पावसाळी रात्र भाग : २

थोड्याच वेळात ते पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहचले. श्वेताला तेथील पोलिसांचे चेहरे ओळखीचे वाटत होते. कारण गेले दोन आठवडे तिच्या आंदोलनात तिला पोलिसांशी जास्तच संपर्क येत होता. तिचा पोलिसांशी जास्त चांगला अनुभव नव्हता. तसा तिचा तमाम पुरूष जातीबद्दल ही चांगला अनुभव नव्हता. पुरूष हे स्त्रियांवर अन्याय करणे हा आपला जन्म सिद्ध हक्क मानतात असे तिचे मत अनेक वर्षाच्या आपल्या अनुभवावरून बनले होते.

असो ती दोघे पोलीस स्टेशन मध्ये गेली. कंप्लेंट लिहून घेणारा पोलीस हवालदार बाहेर भुर्जी पाव खायला गेला होता, असे टॅक्सी ड्रायव्हरने आजूबाजूला विचारपूस केल्यावर कळले. तो हवालदार येई पर्यंत ती दोघे एका बाहेर बाकावर बसले. त्या बाकावर अजून दोघे बसलेले होतेच. म्हणून जरा दाटीवाटीने, अंग चोरून ते त्या बाकावर बसले.

घड्याळात आता रात्रीचे साडे नऊ वाजले होते. तिचे डोळे त्या हवालदारची वाट पाहत होती. आजचा दिवस इतके संकट घेऊन येईल असे तिला वाटले सुद्धा नव्हते. तरी बरे तिची घरी कोणी वाट पाहत नव्हती. ती आपल्या वाशीला आपल्या घरात एकटीच राहत होती. त्यामुळे घरी कोणी आस लावून बसले असे कोणी नव्हते.

या पोलीस स्टेशनवर येणारे आरोपी, गुन्हेगार तर काही पोलीस सुद्धा तिच्याकडे पाहून जिभल्या चाटत होते. तिलाही आपली नजर जमिनीकडे ठेवणे सोयीस्कर वाटत होते. कधी एकदा या कोंदट वातावरणातून बाहेर येऊन आपल्या घरी सुखरूप जाऊ असे तिला वाटू लागले.

अर्धा तास ताटकळत बसल्यावर ते हवालदार साहेब आले. त्यांनी आपल्या कासव गतीने तक्रार लिहून घेतली. आम्ही तुम्हाला कळवू जर आमच्या काही हाती लागले तर, असे सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

पुन्हा दोघे गाडीत बसले आणि गाडी आता तिच्या घराच्या दिशेने धावू लागली. बाहेर वि‍जांचा लखलखाट होऊ लागला. लवकरच पाऊस पडेल अशी चिन्हे दिसू लागली. पावसाच्या वातावरणात गाडी चालवणे खूप कठीण म्हणून ड्रायव्हर गाडीचा वेग वाढवत होता जेणे करून तो पावसाच्या आधी आपले भाडे संपवून घरी सुखरूप पोहचेल.

तिने गाडीच्या काचा खाली केल्या तसा त्याने गाडीतला एसी बंद केला. बाहेरची पौर्णिमेची रात्र, तो पूर्ण चंद्र, ती वाहणारी मंजुळ हवा, लखलखत्या विजा, हे सर्व तिचा दिवसभरचा क्षीण पुसून टाकत होते. तसे तिला काहीतरी आठवण झाली, इतका वेळ एकत्र असून सुद्धा तिला त्याचे नाव माहीत नव्हते. ती त्याला म्हणाली की मी विसरले तुम्ही तुमचे नाव काय सांगितले.

तो म्हणाला की मॅडम मी तुम्हाला माझे नाव अजून सांगितलेच नाही पण आता सांगतो. मी प्रभाकर. मी गेली पाच वर्षे ही गाडी चालवत आहे. बी.कॉम पर्यंत माझे शिक्षण आहे. एका कंपनीत नोकरीला होतो पण इतक्यात कंपनी तोट्यात गेली आणि कंपनी बंद पडली. आम्ही वाऱ्यावर पडलो. मग पुढची एक वर्ष नवीन जॉबसाठी धावपळ केली. एखाद दुसरा भेटला सुद्धा पण मजा नाही त्या जॉबमध्ये. मग होते तेवढे जवळचे पैसे टाकून ही लोनवर गाडी घेतली आणि तेव्हा पासून हा धंदा सुरू झाला.

इतका वेळ गुम्या सारखा बसलेला तो ड्रायव्हर आता आपली चुप्पी तोडून बोलता झाला. तिलापण बरे वाटले. प्रवास मोठा होता त्यात कोणी बोलणारे असेल तर प्रवासाचा मार्ग लहान होतो.

“मी श्वेता. मी एक एनजीओ चालवते. माझे शिक्षण मास्टर इन सोशल वर्क मध्ये झाले आहे. आज आमचा इथे एक मोर्चा होता. त्यासाठी मी इथे आली होती.”

“मॅडम तुम्हाला रोज असाच उशीर होतो का?”

“नाही ओ.. आज जास्तच उशीर झाला.”

“तुम्ही तुमच्या घरी सांगा की उशीर होईल. घरी काळजी करत असतील.”

असे बोलून त्याने आपला मोबाईल पुढे केला. तिचा मोबाईल नक्कीच चोरी झालेल्या पर्स मध्ये राहिला असावा असे त्याला वाटले.

“नाही ओ.. त्याची काही गरज नाही. मी माझ्या घरी एकटीच राहते.”

तिच्या वयावरून ती विवाहित असावी असे वाटत होते पण गळ्यात मंगळसूत्र नव्हते. त्यावर तिची खोदून विचारपूस करावी असे प्रभाकरला वाटले. पण त्याने आपले शब्द तोंडातच रोखले. पण इतक्याच तीच बोलली,

“माझे आईवडील गावी असतात. सातारा. ते शेती करतात. मला बोलवत असतात. पण माझ्या कामाच्या व्यापातून फार कमी वेळ भेटतो. तीन महिन्यांपूर्वी गेली होती. त्यानंतर अजून काही जमले नाही.”

आता श्वेता सुद्धा बोलती झाली होती. बहुतेक तो बाहेरच्या वातावरणातील बदलाचा चांगला परिणाम होता.

“तुमच्या घरी कोण कोण असते.” श्वेता

“माझे आईवडील वृद्धाप काळाने सहा वर्षापूर्वी देवा घरी गेले. त्यानंतर मी स्वत:ला सावरले आणि माझा संसार उभा केला. मी लग्न केले. सर्व काही ठीक होते आहे असे वाटत होते इतक्यात काळाने घात केला. माझी बायको गावी देवीच्या जत्रेसाठी गेली होती. मला त्या जत्रेस काही कामानिमित्त जाता आले नाही. पण जत्रेवरून परतत असताना गाडीचा अपघात झाला आणि माझी बायको मला एकट्याला सोडून देवाघरी गेली.” असे बोलून त्याचे डोळे पाणावले.

श्वेताला समजत नव्हते की त्या अनोळखी पुरूषाची कशी समजूत काढावी. पण गाडी आपला रस्ता कापत होती तसा प्रभाकर पुन्हा आपल्या पूर्वपदावर आला. खूप वेळ गाडीत अबोल शांतता होती. गाडी वाशी खाडी पुलावर आली आणि इतका वेळ तुंबलेल्या पावसाने आपला टाहो फोडला. गाडीच्या काचा बंद झाल्या. बाहेर पडत असलेल्या रिमझिम पावसाने डायरेक्ट मुसळधार पावसाचा गियर टाकला. वातावरणात पावसाने आनंद पसरवला.

थोड्याच वेळात तिच्या सोसायटी बाहेर असलेल्या रस्त्यावर त्याची गाडी येऊन थबकली. त्याने भाडे चेक केले. गाडी भाडे ५८० झाले होते. त्या भामट्यांनी तिची पर्स चोरी केल्यामुळे तिच्याकडे इतके पैसे त्या वेळेस नव्हते. मोबाईल चोरीला गेला म्हणून गुगल पे सुद्धा करू शकत नव्हती. ती म्हणाली मी आता घरी जाते आणि तुमचे पैसे घेऊन येते. पण बाहेर खूप मुसळधार पाऊस होता. अशा पावसात प्रभाकरला पुन्हा मुंबई पर्यंत प्रवास करायचा होता.

अचानक तिचे लक्ष त्याच्या पाण्याच्या बॉटलवर गेले. ती रिकामी झाली होती. या विचाराने तिने म्हटले की तुम्ही घरी येता का तिथे तुमचे पैसे सुद्धा घ्या आणि ही पाण्याची बॉटल सुद्धा भरून देते. तसा प्रभाकरच्या जीवात जीव आला.

बरेच वेळा असे होते की प्रवासी हा सज्जन वाटतो. तो खूप छान बोलतो. प्रवास संपला की बोलतो माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. तुम्ही इमारती बाहेर थांबा. मी लगेच तुमचे भाडे आणून देतो. पण तो त्या इमारतीत शिरलेला प्रवासी काही पुन्हा येत नाही.

त्याची वाट पाहून एक तास होतो. पण प्रवासी येत नाही, त्याचे पैसे स्वत:हून चालत येत नाहीत आणि वेळेची नासाडी होते ती वेगळी. हा विचार प्रभाकरच्या मनाला टच करतोय इतक्यात श्वेताने त्यास आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. म्हणजेच आज ही बाई कशीही असो पण ५८० रूपयाचे नुकसान होणार नाही तर.

त्याने गाडी बंद केली. आपली गाडीची चावी आपल्या खिशात सुरक्षित ठेवली. दोघे छत्रीविना त्या तिच्या इमारतीच्या दिशेने जाऊ लागली. आतमधून पावसाचा ओघ कमी वाटत होता. पण प्रत्यक्षात बाहेर पाऊस ओघाने पडत होता.

दोघांनी आपला चालण्याचा वेग वाढवला. पाण्याचे थेंब त्या दोन शरीरांना ओलेचिंब करण्यासाठी कोणतीही कसर ठेवत नव्हता. तिची इमारत येई पर्यंत ते दोघेही बऱ्यापैकी भिजले. लिफ्टमध्ये शिरताच तिने पाचव्या फ्लोरसाठी बटन प्रेस केले. एखादी भिजलेली स्त्री आपल्या बाजूला होती याची प्रभाकरला जाणीव होती. पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता.

लिफ्ट सुरू होताच तिने आपल्या साडीचा भिजलेला पदर किंचित खाली करून तो नीट करून पुन्हा खांद्यावर टाकला. तिची नजर नाही हे पाहून प्रभाकरने एक कटाक्ष तिच्यावर टाकताच त्याने पाहिले की तिचे ओले केस तिच्या खांद्यावर विसावले होते. चेहऱ्यावर पाण्याच्या धारा खाली पाघळत होत्या. तिची साडी तिच्या अंगाशी लगट करत होती.

इतक्यात पाचवा फ्लोर आला. लिफ्टमधून उतरून ती फ्लॅट नंबर ५०४ समोर आली. प्रभाकर सुद्धा तिला फॉलो करत होता. तिने किल्लीने फ्लॅटचा दरवाजा ओपन केला आणि दोघांनी आत प्रवेश केला. प्रभाकर तिचे घर न्याहाळून पाहत होता. घर छान होते. घरात कमी वस्तू होत्या. पण नीटनेटक्या लावल्या होत्या.

तिने त्याला बसायला खुर्ची दिली. तोपण खूप भिजला होता. स्वत:ला सावरून तो त्या खुर्चीवर बसला. श्वेता लगबगीने स्वयंपाक घरात गेली आणि प्रभाकरची पाण्याची बॉटल पाण्याने भरू लागली. बॉटल भरल्यावर तिचे झाकण घट्ट लावत ती बाहेर आली.

हॉलमध्ये चिंब अवस्थेत प्रभाकर अंग चोरून बसला होता. तिने बाहेर येऊन प्रभाकरच्या शेजारी असलेल्या टेबलवर पाण्याची बॉटल ठेवली. लगेच तिने हॉलमध्ये असलेले कपाट उघडले. लॉकरमध्ये काही कॅश होती, त्यातील सहाशे रूपये वेगळे केले. कपाट बंद केले. सहाशे रूपये प्रभाकरच्या हातात दिले.

ओल्या हातांनी प्रभाकरने ते सहाशे रूपये घेतले आणि आपल्या खिशात वीस रूपये शोधू लागला. तिने त्याची हालचाल ओळखून म्हटले की अहो राहू दे उरलेले पैसे. तुम्ही इतकी मदत मला केलीत त्याबद्दल धन्यवाद. इतक्यात प्रभाकरला ओल्या पॅन्टच्या खिशात दहा रूपयांची दोन नाणी सापडली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने ती दोन नाणी श्वेताच्या हातावर टेकवली.

आता परतीची वेळ आली होती. एक छोटीशी स्माईल देऊन प्रभाकर आपल्या जागेवरून उभा राहिला आणि बाहेर जाण्यासाठी तयार झाला. तो जसा उभा राहिला तसे काही पाण्याच्या धारा त्याच्या कपड्यातून खाली जमिनीवर पडल्या. ज्या चेअरवर बसला होता ती चेअर सुद्धा बऱ्यापैकी भिजली होती. याची जाणीव श्वेताला झाली आणि प्रभाकरला ती बोलली तुम्ही पूर्ण भिजले आहात अशा अवस्थेत राहिलात तर सर्दी होईल आणि आजारी पडाल.

प्रभाकरला नक्की कळत नव्हते की बाईला काय सुचवायचे आहे. पण श्वेताने पुन्हा आपले कपाट उघडले आणि त्यातून एक निळसर रंगाचा टॉवेल काढला आणि त्याच्या दिशेने पुढे केला. प्रभाकरने तो निमूटपणे आपल्या हातात घेतला. श्वेता बोलली की लवकर डोके, केस पुसा नाही तर आजारी पडाल. तसे त्याने मुकुटपणे तिने सांगितलेले फॉलो केले.

पण इतक्यात प्रभाकर म्हणाला की मॅडम तुम्हीपण खूप चिंब भिजल्या आहात तुम्हीपण आजारी पडू शकता. लगेच श्वेताला ही गोष्ट ध्यानात आली. इतका वेळ ही गोष्ट बोलण्याच्या नादात ध्यानात आली नव्हती. तिने लगेच आपला पिंक कलरचा टॉवेल काढला आणि आपल्या बेडरूममध्ये गेली.

पावसाळी रात्र भाग : ५

ओठांची लिफ्ट एक एक मजले वर चढू लागली. तिचे तळवे, पाऊल, तिच्या पायाचा घोटा, तिचा गुडघा, पुन्हा तिच्या मांड्या, असे सर्व दख्खन लुटून तो मधल्या प्रदेशात कुच करत होता. वर येता येता तिचा गाऊन इतका वर झाला होता की तिच्या मांड्या पूर्णपणे आपले दर्शन देत होत्या. तिची चरबी...

पावसाळी रात्र भाग : ४

वाईनचा एक घोट घेत ती आपल्या पूर्व आयुष्यावर बोलू लागली. “ग्रॅज्युएट झाल्यावर मी माझा पहिला जॉब करत होती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. पगार थोडासा होता पण पहिलाच अनुभव जॉबचा म्हणून मी जरा जास्तच हुरळून गेली होती. तिथेच माझी ओळख अर्णवशी झाली. अर्णव त्या कंपनीत माझ्या आधी...

पावसाळी रात्र भाग : ३

इकडे प्रभाकर हॉलमध्ये एकटाच राहिला. त्याने आपल्या टॉवेलने हात, मान, डोके आणि केस व्यवस्थित पुसले. अचानक त्याला जाणीव झाली की त्या टॉवेलला एक वेगळाच सुगंध आहे. जणू काही हा सुगंध त्या टॉवेलने आपल्या मालकीणी कडून उधार घेतला असावा. हा सुगंध स्त्री शरीराचा असावा याबाबत...

पावसाळी रात्र

दुपारी निपचित पडलेले शहर आता हालचाल करू लागले होते. दुपारची गरम हवा आता लोप पावून साधारणतः हवेत थंडावा तरंगत होता. सकाळी पूर्वेकडून येणारा सूर्य आता बऱ्यापैकी पश्चिमेच्या अंगास कलला होता. सायंकाळी वाहनाची नेहमी प्रमाणे वर्दळ वाढली होती. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला...

error: नका ना दाजी असं छळू!!