मोहिनी भाग : ३

घरी येताच मोहिनी आपल्याच विचारात हरवून बसून राहिली. नेहमी एकटी असली की तिचं असंच होतं असे पण आज कारण जरा वेगळंच होतं. अर्थात मुलाची असूया हेच त्यामागचे एकमेव कारण होतेचं, त्यात सुहासच्या रक्त गटाने तिचे मन विचलित केले.
कितीतरी वेळ दोलायमान अवस्थेत ती तशीच बसून राहिली. काही करण्याचे भान तिला राहिलेच नाही. न जाणे अशाच अवस्थेत किती वेळ गेला. दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली.
तिने लगबगीने डोळे पुसले आणि दार उघडले व मोहन घरात आला. मोहनला आलेला पाहून तिच्या संयमाचा बांध फुटला ती मोहनला बिलगून हमसून रडू लागली. मोहनने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाला,
“काय झाल मोहिनी? कोणी काही बोलले का?”
त्याच्या प्रश्नावर मोहिनीने मूक नकारार्थी मान हलवली. त्याबरोबर मोहनने तिचा चेहरा ओंजळीत धरला व म्हणाला,
“ओ हो. राणीला चिंता सतावते आहे तर?”
त्याच्या या प्रश्नावर मोहिनीने पुन्हा तशीच होकारार्थी मान हलवली. ते पाहून मोहनने तिला जवळ ओढले व हसत म्हणाला,
“बस इतकंच. अगं मग त्यात निराश होण्यासारख काय आहे? बघ ना. अजून तरुण किती रात्र आहे. अन हा चंद्र माझ्या मिठीत आहे. फिर डरने की क्या बात है? पण त्या आधी खूप भूक लागलीय गं. जेवायला वाढ ना. तो पर्यंत मी फ्रेश होतो.”
मोहन मिश्किलीने हसत म्हणाला, “मग काय रात्र आपलीच आहे. काय?”
मोहनच्या बदलत्या मूडने मोहिनीचा चेहरा खुलला, व ती म्हणाली,
“हो आता वाढायला घेते.”
इतके बोलून तिने जीभ चावली व पुन्हा म्हणाली, “सॉरी म्हणजे विचाराच्या तंद्रीत भात लावायला विसरले रे.” त्याची मिठी सोडवत ती म्हणाली, “मी आता पटकन लावते. तू फ्रेश होईपर्यंत वाढायला घेते.”
तिची ती उडालेली धांदल पाहून त्याने पुन्हा तिला जवळ ओढले व म्हणाला,
“होईल ग सावकाश. काय घाई आहे? आपण एक काम करू दोघांनी मस्त शॉवर घेऊ आणि मग जेवणाला लागू.” डोळा मारत मोहन म्हणाला, “काय कशी वाटली आयडीया?”
त्याचा कावा ओळखून मोहिनी त्याला दूर ढकलत हसत म्हणाली,
“चल चावट कुठचा. जा फ्रेश हो लवकर. तो पर्यंत मी भात लावते आणि हो. ते तू काय म्हणत होता? हा. तरुण अजून रात्र आहे. पण काय आहे ना? चंद्र जरा कामात आहे. ते झालं की मग, चंद्रच काय संपूर्ण आकाश कवेत घे, माझी काहीच हरकत नाही.”
तिच्या शाब्दिक कोटीवर मोहन खळखळून हसला व तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला,
“मग सोडतो की काय.”
मोहनाची मिठी सुटत नाही पाहून ती त्याला समजावत म्हणाली,
“भूक लागलीय ना? मग तू सोडल्याशिवाय ती कशी मिटणार? भात लावायला हवा ना?”
तिच्या प्रश्नावर मोहन पुन्हा हसला व तिला अधिक घट्ट जखडत म्हणाला म्हणाला,
“तिच मिटविण्याचा प्रयत्न चालू आहे.”
त्याच्या मिश्कीलीवर मोहिनी खोटे खोटे रागावून म्हणाली,
“बस हा. आता पुरे झाला फाजीलपणा.” त्याला बाथरूम मध्ये ढकलत म्हणाली, “जा वाश घे लवकर. मी भात लावते.”
मोहिनीच्या चिडण्यावर मोहनने तोंड बारीक केले व मुकाट बाथरूममध्ये घुसला. त्याचा तो पडलेला चेहरा पाहून मोहनी हसली व भात लावायला किचनकडे वळली.
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मोहिनीचा फुललेला चेहरा रात्र उजळत गेला अन मोहनच्या मनाचा सागर उन्मादाच्या वाऱ्यासंगे बेभान होऊन, चंद्रास गवसणी घालण्या उसळी मारू लागला. विखुरल्या कुंतली जशी रातराणी सजली अन तिच्या गंधाने मोहनच्या मनावर मोहिनी घातली.
जणू भावनांनी भारलेली, ती रात्र मंतरलेली..
त्या मोहमयी क्षणानी, चांदण्या अंथरलेली..!!
उन्मादी एक नजर, नजरेस भिडलेली..
जादुई नायनांवर, वेडा जीव जडलेली..!!
स्पंदनांचे दोन वारु. वायु वेगे दौडलेली..
बाहुपाशांच्या शिखरी, आवेगाने भीड़लेली.!!
प्रीतकुंड चेतवून, अग्नि श्वासी विरलेली
खुल्या घन बटांतून, मोरपिस फिरलेली..!!
गोडवा अंगी लेवुन, रातराणी बहरलेली..
एक ओढ़ अनामिक, लागून हुरहुरलेली..!!
भावनांनी भारलेली, ती रात्र मंतरलेली..
उसवल्या चांदण्या कवेत घेऊन मोहन निद्रेच्या आधीन झाला.
पण मोहिनीला काही केल्या झोप येईना, तिच्या विचारांची शृंखला तुटता तुटत नव्हती. सुहासचा रिपोर्ट तिच्या डोळ्यासमोर नाचत होता. कारण त्याचा रक्त गट मोहनच्या रक्त गटाशी जुळत होता आणि त्यामुळेच तिच्या सारासार विचाराला सुरुंग लागत होता.
कुठेतरी तिच्या ऐकण्यात, वाचनात आले होते की, आई किंवा वडील या पैकी कोणा एकाचा रक्तगट मुलाला मिळतो. हाच विचार तिच्या मनात फेर धरू लागला व मोहन आणि सुहासचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला.
तिने किती तरी वेळा आला विचार झटकण्याचा प्रयत्न केला पण बाळाची तीव्र आस तिला पुन्हा तिथेच आणून सोडत होती. नैतिक अनैतिकतेच्या चक्रात भरडल्या मोहिनीला न जाणे कधी झोप लागली ती सकाळी मोहनच्या हाक मारण्याने जाग आली.
मोहनने हाक मारताच ती खडबडून जागी झाली. ती उठून बसताच मोहन तिला म्हणाला,
“काय राणी साहेब आज कामावर उपाशी पाठवायचा विचार आहे वाटते?”
“नाही रे. आता बनवून देते. कळत नाही आज कसा डोळा लागला?” मोहिनी गोंधळून म्हणाली.
“हरकत नाही. आज डबा नाही मिळाला तरी चालेल.” मोहन मिश्किलीने म्हणाला.
“का? देते ना बनवून. का बाहेर खायचा मूड आलाय?”
“तसं नाही गं. काय आहे. रात्री पोट आणि मन अगदी तृप्त झालंय. मग आज उपवास घडला तर बिघडलं काय?” मोहन हसत म्हणाला.
“सरळ सांग ना. बाहेरचं चमचमीत खायचं आहे. उगाच उपवासाचा बहाना कशाला?” मोहिनी लटक्या रागाने म्हणाली.
“घ्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तुझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून मी म्हणालो. आता तुझी तशीचं इच्छा असेल तर दे बनवून.”
“तसं नाही रे. बाहेरच खाऊन तब्बेत कशाला बिघडवून घ्या. पटकन पोळी भाजी करून देते.”
“बरं. चालेल. होऊ दे तुझ्या मनासारखं.”
मोहनने तिचे म्हणणे ऐकले या समाधानात ती गोड हसली व किचनकडे वळली.
मोहन कामावर निघून जाताच. तिने घराची आवराआवर केली. अंघोळ वगैरे आटपून ती सुहासच्या घरी आली. दारावची बेल वाजवताच सुहासची आई लगबगीने पर्स सांभाळत बाहेर आली. बहुतेक आज तिलाही उशीर झाला असावा.
दारात मोहिनीला पाहताच ती म्हणाली,
“मोहिनी, सॉरी आज उशीर झाला आहे. मी निघते. संध्याकाळी बोलू. हवं तर बस घरी. सुहास तसा जागाच आहे.”
सुहासच्या आईला निघालेली पाहून मोहिनीने विचारले, “सुहास बरा आहे ना आता?”
त्यावर सुहासची आई उत्तरली, “हो आता बरा आहे. रात्रीपासून ताप सुद्धा नाही.”
सुहासच्या आईचे उत्तर ऐकून मोहिनी आईला म्हणाली,
“बरा आहे ना? मग मी नंतर येईन. आता जरा बाजारहाट करून येते. तुम्ही निघा. मी सुद्धा थोड्या वेळात निघते.”
असं म्हणून ती पुन्हा माघारी वळली व सुहासची आई कामावर निघून गेली.
घरी येऊन तिने टीव्ही चालू केला. टीव्हीवर कोणती तरी मालिका सुरु होती पण तीचं मन त्यात काही केल्या रमेना. पाच एक मिनिटात टीव्ही पुन्हा बंद केला अन सुरु झाली विचारांची नवी मालिका.
दोन वेळा गर्भ राहूनही अतृप्त राहिलेलं मातृत्व. ते सासरकडच्यांचे टोमणे, शेजारपाजारी कुस्तीत बोलणे, या सर्वांवर वरताण त्या नातेवाईक म्हातारीचे वांझोटे उल्लेखणे व त्यामुळे झालेल्या मानसिक यातना.
मागील सारे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर तरळू लागले व मोहिनीने भीतिने आपले डोळे घट्ट मिटले अन घरात भयाण शांतता पसरली.
घामाघूम झाली मोहिनी काही वेळात भानावर आली. तिने फ्रीज मधून पाण्याची बाटली काढली व घटाघट अर्धी रिती केली. अन परिस्थिती पूर्वपदावर आली.
विचार शृंखलातून बाहेर पडताच मोहिनीने किचनमध्ये जावून अर्धा कप चहा ओतून घेतला. चहाचा घोट घेताच मनाला तरतरी आली. मग चेहऱ्यावर पाणी मारून, हलका मेकअप करून ती बाजारात निघाली.
बाजारातून येऊन जेवण वगैरे आटपून मोहिनी सुहासच्या घरी आली. बेल वाजताच सुहासने दरवाजा उघडला. मोहिनीने आता येत सुहासला विचारले,
“काय सुहास! तब्बेत काय म्हणतेय?”
“बरी आहे आता पण अजून जरा अशक्तपणा जाणवतो आहे.”
“हम्म. काही खाल्ले का?”
“हो सकाळी दुध बिस्कीट नंतर दोन सफरचंद खाल्ली?”
“आणि जेवण? त्याच काय? आईने काही केलाय का काही?”
“असेल पोळी भाजी. मी अजून काही पाहिले नाही.”
“मग सकाळपासून काय केलं?”
“काही नाही. फक्त लोळतोय. पण त्याचा सुद्धा कंटाळा आलाय. विचार करतोय अंघोळ करावी.”
“हम्म. बरोबर आहे लोळून सुस्ती चढणारच ना? जा. मस्त पैकी फ्रेश हो. त्या शिवाय सुस्ती उडणार नाही.”
“हो जातो आता.”
“ऐक. अंघोळ झाली की जेवायला घरी ये. गावठी तांदळाचा साधारण नरम भात लावते.”
“नको वहिनी. उगाच कशाला त्रास घेता? तसंही अजून जेवण नीटसं जात नाही. सफरचंद खाल्ली आहेत.” सुहास संकोचून म्हणाला.
“म्हणूनच नरम भात बनवते. जेवण घेतल्या शिवाय ताकद येणार नाही. जितकं जमेल तितकं खा. औषधाचा सकारात्मक परिणाम व्हायला हवा की नको?”
“पण.”
“पण नाही बीण नाही. यायचं म्हणजे यायचं. नाही तर मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही.”
“बरं येतो.” सुहास नाईलाजाने म्हणाला.
“छान. मग ये तर. मी वाट पाहते.”
सुहास अंघोळीला गेला तशी मोहिनी घरी आली. तिने गावठी तांदळाचा भात लावला. काही वेळाने सुहास घरी आला.
मोहिनीने दोन ताटं घेतली आणि वाढायला बसली. हे पाहून सुहासने विचारले,
वाहिनी तुम्ही सुद्धा जेवायच्या बाकी आहात?”
सुहासच्या प्रश्नावर मोहिनी उत्तरली,
“हो रे आज एकटीला जेवायचा कंटाळा आला. म्हणून तुला बोलावलं जोडीला. बरं.”
असं म्हणून सुहास खाली मान घालून जेवायला बसला.
जेवता जेवता मोहिनी सुहासला न्याहाळू लागली अन तिच्या मस्तकात विचारांची दाटी झाली. मनाचा मनाशी खल चालू झाला व तिचा कल अनैतिकतेकडे झुकू लागला.
ती विचार करू लागली. ‘हीच एकमेव संधी आहे जी सुहासच्या रुपात चालून आली आहे आणि ही संधी जर का वाया गेली तर? तर कदाचित बाळाचं स्वप्न केवळ स्वप्न बनून राहील व कधीही न पुसला जाणारा वांझोटा शिक्का कायम आपल्या माथ्यावर राहील.
हा जीवघेणा शिक्का पुसायचा असेल तर सुहासला वश करायला हवे. कोणाला काहीच कळणार नाही. कारण पुढचा मार्ग निर्धोक असेल नव्हे तर सुहासच्या रक्त गटाने तो आधीच निर्धोक करून ठेवला आहे.’

मोहिनी भाग : ४

आपल्याच विचारात हरवलेल्या मोहिनीची तंद्री सुहासच्या हाकेने भंग पावली.“कुठे हरवलात वाहिनी? दोनदा हाक दिली तुमच लक्षच नाही?”“नाही रे सहज विचार करत होते. तुला काही हवं का?”“हो थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय.”“आवडलं तुला? हे घे.”असं म्हणत तिने ताटात भात वाढला.“हो आवडलं....

मोहिनी भाग : २

काही महिने असेच गेले. सुहासचं येणे जाणे नित्याचे झाले. आता मोहिनीला ही त्याची सवय झाली होती. तो एखादे दिवस आला नाही तरी मोहिनीला चुकल्या चुकल्यासारखे वाटत असे.असाच एके दिवशी तो आला नाही म्हणून मोहिनी त्याला पहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवली पण बराच वेळ...

मोहिनी

मोहन आणि मोहिनी तसे सुखी दांपत्य. मोहन एका बड्या कंपनी चांगल्या पदावर नोकरी करत होता तर मोहिनी गृहिणी. तसा संसार सुखाचा होता मात्र दोघांना एका गोष्टीची कमी प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे लग्न होऊन ६ वर्ष उलटली तरी अजुन घरात पाळणा हलला नव्हता.एक दोनदा मोहिनी गरोदर...

error: नका ना दाजी असं छळू!!