अजिंक्य बाल्कनीत स्टुलावर चढून आकाशकंदील बांधत होता. त्यानं आणि गौरीनं काल रात्री ऑफिसमधून आल्यावर घरीच हा आकाशकंदील बनवला होता. गणपती, दिवाळी, पाडवा, दसरा, अशा प्रत्येक सणाचं डेकोरेशन घरच्या घरीच करायचा नियम दोघांनी सुरुवातीपासूनच पाळला होता. ऑफीसमधून कितीही दमून घरी...