गावात MIDC आल्यामुळे लोकांकडे पैसा बक्कळ झाला होता. बिना कष्टाचा पैसा खिशात न राहता डोक्यावर बसतो असं म्हटलं जायचं ते आता प्रत्यक्षात पहायला मिळू लागलं होतं.
गावातल्या प्रत्येक दहा घरांमागे एक मंडळ आणि ग्रुप उगवले होते. दोन नंबरचा पैसा पाण्यासारखा घराघरातून वाहत होता. या दोन नंबरच्या कारभारांमधील एक नंबर व्यक्तिमत्व म्हणजे दादा कोल्हे!
गावात कुठेही उभा राहलात तरी दिसेल अशी त्यांची हवेली. दारात करोडोच्या किमतीच्या डझनभर गाड्या. संरक्षणासाठी नव्हे तर पैशाचा माज दाखविण्यासाठी पाळलेली पाच पंधरा जातवान कुत्री आणि पैशाच्या मागोमाग येणारा थुंकीसुद्धा झेलायला तयार असणाऱ्या तथाकथित कट्टर समर्थकांचा मेळावा; असा दादा साहेबांचा थाट. या वर्णनावरून दादा साहेबांचं चित्रही डोळ्यासमोर उभं राहलंच असेल, पण असं नाही.
दादा साहेब म्हणजे पंचवीस सत्तावीस वर्षांचा उमदा देखणा तरुण! मध्यम उंची व्यवस्थित भांग पाडलेले केस, कायम कडक इस्त्रीचे कपडे, पांढरे पुढारी टाईप नव्हे तर एखाद्या मोठ्या कंपनीचा मोठा अधिकारी असावा असं वाटेल असा त्याचा पेहराव. डोळ्यांवर बिना फ्रेमचा बारीक चष्मा आणि कायम मोबाईलमध्ये डोकं खुपसलेले. कुणी त्याच्याशी बोलत असलं तरी तो मोबाईलमध्ये बघतच बोलणार, अगदी धीरगंभीर स्वरात!
दादा साहेबांच्या नावाची आज चलती होती. गावतलं पानही त्याच्या आज्ञेशिवाय हलायची नाही. शिक्षणाने सिव्हील इंजिनिअर पण पेशाने व्हाईट कॉलर गुंड! त्याने कधी कुणाला चार बोटांनी स्पर्शसुद्धा केला नव्हता पण आपल्या तल्लख डोक्याच्या जोरावर अख्खा गावच काय जवळ जवळ अख्खा तालुका मुठीत ठेवला होता असं म्हटलं तरी चालेल.
मोठ मोठ्या उद्योगपतींपासून ते दिग्गज राजकारण्यांसोबत त्याची नेहमीची उठबस असे. रोज संध्याकाळी सहाच्या पुढे हवेलीच्या बागेत त्याचा दरबार भरे. लोक कामं घेऊन येत, प्रश्न घेऊन येत, तसं काही नसेल तर नुसत्याच इकडच्या तिकडच्या गप्पा होतं.
त्या दिवशी असाच रिकामा वेळ होता. काही जवळचे कार्यकर्ते आणि MIDC मधल्या कंपनीतील काही अधिकारी गप्पा ठोकत तिथे बसले होते. त्याचं नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये काम चालू होतं. इतक्यात पाच पंधरा जणांचा घोळका गेटमधून आत आला.
“दादा साहेब! येऊ का म्हटलं?” गावातल्या युवकांचा स्वयंघोषित अध्यक्ष म्हणजे निलेश भय्या.
“ये भय्या बस की!” दादा साहेब.
“काय दादा साहेब होळी आलीय. काही नियोजन हाय का नाय? नाय कुटं काय हालचाल दिसंना म्हून म्हन्तो!” भय्या.
बाकीची पोरं त्याच्या खुर्चीमागे हाताच्या घड्या घालून उभी राहिली.
“अरे भय्या नियोजन काय त्यात पंधरा बोकडं आहेत धुळवडीला. अजून काय तमाशा आणतो का आता!” दादा साहेब.
“नाय राव! ती रंग खेळायला एखांदी नटी बीटी नको का राव. आपली पोरं बिचारी कधी कुठल्या पोरीकडं बघतपण नायेत. म्हणता त्यानला मनोरंजन तेव्हढंच!” तो मोठ्याने हसला.
“अरे ही काय दहीहंडी आहे का? नशेत कुणी तरी वेड वाकडं करायचं आणि मग पत्रकार आहेतच बातम्या छापायला, काय मेंगडे साहेब!” दादा साहेब मेंगडे पत्रकाराकडे बघत म्हणाले.
मागील दोन वर्षात लोकांची सण साजरे करण्याची पद्धतच मुळात बदलून गेली होती. पूर्वीप्रमाणे आता सण साधेसुधे राहले नव्हते. आता ते ग्लॅमरस आणि स्पॉन्सर्ड झाले होते.
पूर्वीच्या दहीहंडीला लोक थर बघायला जमायचे आजकाल स्टेजवरील अप्सरांना बघायला जमतात. मंडळा मंडळांमध्ये सिनेतारका आणण्याची जणू स्पर्धाच लागायला लागली होती.
“काय बी का दादा? आपली पोरं हुल्लडबाजी करत्यात कदी?” भय्या.
“अरे पण हे नवीनच काय? आणि कोणती नटी तयार होईल असं रंग खेळायला यायला?” दादा साहेब.
“ह्योका दादा ती राष्ट्रसेनावाल्यांनी लढेगावात जोरदार तयारी केलीय. सिरिअलची नटी ठरवलीय. नटी स्टेजवर बसणार निस्ती आपला धिंगाणा खाली. स्टेजवर नो इंट्री!” भय्या
“अरे त्याची लेवल काय आपली लेवल काय, कुणाबरोबर तुलना करतोयस तू, गटारातली डुकरं ती!” दादा साहेब.
“तेच तं! डुकरं गु सोडून पाचपक्वान खायला लागली. आपलं काय? आपलं श्टाण्डर्ड दावायलाच पायजे त्यानला.” भय्या काही हार मानायला तयार नव्हता.
“दादा साहेब आहे पोरांची इच्छा तर करून टाका एखादा कार्यक्रम! कशाला ताणता?” पाईप कंपनीतले साहेब बोलले.
“अहो पण साहेब!” दादा साहेब
“पन बिन काय नाही दादा साहेब! पोरं उर फुटोस्तोर पळत्यात राव. तुमची हाक पुर्न होयच्या आधी दारात असतंय पोरं! तेंच्यासाठी तरी नाय म्हणू नका! वर्गणी करू पायजेल तर!” भय्या
मागच्या पोरांनी उगाच चेहरे केविलवाणे केले.
“भय्या! जास्त शिंगं आल्याली दिसत्यात, भडव्या माज आला व्हय रं! वर्गणी करणार का आता तू?” दादाला राग आला की तो त्याच्या गावच्या रांगड्या भाषेत बोलत असे. तो तसं बोलला की सगळे घाबरत.
“तसं न्हाय हो दादा साहेब! तुम्ही उलटा इचार घिऊ नगसा डोसक्यात. सज बोलून गेलो दादाराव. तुमी असताना वर्गणी हुईल का कदी गावात. अन म्हूनतर तुमच्यापशी आलो नव्हं का? चिरडीला जाऊ नगासा!” भय्या घाबरला.
“चला निघा तुम्ही सगळे मी बघतो. भय्या तू थांब!” दादा साहेब पुन्हा नॉर्मल झाले. त्या पोरांना कळेना. ती उगाच भय्याकडे बघू लागली.
“आरं, व्हय ना फुडं! कानात गड्डे घातल्यात का काय? दादा साहेब काय म्हनलं आयकलं नव्हं? निगा चला. हाला!” भय्या खेकसला. पोरं तकाट पळाली.
“भय्या आत्ता ऐकतोय. असली नसती थेरं नकोयत पुन्हा. कामाधंद्यांना लाव त्यांना म्हणजे डोकी शाबूत राहतील! परत कुणी असले हट्ट करायला लागले तर तूच चार शब्द ऐकवून गप्प करायचं त्यांना!” दादा साहेब
“पोरं सांभाळावं लागत्यात ना दादा साहेब!” भय्या
“आरं काय उपटायला अध्यक्ष झालायस व्हय? भलं बरं तुलाच कळत न्हाय तर तू काय झाट्टं सांभाळणार त्येंला? सगळी येड्या भोकाची आन तू त्याचा म्होरक्या. दलिन्दरी लक्षणं सालं. बरं का सायेब ही अशीच मरायची. ह्यांला उद्याची चिंताच न्हाय मजामस्ती पायजेल नुसती. एखाद्याला जा लाईनीवर कामाला म्हटलं तर गांडीत काटा फुटतो डुकरांच्या!” दादा साहेब गरजलाच.
“दादा साहेब थंड घ्या! यवढी बार फकस्त! पुन्हा माजी हमी! एकशे न एक टक्का! बास यवढी बार घ्या पदरात!” तो काकुळतीला आला.
“ठीक आहे थोड्या येळानं फोन करील पक्या तुला. काय पैशे बिशे पायजेत का?” दादाचा पारा चढलेलाच होता.
“नको, घिन मंग परत. जातो आता, आयघाल्यांची मुस्काडंच रंगवतो एकेकाची. येतो दादा साहेब.” भय्या.
भय्या उठला. त्याचा मूड बघून बाकीच्या सगळ्यांनीही भय्याबरोबर काढता पाय घेतला. कुणाला तरी फोन लावून दादा गाडीच्या दिशेने निघाला. त्याने तडक पुणे गाठले. पुण्यातही त्याचा मोठा बंगला होता. तिथे पोचला तर दारातच त्याचा पुण्यातला मॅनेजर दोशी उभा होता.
“नमस्ते दादा साहेब!” गाडीचा दरवाजा उघडत दोशी बोलला.
“नमस्ते दोशी, पुढच्या शनिवारी कार्यक्रम आहे गावात होळीचा. ते लढेगावला लोकांनी काय प्लानिंग केलय ते पहा आणि सांगा मला दहा मिनिटांत.” पुन्हा फोन कानाला लावत तो आत गेला. दोशीनेही कुणाला तरी फोन लावला. थोड्या वेळाने आत येऊन दोशीने त्याला सगळं समजावून सांगितलं.
“आईच्या गावात ह्या भय्याच्या नसती गाढवं उडवून घेतं येड्झवं कुठलं!” दादा पुन्हा पिसाळला.
“आज काय काम आहे का दादा साहेब?” दोशी चपापला.
“आपल्यालापण एखादी नटी बघा, टीव्ही ऍक्टरच बघा.” दादा साहेब
“ठीक आहे! पंधरा मिनिटांत कळवतो!” दोशी
“आणि हो दोशी! आज रात्रीसाठी सोय करा. आणि मागच्या वेळीसारखी मेंगळट नको! नीट बघून घेत जा जरा!” दादा साहेब
“ठीक आहे साहेब!” म्हणून दोशी बाहेर गेला.
दादा तसं सुपारीही खात नसे तो पण पुण्याला आला की एखादी अप्सरा मागवून कार्यक्रम त्याचा ठरलेलाच असे. बायकांचं मोठं व्यसन होतं त्याला. आणि म्हणूनच त्याने अजून लग्नही केलेलं नव्हतं.
“साहेब दहा बारा बघितल्या पण होळी म्हटलं की नको म्हणत आहेत. एक आहे सुलेखा, ती तयार आहे! पण सशर्त!” तो चाचरत बोलला आणि त्याने मोबाईल मधील तिचा फोटो त्याने दादासमोर धरला.
“बोला तिच्याशी आणि ठरवा! तशी बऱ्यापैकी फेमस आहे ती. आणि ते लढेगाववाले तरी काय अशी खूप तरुण आणणार आहेत, तेव्हा त्यांच्यापेक्षा कैक पटींनी चांगलीच आहे. ही फायनल करा!” म्हणून तो बेडरूममध्ये निघून गेला.