मोहिनी

मोहन आणि मोहिनी तसे सुखी दांपत्य. मोहन एका बड्या कंपनी चांगल्या पदावर नोकरी करत होता तर मोहिनी गृहिणी. तसा संसार सुखाचा होता मात्र दोघांना एका गोष्टीची कमी प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे लग्न होऊन ६ वर्ष उलटली तरी अजुन घरात पाळणा हलला नव्हता.
एक दोनदा मोहिनी गरोदर राहिली होती मात्र गर्भ उदरात टिकला नव्हता. ह्याची खंत मोहिनीस नेहमीच सतावत होती. बाळासाठी तिचे मातृप्रेम आसुसले होते.
तसा तिच्यात दोष काहीच नव्हता दोष होता तो मोहनमध्ये. विर्याचे पातळपण, शुक्राणूची कमतरता असं निदान डॉक्टरने केलं. त्यासाठी मोहनला काही औषधे, टॉनिक तसेच पथ्य पाळण्यास सांगितले. इतके सारे करूनही म्हणावा तितका फरक अजुन पडला नव्हता.
मूल होतं नाही म्हणून नातेवाईकांचे तसेच शेजारी पाजाऱ्यांचे सतत टोचणारे शब्द मोहिनीचे काळीज नेहमीच चिरत होते. मूल न होण्यामागील सत्य मात्र त्या दोघांनाच ठावुक होते. पण करणार काय?
पण म्हणतात ना मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. तशीच काहीशी अवस्था मोहिनीची झाली. तोंड दाबून, शाब्दिक बुक्क्यांचा मार ती निमुट पणे सहन करत दिवस ढकलत होती.
मोहिनी तशी दिसायला साक्षात मोहिनीच होती. चाफेकळी नाक, खळीदार गाल, गोरा वर्ण, काळेभोर डोळे, भरगच्च बांधा, पाहणाऱ्यावर प्रथम दर्शनीच तिच्या रूपाची मोहिनी पडत असे. शिवाय बोलणेही अतिशय लाघवी. मोहन तिच्या प्रेमात पडला त्यात नवल ते काय?
मोहन व मोहिनीने प्रेम विवाह केला होता. कदाचित त्याचमुळे घरात आणि नातेवाईकांत सतत टोमण्यांना सामोरे जावे लागत असावे. मात्र एके दिवशी या टोमण्यांचा अगदी कहर झाला.
त्याचे झाले असे की, मोहनच्या घरी कोणा नातेवाईकाने बारशाचे आमंत्रण दिले. सहाजीक मोहिनीच्या सासुने मोहिनीस तिथे पाठवले. मोहिनी सुद्धा छान तयारी करून सायंकाळी त्या नातेवाईकाच्या घरी गेली.
बारशाचा कार्यक्रम सुरु झाला तशा सुहासिणी स्त्रीया बाळंतिणीची ओटी भरू लागल्या. रिवाज म्हणून मोहिनीही ओटी भरायला सरसावली मात्र, घोळक्यातून एक आवाज आला.
“थांब!”
मोहिनीने मागे वळून पाहिले. तो आवाज बाळंतीणीच्या सासुचा होता. अचंबित होतं मोहिनी तिच्याकडे पहात राहिली. घोळक्यातून पुढें येत ती म्हणाली,
“तिथेच थांब! वांझोट्या बाईकडून आम्हास ओटी भरून घ्यायची नाही. तुझ्या ओटीची काही गरज नाही.”
तिचे ते शब्द मोहिनीच्या वर्मी लागले. त्या शब्दांनी ती पुरती कोलमडून गेली. तिचा टवटवीत प्रफुल्ल चेहरा पुरता मलुल झाला. डोळ्यासमोर अंधार दाटून आला. गंगा यमुना उमडून वाहु लागल्या. खिन्न मनाने ती त्या समारंभातून बाहेर पडली.
आपल्याच विचारांच्या तंद्रीत ती त्या नातेवाईकांच्या बिल्डिंगच्या बाहेर पडताक्षणी ती एका इसमास धडकली अन तिची तंद्री भंग पावली. चमकुन तिने त्या इसमाकडे पाहिले.
त्याला पाहताक्षणी तिच्या मनाचा बांध फुटेला. ती त्या इसमास बिलगुन हमसून रडू लागली. तो इसम म्हणजे तिचा पती मोहन होता.
त्याने प्रेमाने मोहिनीला थोपटले. तिचे सांत्वन केले व काय घडले ह्याची चौकशी करू लागला. मोहिनीने घडला प्रकार त्याच्या कानावर घातला. विस्तृत घटनाक्रम ऐकताच मोहनची तळपायाची आग मस्तकात गेली.
दात ओठ खात तो जाब विचारण्यास इमारतीत शिरणार इतक्यात मोहिनीने त्यास रोखले व म्हणाली,
“जाऊ दे मोहन. पुन्हा आपल्याला असे समारंभ नको आणि नको ते नातेवाईक. त्यापेक्षा आपण कुठे दुसरीकडे रहायला जाऊ. राजा राणीचा संसार करू. थकले रे आता सततचे टोमणे ऐकून ऐकून. राहायचं का आपण वेगळे? सांग ना राहायचं का आपण वेगळे?”
मोहनला तिचे म्हणणे पटले. त्याने आपला रुकार तिला कळवला तशी मोहिनीची मलूल कळी सुहास्य खुलली.
मोहन, मोहिनी आता आई वडिलांच घर सोडून दुसरीकडे भाड्याने घर घेवून रहायला आले. राजा राणीचा नवा संसार सुरु झाला. आता रोजच्या टोमण्यातुन तिची मुक्तता झाली होती. पण म्हणतात ना नव्याची नवलाई नऊ दिवस तसेच काही मोहिनीचे झाले.
काही दिवसातच मोहन त्याच्या कामात व्यस्त झाला. मोहिनीला दोघांच्या जेवणा व्यतीरिक्त काही काम नसल्यामुळे दिवस खायला उठत असे. वेळ जाता जात नव्हता. एकटेपणाच्या जाणिवेतून बाळ नसल्याची खंत तिव्रतेने जाणवू लागली.
डोळ्यात प्राण आणून ती मोहनची वाट पाहत बसायची. तो आला की तिल हायसं वाटत असे. बाळाच्या ओढीने ती मोहनला ह्या ना त्या कारणाने रिझवत असे. मोहनही तिला शक्य तितकी साथ देत होता. पण दैव? ते अजुन रुसलेलं असावं. घरात पाळणा हलण्याची काही चिन्ह दिसेनात. बघता बघता वर्ष सरले.
बाळाच्या ओढीने मोहिनी दिवसेंदिवस चिंताक्रांत दिसू लागली. दिवसभर घरात बसून आपल्याच विचारात मग्न असायची. शेजारी पाजारीही ती सहसा जात नव्हती. न जाणे कुणी बाळाचा विषय छेडला तर? ह्याचं भितीपोटी ती जाणे टाळत होती.
एके दिवशी दुपारी अशीच विचारात मग्न असता दाराची बेल वाजली व मोहिनीची तंद्री भंग पावली. तिने दार उघडले. समोर १८/१९ वर्षाचा युवक उभा होता. तिने दार उघडताच तो म्हणाला,
“नमस्कार वाहिनी मी सुहास. आताच शेजारच्या फ्लॅट मध्ये रहायला आलोय. सामानाची लावालाव अजुन करायची आहे. ज़रा एक बाटली थंड पाणी मिळेल का?”
त्याने पाणी मागताच मोहिनीने त्यास नखशिकांत न्याहाळले व म्हणाली,
“थांब हां आता आणते.”
असं म्हणत तिने दरवाजा चैन मध्ये अडकवला व पाणी आणायला किचन मध्ये गेली.
किचन मधून बाटली घेऊन आली व पुन्हा दरवाजा उघडला. पाहते तो त्या मुलांची आई त्याचा मागे उभी होती. मोहिनीने दरवाजा उघडताच ती पुढे होतं म्हणाली,
“नमस्कार मी सुहासची आई. म्हटलं एकट्या मुलाला पाहुन कोणी पाणी देईल न देईल म्हणून ह्यांच्या मागोमाग आले.”
मोहिनी हसली व म्हणाली,
“त्यात काय इतकं मी पाणी देतच होते. आता आलाच आहात तर या आत. पटकन चहा ठेवते.”
तिच्या म्हणण्यास नकार देत सुहासची आई म्हणाली,
“आता नको, बरचं काम पडलय नंतर येऊ आम्ही.”
त्या बाईचा नकार पाहुन मोहिनी अधिक आग्रह करत तिला म्हणाली,
“नंतर याल तेव्हा याल पण आता या. दुरुन आला आहात. चहा घ्या थकवा दूर होईल. अन काम करण्यास सुद्धा उत्साह येईल.”
मोहिनीचे ते आपुलकीचे लाघवी बोलणे ऐकून सुहासच्या आईला तिचा आग्रह मोडवला नाही. तिने हसून रुकार दिला. दोघे माय लेक आत आले व हॉल मधील सोफ्यावर बसले. मोहिनी “आलेच,” म्हणून किचनमध्ये गेली अन दोघे मोहिनीचे घर अर्थात हॉल न्याहळू लागले.
मोहिनीने घर अगदी छान सजवले होते. साफ़ आणि टापटिप होते. ते पाहुन दोघांसही प्रसन्न वाटले.
काही वेळातच मोहिनी चहाचा ट्रे घेऊन आली. सोबत बिस्कीटांची सरबराई होती. ते पाहुन सुहासची आई म्हणाली,
“कशाला इतकी तसदी घेतली? चहा पुरेसा होता.”
तिचे बोल ऐकून मोहिनी उत्तरली,
“कशाला काय? तुम्ही तिकडून आता सामान घेऊन आलात. म्हणजे जेवण झाले नसणार? आणि सामन लावून जेवण बनवेपर्यंत बराच वेळ जाणार. तो पर्यंत पोटाला आधार म्हणून बिस्कीटे खाऊन घ्या. म्हणजे काम करण्यास हरुप येईल. काय सुहास बरोबर ना?”
अचानक झालेल्या प्रश्नाने सुहास भांबावला. काही न बोलता त्याने माननेच होकार भरला. तिच्या प्रश्नावर मग सुहासची आई उत्तरली,
“सुहास थोड़ा मितभाषी आहे. मी पाठवाला म्हणून नाइलाजाने आढेवेढे घेत आला. त्यामुळेच मला त्याच्या मागून यावे लागले. म्हटलं पाणी मागतोय की नाही? त्याला वेळ लागतो ओळख करून घ्यायला. म्हणून त्याचे मित्रही फारसे नाहीत. कॉलेजमध्ये आहेत का नाही हे ही माहीत नाही.”
तिच्या उत्तरावर मोहिनी म्हणाली,
“असं आहे होय. पण बरं केलेत तुम्ही स्वतः आलात त्यामुळे ओळख तर झाली. मोहिनीच्या म्हणाण्यास दुजोरा देत सुहासची आई उत्तरली, हो हे मात्र खरे आहे.”
चहापाणी आणि जुजबी ओळखपरेड संपवून माय लेक मोहिनीचा निरोप घेऊन निघाले. मोहिनीने दरवाजा लावून घेतला व आपल्या कामात गुंतली.
दुपारची वमकुक्षी घेऊन मोहिनी संध्याकाळच्या वेळेस सुहासच्या घरी पोहचली. दरवाजा उघडाच होता. बहुतेक सामानाची आवाराआवर झाली होती. निदान बाहेरून मोहिनीस तसेचं जाणवले होते. तिने बाहेरूनच आवाज दिला,
“येऊ का आत?”
तिला पाहताच सुहासची आई हसत सामोरी गेली व म्हणाली,
“अगं अशी विचारतेस काय.? बेधड़क ये आपलच घर समज.”
मोहिनी आत येऊन हॉलमधल्या खुर्चीवर विसावली व म्हणाली,
“झाली का सर्व आवाराआवर?”
“हो आताच झाले. काही छोटी मोठी कामं आहेत ती करता येतील सावकाश.” सुहासची आई उत्तरली,
गप्पांच्या ओघात मोहिनीने संपूर्ण घर फिरून पाहिले. संपूर्ण सामान अगदी व्यवस्थित जागच्या जागेवर लावले होते. जणू ते आज नाही आधीपासूनच रहात असावेत.
तिने आश्चर्याने त्याबद्दल सुहासच्या आईला विचारले. त्यावर ती हसत उत्तरली,
“ही सर्व सुहासची कर्तबगारी. हुशार आहे तो ह्या कामात आणि त्याला आवडही आहे. घरातील बहुतेक कामं तोच करतो. जसे फिटिंग, पेंटिंग, लाईटींग वगैरे. शिवाय मलाही माझ्या कामात मदत करतो. “
सुहासच्या आईच्या उद्गारांनी मोहिनी प्रभावित झाली व सुहासकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली, “अरे वाह तुमचा सुहास भारीच हुशार दिसतोय.”
सुहास एका बाजूला वायरचं जंजाळ खोलून काहीतरी टेस्ट करत होता. मोहिनीच्या वाक्यावर त्याने छोटसं स्मित केले व आपल्या कामात गुंग झाला.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तसेच त्यांच्याबद्दल बहुतेक माहिती घेऊन मोहिनी आपल्या घरी आली. गप्पांच्या ओघात तिला कळले होते की सुहासची आई कामावर जात होती. सुहास सकाळी कॉलेजला जात होता. माय लेक दोघही फार सज्जन वाटली.
घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. सुहासचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. सुहास त्यांचा एकुलता एक मुलगा. सालस, मितभाषी पण हरहुन्नरी. वडिलांच्या पश्चात आईनेच सुहासला लहानाचे मोठे केले होते. चांगले संस्कार दिले होते. वडिलांच्या ठिकाणीच सुहासच्या आईला अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती.
मोहिनीला एक चांगली सोबत मिळाली. आता सुहासकडे येणे जाणे नेहमीचे झाले. काही दिवसातचं सुहास सुद्धा तिच्याशी छान गप्पा मारू लागला.
मोहिनी होतीच इतकी लाघवी की, एक दिवस जरी ती सुहासच्या घरी गेली नाही तर सुहासची आई तिला भेटायला घरी येत असे. सुहास सुद्धा कधी कधी दुपारच्या वेळी गप्पा मारायला तिच्या घरी जात असे. तिची काही छोटी मोठी काम असतील ती करून देत असे. मोहिनी सुद्धा घरी काही विशेष बनविले असेल तर सुहासला तसेच त्याच्या आईला आवर्जून देत असे.
अलीकडे तिच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेघ काहीशी धूसर झाली होती. पूर्वीसारखा एकटेपणाही जाणवत नव्हता. असं असलं तरी प्रत्येक वेळी कोणी बोलायला असेल असही नाही ना? मग कधी कधी एकांतात आसुसलेलं मातृत्व उसळी मारायचं आणि मन पुन्हा निराशेकडे झुकायचं.

मोहिनी भाग : ४

आपल्याच विचारात हरवलेल्या मोहिनीची तंद्री सुहासच्या हाकेने भंग पावली.“कुठे हरवलात वाहिनी? दोनदा हाक दिली तुमच लक्षच नाही?”“नाही रे सहज विचार करत होते. तुला काही हवं का?”“हो थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय.”“आवडलं तुला? हे घे.”असं म्हणत तिने ताटात भात वाढला.“हो आवडलं....

मोहिनी भाग : ३

घरी येताच मोहिनी आपल्याच विचारात हरवून बसून राहिली. नेहमी एकटी असली की तिचं असंच होतं असे पण आज कारण जरा वेगळंच होतं. अर्थात मुलाची असूया हेच त्यामागचे एकमेव कारण होतेचं, त्यात सुहासच्या रक्त गटाने तिचे मन विचलित केले.कितीतरी वेळ दोलायमान अवस्थेत ती तशीच बसून राहिली....

मोहिनी भाग : २

काही महिने असेच गेले. सुहासचं येणे जाणे नित्याचे झाले. आता मोहिनीला ही त्याची सवय झाली होती. तो एखादे दिवस आला नाही तरी मोहिनीला चुकल्या चुकल्यासारखे वाटत असे.असाच एके दिवशी तो आला नाही म्हणून मोहिनी त्याला पहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवली पण बराच वेळ...

error: नका ना दाजी असं छळू!!