मोहिनी भाग : ४

आपल्याच विचारात हरवलेल्या मोहिनीची तंद्री सुहासच्या हाकेने भंग पावली.
“कुठे हरवलात वाहिनी? दोनदा हाक दिली तुमच लक्षच नाही?”
“नाही रे सहज विचार करत होते. तुला काही हवं का?”
“हो थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय.”
“आवडलं तुला? हे घे.”
असं म्हणत तिने ताटात भात वाढला.
“हो आवडलं. तुम्ही स्वयंपाक छान करता. तुमच्या हाताला वेगळीच चव आहे.”
“मग रोज ये दुपारचा जेवायला. त्या निमित्ताने मलाही सोबत होईल.” मोहिनी हसत म्हणाली.
“ते ठीक आहे पण कॉलेजवरून येता येता खूप उशीर होईल ना? आता घरी आहे तो पर्यंत ठीक आहे पण कॉलेजला गेल्यावर काही सांगता येणार नाही.”
“पण कॉलेज दुपारीच सुटते ना? जेवायच्या वेळेला घरी येऊ शकतो.”
“ज्या दिवशी लवकर येईन तेव्हा नक्की येईन.”
“आणि उशिरा येशील तेव्हा काय समजू? कोणाबरोबर गेला?” मोहिनी मिश्किलपणे म्हणाली.
सुहास कावरा बावरा होत म्हणाला,
“तसं नाही. कधी कोणी मित्र भेटला किंवा ट्राफिक असले तर उशीर होऊ शकतो ना.”
“खर सांग हा मित्र की मैत्रीण?”
मोहिनीच्या प्रश्नावर सुहास चक्क लाजला व काही न बोलता गप्प बसला.
“अच्छा. म्हणजे मैत्रीण आहे तर?”
सुहास लाजत म्हणाला,
“हो पण आईला काही बोलू नका.”
“बरं. हरकत नाही. कर एन्जॉय. आता नाही करणार तर कधी करणार?”
जेवण आटपून सुहास आराम करायला घरी निघाला मात्र मोहिनीने रोखले त्याला म्हणाली,
“बस थोडा वेळ गप्पा मारू. नाही तरी सकाळपासून झोपाचं काढतो आहेस.”
तिचा आग्रह त्याला मोडवला नाही.
गप्पांच्या ओघात ती त्याच्याशी जवळीक साधत त्याला विचलित करू लागली. बाजारात जाताना तिने नेसलेली साडी आज तशीच होती. अधून मधून तिचा पदर ढळत होता आणि सुहास नजर चोरून बसत होता.
आज सुहास मोहिनीचे नवे रूप अनुभवत होता. सहाजिक नेहमीचा परिचय असूनही तो आज जरा गोंधळालाच. कसे आणि काय बोलावे हेच सुचेनासे झाले. सरते शेवटी, “वहिनी, आता थोडा वेळ आराम करतो, तुम्ही ही करा,” म्हणत तो घरी जाण्यास निघाला.
तेव्हा मोहिनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली,
“उद्या जेवायला येशील ना घरी?”
तिच्या बोलण्यावर सुहासने मानेने होकार दिला व घरी येऊन पहुडला.
मोहिनीच्या स्पर्शाची भाषा, तिच्या सततच्या ढळणाऱ्या पदराने आपले काम चोख केले. नकळत सुहासचे मन विचलित झाले. त्याच्यातील पुरुषाने त्याची झोप उडवली आणि संपूर्ण दुपार तळमळण्यात गेली.
संध्याकाळी आई घरी येताच सुहास बिछान्यातून उठला व फ्रेश होऊन बसला न बसला तोच मोहिनी घरी आली व सुहासच्या चेहऱ्यावर स्मित लकेर उमटली.
घरात प्रवेश करताच ती सुहासकडे पाहून सूचक हसली व म्हणाली,
“काय सुहास झोप पूर्ण झाली की नाही? कसं वाटतेय आता?”
तिचा आवाज ऐकून सुहासची आई किचनमधून बाहेर आली व म्हणाली,
“तूच बघ कसा दिसतोय? कालच्या पेक्षा चेहऱ्यावर तेज दिसतंय नाही?”
आईच्या प्रश्नावर मोहिनी उत्तरली,
“मग दिसणारच ना. दुपारी पोटभर जेवलाय तो. त्यामुळेच फ्रेश झालाय.”
तिच्या उत्तरावर सुहासची आई हसली व म्हणाली,
“ही तुझीच कृपा आहे बर का. माझ्या पाठीमागे तुत्याची खूप छान काळजी घेतली. खरंच तुझे उपकार कसे मानावे हेच कळत नाही.”
सुहासच्या आईचे तिच्या प्रती कृतज्ञतेचे उद्गार ऐकून ती म्हणाली,
“अहो उपकार कसले त्यात, मी परकी आहे का तुम्हाला? आणि तुम्ही तरी मला परक्या आहात का? काय रे सुहास मी परकी आहे का कोणी?”
मोहिनीच्या प्रश्नावर सुहासने काही न बोलता नकारार्थी मान हलवली व मोहिनी आईशी बोलण्यात गुंतली.
मोहिनी सुहासच्या आई सोबत चांगली तासभर बोलत बसली. इतक्या वेळात सुहास मोहिनीला चोरून न्याहाळत होता.
मोहिनीच्या मोहिनीची ही जादू होती. त्याने सुहासची नजर बदलली होती. मोहिनीच्या ते चांगलेच लक्षात आले. कारण ती मध्येच त्याच्याकडे लक्ष टाकता सुहासची नजर खाली जात होती पण मोहिनीची त्यावर बारीक नजर होती.
तिने पटकन हेरले की मासा गळाच्या आसपास घिरट्या घालतोय, आता अडकण्यास वेळ नाही लागणार. सुहासमधील हा बदल पाहून ती मनोमन सुखावली व निश्चिंत मनाने घरी आली.
दुसऱ्या दिवशी मोहिनीला वाटले होते की, आज सुहास लवकर घरी येईल पण तसे झाले नाही. साहजिक तिचा हिरमोड झाला. दुपारचा १ वाजून गेला तरीही सुहास आला नाही म्हणून ती त्याला पहायला त्याच्या घरी गेली पण सुहास तिथे नव्हता.
ती हिमुसली होऊन माघारी वळली व घरी येऊन बसली. आता वाट पाहण्याशिवाय तिच्या हाती काहीच नव्हते. वेळ जावा म्हणून ती मासिक चाळत बसली पण मन त्यातही रमेना.
ती विचार करू लागली. ‘एकंदर काल असंच वाटलं होतं की सुहास आकर्षित होतोय मग आज असे काय झाले की तो आला नाही? शिवाय घरी सुद्धा नाही. मग गेला तर कुठे गेला? कदाचित कॉलेजला गेला असेल? मैत्रिणीला भेटावेसे वाटले असेल? बघू आल्यावर कळेलच. चला आलिया भोगाशी असावे सादर.’
कितीतरी वेळ ती आपल्याच मनाशी संवाद साधत असताना दाराची बेल वाजली. तिने दार उघडले तर दारात सुहास उभा होता. त्याला पाहताच तिची कळी खुलली. तिने त्याच हसत स्वागत केले व म्हणाली,
“काय सुहास? तब्बेत अगदी ठणठणीत झालेली दिसतेय?”
सुहास स्मित हास्य पेरत म्हणाला,
“हो. आता एकदम फ्रेश आहे. कॉलेजला गेलो होतो.”
“अच्छा. म्हणून आज यायला इतका उशीर झाला?”
“हो. थोडा बॅकलॉग भरून काढायचा होता ना. म्हणून उशीर झाला.”
मोहिनी मिश्किलपणे म्हणाली,
“नक्की कोणता बॅकलॉग? अभ्यासाचा की आणखी कोणता?”
सुहास भांबावल्या मनाने म्हणाला,
“अ.. अ.. अभ्यासाचाचं. खरंच.”
मोहिनी हसत म्हणाली,
“बरं बरं. अभ्यासाचाचं. बाकी तू लाजतो छान हा.”
ती त्याच्या गालाला स्पर्श करत म्हणाली,
“अगदी गोड दिसतोस.”
मोहिनीच्या बिनधास्त बोलण्याने नेमके कसे व्यक्त व्हावे हेच त्याला कळेनासे झाले त्यामुळे भांबावलेला सुहास अधिक भांबावला व नकळत मूक झाला. इतके मात्र खरे की, मोहिनीचा स्पर्श त्यास सुखावून गेला.
चाणाक्ष मोहिनीने त्याची ती अवस्था जाणली व त्याला बोलते करण्यास म्हणाली,
“मग जेवायला बसायचं ना? तुझ्या आवडीचं जेवण खास तुझ्यासाठी बनवले आहे. मग बसुया?”
मोहिनीच्या बोलण्यावर सुहासने रुकार दर्शिविला आणि ते दोघे बसले जेवायला.
एक दोन दिवस असेच गेले. मोहिनी त्याला विचलित करण्याचा हर प्रयत्न करत होती पण त्याचं पाऊल काही पुढे सरकत नव्हते. तो तिच्याकडे आकृष्ट तर झाला होता हे त्याच्या नजरेतून तसेच देहबोलीतून जाणवत होते पण त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळे मोहिनीला अभिप्रेत असणारा पवित्रा त्याने अजून तरी घेतला नव्हता. त्यामुळे सहाजिक मोहिनीचा हिरमोड झाला.
आपलं इप्सित साध्य करायचं असेल तर एक घाव दोन तुकडे करायलाच हवे त्याशिवाय आपले स्वप्न साकार होणार नाही हे मोहिनीने ताडले.
सुहास पुढे येत नाही तर आपणच पुढे होऊ, काही ही झाले तरी लवकरात लवकर सुहासला वश करायलाच हवे असे तिने मनोमन ठरवले आणि तशी संधी तिला दुसऱ्याचं दिवशी उपलब्ध झाली.
मोहन कामावर निघून जाताच मोहिनी किचन आवरून अंघोळीला जाण्याच्या विचारात होती इतक्यात दाराची बेल वाजली.
रात्रीची पारदर्शक नाईटी अजूनही तिच्या अंगावर होती. तिने दाराच्या झरोक्यातून बाहेर पाहिले तर सुहास उभा होता. सुहासला पाहताच तिचा चेहरा आनंदाने फुलला. हीच ती योग्य संधी आहे असा विचार करत तिने झटकन दरवाजा खोलला.
झिरझिरीत नाईटीतुन डोकावणाऱ्या त्या चंद्राच्या तेजाने सुहास दिपून गेला. काही क्षण तो भारावून गेला. मात्र पुढच्याच क्षणात भानावर आला अन आत जावे न जावे याचं विचारात दारावर घुटमळळा.
त्याच्या पुढच्याच क्षणाला मोहिनीने त्याचा हात धरून त्याला आत ओढला आणि बेसावध तो तिच्या अंगावर धडकला. सावध मोहिनीने चपळाईने दरवाजा बंद केला आणि काही कळण्याच्या आतच मेणाचा पुतळा मोहिनीच्या आचेत विरघळून गेला.
अनपेक्षित अशा या घटनेने सुरवातीस भांबावलेला सुहास सायंकाळी एका वेगळ्याच समाधानाने मोहिनीच्या घरातून बाहेर पडला. जागा झालेल्या अन सुखावलेल्या पुरुषाने सुहासचा चेहरा मोहरा बदलून टाकला. मोहिनीच्या सौंदर्याचे मधु प्याले तो एकावर एक रिचवू लागला. परिणाम व्हायचा तोच झाला.
एकीकडे मोहिनीला दिवस गेले आणि दुसरीकडे सुहास कामाक्षीच्या व्यसनात इतका अडकला की, कॉलेजला वरचेवर दांड्या मारू लागला. इतकेच काय प्रेयसीतही त्याचे मन रमेनासे झाले. मोहिनीचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला. तिच्या पाशात तो पूर्णतः गुंतून गेला.
मोहिनीचा हेतु साध्य झाल्याने तिला आता थांबायचे होते. पण सुहास? सुहास मात्र थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. मोहिनीच्या देहाची आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो कधी मनधरणी करून तर कधी प्रसंगी बळजबरीने आपली कामेच्छा पूर्ण करून घेऊ लागला.
पण मोहिनी त्याला त्यास रोखू शकत नव्हती तिचा नाईलाज होतं होता. तिने सुहासला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण सुहास आता समजण्याच्या पलीकडे गेला होता. अशात दोन महिने होऊन मोहिनीला आता तिसरा महिना लागला.
मोहिनीला दिवस गेल्याचे कळताच तिच्या घरी आता नातेवाईकांचा गोतावळा जमू लागला. मोहिनीचे सासू, सासरे तसेच आई, वडील यांचे वरचेवर येणे जाणे सुरु झाले. कधी कधी मुक्कामी राहू लागले. त्यामुळे सुहासची कुचंबणा होऊ लागली.
त्याला संधी मिळेनासी झाली आणि यदाकदाचित मिळाली तरी मोहिनी शिताफीने त्यास परावृत्त करत होती. पण कुठवर करणार? काही झाले तरी सुहास तिच्या देहाशी खेळणार हे ती ही जाणून होती.
यातून सुटका करून घ्यायची असेल तर एक मार्ग होता तो म्हणजे हे राहतं घर सोडून जाणे. त्याशिवाय सुहासचा ससेमिरा सुटणार नाही आणि तसं झाल नाही तर एक ना एक दिवस हे सुहास प्रकरण आपल्या अंगलट येईल याची जाणीव तिला झाली.
एकीकडे मोहिनीने घर सोडण्याचा विचार केला आणि नियतिची तिला साथ मिळाली. नातवासाठी आसुसलेली तिची सासू तिला घरी येण्यासाठी गळ घालू लागली. मोहिनीला तेच हवे होते ती पटकन त्यास तयार झाली व सुहासला काहीच कळू न देता ती निघून सुद्धा गेली.
सर्व काही आलबेल झाल्यावर पुढील दोन एक दिवसात मोहनने सर्व सामान टेंपोत भरले व चावी मालकाच्या ताब्यात देऊन आपल्या मुळं मुक्कामी म्हणजेच आपल्या आई वडिलांकडे परतला.
मोहिनी निघून जाताच सुहास वेडापिसा झाला. त्याच वेडात मोहिनीचे शरीर सुख त्याने प्रेयसीकडून मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सपशेल आपटला व ती सुद्धा त्यास झिडकारून निघून गेली. हरलेल्या सुहासने मग व्यसनास जवळ केले.
तिकडे मोहिनीच्या आनंदास काही पारावार नव्हता. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतं होता. यथावकाश गोंडस मुलगा झाला. तो कलेकलेने वाढू लागला. मोहिनीचा वांझोटा डाग पुसला गेला. पण ज्याच्यामुळे हे शक्य झाले तो सुहास मात्र आयुष्यातून उठला. व्यसनास जवळ केल्याने दिवसेंदिवस खंगत चालला.
एकीकडे एका कोवळ्या जीवाचा उदय झाला तर दुसरीकडे ऐन भरात आलेल्या दुसरा जीव अस्ताचळी चालला होता. कोण जबाबदार होतं त्याच्या ऱ्हासाला? मोहन? जो वैद्यकीय दृष्ट्या असमर्थ होता, की मोहिनी? जिचा आई होण्याचा मार्ग चुकला होता.
का स्वतः सुहास? जो कोवळ्या वयात शारीरिक सुखाच्या आहारी गेला. की बुरसटलल्या रूढी, परंपरेत अडकलेला आपला समाज? ज्यांनी वांझोटेपणाचा शिक्का मोहिनीच्या माथी मारला होता. कोण. कोण जबाबदार होतं या संपूर्ण घटनेला?

मोहिनी भाग : ३

घरी येताच मोहिनी आपल्याच विचारात हरवून बसून राहिली. नेहमी एकटी असली की तिचं असंच होतं असे पण आज कारण जरा वेगळंच होतं. अर्थात मुलाची असूया हेच त्यामागचे एकमेव कारण होतेचं, त्यात सुहासच्या रक्त गटाने तिचे मन विचलित केले.कितीतरी वेळ दोलायमान अवस्थेत ती तशीच बसून राहिली....

मोहिनी भाग : २

काही महिने असेच गेले. सुहासचं येणे जाणे नित्याचे झाले. आता मोहिनीला ही त्याची सवय झाली होती. तो एखादे दिवस आला नाही तरी मोहिनीला चुकल्या चुकल्यासारखे वाटत असे.असाच एके दिवशी तो आला नाही म्हणून मोहिनी त्याला पहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवली पण बराच वेळ...

मोहिनी

मोहन आणि मोहिनी तसे सुखी दांपत्य. मोहन एका बड्या कंपनी चांगल्या पदावर नोकरी करत होता तर मोहिनी गृहिणी. तसा संसार सुखाचा होता मात्र दोघांना एका गोष्टीची कमी प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे लग्न होऊन ६ वर्ष उलटली तरी अजुन घरात पाळणा हलला नव्हता.एक दोनदा मोहिनी गरोदर...

error: नका ना दाजी असं छळू!!