गोरेगावच्या त्या सोसायटीत महेशचे कुटुंब राहायला आले तेव्हा बाकीची सर्व कुटुंबे राहायला येवून एक वर्ष झाले होते. त्याच्या घरात तो एकुलता एक असला तरी तो पूर्वी रहाणार्या लालबागच्या त्याच्या चाळीत प्रत्येक घरात मुलाबाळांचा फौजफाटा होता. तर इथे गोरेगावला मात्र प्रत्येक घरी एखाद दुसरच मुलं होते.
दुसरी मजा त्याला वाटली ती, इथे राहणार्या कुटुंबात त्याच्या वयाची मुलेच नव्हती. होती ती अगदी कच्ची लिंबुटिंबु किंवा मोठ्या वयाची, कॉलेजात जाणारी. मात्र त्याच्या वयाच्या मुली मात्र भरपूर होत्या. काही घरात तर दोन दोन! त्यामुळे सुरवातीला त्याची पंचाइत झाली ती खेळायचे कुणाशी.
तो सहावीच्या त्या ऊन्हाळी सुट्टीत सुरवातीला एक दोन दिवस त्याने घरात बसून काढले. गॅलरीत उभे राहून तो खाली खेळणार्या बहुसंख्य मुलींचा दंगा पहात होता. एक शर्ट पॅन्ट घातलेली बॉय कट केसाची मुलगी त्या खेळणार्या मुलांची लिडर होती व सर्व मुली व काही लिंबूटिंबू मुले ती सांगेल ते निमुटपणे ऐकत होती.
खालून येणार्या गोंधळात एक नाव ’अंजु’ त्याला खूप वेळा ऐकू आले. बहुदा त्या मुलीचे असावे. ती महेशला त्यांचा खेळ बघताना दोन दिवस बघत होती. तिने शेवटी एका छोट्या मुलाला त्याला खाली बोलवायला त्याच्या घरी पाठवले.
शर्ट पॅन्ट घालून उलटी बेसबॉल कॅप घातलेली अंजु त्याला ‘हम पाच’ या त्या वेळी टीव्हीवर गाजलेल्या मालिकेतील त्या टॉमबॉय मुलीची महेशला आठवण आली.
तशी १२ वर्षाची अंजु दिसायला चार चौघात उठून दिसेल अशीच होती. तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा उंच होती. शाळेत खो खो पटु असलेली अंजु कोणावरही छाप पाडून त्याला तिचे म्हणणे पटवून देईल असा तिच्यात नेतृत्व गुण असलेली होती.
महेश तर तिच्या व्यक्तीमत्वावर वर फिदा झाला. विशेषतः तिचे खास टोनमध्ये बोललेले ‘काय भिडू’ महेशला जाम आवडले. कोणीही न सांगता अंजुला त्याने आपली लिडर म्हणून मान्य करून टाकले. त्याच्या लालबागच्या चाळीत मुले मुली एकत्र खेळायची पण जास्त मुलेच असत. इथे त्याउलट परिस्थिती होती. तरी महेश खुष होता.
त्या दिवसापासून महेश सर्वात छान मिसळला. अंजु सातवी पास होवून आठवीत गेली होती. बाकीच्या मुली साधारण त्याच्याच वयाच्या होत्या. बाकीची मुले पहिली दुसरीतच होती.
अंजु कितीही टॉमबॉय असली तरी महेशशी तिचे छान जमले. ती त्याच्याच मजल्यावरच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती त्याच्याशी कधीच भांडली नाही. उलट त्यांच्या खेळात अंजुने त्याला अगदी छान सामील करून घेतले.
त्या सुट्टीत दुपारी ऊन्हाच्या वेळी त्यांचे कोणाच्या तरी घरी पत्ते किंवा कॅरम चाले. संध्याकाळी लपंडाव, डब्बा, ऐसपैस, किंवा लगोरी, खोखो. कधी कधी महेशला त्यांच्या मुलींच्या खेळाचा कंटाळा आला तर त्या मुली अंजु त्याच्यासाठी सगळ्यांना क्रिकेटही खेळायला लावे.
महेश त्या सोसायटीत सर्व मुलात कधी मिसळून गेला हे त्यालाही कळले नाही. महेशकडे जोक्सचा मोठा स्टॉक व पत्त्याच्या जादुच्या अनेक ट्रिक्स होत्या. त्यामुळे एक दोन दिवसातच महेश अंजू इतकाच त्यांना हवा हवासा वाटायला लागला. विशेषतः महेशने त्यांना शिकवलेला स्टॅंच्यूचा खेळ तर सगळ्या गॅंगला खूपच आवडला. त्या सुट्टीत स्टॅंच्यूने त्या सोसायटीत धुमाकूळ घातला.
सुट्टी संपली तरी त्यांचा दर रोज खाली दंगा चाले. महेश अभ्यासात तर खूपच हुशार असल्यामुळे सगळी गॅंग त्यांच्या डिफिकल्टी विचारायला त्याच्याकडे हक्काने जात.
अंजु एक वर्ष त्याच्या पुढे होती तरी गणित व शास्त्राच्या तिच्या अनेक शंका महेश सहज सोडवून देइ. त्याच्या मदतीने अंजुचे हे दोन्ही अत्यंत नावडते विषय तिला चक्क समजायला लागले व म्हणून आवडायला लागले.
दहावीत गेलेल्या अंजुला त्याने अभ्यासात असे काही फंडे सांगितले व इतर मदत केली की तिला दहावीला चक्क ७५% टक्के मार्क्स मिळाले! रिझल्ट लागले तेव्हा ती पेढे द्यायला आली तेव्हा नेमके महेशचे आईबाबा बाहेर गेले होते. तिने महेशला पेढा दिला. पण महेशने तिला आधी चक्क त्याला नमस्कार घालायला लावला. शेवटी तिचा तो गुरू होता ना!
“महेश तुला मी काय गुरूदक्षिणा देवु भिडू?” अचानक अंजुने तिच्या खास स्टाइलने विचारले.
“छ्या! फक्त मला नमस्कार कर ’भिडू’!” महेशने मुद्दाम वात्रट उत्तर दिले.
“स्टॅंच्यू!” अचानक अंजुने त्याच्याकडे दोन बोटे दाखवून त्याला पुतळा बनवला. ती त्याच्यासमोर उभी राहिली. त्यावेळी त्याच्यापेक्षा ती दोन इंच तरी उंच होती. तिने वाकून त्याच्या दोन्ही गालाची छान ’चुक’ आवाज येइल इतका कचकून ओला किस घेतला!
तिने त्याला ’स्टॅंच्यू’ केले नसते तरी ही तो तिच्या त्या अनोख्या गुरूदक्षिणेने तितकाच स्तंभीत झाला असता!
कॉलेजात कॉमर्स शाखेला गेल्यावर अंजु जरा गंभीर झाल्यासारखी महेशला वाटे. ती त्याच्याकडे त्याचे लक्ष नसताना हल्ली टक लावून बघत असते असा महेशला संशय होता. पण त्याने तिला काहीच विचारले नाही. तसा तोही हल्ली त्याच्या दहावीच्या तयारीत मग्न होता. त्यामुळे त्याने या गोष्टीचा फारसा विचार केला नाही.
त्यांचा संध्याकाळच्या नियमित खेळात अंजु नसे व तोही नसे. त्यामुळे बाकीच्या मुली व जरा मोठी मुले खेळत पण त्यांची भिडू अंजु व महेशशिवाय त्यात मजा राहिली नाही. एखाद्या रविवारी महेश खेळायला उतरला तर अंजुही येई व परत त्यांच्या सोसायटीच्या आवारात त्यांच्या गॅंगचे धमाल गेम रंगत.
मधूनमधून अंजु त्याला तिच्या मॅथेमॅटीक्सच्या डिफिकल्टी विचारायला येई. आजूबाजूला कोणी नसले तर त्याला स्टॅंच्यु करी व दोन्ही गालाचे किस घेत असे. तिच्या या गुरूदक्षीणेच्या या रतीबाने महेशच्या छातीत जोराने धडधडे पण त्यावर त्याने कधी जास्त विचार केला नाही.
भराभर दिवस जात होते. हा हा म्हणता महेशला गोरेगावात राहायला येवून सहा वर्षे झाली. बारावीनंतर महेशला पिलानीच्या कॉलेजला इंजीनीयरींगला ऍडमिशन मिळाली व तो तिथे केमीकल इंजीनीयर बनायला गेला.
त्या वर्षी सोसायटीतल्या त्यांच्या गॅंगमधल्या बाकीच्या बहुतेक मुले मुली दहावीला किंवा बारावीला बसत होत्या. अंजु सेकंड यीयर बीकॉमला होती. त्यामुळे त्या वर्षी दिवाळी सुट्टीत सगळी गॅंग या आपापल्या शाळा व क्लासेसमधल्या अभ्यासात दंग होत्या.
महेश पिलानीहून सुट्टीत आला त्या वेळी तो इतका होमसीक झाला होता व अभ्यासाने थकला होता की घरी आल्यावर चार दिवस फक्त झोपायचा त्याचा बेत होता. इतका तो अभ्यासाला व पिलानीच्या हॉस्टेल जीवनाला पकला होता.
पण एकच दिवस भरपूर झोपा काढल्यावर दुसर्या दिवशी सकाळी त्याला झोप येइना. गॅलरीत उभा राहून तो समोरचा रस्ता पाहत होता.
अचानक त्याला कॉलेजमधून येणारी अंजु गेटमधून शिरताना दिसली. अंजुने वर पाहिले व त्यांची नजरा नजर होताच तिने त्याला जोराने हात हलवून हाय केले व धावतच ती वर यायला लागली.
तिने डोअरबेल वाजवायच्या आधीच महेशने दार उघडले व अंजु आत घरात आली. अंजुचे आई बाबा नोकरीला जातात. तिची आजी गेल्या वर्षी वारली तेव्हापासून दुपारी कॉलेजमधून आल्यावर दिवसभर ती एकटीच असते.
तिची आई दिवसातून जमेल तेव्हा लेकीला तिच्या मोबाइलवर फोन करून चौकशी करते. खरतर तेव्हड्यांचसाठी तिला यंदा मोबाइल घेऊन दिला. महेशची आईही हल्ली त्याच्या बाबांच्या प्रिंटींग प्रेसचा वाढत्या धंद्यात त्यांना मदत करायला जाते. त्यामुळे आज तो ही एकटाच होता.
अंजु आत आली व तिने दार ढकलून लॅच बंद केले. महेश सहा महिन्यानी अंजुला भेटत होता. टाइट जीन्स व टी-शर्ट घातलेली अंजु, तिच्या हाय हिल्स चपला घालुनही हल्ली ती त्याच्या कानापर्यंत पोचते कारण महेश सहा फूटी झाला होता.
त्याला गुरूदक्षीणा देणार्या खोडकर बॉब कटवाल्या त्याची भिडु अंजुतही भरपूर फरक पडला होता. हल्ली तिने तिचे केस चांगले खांद्यापर्यंत वाढवलेले तिचे सरळ केस तिने सुटेच सोडले होते. त्यामुळे तिच्या टॉमबॉय व्यक्तीमत्वात चांगलाच फरक पडला होता.
हलकासा मेकअप व ओठाच्या लिपस्टिकमुळे त्याच्यापेक्षा एक वर्ष मोठी असलेली सडसडीत व नाजूक दिसणारी अंजु खरच एक आधुनिक कॉलेज कन्या शोभत होती. तिच्या डोळ्यावर मोठा काळा चष्मा होता, त्यामुळे त्याला तिचे डोळे दिसत नव्हते. ते ओळखून तिने तिचा गॉगल वर करून केसात लावला.
महेशला साडेपाच फुटी अंजु हिंदी सिनेमातील त्याच्या आवडत्या शिल्पा शेट्टीसारखी सुंदर भासली. तिच्या तंग टी-शर्टमधून दिसणारी छातीवरची लिंबे आता संत्र्याच्या आकाराची झाली होती. खालील तितक्याच तंग जीन्समधल्या तिच्या लांब मांड्या एकदम सेक्सी दिसत होत्या.