांना चिटकून चालत...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ६

आम्ही आता पबमधून बाहेर पडलो आणि आमच्या सूटकडे निघालो. ह्यांनी माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आम्ही एकमेकांना चिटकून चालत होतो. “अरू काय गं तू एंजॉय केलंस ना?” “अहो आज मी खूपच एंजॉय केले.” “खरंच का?” “हो थँक्स फॉर द ऑल वंडरफुल मोमेंट्स.” “अरू, यु आर...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ७

काही वेळाने मी शांत झाले. आता माझ्या वेदनापण कमी झाल्या होत्या. मी आता यांना माझ्यामध्ये पूर्णपणे सामावून घेतले होते आणि आता आमच्या पहिल्या वाहिल्या प्रणयाला सुरवात झाली होती. रूममध्ये फक्त माझ्या सुसकाऱ्यांसोबत माझ्या हातामधील बांगड्या व पायातील पैंजणांचा ‘किण किण’...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ८

सकाळचे आठ वाजले होते. माधुरी, रूचिरा व शिल्पा अगोदरच आल्या होत्या. आम्ही एक कोपर्‍याचे टेबल पाहून बसलो व आणि नाश्ता करू लागलो. सोनाली व पूजा आमच्यानंतर पोहचल्या. नाश्ता झाल्यावर पुढच्या प्रोग्रामसाठी मला लेडीजनी बोलावून घेतले. त्या सर्वच जणी जीन्स पॅन्ट व टॉपमध्ये...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ९

आम्ही पाहू लागलो तर शेजारी पेरूच्या झाडावरून एक पेरू खाली पडला होता आणि एक राघू तो पेरू खात होता. “बघ ना गं तो राघू, कसा पिकलेला पेरू मिळालाय त्याला आणि तो पेरूला टोच मारतोय.” “अगदी तुमच्या सारखा.” “त्याला हवं ते मिळालं, पण माझं काय?” “तुम्हाला वाट पाहावी लागेल. इकडे...

जीव गुंतला तुझ्यात भाग : १०

गप्पा मारत मारत आम्ही सूटमध्ये आलो. आतमध्ये येताच यांनी मला मिठीमध्ये घेतले. यांच्या डोळ्यामध्ये मला कामज्वर दिसत होता. मीपण यांच्या मिठीमध्ये स्वत:ला झोकून दिले. आम्हा दोघांनाही माहीत होते की आजची रात्र परत येणार नाही. मी यांना आज पूर्ण सुख द्यायचे मनोमनी ठरवले होते....

जीव गुंतला तुझ्यात भाग : ११

मंगळवारी मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. मला आज अजय समोर त्याचा बॉस म्हणून जायला थोडा संकोच वाटत होता पण मी ते अव्हॉइडपण करू शकत नव्हते. आज मला अजय व इतर स्टाफची प्रमोशन लेटर द्यायची होती. मी प्रत्येकाला माझ्या केबिनमध्ये बोलावून त्यांना त्यांचे प्रमोशन लेटर देऊन अभिनंदन...

जीव गुंतला तुझ्यात भाग : १३

पुजारी बुवा आमची वाट पाहत होते. आमच्या दोघांमध्ये अंतरपाट पकडला गेला. पुजारी बुवा मंत्रपाठ करू लागले. पुजारी बुवांनी विधिवत आमचे लग्ना लावून दिले. अजयने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले. आज मला खरोखर एक स्त्रीचा आणि बायकोपणाचा मान मिळाला होता. मी खाली वाकून माझ्या...

error: नका ना दाजी असं छळू!!