माझं बरंचसं लहान पण हे मा‍झ्या आत्याच्या गावी गेलं. गेल्या तीन वर्षांत मात्र तिथे जायला जमलं नव्हतं. ते गाव तसं लहानच आहे पण आमचे आतोबा म्हणजे गावकीतील प्रतिष्ठित सदस्य आहेत. गावात आत्याच्या सासर्यांनी बांधलेला चिरेबंदी वाडा आहे. त्यांची बर्यापैकी शेतजमीन आणि...