मंदा | भाग १

गजरच्या आवाजाने मंदा उठली. तिचं नाव ‘मंदाकिनी’ असलं तरी सगळे तिला ‘मंदा’ असेच म्हणायचे. तसं तिला गजर लावून उठायची सवय नव्हती. आपोआप जाग यायची पण आज घरातलं काम लवकर आटपायचं होतं म्हणून लवकर उठण्यासाठी तिने गजर लावला होता.

काल जया वहिनी येऊन निरोप देऊन गेल्या होत्या. आज सकाळी त्यांच्याकडे कामाला जायचं होतं. कामाला जाण्याअगोदर घरातलं सगळं काम तिलाच करावं लागणार होतं.

तिच्या घरी राहायला तशी इन मीन तीनच माणसे. ती, तिचा नवरा माधव आणि नुकताच पहिलीला जाऊ लागलेला तिचा मुलगा रवी. दोन खोल्यांचं घर होतं आणि घरापुढे सोपा. सोप्याला लागून एका बाजूला जनावरांचा गोठा होता. त्यात एक म्हैस आणि दोन जर्सी गाई होत्या.

ती उठली. तिच्या शेजारी रवी गाढ झोपत होता. त्याला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घेत ती खाटेवरून उतरली. खोलीत अंधार होता. तिने उशाजवळ ठेवलेली बॅटरी हातात घेत उजेड करायचा प्रयत्न केला पण नवऱ्याच्या अंगाला खेटून ती त्याच्या अंगावर पडली. त्याच्या तोंडाला अजूनही दारूचा वास येत होता. काल दारू ढोसून त्याने तिच्याशी भांडण केलं होतं. आता तो खुशाल घोरत पडला होता.

तिला त्याचा राग आला नाही. अगोदर या गोष्टीचा तिला राग यायचा. तो दारू पिऊन आला की ती भांडण काढायची. दारू उतरल्यावर पुन्हा दारू न घेण्याची वचन घ्यायची पण काही केल्या माधव सुधरत नव्हता. तो दारू ढोसायचा आणि भांडण करायचा. आता तिला त्या गोष्टीची सवय झाली होती. त्याच्याकडून तिच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. त्या तिघांचा संसार ती कसाबसा चालवत होती.

घराजवळच शेताचा छोटासा तुकडा होता. त्यात वैरण वगैरे करायची. जनावरांना घालायची. दूध डेअरीला जायचं. त्यातून थोडा फार पैसा यायचा. ती रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची. कधी मधी नवरा नीट वागू लागला तर तोही थोडेफार पैसे घरी आणायचा.

तसं त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. मात्र दारू घेतल्यावर होणारा नवऱ्याचा अवतार तिला नकोसा वाटायचा. सुरुवातीला तिला त्याचा त्रास व्हायचा पण आता ती त्या वेळी सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.

त्याच्या अंगावर पडताच त्याच्या शरीराचा स्पर्श आणि ती उब जाणवताच तिच्या जुन्या आठवणी उसळून वर आल्या. लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात माधवचा असणारा आवेश आठवून क्षणभर तिच्या अंगावर काटा आला.


सुरुवातीची काही वर्षे तिच्या आयुष्यातील सर्वात सुखद वर्षे होती. तेव्हा त्याला दारूचं व्यसन नव्हतं. घेतली तरी थोडी फार घ्यायचा, इतकी नाही. तिला घरातलं काम तेवढं करावं लागायचं. बाहेर मजुरीने जावं लागायचं नाही. मुख्य म्हणजे तिचा नवरा नेहमी तिच्या मागे पुढे करायचा. वेळ मिळाला की दार लावून घ्यायचा आणि तिच्या अंगावर तुटून पडायचा. कधी कपडे बाजूला व्हायचे आणि ते दोघे एकमेकांच्या अंगांना झटू लागायचे ते कळायचं पण नाही.

कुठे माशी शिंकली हे तिला कळालं नाही आणि गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. तिच्याऐवजी त्याला दारू जास्त जवळची वाटू लागली आणि मग सगळंच बदलत गेलं. तो काम करेनासा झाला. घर चालवायला पैसे अपुरे झाले मग तिला जबाबदारी घ्यावी लागली. घरातलं काम तर ती करतच होती, आता बाहेरही रोजंदारीने जाऊ लागली.

त्यांच्या घरापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर आबांची वस्ती होती. आबा म्हणजे गावातील प्रगतशील बागायतदार. त्यांच्या घरी नेहमीच तीन-चार गाडी आणि दोन-तीन बायका कुठे ना कुठे कामाला असायच्या. एकदा-दोनदा ती सुद्धा गेली.

ती कामचुकारपणा करायची नाही. पडेल ते काम अंग भरून करायची. त्यामुळेच तिला महिन्याच्या पगाराने आबांनी कामावर ठेवलं आणि दररोज तिचं त्यांच्याकडे जाणं होऊ लागलं.

बाहेरच्या कामाबरोबर हळूहळू आबांची पत्नी, जया वहिनींनी, तिला घरातलं काम सुद्धा सांगायला सुरुवात केली. ती घरातल्या कामात सुद्धा त्यांची मदत करू लागली. वहिनींना तर त्यांच्या सुनेपेक्षा तिचंच काम आवडायचं. त्या नेहमी तिची स्तुती करायच्या आणि तिच्या नशीबाला व माधवला दोष द्यायच्या. ‘ सोन्यासारखी पोर तू, त्या माकडाला काय कळणार तुझी किंमत!’ तिच्या गालावरून हात फिरवून कपाळावर बोटे मोडत त्या नेहमी म्हणायच्या.

काल संध्याकाळी येऊन त्यांनी तिला घरातलं काम करण्यासाठी लवकर वस्तीवर यायला सांगितलं होतं. त्या स्वत:, त्यांचा मुलगा आणि सून कुठेतरी कार्यक्रमाला जाणार होते. घरातलं झाडणं-लोटणं, धुणी-भांडी आणि आबांचा स्वयंपाक करण्यासाठी तिला लवकर वस्तीवर जायचं होतं. तिला जाण्याअगोदर घरातली सगळी काम आवरायची होती.

ती त्याच्या अंगावर पडली तरी तो हलला नाही की त्याला जाग आली नाही. गोड आठवणीतून बाहेर पडत ती उठून उभा राहिली. काही दिवसांपूर्वीच तिने त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी केलेला प्रयत्न आठवताच तिला स्वत:चीच लाज वाटली आणि बॅटरीच्या उजेडात ती पटकन बाहेर आली.

बाहेर येताच पहिल्यांदा तिने चूल पेटवली आणि पाणी तापवायला ठेवलं. मग जनावराखालचं शेण-घाण काढून त्यांची जागा बदलली. मग दोन्ही जर्सी गायांची धार काढली. शेवटी पेंड ठेवून वैरण पाणी केलं.

आता चांगलंच उजाडलं होतं. तापलेलं पाणी बादलीत ओतत तिने न्हाणी गाठली आणि आंघोळीला सुरुवात केली. आंघोळ करत असताना स्वत:च्या नग्न शरीरावरून फिरणारी बोटेसुद्धा तिची आग भडकवत होती. तिला उत्तेजित करत होती.

कित्येक दिवसापासून तिच्या नवऱ्याचं ते रांगडं रूप तिने अनुभवलं नव्हतं. मागच्या कित्येक महिन्यापासून तिच्या नवऱ्याने तिला भोगलं नव्हतं. तिने प्रयत्न केला तरी त्याच्याकडून तिला प्रतिसाद मिळाला नव्हता. पण आता त्या गोष्टींचा विचार करायला तिच्याकडे वेळ नव्हता.

पटकन आंघोळ उरकल्यानंतर तिने स्वयंपाकघर गाठलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. तिघांचा स्वयंपाक करायला तिला जास्त वेळ लागला नाही. चपात्या केल्या, भाजी केली आणि मग भात रांधायला टाकून तिने रवीला उठवलं. रवीला आंघोळ घालून तो तयार होईपर्यंत भात झाला होता. तिने रवीचा डबा भरून त्याच्या दप्तरात टाकला आणि त्याला घेऊन ती बाहेर पडली.

जाता जाता नवऱ्याला जागे करून तिने डेरीत दूध घालायला सांगितलं. तो फक्त ‘हो’ म्हणून पुन्हा एकदा पांघरून घेऊन झोपी गेला. रवीला त्याच्या स्कूलबसच्या स्टॉपवर उभं करून ती आबांच्या वस्तीकडे वेगात चालू लागली.


(क्रमशः)

मंदा | भाग ४

तिला काही कळायच्या अगोदर तिच्या दोन्ही बाजूला हात टेकवत…

मंदा | भाग ३

तिला काही कळायच्या अगोदर तिच्या दोन्ही बाजूला हात टेकवत…

मंदा | भाग २

लग्न झाल्यापासून कोणत्याच परपुरूषाच्या विचाराने ती इतकी…

error: नका ना दाजी असं छळू!!