“पहा ना हो भाऊजी, तुमच्या मित्राने मला कसा त्रास द्यायचं ठरवलंय, जीव अगदी नकोसा झालाय मला.” रागिणी वहिनी स्फुंदत स्फुंदत बोलत होत्या. “अगदी लहानसहान कारणांवरूनही माझ्याशी भांडतात. सारखी धमकी देतात मला, घरातून निघून जा म्हणून.” वहिनी रडताना अगदी लहान मुलीसारख्या गोड...