तो तळमळत पडला होता. कपडे फाटले होते. घशाला पाण्याविना कोरड पडली होती. ऊन्हाचे चटके बसून कातडं जवळपास जळलं होतं. अजून काही काळ तो तशाच ऊन्हात पडून राहिला असता, तर त्याचा मृत्यू निश्चित होता.
“तुझी शेवटची इच्छा काय आहे…?”
त्याच्या अंत: करणातून आवाज येत होता. कुणीतरी त्याला विचारत होतं. तोंड उघडून बोलायचं त्याला बळ नव्हतं. काय होतंय हे त्याला समजत नव्हतं, पण तो जर मरणार असेल तर मरण्या अगोदर त्याला काही गोष्टी करायच्या होत्या. ती चित्रे त्याच्या मनाच्या पटलावरती उमटली.
“बस, एवढंच की आणखी काही हवंय…? पुन्हा तुला भौतिक जगातील कोणत्याच गोष्टी करता येणार नाहीत त्यामुळे विचार करून सांग…!”
त्याला जास्त विचार करण्याची गरज नव्हती. त्याला काय होतंय हे माहीत नव्हतं. मरण्या अगोदर त्याला तीन गोष्टी हव्या होत्या आणि त्याच गोष्टींचा तो विचार करू लागला होता.
“तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या की तुझा मृत्यू होईल. तथास्तु…!” आणि तो आवाज बंद झाला.
त्याच्या आजूबाजूचा परिसर बदलला. तो एका शाही स्नान गृहात होता. कोमट व सुगंधी पाण्याने दासी त्याला स्नान घालत होत्या. शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लावून त्याच्या शरीराचा मळ काढला जात होता. त्यानंतर सुगंधी द्रव्ये टाकून त्याचं शरीर धुतलं जात होतं.
बराच वेळ तो शाही स्नानाचा आनंद घेत राहिला, नंतर त्याला तिथून उठवण्यात आलं. त्याचं अंग पुसून त्याच्या शरीरावरती उंची दर्जाची सुती कपडे चढवण्यात आली. त्याचे केस पुसून मागे बांधण्यात आले आणि त्याला चालवत भोजन गृहाकडे नेण्यात आलं.
भोजनालयात त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने तयार होती. तो ताटाला बसताच त्याला वेगवेगळी पक्वान्नं आणून वाढली जात होती. त्याने पोट भरेपर्यंत भरपूर जेवण केलं. कित्येक पदार्थ तो पहिल्यांदाच चाखत होता.
जेवण झाल्यानंतर त्याला लुसलुशीत गादीवर झोपवण्यात आलं. आजूबाजूला दासी त्याच्यासाठी वारा घालायला उभा राहिल्या. त्या थंड वार्याच्या प्रभावाखाली त्याला लगेच झोप लागली.
त्याच्या शरीराला होणार्या स्पर्शामुळे त्याला काही वेळाने जाग आली. त्याच्या अवतीभवती नग्न दासींचा गराडा होता. त्यांची सुंदरता पाहून तो लगेच उत्तेजित झाला. त्या दासी त्या ठिकाणी त्याची सेवा करण्यासाठी होत्या. त्याने शक्य होईल तितक्या दासींबरोबर मनसोक्तपणे संभोग केला.
एरवी तो लगेच स्खलित व्हायच्या, पण त्या दिवशी कितीही संभोग केला तरी त्याला अधिकच उत्तेजना मिळत होती. कितीही सुख अनुभवलं तरी त्याला अधिकच सुख हवंसं वाटत होतं.
कितीही मैथुन केलं तरी तो स्खलित होत नव्हता. त्याला वाटत होतं तो युगानुयुगे मैथुन करतोय. शेवटी युगांत झाला आणि सुखाच्या परमोच्च बिंदूवर असताना तो स्खलित झाला.
उत्कर्ष बिंदूचं सुख अनुभवल्या नंतर त्याच्या आजूबाजूची परिस्थिती अचानक बदलली. तो पुन्हा एकदा वाळवंटात होता. त्याच्या कातड्याला चटके बसत होते. श्वास घ्यायला जड जात होतं. डोळ्यापुढे अंधारी आली होती.
हळूहळू त्याचं अस्तित्व नाहीस झालं. तो होत्याचा नव्हता झाला. त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या शेवटच्या तीन इच्छा पूर्ण झाल्या होत्या. मनसोक्तपणे जेवण केलं होतं, स्वच्छ आंघोळ करून झोप काढली होती आणि मरेपर्यंत संभोग केला होता…!