गंधाळलेली रात्र भाग: ३

बराच वेळ बेडरूम बंद होते. सगळ्या गोष्टींचा उलगडा कसा होणार याची सगळ्यांना हुरहुर लागून राहिली होती. तितक्याच वेगाने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि संजु बाहेर आली. ती थेट किचनमध्ये गेली आणि डब्यातून पेढे घेऊन आली. आनंद जसा तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता.

ती सगळ्यांच्या मधोमध उभी राहिली आणि जोरात म्हणाली, “खरंच गुड न्यूज आहे. मी आई होणार आहे. किती वाट पाहिली आपण सर्वांनी या क्षणाची. आज असे का उभे आहात. तुम्हाला सांगितले नव्हते की मी आणि विराट डॉक्टरकडे गेलो होतो की पाळणा हलण्याची लक्षणे दिसेनात परंतु दोष कोणाचाच नव्हता.

“आम्ही तर आशाच सोडली होती. अनघा ताईने लग्न करून मला या घरात ज्या कारणाने आणलं होतं, ते मी करू शकले नाही आणि त्यात मी त्यांच्याकडून घेतलेलं ते वचन की लग्न दिवसापासून विराटशी अनघाताईंचा काही संबंध नसेल!! किती लाजिरवाणे वागले होते मीपण! अनघाताई वचनात राहिल्या. विराटचं कधी कधी माझ्याशी तुटक वागणं मला समजायचं पण त्यानेही कधी तक्रार केली नाही.

“आज मी खूपच आनंदी आहे कारण अनघाताईच नाही तर मीही आई होणार आहे. त्या मला आई व्हायचं भाग्य देणार आहेत. आई-बाबा असे काय पहाताय? विराट बाबा होणार आहेत आणि तुम्ही आजी-आजोबा. इतकी आनंदाची गोष्ट आहे आणि सगळे असे स्तब्ध का?”

नंदिनीने (विराटची बहिण) संजुला धरून गदागदा हलवले. “अगं वहिनी शुद्धीवर ये काय बरळते समजतंय का तुला?”

संजुने नंदिनीला शांत केले व सोफ्यावर बसवले आणि पुढे बोलू लागली, “मला माहीत आहे की सगळ्यांच्या डोक्यात काय चालू आहे ते. मी सगळ्या शंकांचे निरसन करते.”

ती बोलू लागली,

“आई-बाबा, काही महिन्यांपूर्वी मी ऑफिसच्या कामाने पुण्याला गेले होते आठवतंय का? त्याच वेळी तुम्ही सर्व कोणाच्या तरी साखरपुड्याची तारीख गाठायला गावी गेला होतात. त्या वेळी अनघाताई आणि विराट हे घरात एकटेच होते. त्या दिवशी रात्री विराट काही वेगळाच होता कारण त्याचा फोनवर माझ्याशी बोलतानाचा आवाज बदलला होता. बहुतेक त्याने थोडीशी घेतलीही असावी.

“तो सारखा काहीतरी बरगळत होता. खूप वाईट वाटलं होतं, मी त्याच्या जवळ नसल्याचं. अर्थात आजपर्यंत खंत होती पण आज देवाचे आभार मानले मी कारण त्या दिवशी नकळत का होईना अनघाताई आणि विराटची समोरा समोर झाली होती. लग्नाच्या दिवशीची ती शपथ तुटली होती.

“त्या दोघांची झालेली जवळीक त्यांनी माझ्यापासून लपवू पाहिली पण ती अशाप्रकारे सगळ्यांना समजेल, याची कल्पना तर त्यांनापण नव्हती. हे बाळ विराटचंच आहे. आपल्या घरात पाळणा हलणार आता. त्या दोघांना अजूनही विश्वास बसेना. आई-बाबा चला ना आत त्यांना भानावर आणू आपण.”

संजु बोलतच होती. सगळे तिच्याकडे पाहतच राहिले होते. सर्व जण आज संजुचं आणखी एक नवं रुप पाहत होते. नंदिनीने संजुला मिठी मारली. विराटच्या आईने कौतुकाने डोक्यावरून हात फिरवून संजुच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं.

“अनघा आणि विराटचं लव्ह मॅरेज होतं तरीही आम्ही सगळे जण लग्नाला तयार होतो. अनघा आली आणि अशी आमच्यात मिसळली की दुधात साखर. असं वाटलं जसं सुख म्हणजे काय ते हेच. सगळ्यांच्या आवडी निवडी, नंदिनीची अभ्यासाची जबाबदारी आणि विराटच्या चेहर्‍यावरचं हसू जणू तिने असं जपलं होतं की दृष्टच लागू नये. मग दिवस सरू लागले आणि आम्हाला ओढ लागली ती घराचं गोकुळ होण्याची!

“विराट आणि अनघा आमच्या नकळत डॉक्टरकडेही जायचे, याची आम्हाला कल्पना आली होती तरी आम्ही आपले गप्पच. एक दिवस काय अनघाच्या मनात आले आणि ती माझ्याकडे आली. त्या दिवशी एक अपूर्ण स्त्री आली होती माझ्याकडे बोलायला. इतकी रडली होती म्हणून काय सांगू! आई न होण्याचं दु:ख तिला व्यक्त करता येत नव्हतं. विराटने दुसरं लग्न करावं, अशी जाता जाता विनंती करून गेली आणि मी तिथल्या तिथे स्तब्ध.

“आठ दिवसांत अनघाने घरात सगळ्यांसमोर विषय काढला. मा‍झ्या तोंडून शब्द निघेनात शेवटी अनघाच बोलली, ‘घरात पाळणा हलणार नाही बहुतेक माझ्याकडून म्हणून मी विराटला दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेण्यास सांगत आहे.’ विराटने पहिल्यांदाच आणि शेवटचा तिच्यावर हात उचलला होता. अनघा त्याच्या प्रेमाची आणि लाडाची होती. ते ऐकून तो स्वत: रडू लागला होता. हळूहळू अनघाने आम्हाला आणि विराटला तुझ्याशी लग्नाला तयार केलंच.

“तुझ्यावर राग नव्हताच आमचा मुळी. अनघावरची नाराजी होती, जी तुझ्यावर झळकत होती. तिची जागा कोणा दुसरीला देणं, हे आम्ही स्वप्नातही विचार करत नसताना तिने तिचा निर्णय समोर मांडला होता. तुला विराटने कुठून, कसं आणलं आम्ही कधीच विचारलं नाही.

“आज तुझ्या समजूतदारपणामुळे तू तुझं महत्त्वाचं स्थान बनवलं आहेस या घरात आणि आमच्या मनात. अनघा आणि तू दोघी बहि‍णी सारख्याच राहिलात यात काही वादच नाही. तू लग्नात घेतलेलं अनघाने विराटपासून दूर रहायचं वचन तिने कडेकोरपणे पाळलं. आम्हाला वाईट वाटायचं पण तुमच्या त्रिकुटात आम्ही कधीच भाग घेतला नाही.

“अनघा आणि विराटच्या प्रेमाचं सांगावे तितकं कमीच होतं. त्यांचं जवळ येणं आमच्यासाठी आश्चर्यजनक नाहीच. अनघावर संशय घेण्याचा तर प्रश्नच येत नाही, चिंता होती ती तू कशी सामोरी जाणार या गोष्टीला. विराटला बाबा बनवायला अनघा असमर्थ होती आणि म्हणूनच तिने तुला या घरात आणले, पण देवाची करणी बघ शेवटी अनघाच विराटला अपत्य देत आहे.”

सगळे बेडरूममध्ये गेले. अनघाचं कोडकौतुक करू लागले. घर नुसतं गजबजून उठलं होतं. विराटच्या त्या गंधाळलेल्या रात्रीने अनघावर अशी काही प्रेमाची बरसात केली होती की ती तृप्त झाली होती आणि त्याचे गोड परिणाम सगळ्यांसमोर होते.

सगळे झोपायला गेले आणि संजु अनघासाठी ग्लासात बदामाचे दूध घेऊन आली.

विराट : संजु, आय ॲम सॉरी..

संजु : आता पुन्हा तो विषय नकोय आणि माफी कसली मागतोय रे. अनघाताईवर तुझा पूर्ण अधिकार आहे. इव्हन आय ॲम सॉरी, अनघाताई, थॅन्क यु सो मच..

अनघा : मी आजही म्हणेल संजु, की त्या रात्री तू विराट जवळ असायला हवी होतीस.

संजु : नाही अनघाताई! ती गंधाळलेली रात्र फक्त तुमच्या वाट्यालाच येणार होती आणि हे आईपणाचं सुखपण..

अनघा : शेवटी तुझाच पायगुण संजु, हे विसरून कसं चालेल.

संजुने अनघाला घट्ट मिठी मारली. त्या गंधाळलेल्या रात्रीचे मर्म अविस्मरणीय झाले होते.


या गंधाळलेल्या रात्री,

तू इथे असावी,घन मागे सारावे,

अन् या पावसाच्या धारेने,

तू ओलीचिंब व्हावी..

गंधाळलेली रात्र भाग: २

अनघा : विराट, चुकतोय आपण.. संजुला समजलं तर वाईट होईल.. विराट : तिला आपण सांगितलं तरच समजेल अनु आणि चुकतोय काय गं.. आपण एकमेकांवर प्रेम करतो काहीही चुकीचं नाही यात.. विराटने दरवाजा उघडला आणि आतून लावून घेतला. अनघा अंग चोरून उभी होती. विराटच्या मनात काय आहे या विचाराने...

गंधाळलेली रात्र

रात्रीचे अकरा वाजले होते तरी विराटचा पत्ता नव्हता. अनघा त्याची वाट पाहत बसली होती. संजना घरी नाही म्हणूनच तो उशीर करतोय यायला, हे अनघाला समजलं होतं. शेवटी तिने विराटला फोन केला. (विराट एकटाच बार मध्ये पित बसलेला..) विराट : ह.. हॅलो… अनघा : अरे विराट किती वाजले बघ!! मी...

error: नका ना दाजी असं छळू!!