अनघा: विराट, चुकतोय आपण… संजुला समजलं तर वाईट होईल…
विराट: तिला आ पण सांगितलं तरच समजेल अनु आणि चुकतोय काय गं… आ पण एकमेकांवर प्रेम करतो काहीही चुकीचं नाही यात…
विराटने दरवाजा उघडला आणि आतून लावून घेतला. अनघा अंग चोरून उभी होती. विराटच्या मनात काय आहे या विचाराने ती कावरी बावरी झाली.
विराटने तिला बेडवर बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला.
विराट: तुला आठवतं आ पण याच बेडवर किती एकमेकांत हरवायचो ते. वेड लावलं होतंस तू मला. संजुसोबत झोपताना सतत तू दिसतेस मला तिच्यात. कित्येकदा तर मी तुझं नाव घेतलंय, त्या नाजूक वेळी… पण तीही समजून घेते.
अनघा फक्त ऐकत होती आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती.
दोन तास दोघे असेच स्वतःचे प्रेम प्रसंग आठवून गप्पांमध्ये रंगले होते. विराटने हळूच तिला मान पकडून वाकवलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं पण अनघाने त्याला लांब केलं. विराटला समजलंच नाही की तिने तसं का केलं. तो उठून बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने तिचे हात पकडले व ‘सॉरी’ बोलून बेडवरून उतरू लागला. अनघाने त्याचा हात पकडला आणि विराटने तिला जोरात मिठी मारली.
एक एक क्षण हा प्रेमाने भरला होता. दोघांच्या श्वासाची गती वाढली होती. अनघा जशी ओसाड जमीन जी पाण्यासाठी तरसली होती आणि विराट म्हणजे आसुसलेला पाऊस जो बेभानपणे बरसण्यासाठी आतुरलेला होता. दोघे एक झाले होते. सगळं काही विसरलं होते. तो क्षण, ती रात्र त्यांची होती.
विराटच्या मनात काहीतरी आहे, याची चाहुल अनघाला काही तासांपूर्वीच लागली होती आणि आता ती रात्र प्रेम सुवासाने गंधाळली होती. त्या क्षणी त्यांच्या तोंडून निघणारी त्यांची नावं आज त्यांना खूप आवडू लागली होती. आज ती दोघं नव्यानं भेटली होती आणि एकमेकांत एकरूप झाली होती.
सकाळी गजर झाला आणि अनघाला जाग आली. रात्री कधी झोप लागली हे तिला आठवत पण नव्हते. तिने उठून सर्व आवरले. अंघोळ करून विराटचा डबा बनवला आणि त्याला उठवायला गेली.
अनघा: विराट उठतोस ना…? ऑफिसला जायचं नाही का…?
विराटने तिला हात धरून बेडवर बसवले आणि तिला बिलगला.
विराट: अनु सॉरी गं, काल मी घेतली होती, पण मी तुला गमावलं, असं मला वाटत होतं पण नाही तू माझीच आहेस हे समजलं मला. आय लव यु, डार्लिंग…
अनघा: झालं ते झालं पण आता पुन्हा आ पण अनोळखी आहोत, हे विसरू नकोस. रात्री मी तुला अडवलं पण तू ऐकलं नाहीस आणि तू त्या स्थितीत पण नव्हता मग माझाही नाइलाज झाला. आता पुन्हा असं नको व्हायला संजुला दिलेलं वचन आ पण पाळायला हवंय, प्लीज.
विराटने मान डोलावली आणि उठून बाथरूममध्ये गेला.
आता सांजवेळ झाली होती. सात वाजून गेले होते आणि संजना विराटची वाट पाहत दाराला टेकून उभी होती. अनघा नेहमीप्रमाणेच स्वयंपाकघरात होती आणि खिडकीतून संजनाची उलघाल बघत होती.
लांब सडक केस आणि गालावर खेळणारी ती बट उठून दिसत होती तिच्यावर. सडपातळच पण कोरीव बांधा, सुंदर, नाजूक अशी दिसत होती ती. अर्थातच विराटची पसंत होती ती छानच असणार पण संजनाला इतकं निरखून पहायला वेळ होताच कुठे!
विराट आणि संजनाच्या लग्नाला घरातून मान्यता नव्हती. होतं तर ते अरेंज मॅरेजच. पण तरीही घरातले कोणीही तयार नव्हते. या लग्नाला पुढाकार अनघाचाच होता आणि विराटचाही संजनाशी लग्नाला होकार यात अनघाचाच खूप मोठा हात होता.
संजना तशी खूप संमजस होती. तिने लवकरच घरातल्यांची मनंही जिंकलं होतं. लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि घरातल्यांना आशा लागली होती ती पाळणा हलायची. पण फॅमिली प्लॅनिंग असलं काही असावं, असा समज म्हणून गप्प.
सगळं मजेत चालू होतं. विराटही मजेतच असायचा पण कधी कधी अनघाकडे त्याचा कटाक्ष खूपच विचित्र असे, त्यामुळे संजनाला कायम काळजी लागून रहायची.
मनामध्ये विचार घोळत असतानाच अनघाला गरगरलं आणि ती हिंदकळून तिच्या हातातलं भांडं खाली पडलं. संजना धावतच आत गेली आणि तिने अनघाला सावरलं. डॉक्टर आले, घरातील सर्व मंडळी गोळा झाली. विराटही धापा टाकत आला की अचानक काय झालं असेल. डॉक्टरांनी तपासलं आणि हसले. एकाच सुरात म्हणाले, “गुड न्यूज!!”
झालं…! सगळे एकमेकांकडे पाहू लागले. विराट आणि संजना तर जागच्या जागीच बसून राहिले. घरात भयाण शांतता!!
इकडे अनघा गुडघ्यांमध्ये डोकं घालून बसली होती. कोणाकडे पाहणं तर काय कोणाला चेहरा पण दाखवत नव्हती. कोणाला काहीच समजत नव्हते. अनघाला काही विचारायची हिंमत कोणातच नव्हती. विराटचा धाकच होता तितका. पण विराट विचारल्याशिवाय राहणार नाही, हे सर्वांना ठाऊक होतं.
एकदाचा विराट उठला आणि सर्वांना म्हणाला, “मला अनघाशी बोलायचं आहे.”
सर्व उठून बाहेर गेले. संजनाही बाहेर जाताना पाहून विराटने तिला थांबवलं आणि आतून कडी लावली गेली.
बाहेर सर्व याच काळजीत की आत काय चालू असेल. विराटचा राग सर्वांनाच ठाऊक होता. त्यापलीकडे अनघाकडून काही चूक होणार नाही याची खात्री सर्वांना होती. मग पाणी मुरतंय कुठे? हे कोणालाच समजत नव्हते.