पावसात भिजताना

शहर सोडून बस आता हायवेला लागली होती. बसमध्ये सगळे मजमस्ती करत होते. कुणी अंताक्षरी खेळत होते, कुणी गप्पांमध्ये गुंग झाले होते, कुणी सेल्फी काढत होते तर कुणी पार्सल आणलेल्या वडापावांवर तुटून पडले होते.
तो मात्र पुढे ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून आजूबाजूच्या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. शहर सोडलं आणि बसने वेग पकडला. त्याने आपला कॅमेरा गुंडाळून व्यवस्थित बॅगमध्ये ठेवला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला.
गाडी नाशिक हायवेवरून शिवनेरीच्या दिशेने उधळत होती. जसजसा वेळ गेला तसतसा गाडीतील गोंधळ कमी होतं गेला. काही वेळाने बहुतेकांनी माना टाकल्या. काही सिनिअर लोक कसलीशी पुस्तकं काढून त्यात डोकं खुपसून बसली. तो ड्रायव्हरशी गप्पा मारत होता.
कंपनीत जॉईन होऊन काही महिनेच झाले होते. बाकीच्यांशी अजून त्याचं म्हणावं असं ट्युनिंग जुळलं नव्हतं. तो जरासा कलाकार माणूस होता. त्याला खरं तर फोटोग्राफर व्हायचं होतं पण शंभरातल्या नव्वद लोकांचं असच होतं.
आपलं स्वप्न गुंडाळून त्याला सेल्स आणि मार्केटिंग सारख्या रुक्ष क्षेत्रात काम करत होता. आईवडिलांच्या अपेक्षा, जगाच्या यशाच्या वेगळ्या व्याख्या आणि त्या त्या वयात चुकलेले निर्णय माणसांना अगदी विरुद्ध टोकाचं जीवन जगण्यास भाग पाडतात.
तसं या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत त्याने दोन महिन्यातच बढती आपल्या पदरात पाडून घेतली होती. त्याच्या सहकाऱ्यांमध्येही त्याच्याभोवती उत्सुकतेचे एक वलय होते. कामाव्यतिरिक्त फारसं न बोलणारा, आपल्याच धुंदीत वारणारा सणकी! अशीच त्याची प्रतिमा झाली होती.
पण त्याच्या हुशारीबद्दल मात्र सगळ्यांच्याच मनात आदर होता. त्याच्या वरिष्ठांसह सगळेच त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर फिदा होते. फक्त तो सगळ्यांच्यात मिसळत नसल्याने त्या लोकांमध्ये आणि त्याच्यात थोडं अंतर तयार झालं होतं.
वर्षातून एकदा त्यांचा विभाग सगळ्यांना घेवून एक ट्रिप काढत असे. नाणेघाटाच्या जंगलात त्यांच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथेच दरवर्षी ही ट्रिप होतं असे. त्याची ही पहिलीच ट्रिप होती. पुढचे दोन दिवस त्याला त्याचा फोटोग्राफीचा छंद मनसोक्त जोपासता येणार होता.
गप्पा मारत मारत त्यांनी जुन्नर गाठलं. फाट्यावरून हायवे सोडून बस कच्च्या रस्त्याने आत वळली आणि धडधडीने सगळ्यांची झोप उडाली. हळूहळू पुन्हा बसमधला गोंधळ वाढू लागला.
पावसाळ्याचे दिवस होते. सगळीकडे हिरवंगार झालं होतं. डोंगरांच्या कुशीतून पाण्याचे लोट दऱ्यांमध्ये बेधडक उड्या घेत होते. उंच उंच कड्यांवरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह मोठा आवाज करत त्या जंगलांमधील शांतता भंग करत होते.
सगळे वाकून वाकून खिडक्यांमधून आजूबाजूचे सौन्दर्य पाहत होते. त्याच्या कॅमेराचा क्लिकक्लिकाट पुन्हा चालू झाला. तो अधशासारखं प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात टिपत होता. पुढे बसल्यामुळे त्याला व्ह्यूही चांगला मिळत होता.
“मनोजराव! इकडेही फिरूद्या तुमची लेन्स जरा!” त्याचे साहेब म्हणजे प्रशांत कवलेंचा आवाज त्याच्या कानावर पडला. तो उठून मागे आला आणि बसमधल्या लोकांचे फोटो काढू लागला. लोकही त्याला वेगवेगळ्या पोज देऊ लागले.
कॅमेऱ्यातून फोटो काढता काढता त्याची लेन्स बसच्या अगदी मागच्या कोपऱ्यात शांत बसलेल्या दिपिकावर थबकली. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. ढगांआडून डोकावणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणं तिच्या गोऱ्या रंगाला खुलवत होती. तिच्या भुऱ्या रंगांच्या केसाची एक बट वाऱ्यावर उडत होती. त्याने झूम ऍडजस्ट करत तिचा एक सुंदर फोटो काढला.
“मनोज! इकडे इकडे!” नेहाचा आवाज आला. त्याने आपला कॅमेरा वळवून पुन्हा बाकीच्यांचे फोटो काढायला सुरवात केली. बस गेस्ट हाऊसला पोचेपर्यंत त्यांचे फोटोसेशन चालूच होते. गेस्ट हाऊसच्या गेटबाहेर त्यांची बस थांबली.
“मनोज बस कर आता. रोल संपेल नाही तर आता!” त्यांच्या सगळ्यांचे साहेब म्हणजे सेल्स मार्केटिंगचे प्रेसिडेंट लेले साहेबांचा भारदस्त आवाज घुमला. त्यांच्या विनोदावर खिदळत सगळ्यांनी आपापल्या बॅगा काढायला सुरवात केली.
त्याने आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कॅमेरा अगदी व्यवस्थित बॅगेत ठेवला. एक एक करून लोक उतरून बाहेर घोळक्याने उभे राहू लागले. सगळे उतरून गेल्यानंतर तो आणि ड्रायव्हर खाली आले. लेले साहेब आणि कवले साहेब आता जाऊन आले.
“हे बघा! आता आपण इथे दोन दिवस राहणार आहोतं. इथे नवीन कॉटेजेस बांधले आहेत. एका कॉटेजमध्ये तिघे राहू शकतात. सगळ्यांनी आपसात तीन तीन जणांचे ग्रुप करून घ्यायचे आहेत. उरका पटापट!” लेले साहेबांनी घोषणा केली.
सगळ्यांनी आपापल्या जवळच्या लोकांना घेऊन तिघातिघांचे ग्रुप्स बनवले. मनोज त्याचे सहकारी राहुल आणि शिरीषकडे जाऊ लागला तेवढ्यात कवले साहेब ओरडले,
“ओ, ओ मनोजराव! तुम्ही इकडे या! तुम्ही मी आणि लेले साहेब आहोतं!” तो दचकला.
“पण,” तो कवले साहेबांजवळ जात म्हणाला.
“अहो प्रवासी आणि त्यात फोटोग्राफर माणूस तुम्ही. तुमचे अनुभव ऐकत येतील आम्हाला. आमचे दोन फोटो जास्त येतील! त्यात ते राहूल आणि शिरीष बिचारे सरळमार्गी लोक त्यांच्या सोबत काय एन्जॉय करणार? आपण बसू आता रात्री मस्त!”
कवले आणि लेले साहेब म्हणजे टेबल पार्टनर! त्यात त्यांना हा तिसरा पार्टनर सापडला.
“ठीक आहे!” म्हणत तो त्यांच्या शेजारी उभा राहिला.
सगळे तीन तीनच्या ग्रुपने आतमध्ये गेले. सगळ्यात शेवटी हे तिघे गेले. आत गेल्यावर गेटच्या अगदी समोर एक मोठं रेस्टोरंट होतं. त्याच्या दरवाजाजवळ एक रिसेप्शन काउंटर. उजव्या बाजूला तीन चार मोठे हॉल होते आणि डाव्या बाजूला एका ओळीने छोट्या छोट्या कौलारू कॉटेजेस होत्या.
प्रत्येक कॉटेजच्या भोवती झुडपांची सहा सात फूट उंचीची कुंपणं वाढवलेली होती. झुडपांच्या छोट्या छोट्या बॉक्समधील कॉटेजेस साधीच पण फार सुबक होती. कॉटेजेसला जायला फरशा आणि लॉन्स लाऊन छानशी वाट बनवली होती आणि वाटेच्या पलीकडे मोठंच्या मोठं लॉन वाढवलेलं होतं. लॉनवरच्या दवबिंदूंमुळे ते चमकत होतं. आकाश ढगांनी भरल्यामुळे वातावरणही कुंद झालं होतं.
“काय मूड बनतो ना अशा वातावरणात!” त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
“कसला हो?”
लेले साहेब म्हणजे खूप विनोदी माणूस! कायम विनोद करत राहणे त्यांचा स्वभावच होता.
“अजून कसला मूड होणार साहेब हेच आपला!”
त्याने एक हात सरळ करत कोपराला तळवा लावला.
“अहो बॅग तरी ठेवा. सगळी सोय आहे. च्यायला अंघोळच करू आज.” कवले साहेब लेले साहेबाना टाळी देत बोलले.
मनोजला अवघडल्यासारखं झालं.
“बरं का मनोज! साहेब मी ऑफिसात. टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण मित्र. कंपनीत नाही होतं आपण आता!” लेले साहेब त्याच्या पाठीवर हात टाकत बोलले.
“बरं!”
मनोजने बॅग उचलली. साहेब लोकांसाठी पहिली कॉटेज रिझर्व्ह होती. त्यानंतर एक दोन कॉटेजेस रिकामी होती आणि नंतर लेडीजसाठी आणि त्याच्या पलीकडे पुरुषांच्या कॉटेजेस अशी व्यवस्था होती.
“साहेब आपण शेवटची घेऊ! जरा कनफाईन्ड असलं की मजा येते अशा वातावरणात!” मनोज बोलला.
“अगदी माझ्या मनातलं बोललास! ही चावी ठेव तुझ्याजवळ.”
लेले साहेबांनी कॉटेजची चावी त्याच्याकडे दिली. चावी खिशात ठेऊन तो त्यांच्या मागोमाग गेला.
सगळे आपापल्या कॉटेजमध्ये जाऊन फ्रेश होऊन आले. मनोजने आपले कपडे बदलले. टी शर्ट हाफ पँट वर कॅमेऱ्याचे जाकीट घातले. जॅकेटचे खिसे ज्या त्या वस्तूने भरून कॅमेरा गळ्यात अडकवला आणि ट्रेकिंगचे शूज घालून तो बाहेर आला.
ट्रॅक पँट, टी शर्ट आणि पावसाळी जॅकेट घालून लेले साहेब आणि कवले साहेब समोर लॉनवर गप्पा मारत उभे होते. तो तिथे जाऊन उभा राहिला.
“हां! बघा! असं पाहिजे. वाटतो ना पक्का ट्रॅवलर?” लेले
“मग काय नाहीतर ते येडं एकनाथ पाटील बघा तिकडे. इस्त्रीचा शर्ट इन करून चमकवलेले शूज घालून उभा आहे बघा!” कवले. तिघेही मनसोक्त हसले.
“मनोज तल्लफ झालीय जाम!” कवले
“एक मिनिट!” म्हणत त्याने खिशातून पाकीट आणि लायटर काढून कवलेंच्या हातात दिले.
“बरं का लेलेसाहेब! दोन दिवस काहीही हवं असेल तर दुसऱ्या कुणाला विचारायचं नाही. हा माणूस म्हणजे सॅव्हीयर आहे!” कवले सिगारेट पेटीवत बोलेले.
“अहो कवले! दोन दिवस नाही तो कायमच आपला सेवियर आहे!” लेलेंनी आणखी एक विनोद केला.
तेवढ्यात एका कॉटेजमधून केस मागे बांधत दीपिका आणि मयुरी बाहेर आल्या. दीपिकाही मनोज सारखीच मुरलेली प्रवासी असावी. तिने पांढऱ्या रंगाचा घट्ट टॉप, कशीबशी तिच्या गुडघ्यांपर्यंत पोचणारी काळी जीन्सची शॉर्ट आणि जॅकेट घातलं होतं. खाली पायात तिनेही ट्रेकिंग शूज घातले होते.
मयुरीने आकाशी रंगाची थ्री फोर्थ आणि पांढरा लूज टी शर्ट घातला होता. त्यांच्या मागोमाग पंजाबी ड्रेस घालून नेहा आणि सुमती मॅडम ही आल्या. त्या सगळ्याही हे तिघे जिथे उभे होते तिथे आले. अशा कॅज्युअल ठिकाणी सहसा लोक बॉस लोकांना चिटकण्याचा प्रयत्न करतात. मुद्दाम त्यांच्या पुढेपुढे करतात.
“अरे व्वा! आणखी एक ट्रेकर आहे आपल्यात तर!” लेले साहेब दीपिकाकडे पाहत बोलले. ती त्यांच्याकडे पाहून गोड हसली.
“हे दोघे किती छान दिसतायत ना? फोटो हवा दोघांचा एक!” सुमती मॅडम
“हो हो! नक्कीच! आण रे तो कॅमेरा इकडे!” लेले साहेबांनी हात पुढे केला.
“पाहताय काय? चला उभे रहा तिकडे. बॅकड्रॉपला तो डोंगर आणि धबधबा मस्त दिसेल.” कवले त्या दोघांना म्हणाले.
तो अवघडून गेला. मनातल्या मनात तिच्यासाठी तो पहिल्या दिवसापासून झुरत होता. पण तीही त्याच्या सारखीच कमी बोलणारी असल्यामुळे त्यांच्यात अजून कसलंच संभाषण झलेलं नव्हतं. ते दोघेही समूहगीत म्हणायला उभे राहिल्यासारखे हात बांधून उभे राहिले.
“अरे यार! म्हातारे झालात का तुम्ही? जरा स्टाईल दाखवा तुमच्या जनरेशनची! का गं दीपिका? चावतोय की काय तो तुला?” लेले
ती ही अवघडत त्याच्या जवळ गेली.
“पाठ लाव पाठीला.” अगदी हळू आवाजात ती त्याला म्हणाली.
त्यांनी एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन सुंदर पोज दिली. फोटो झाला. थोड्या गप्पा झाल्या. नंतर जेवणंही झाली.
जेवणानंतर सगळे एका हॉलमध्ये येऊन टाईमपास करत होते. मनोज कुठे दिसत नव्हता. लेले आणि कवले त्याला शोधू लागले. तेवढ्यात हातात ट्रायपॉड आणि मोबाईल सारखं काहीतरी घेऊन तो आला.
“अरे बेट्या कुठे फिरतोयस?” लेले गरजले. कुजबुज जराशी कमी झाली.
“नाणेघाटात चाललोय! दोन किमी आहे इथून!” मनोज
“एकटाच?” लेले
“नाही. तेच विचारायला आलोय. येतंय का कुणी?” तो
“अरे बाबा चार किमी कोण तंगड्या तोडणार? बस इथे पोकर खेळू!” शिरीष बोलला.
“नाहीतर काय. एवढं भरून आलंय आभाळ. बस इथे बाबा!” नेहा
“चल! मी येतो सोबत. जॉईन झाल्यापासून दर पावसाळ्यात आहे इथे मी पण कधी फिरकलो नाही तिकडे. चल!” लेले
“सर मी पण येऊ का?” कोपऱ्यातून दीपिकाचा आवाज आला.
“वा वा! बघा सुमती मॅडम! याला म्हणतात स्त्री पुरुष समानता! मला वाटलं फक्त स्टाईल मारायलाच असे कपडे घातलेस तू!” लेले. दीपिकाने आपली सॅक खांद्याला अडकवली आणि ती मनोज शेजारी येऊन उभी राहिली.
“साहेब तुम्ही आम्हाला सोडून एकटे एकटे जाणार? आमच्यापासून सुटका नाही तुमची!” म्हणत पार्श्वभाग झडत कवलेही उभे राहिले.
मग हळू हळू आणखी चार पाच जण तयार झाले.

पावसात भिजताना भाग : ५

तिने हळूच आपली मान उंचावली आणि त्याच्या थथरणाऱ्या ओठांना आपल्या नाजूक ओठांमध्ये पकडले. एकमेकांच्या ओठांच्या गरम स्पर्शाने दोघांची शरीरे शहारून गेली.अगदी सावकाश ते एकमेकांचे ओठ आपल्या ओठांनी कुरवाळू लागले. अगदी स्लोमोशन वाटावं इतक्या सावकाश. त्यांच्या दोघांच्याही...

पावसात भिजताना भाग : ४

अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोघेही भानावर आले. झटकन एकमेकांपासून दूर होऊन ते लाजत उभे राहिले.“चिर्स टू स्वीट कपल दीपिका अँड मनोज!” लेले ग्लास उंचावून ओरडले.“चिअर्स, चिअर्स, चिअर्स!” एकच गलका उडाला.सगळे त्या दोघांचं अभिनंदन करू लागले. कवले हातात दोन ग्लास घेऊन आले...

पावसात भिजताना भाग : ३

तिने आपल्या दातांमध्ये फोनची केबल पकडली होती. एका हातात फोन धरून तशीच ती आपले केस गुंडाळत होती. तिच्या ओठांवर केबलचा दाब पडून ते कमालीचे आकर्षक दिसत होते.तिने पांढरा ढगळ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची थ्रीफोर्थ लेगिंग घातली होती. तिच्या नाजूक सडपातळ कमरेवर त्या ढिल्या टी...

पावसात भिजताना भाग : २

ते आठ दहा जण पायवाटेने नाणेघाटाच्या दिशेने चालू लागेल. सर्वात पुढे मनोज, त्याच्या मागे दीपिका आणि मागोमाग लेले, कवले आणि इतर असे चालत होते. मध्ये मध्ये थांबून ते वेगवेगळ्या पक्षांचे, किड्यांचे, धबधब्याचे फोटो काढत होते, कधी ग्रुप सेल्फी काढत होते. अर्ध्या पाऊण तासात...

error: नका ना दाजी असं छळू!!