पावसात भिजताना | भाग २

ते आठ दहा जण पायवाटेने नाणेघाटाच्या दिशेने चालू लागेल. सर्वात पुढे मनोज, त्याच्या मागे दीपिका आणि मागोमाग लेले, कवले आणि इतर असे चालत होते.मध्ये मध्ये थांबून ते वेगवेगळ्या पक्षांचे, किड्यांचे, धबधब्याचे फोटो काढत होते, कधी ग्रूप सेल्फी काढत होते. अर्ध्या पाऊण तासात ते घाटाच्या खिंडीसमोरच्या पटांगणात जमले.
“अरे काय रे मनोज? हे ग्राउंड पहायला एवढ्या लांब तंगडतोड केली होय आपण?” कवले धापा टाकत होते.
“नाही हो सर! खाली पुढे आहे!” मनोज
दुपारचे तीन वाजत होते पण अगदी दिवस मावळून गेल्यासारखं अंधारून आलं होतं. गडगडायलाही सुरवात झाली होती.
“ए बाबा! तुम्हा लोकांना नाही ते किडे असतात. आम्ही साधारण माणसं आहोतं बाबा. जीवाशी खेळ करू नकोस. आभाळ फाटणार आहे असं दिसतंय!” लेले आकाशाकडे पाहत बोलले.
“खूप सोप आहे सर. डोन्ट वरी! या मागे मागे. फक्त सगळ्यांनी एक लक्षात ठेवा. बाजूला कड्याला धरून सावकाश पायर्या उतरा. वाटलंच तर अगदी बसून पायर्या उतरा. भिजले तर भिजू द्या कपडे.” मनोज
थोडं पुढे जाताच त्यांना खाली जाणार्या उद्धवस्त झालेल्या पायर्या दिसल्या. पायर्या कसल्या एकावर एक कशीही रचलेली दगडंच वाटत होती ती. मनोजने ट्रायपॉड सॅकला अडकवला आणि पायर्या उतरायला सुरवात केली.
मागोमाग दीपिका. दोघेही अगदी शिताफीने पायर्या उतरत होते. उतरताना मागच्याना सूचना करत होते. तरीही कवले घसरलेच. नशीबाने घसरत पुढे न जात त्यांनी जागेवरच बसकण मारली.
त्या पायर्यांवरून साधारण घोट्याएवढं पाणी वाहत होतं. मनोज आणि दीपिका सहज उतरून खालच्या अरूंद रॅम्पवर आले. आता या रॅम्पला कठडे बसवल्यामुळे तसा धोका नव्हता नाही तर घसरलेला माणूस येथून थेट खाली दरीत कोसळत असे.
पराकाष्ठा करत बाकीचे खाली आले. पण तिथे आल्यावर त्यांच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं. समोर १८० अंशाच्या कोनात दीड दोन हजार फूट खोल पसरलेली जमीन दिसत होती. अगदी हिरवीगार. त्यावर दाटलेले पावसाचे ढग!
“व्वा! मनोजराव! दिल खुश झालं! च्यायला इथेच राहावं असं वाटतंय” लेले
“थँक्स मनोज!” दीपिकाचा आवाज त्याच्या कानात घुमला.
ती पहिल्यांदाच स्वतःहून त्याच्याशी बोलली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती कठड्यावरून वाकून खोलीचा अंदाज घेत होती. फोटो काढणं सुरू झालं आणि मुसळधार पाऊसही. पावसाचे टपोरे थेंब सगळ्यांची डोकी बडवू लागले.
“झालं! शेवटी नको तेच झालं!” लेले
“नो प्रॉब्लेम सर. या माझ्या मागे!”
तो त्या लोखंडी कठड्याला धरून दहा बारा पावलं पुढं गेला. डाव्या हाताला असणार्या गुहेसारख्या कातळात कोरून काढलेल्या खोलीच्या कुलुपाला त्याने हातानेच झटका दिला. कुलूप उघडलं. सगळे पटापट आत पळाले. सगळे आत गेल्यावर त्याने दरवाज्याशी आपला कॅमेरा सेट केला आणि काम सुरू केलं.
“मी पाहू?” दीपिका
“अं! सांभाळून!”
तो कॅमेरा म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. तिनेही दोनचार फोटो काढले. खिशातून पाकीट काढत त्याने सिगारेट पेटवली.
“सर!” कवलेंना हाक मारत त्याने पाकीट आणि लायटर त्यांचाकडे टाकला.
“वा वा वा! उत्तम! खरी मजा इथे आहे!” झेल घेत कवले बोलले.
लेले-कवलेही धूर सोडू लागले. दीपिकाने बॅग उघडून कागदी कप काढून समोर मांडले आणि दोन थर्मासमधून आणलेली कॉफी त्यात ओतली.
“हे बघा मुरलेले लोक आहेत हे! कसे तयारीत असतात पहा! नाहीतर आ पण बसतो त्या झोपड्यांत तर्राट होऊन!” लेले त्या दोघांवर मनापासून खुश होते.
“साहेब उद्या इथेच मुक्काम करू!” कवले
“बघू आधी परत कसं जायचं ते पहा!” लेले. मनोज त्यांच्या कॉफीपार्टीचे फोटो काढत होता.
“साहेब इथे काही चालत नाही आपलं! निसर्ग सांगेल तसं करायचं गपचूप! तुमची टेक्नॉलॉजी तंगड्या वर करून पडते इथे!” मनोज कॉफीचा घोट घेत बोलला.
“हो ना! आ पण किती दुर्बळ आहोतं याची जाणीव करून घ्यायची असेल तर याच्या सानिध्यात यावं. तो आपल्याला जमिनीवरही आणतो आणि आपली काळजीही घेतो.” दीपिका
“च्यायला दोघांची जोडी एकदम सुपरहिट आहे नाही!” लेले मोठ्यांदा हसले.
काही वेळाने पाऊस थांबला ते लोक पुन्हा कसरत करत कसेबसे वर गेले. आता पाऊस चांगलाच उघडला होता पण आभाळ अजूनही गच्चं भरलेलंच होतं.
“आपल्याला हा रस्त्यात नक्की गाठणार.” कवले साहेब अंदाज वर्तवू लागले.
“चला भरभर चालायला सुरवात करा. पुढे त्या टेकडीवर नेटवर्क असतं. तिथून फोन करून ड्रायव्हरला बोलावून घेऊ. तोपर्यंत पाऊस नाही आला तर नशीब नाहीतर मग पर्याय नाही.”
मनोज भरभर पावले टाकत निघाला. दीपिका वगळता बाकीच्यांना त्याच्या सोबत चालण्यासाठी जवळजवळ धावावंच लागत होतं. भरभर चालत ते टेकडीवर पोचले. मनोजने ड्रायव्हरला फोन लावला. ड्रायव्हरही काही मिनिटांतच बस घेऊन तेथे हजर झाला. तो बस वळवेपर्यंतच पुन्हा पाऊस सुरू झालाच.
सगळे पटापट बसमसध्ये चढले. सगळ्यात शेवटी दीपिका आणि तिच्यामागे मनोज!
दीपिका पुन्हा सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसली. बाकीच्या सगळ्या सीटवर आधीच दोघे दोघे बसलेले होते. एक जण त्याच्या जागेवर म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारीही बसला होता. आता त्याला मागे जाऊन बसणं भाग होतं.
सगळ्यांनी आपले ओले रेनकोट काढून एका बाजूला अडकवले. तो वाट काढत मागे आला आणि ती बसलेल्या सीटच्या बाजूच्या सीटवर बसला. ती अजूनही खिडकीतून बाहेरच पाहत होती. बस सुरू झाली तो तिला न्याहाळू लागला.
तिच्या शरीरावर त्याची नजरच ठरत नव्हती. भुर्या रंगाचे एकदम छोटे केस. पोनी सोडली तरी तिच्या मानेपर्यंतच यायचे. तिची गोरीपान मान आणि खांदे तिच्या स्टायलिश टॉपमुळे उघडे दिसत होते.
तिच्या ब्राच्या काळ्या लेस तिच्या मानेवर ताणून त्यांची नाजूक गाठ मारलेली होती. टॉपही अगदी घट्ट फिटअसल्यामुळे तिच्या ब्राचा टॉपवरूनही आकार अगदी उठावदार झाला होता. या प्रकारच्या ब्रा आजकाल बर्याच मुली वापरू लागल्या आहेत. अशी ब्रा दिसली की तो नेहमी बुचकळ्यात पडत असे. याचा फायदा काय? की मुद्दाम मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते असल्या ब्रा घालतात? कारण काहीही असो पण या ब्रा असतात मात्र कमालीच्या आकर्षक!
खचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यावर बस दणादण आदळत होती आणि त्यामुळे तिचा उभारही उसळत होता. टॉप थोडा वर ओढला जाऊन तिची कंबरं थोडीशी उघडी पडली होती. तिच्या गोर्यापान मांड्या थरथरत होत्या. त्याचे भान हरपले होते अजूबाजूला कोण आहे नाही याचीही शुद्ध त्याला राहिली नव्हती.
तो नजरेनेच तिचं सौन्दर्य पिऊन टाकत होता. बस कधी पोचली हे त्याला कळलेही नाही. बसच्या ब्रेकच्या धक्क्याने त्याची तंद्री भंग पावली. सगळे एक एक करून उतरून आतमध्ये पळाले. दीपिका मात्र शांतपणे पाय ओढत निघाली होती. चवळीच्या शेंगेसारखी बारीक होती ती. बहुतेक थकली असावी. पाठीवरच्या सॅकचे बंद हातांनी घट्ट धरून ती चालत होती.
“आण इकडे, मी घेतो!” मनोजने हात पुढे केला.
“नाही ठीक आहे!” ती वाकून गेली होती.
“दे! थोडंसच तर आहे. आणि मला अशा बॅग उचलण्याचा मोठा सराव आहे! चल आण!” मनोज
तिने छाती पुढे काढत सॅकच्या बंदांमधून हात काढले आणि त्याच्या हातात सॅक दिली. काहीही न बोलता दोघे गेटमधून आत चालत गेले. आत गेले तर सगळे आपापल्या कॉटेजेसमध्ये पसरले होते. त्यांचा चांगलाच व्यायाम करून घेतला होता त्याने. जे आले नव्हते ते ऑलरेडी तर्राट होऊन पडले होते.
तिच्या कॉटेज समोर येताच त्याने तिची सॅक तिच्याकडे दिली. “थँक यू!” अगदी गोड आवाजात त्याचे आभार मानून ती आत निघून गेली. तोही आपल्या कॉटेजकडे आला. बाहेर शूज काढून ठेऊन आत आला. लेले कवले आडवे तिडवे पसरले होते.
“आलास का? बेट्या जाम फाडलीस लेका तू आमची!” लेले
“फाटली पण मजा वाटली!” कवले स्वतःच्याच पाणचट जोकवर मोठमोठ्याने हसू लागले.
“नाही पण खरंच मजा आली बरंका! बोल तुला काय वरदान हवं? आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोतं!” विष्णू किंवा शंकराचा अवतार असल्याचा आव आणत लेले बोलले.
“भगवंता! माझे जेव्हाही कुठे ट्रेक्स असतील तेव्हा मला सहज सुट्टी मिळू दे!” मनोज हात जोडत मान झुकवून म्हणाला. तोही काही कमी नव्हता.
“तथास्तु!” लेलेंनी आशीर्वाद दिला.
“अहो सर काय केलत हे. कामं कोण करणार?” कवले
“अरे वय आहे त्याचं आणि माहितीही आहे त्याला त्यातली. असाही रोज रोज थोडीच जाणार आहे तो!” लेले मनोजवर भलतेच खुश झाले होते.
“डोन्ट वरी! सर मी सहज म्हणालो.” मनोज
“बरं सोडा आता सगळं. चला हॉलला जरा हाऊजी वगैरे खेळूयात! करा सगळे गोळा!” लेले उठून आळोखे पिळोखे देत बोलले.
“हो हो तर! हाऊजी शिवाय ट्रिप पूर्ण कशी होईल?”
कवलेंनी पाकिटातून पाचशेची नोट काढली आणि लेलेंसमोर हात पसरला. लेलेंनीही एक नोट काढून दिली. मग मनोजनेही.
पैसे जुळवत कवले बाकीच्या लोकांकडे गेले.
मनोजला मेसेज आला होता.
दीपिका: थँक्स या लॉट मनोज!
मनोज: कशाबद्दल?
दीपिका: तुझ्यामुळे पाहता आलं सगळं. एकटीला जाऊ दिलं नसतं मला.
मनोज: ओह! माय प्लेजर!
तिने तिच्या मोबाईलवर मनोजचे त्याच्या नकळत काढलेले फोटो त्याला पाठवले. त्याची फोटोग्राफी सुरू असताना. लेलेसाहेबांना टाळ्या देत हास्यविनोद करत असतांना. कुत्र्याचा भिजलेल्या पिलांची अंगं पुसताना आणि असे कितीतरी.
मनोज: वॉव! कधी काढलेस हे फोटो! मला खरंच कळलंही नाही. मस्त फोटो काढतेस की तू!
दीपिका: तू काढलेले फोटोस पाठव ना!
मनोज: अगं ते कॅमेरामध्ये आहेत. हाऊजी खेळताना देईन. यूएसबी घेऊन ये येताना.
दीपिका: ओके! जाताना मला हाक मार.
मनोज: ठीक आहे. फ्रेश होतो जरा!
दीपिका: ठीक आहे.
मोबाईल ठेऊन तो उठला. त्याच्या चेहर्यावर वेगळंच तेज दिसू लागलं होतं. नेहमी सिरीयस असणारा त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता. उगाचच स्वतःशी हसत त्याने बॅग उघडली आणि आंघोळीचे कपडे घेऊन तो बाथरूममध्ये गेला.
अंघोळ करत असतानाही त्याच्या डोळ्यांसमोरून दीपिका हलत नव्हती. या ट्रिपच्या निमित्ताने अनपेक्षितपणे अगदी सहज हसत खेळत त्यांच्यातला आइस ब्रेक झाला होता. तो पुन्हापुन्हा लाजत होता. भराभर अंघोळ उरकून तो बाहेर आला.
लेलेसाहेब निघून गेले होते. बाहेर येऊन त्याने सगळं आवरलं आणि आपला कॅमेरा आणि मोबाईल घेऊन तो हॉलकडे जाऊ लागला. जाताना दीपिकाच्या कॉटेजजवळ थांबून त्याने हाक मारली,
“दीपिकाऽऽऽ!”
“आलेच हं! दोनच मिनिट!” आतून तिचा आवाज आला.
“केबल घेऊन ये!” तो
“होऽऽ आणतेय!” असं म्हणत दीपिका दरात आली.

पावसात भिजताना | भाग ५

तिने हळूच आपली मान उंचावली आणि त्याच्या थथरणार्या ओठांना आपल्या नाजूक ओठांमध्ये पकडले. एकमेकांच्या ओठांच्या गरम स्पर्शाने दोघांची शरीरे शहारून गेली.अगदी सावकाश ते एकमेकांचे ओठ आपल्या ओठांनी कुरवाळू लागले. अगदी स्लोमोशन वाटावं इतक्या सावकाश. त्यांच्या दोघांच्याही...

पावसात भिजताना | भाग ४

अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोघेही भानावर आले. झटकन एकमेकांपासून दूर होऊन ते लाजत उभे राहिले.“चिर्स टू स्वीट कपल दीपिका अँड मनोज!” लेले ग्लास उंचावून ओरडले.“चिअर्स, चिअर्स, चिअर्स!” एकच गलका उडाला.सगळे त्या दोघांचं अभिनंदन करू लागले. कवले हातात दोन ग्लास घेऊन आले...

पावसात भिजताना | भाग ३

तिने आपल्या दातांमध्ये फोनची केबल पकडली होती. एका हातात फोन धरून तशीच ती आपले केस गुंडाळत होती. तिच्या ओठांवर केबलचा दाब पडून ते कमालीचे आकर्षक दिसत होते.तिने पांढरा ढगळ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची थ्रीफोर्थ लेगिंग घातली होती. तिच्या नाजूक सडपातळ कमरेवर त्या ढिल्या...

पावसात भिजताना

शहर सोडून बस आता हायवेला लागली होती. बसमध्ये सगळे मजमस्ती करत होते. कुणी अंताक्षरी खेळत होते, कुणी गप्पांमध्ये गुंग झाले होते, कुणी सेल्फी काढत होते तर कुणी पार्सल आणलेल्या वडापावांवर तुटून पडले होते.तो मात्र पुढे ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून आजूबाजूच्या गोष्टी...

error: नका ना दाजी असं छळू!!