पावसात भिजताना भाग : ३

तिने आपल्या दातांमध्ये फोनची केबल पकडली होती. एका हातात फोन धरून तशीच ती आपले केस गुंडाळत होती. तिच्या ओठांवर केबलचा दाब पडून ते कमालीचे आकर्षक दिसत होते.
तिने पांढरा ढगळ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची थ्रीफोर्थ लेगिंग घातली होती. तिच्या नाजूक सडपातळ कमरेवर त्या ढिल्या टी शर्टची करकचून गाठ मारलेली होती. टीशर्ट आणि लेगिंगच्या मध्ये तिच्या सपाट पोटावरची उभट खळी हळूच डोकावत होती.
केस गुंडाळून तिने क्लिपमध्ये अडकवले आणि पायात फुलफुलांच्या स्लीपर सरकवून ती जवळ जवळ धावतच त्याच्या जवळ गेली. ओठांना हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेली असल्याने तिच्या गोऱ्यापान रंगावर तिचे ओठ उठून दिसत होते.
“जाऊयात?” तिच्या आवाजाने तो भानावर आला.
“हं!” म्हणत तो चालू लागला.
“मला पावसाळा खूप आवडतो! कित्ती मस्त वातावरण असतं ना?” दीपिका
“हो ना! मला पण खूप आवडतो पावसाळा.” तो
“तू ट्रेकिंग वगैरे करतेस?” त्याने विचारलं.
“कॉलेजात असताना जायचे ग्रुपसोबत नंतर सुटलं!” ती
“नाही मगाशी पूर्ण तयारीत आलेलीस!” तो
“मला वाटलेलंच तू नाणेघाट सोडायचा नाहीस म्हणून!” ती
“आणि असं का वाटलं तुला?” तो
“मी फेसबुक वर पाहिलं होतं!” असं म्हणत तिने जीभ चावली.
तिची चोरी पकडली गेली होती. कारण अजून ते दोघे फेसबुक वर फ्रेंड्स नव्हते आणि तरीही तिने याचं अकाउंट पाहिलं म्हणजे ती त्याला फॉलो करत होती आणि हे त्याच्या लगेच लक्षात आलं. पण त्याने काही न बोलता विषय थोडासा फिरवला.
“अरे एक मिनिट मी तुला ऍड करतो!” म्हणत त्याने मोबाईल उघडून तिला रिक्वेस्ट पाठवली.
तिनेही झटकन त्याची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि मगाशी नाणेघाटात सगळ्या ग्रुपबरोबर काढलेल्या फोटोसोबत चेक इन केलं.
“ए फोटो दाखव ना मला!” दीपिका लाडिक स्वरात बोलली.
“दाखवतो चल! आधी बसूयात!” मनोज
ते दोघे हॉलमध्ये गेले. सगळे अस्ताव्यस्त बसले होते. पुढे एका टेबलवर हाऊजीचा पसारा मांडला होता आणि कवले-लेले जोडी टेबलाशी खुर्चीवर बसली होती. ते दोघे एकमेकां शेजारी बसले.
“दीपिका मॅडम! तुमची काँट्री द्या! रुपये पाचशे फक्त!” कवले त्या दोघांना पाहताच म्हणाले.
“आईगं! मी वॉलेट नाहीये आणलय! एक मिन हा मनोज मी आलेच!” ती उठू लागली.
“बस! मी देतो!”
त्याने तिचा हात धरत ओढून तिला खाली बसवले. ती गोड लाजली. तिलाही त्याचा सहवास, त्याचं असं हक्कानं वागणं खूप आवडलं. त्याने खिशातून पाचशे काढून तिच्या हातात कोंबले. तिने पुढे देत ते पास करण्यास सांगितले.
हौजीचा खेळ सुरु झाला. ते दोघे जसा वेळ जाऊ लागला तसतसे आणखी मोकळेपणाने वागू लागले. त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री आहे की काय. खेळ संपला. गबाळा एकनाथ पाटील फुल हाऊस जिंकला. या दोघांना गेमचं काहीच पडलेलं नव्हतं त्यांना एकमेकांच्या सानिध्यातला प्रत्येक क्षण पूर्णपणे जगायचा होता.
सात वाजत आले होते. ढगांचा गडगडाट आणि विजांचा थयथयाट चालूच होता. जेवणाला आणखी अवकाश होता. सगळे ग्रुप करून गप्पा छाटत बसले. हे दोघे हॉलच्या दरवाज्या जवळच्या गाद्याच्या ढीगाला टेकून बसले होते. तो त्याचा कॅमेरा तिच्या मोबाईलला जोडून तिला फोटो ट्रान्सफर करत होता. कवले साहेब तिथे आले.
“मनोजराव! आम्ही पण आहोतं म्हटलं ट्रिपमध्ये!” कवले
“अरे सर बसा ना! फोटो दाखवतो तुम्हाला!” ते दोघे जरा सावरून सरळ बसले.
“अरे कसले फोटो न कसलं काय! हे रेसॉर्टवले बावळट साले. रात्रीसाठी दारू नाही आणली यांनी!” ते जरा वैतागलेच होते.
“असुद्या हो साहेब उद्याची रात्र आहेच की!” मनोज
“पण आजचं काय?” कवलेंना चांगलीच तल्लफ झाली होती.
“मी पाहतो!” असं म्हणत मनोजने कुणालातरी मेसेज केले.
“झालं! साहेब! एक पंधरा अर्धा एक तासात येतील बॉक्स आपले. पेमेंट सेटल करा फक्त!” मनोज
“च्यायला! हा मनोज म्हणजे अल्लादिनचा जीनीच आहे!” लेले तिथे अवतरले.
“काहीही काय सर! माझे मित्र आहेत जुन्नरमध्ये त्यांना सांगितलं. फक्त ते आल्यावर मी इथे आहे हे त्यांना कळू देऊ नका नाहीतर मला घेऊन जातील ते.” मनोज
“डोंट वरी मिस्टर जीनी!” कवलेंची गाडी खुशीत होती.
“आणि काय गं पोट्टे? मगाशी फोटो काढताना उभा राहताना किती नाटकं तुमची! आमच्या पासून लपवत होतीस की काय?” लेले दीपिकाला बोलले.
“काय लपवणार सर? तसं काही नाहीये, गैरसमज होतोय तुमचा.” ती खूप गोड लाजली.
“कशाला प्रयत्न करतेस? तुम्ही लोक एकमेकांना बोललात की नाही माहिती नाही पण तुम्ही दोघेही एकमेकांवर किती मरता हे बिलकुल लपून राहत नाही बरंका!” लेले
आता तर दीपिकाने आपला चेहराच ओंजळीत झाकून घेतला.
“बरं, मनोजराव वी रिस्पेक्ट योर प्रायव्हसी! आज दारू पार्टी तुमच्यासाठी ऑप्शनल! जर यायचं असेल तरच या. बिलकुल जबरंदस्ती नाही. पण उद्या मात्र तुमचं हे आम्हा सगळ्यांसोबत तुम्हाला सेलिब्रेट करावं लागेल हं!” कवले
“काहीही काय बोलताय सर तुम्ही?” आता मात्र तिला काय करावं हेच कळत नव्हतं.
“अगं पोरी आम्ही तुझ्या वयाचे होतो. सगळं कळतं आम्हाला. आता फायदा नाही नाकारून. तुझं बिंग फुटलंय पुरतं आता! चेहरा बघ लाल लाल झालाय नुसता!” लेले
“सर प्लिज ना!” ती
“बरं बरं चालू द्या तुमचं आम्ही आहोतं बाहेर.” असं म्हणून लेले आणि कवले निघून गेले.
“हे सर म्हणजे अगदी हेच आहेत!” ती अजून लाजत होती.
“हो ना काहीही बोलतात.” तो
पुढे काय बोलावं गे तिलाही कळेना आणि त्यालाही कळेना. बराच वेळ गप्पा मारत तिथे बसून राहिले.
थोड्या वेळाने सगळे पुन्हा आत आले. शिरीष एकनाथ आणि आणखी एक जण हातात दारुचे बॉक्स घेऊन आले. सगळे बॉक्स टेबलवर मांडून पुन्हा ग्रुप्स करून गप्पा मारत बसले. या दोघांना मात्र एकमेकांशिवाय ना काही सुचत होतं ना काही दिसत होतं.
“ओ लव बर्डस! चला इकडे!” सुमती मॅडमचा आवाज त्यांच्या कानावर पडला.
एव्हाना बातमी जगजाहीर झाली होती. कुणीही कुणाला प्रपोज न करता किंवा होकार नकार यांचं टेन्शन न येता त्यांच्यावर ‘लव्हबर्डस’ चा शिक्का बसला होता. त्यांना दोघांनाही खूप भारी वाटत होतं. त्यांचं जोडपं खूपच गोड दिसत होतं. ते दोघेही उठून सगळ्यांच्यात जाऊन बसले.
“काय मनोजराव? विकेट घेतलीच ना शेवटी?” सुमती मॅडमनी त्याला टोमणा मारला.
“मॅडम विकेट तर जॉईन झालो त्या दिवशीच गेली होती. आता उलट वर्ल्डकप जिंकलाय!” मनोजने जोरदार प्रत्युत्तर दिले.
सगळे मोठमोठ्याने हसू लागले. आणि दीपिका मात्र तोंड ओंजळीत लपवून गालातल्या गालात हसत होती. त्यांची पार्टी सुरु झाली. सगळे ग्लासवर ग्लास रिचवू लागले. अर्ध्या पाऊण तासात एक एक विकेट पडायला सुरवात झाली.
नशेत सगळे विक्षप्तपणे असंबद्ध बडबडत होते. कुणी उगाच मोठमोठ्याने हसत होते. कुणी आपल्या इतिहासाचं पुस्तक मांडून बसलं होतं तर कुणी बढाया मारत होते. दीपिका, नेहा, सुमती मॅडम आणि प्राजक्ता सोबत सावकाश घोट घेत होती.
मनोज, लेले आणि कवलें सोबत होता. दोघांचं लक्ष मात्र फक्त एकमेकांकडेच होतं. एवढ्या दुरुनही त्यांच्या नजर एकमेकांवरच खिळलेल्या होत्या. डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत दोघेही गालातल्या गालात हसत होते. शेवटी लेले गरजलेच,
“जा बाबा जा! आम्हा म्हाताऱ्यां बरोबर नाही करमणार तुला. आपण बसू परत जेवणं झाल्यावर निवांत. ओऽऽऽ सुमती मॅडम! सोडा तिला. का त्रास देताय!”
त्यांचा आवाज ऐकताच सुमती मॅडमनी कोपराने ढोसून दीपिकाला जाण्याची खूण केली. आपापले ग्लास हातात घेऊन ते दोघे कोपऱ्यातल्या खुर्च्यांवर जाऊन बसले.
नाही म्हटलं तरी ते दोघेही जरा झिंगले होतेच. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या. त्याने सिगारेट काढली आणि आपल्या ओठात पकडून तो खिशात लायटर शोधू लागला. तिने त्याच्या तोंडातून सिगारेट काढून घेतली आणि दूर टाकली.
तिनेही आता अधिकार गाजवायला सुरवात केली होती. त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी भलतीच बहरू लागली होती. इतर वेळी कुणी सिगरेटवरून काही बोललं तरी मनोज त्याचा जन्माचा उद्धार करत असे पण आज त्याला इतकं भारी वाटलं की बस्स! तो हसला.
“दीपिका! एक विचारू?” मनोज
“हं विचार ना!” घोट गिळत दीपिका बोलली.
“हे जे चाललंय ते खरं आहे का गं?” तो
“मलाही हाच प्रश्न पडलाय! असं वाटतंय की सगळं अगदी व्यवस्थित ठरलेलं होतं!” ती
“मला खरंच विश्वास बसत नाहीये!” तो
“हो ना. प्रपोज नाही, उत्तर नाही आणि आपण ऑफिशियली लव्हर्स झालो.” ती
“पण खरंच आहोतं आपण?” त्याने विचारलं.
“म्हणजे? तुला आवडत नाही मी!”
अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सगळ्या आनंदावर जणू विरजण पडलं. तो काय उत्तर देतोय याच्या टेन्शनने तिचा उर धडाडु लागला.
“बोल ना मनोज लवकर!” ती उतावळी झाली होती.
“आवडत नाही? हा काय प्रश्न आहे? तुला कळत नाही मला काय वाटतं तुझ्याबद्दल ते?” तो
खरं तर त्याला आपण मनापासून आवडतो हे तिला पक्कं माहित होतं पण अशी वेळ आली की माणूस बेचैन होतोच.
“मनोज बोल ना! नको ना त्रास देउ. मला खूप टेन्शन येतंय!” ती
“जर मी नाही म्हणालो तर?” तो
ती ताडकन उठली. ग्लास खुर्चीवर ठेवताना खाली पडला आणि फुटला. सगळ्यांच लक्ष त्यांच्याकडे गेलं. हॉलमध्ये शांतता पसरली. तिचे डोळे गच्च भरून आले होते, हुंदका अनावर आला होता. तिला तिथून पळून जावंसं वाटलं. पाऊल टाकणार इतक्यात त्याने तिचं मनगट आपल्या हातात पकडलं.
“दीपिका.”
त्याचा आवजही कापरे भरल्यासारखा झाला होता. तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. ती मुसमुसत होती.
“काय?” रडवेल्या आवाजात ती बोलली.
“माझ्याशी लग्न करशील?” त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
“काय? थेट लग्न?”
ती रडता रडताच हसू लागली. तो आय लव्ह यु वगैरे काहीतरी म्हणेल असं तिला वाटलं होतं पण त्याने तर थेट मागणीच घातली. खरं तर त्यालाही आपण असं कसं बोललो ते कळलं नाही.
“हो. करशील?” तो
“बघू!” डोळे पुसत ती मुद्दाम ऍटीट्यूड दाखवू लागली.
“प्लीज!” तो
“ठीक आहे. करेन!” ती हसत बोलली आणि तिने त्याला मिठी मारली.

पावसात भिजताना भाग : ५

तिने हळूच आपली मान उंचावली आणि त्याच्या थथरणाऱ्या ओठांना आपल्या नाजूक ओठांमध्ये पकडले. एकमेकांच्या ओठांच्या गरम स्पर्शाने दोघांची शरीरे शहारून गेली.अगदी सावकाश ते एकमेकांचे ओठ आपल्या ओठांनी कुरवाळू लागले. अगदी स्लोमोशन वाटावं इतक्या सावकाश. त्यांच्या दोघांच्याही...

पावसात भिजताना भाग : ४

अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोघेही भानावर आले. झटकन एकमेकांपासून दूर होऊन ते लाजत उभे राहिले.“चिर्स टू स्वीट कपल दीपिका अँड मनोज!” लेले ग्लास उंचावून ओरडले.“चिअर्स, चिअर्स, चिअर्स!” एकच गलका उडाला.सगळे त्या दोघांचं अभिनंदन करू लागले. कवले हातात दोन ग्लास घेऊन आले...

पावसात भिजताना भाग : २

ते आठ दहा जण पायवाटेने नाणेघाटाच्या दिशेने चालू लागेल. सर्वात पुढे मनोज, त्याच्या मागे दीपिका आणि मागोमाग लेले, कवले आणि इतर असे चालत होते. मध्ये मध्ये थांबून ते वेगवेगळ्या पक्षांचे, किड्यांचे, धबधब्याचे फोटो काढत होते, कधी ग्रुप सेल्फी काढत होते. अर्ध्या पाऊण तासात...

पावसात भिजताना

शहर सोडून बस आता हायवेला लागली होती. बसमध्ये सगळे मजमस्ती करत होते. कुणी अंताक्षरी खेळत होते, कुणी गप्पांमध्ये गुंग झाले होते, कुणी सेल्फी काढत होते तर कुणी पार्सल आणलेल्या वडापावांवर तुटून पडले होते.तो मात्र पुढे ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून आजूबाजूच्या गोष्टी...

error: नका ना दाजी असं छळू!!