“इंटरेस्टिंग!” राजेंद्र खरंच इंप्रेस झाला होता.
“खरंच!” मागून आवाज आला.
त्याने मागे वळून पाहिलं. ती मगाशीची तरुणी त्याच्या मागे उभी होती.
“अरे! बरंका! सॉरी मी अजून तुमचं नाव नाही विचारलं!” राजेंद्र
“विशाल!” तो
“ओके विशाल! ही माझी बायको तृप्ती! दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं आमचं! शिक्षिका आहे!” राजेंद्र
“नमस्ते!” सिगारेट एशट्रेमध्ये ठेवत त्याने हात जोडले.
“नमस्ते! तुम्ही खरंच ग्रेट आहात. आम्ही मगाशी तुम्हाला पाहिलं तेव्हा वाटलं तुम्ही एखाद्या श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद असाल. आमची तीच चर्चा चालली होती. वाटलं हट्ट करून बांधायला लावलं असेल हे रिसॉर्ट आणि आता ऐश!” ती खुर्चीत बसत म्हणाली.
“लोकांना सुरवातीला असंच वाटतं. हे नवीन नाही मला! बरं टाकी भरली असेल अंघोळी करून घ्या तुम्ही!” तो
“तुम्हा बायकांना खूप वेळ लागतो तुमचं उरका आधी मग आम्ही करू!” राजेंद्र
“चला मी बाथरूम्स दाखवतो तुम्हाला! तीन तीन करून या. तीनच बाथरुम्स आहेत,” त्याने पुन्हा एक झुरका घेतला.
ती त्याच्या मागोमाग गेली व त्या दोन मुलींना सोबत घेतलं बॅगेतले कपडे टॉवेलमध्ये गुंडाळले आणि त्या तिघी त्याच्या मागे गेल्या. सोबत एक छोटा मुलगा पण आला. विशालने दुरूनच बाथरूम दाखवले आणि तिथे शेजारीच असणाऱ्या त्याच्या घरात तो निघून गेला.
त्या तिघींचं काहीतरी चाललं होतं. बहुतेक त्यांच्यातील एकीला तो आवडला होता. त्या तिघी अंघोळ करून आल्या तेव्हा नेमका हा त्याचे कपडे बदलून त्याच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला घेऊन बाहेर आला. हाफ पॅन्ट टी शर्ट, डोळ्यांवर गॉगल आणि हातात कॅमेरा. त्या दोन मुली पुन्हा आपसात काहीतरी कुजबुजल्या आणि खिदळत पळाल्या.
तृप्तीने अंघोळ केली पण ती मागशीच साडी नेसली होती. तिने केसांवर टॉवेल गुंडाळला होता. तरीही पाणी ठिबकून तिचा ब्लाउज ओला झाला होता पाणी झिरपून अगदी तिच्या पार्श्वभागापर्यंत ओघळले होते.
टॉवेलमधील केस पिळून तिने उजव्या खांद्यावरून पुढे घेतले होते. तिचा चेहराही ओलाच होता. तिने त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. तोही हसला. ती निघून गेली. तोही किनाऱ्याकडील गेटच्या दिशेने निघून गेला.
तास दीड तास तो किनाऱ्यावर कुत्र्यासोबत मनसोक्त खेळला, अनेक फोटो काढले. जेट स्की वाले यायला सुरवात झाली होती. तो त्यांच्याशी गप्पा मारत उभा होता. तेवढ्यात बापूचा फोन आला.
“मालक सगळ्यांच्या अंघोळी व नाश्ता झाला. ते हॉलमध्ये झोपले आहेत त्यांच्यासाठी जेवण काय बनवायचं?”
“नेहमीचं शाकाहारी बनव!” तो
गप्पा मारून तो गेट उघडून आत आला या गेटच्या शेजारीच थोडी सुरुची झाडं ओलांडून गेलं की त्यांचा हॉल होता. हॉलमधून कसलाच आवाज येत नव्हता. त्याने जाऊन पहिले सगळे डाराडुर झोपले होते. पलीकडे बाहेर राजेंद्र कुणाशीतरी फोनवर बोलत होता.
याने पुन्हा सिगारेट पेटवली. झुरके घेत त्याने कुत्र्याला त्याच्या जाळीत सोडून जाळी बंद करून घेतली आणि पुन्हा तो त्याच्या मचाणवजा झोपडीत येऊन चहा घेऊ लागला. काही मिनिटांत राजेंद्रही तेथे आला.
“फिरावं म्हणत होतो पण जाम कंटाळलोय. परवा सकाळपासून पाठ टेकली नाही बिलकुल! आंघोळ झाली आणि सगळे म्हणाले आज आरामच करू. संध्याकाळी थेट मंदिरात जाऊ!” राजेंद्र
“बरं बरं! तुम्हाला कंटाळा नाही आला का? घ्या झोपून तुम्हीही हवं तर!” तो
“मी आलो होतो तुमच्याकडे त्यासाठीच. मला इथे व्हिस्की मिळेल का? थोडा श्रमपरिहार!” राजेंद्र डोळे मिचकवीत बोलला.
“अहो! कोकण किनाऱ्यावर तुम्ही व्हिस्की कसली पिताय? माडी पिऊन बघा एकदा!” तो हसला
“माडी?”
“हो, १००% टक्के शुद्ध, नैसर्गिक आणि सुरक्षित! आणि हो कडक सुद्धा!” तो
“चालेल पण मला एखादी रूम मिळाली तर! कसं आहे आत्ता वाजतायत साडेनऊ. सकाळी सकाळी बसलेलो कळलं तर वडील इथे समाधी बांधतील.” राजेंद्र हसला.
“ठीक आहे बापूला सांगतो सगळी सोय करेल तो. पण मला किंवा बापूला विचारल्याशिवाय कुणाच्या नजरेस पडू नका! घोळ होईल!” तो
“ठीक आहे!” म्हणत त्याने कुणालातरी फोन लावला.
“मी जरा इथल्या तालुक्याला जाऊन येतो तुमचा आराम होईपर्यंत तेवढंच फिरणं होईल. जेवण अडीच वाजता सांगितलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे!”
एवढं सांगून राजेंद्रने फोन बंद केला. विशालने तोपर्यंत बापूला मेसेज टाकला. बापु येऊन त्याला घेऊन गेला.
हा आपल्या मचाणावर सिगारेटी फ़ुकत निवांत पहुडला होता. काही वेळाने त्याला खाली खुसफुस आवाज ऐकू आला म्हणून त्याने वाकून खाली पाहिलं तर तृप्ती सोनचाफ्याची फुलं तोडण्याचा प्रयत्न करत होती.
“मॅडम, ती फुलं तोडायची नसतात, वेचायची असतात. आजची सरूने नेली, उद्याची तुमच्यासाठी ठेवायला सांगतो!” तो वरूनच बोलला.
वरून त्याला थेट तिच्या छातीवरची खोल घळई दिसली. त्याचा आवाज ऐकून तिने वर पाहिले. त्याला आता तिच्या गोऱ्यापान छातीचेही दर्शन घडले. गडद रंगाच्या ब्लाउजमुळे तिचा गोरा रंग अधिकच उठावदार दिसत होता.
“हो का? ठीक आहे!” म्हणून ती झाडापासून बाजूला झाली.
तो पुन्हा जागेवर येऊन बसला. आणि झुरके घेऊ लागला. ती पायऱ्या चढून वर आली. “मी आले तर चालेल?” मागून आलेला तिचा आवाज ऐकून त्याने वळून पहिले.
“माझी प्रायव्हेट जागा आहे ही पण सुंदर व्यक्तींसाठी खुली आहे!” त्याने पुन्हा आपली मान वळविली आणि समुद्राकडे पाहत त्याने झुरका घेतला. या मचाणाची फक्त समुद्रकडील बाजू उघडी होती, बाकी तिन्ही बाजूंनी दाट सुरुचे बन होते.
“हो का? मग मी येऊ की नको!” तिनेही जोरदार प्रत्युत्तर दिले.
“मी म्हणालो ना सुंदर व्यक्तींसाठी खुली आहे म्हणून!” तोही मुरलेला होता.
“छान मस्करी करता तुम्ही!” ती हसत पुढे आली.
टेबलवर मृत्युन्जय, महानायक आणि सिडने शेल्डनची दोन तीन पुस्तकं पडली होती.
“म्हणजे वाचायचा ही छंद आहे तुम्हाला!” ती पुस्तकं चाळत बोलली.
“सुंदर माणसं खूप कमी वेळा येतात इथे, म्हणून सुंदर पुस्तकांची सोबत!” तो
तिने बाजूची प्लास्टिकची खुर्ची त्याच्याशेजारी मांडली.
“इथे बसलं तर प्रॉब्लेम नसावा तुम्हाला!” तिने त्याची स्टाईल मारली.
“छे छे अगदी निवांत बसा!” तो तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. बायकांना काय आवडतं आणि त्यांच्याशी कसं वागावं याचा ज्ञानकोशच होता तो.
“तुमचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. तुमच्याकडे पाहिलं की कुतूहल वाढतं!” ती
“म्हणजे?” तो
“तुमच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा बळावते!” ती
“काय करणार माझ्याविषयी जाणून घेऊन. तसंही जाणून घेण्यासारखं काही नाही माझ्या आयुष्यात!” तो
“असेलही तसं पण अशी इच्छा होते ते सांगतेय मी!” ती
“असो! तुम्ही झोपला नाहीत? कंटाळा आला नाही का?” तो
“कंटाळा तर खूप आलाय पण झोपून कंटाळा जातो थोडीच?” ती.
त्याची छाती धडधडत होती. मन तिच्या शरीराकडे धाव घेत होतं, हात शिवशिवत होते. पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते.
“बाकीचे सगळे इतके गाढ झोपलेत. एकूणेक पुरुष घोरत आहेत. बायकाही कुणी उठायला तयार नाहीत. हे कुठे फिरायला गेलेत. मला बोर होतं होतं खूप म्हणून आवारात फिरत होते. छान सजवलं आहे तुम्ही हे सगळं. खूप शांत आणि निवांत आहे. खरं तर दोघेच असायला पाहिजे इथे!” ती आजूबाजूला न्याहाळत बोलली.
“दोघंच आहोतं ना!” तो अवसान गोळा करू लागला होता.
“हाहाहा तुमची विनोदबुद्धी अप्रतिम आहे हं!” तिलाही अंदाज येऊ लागला.
“धन्यवाद! पण तुम्ही येताना हॉलचा दरवाजा बंद केलात का? लहान मुलं सुमद्राकडे गेली तर प्रॉब्लेम व्हायचा!” तो
“अरे देवा! डोक्यात नाही आलं माझ्या!” तिने कपाळाला हात लावला.
“मी सांगतो बापूला!” तो
त्याने बापूला फोन करून सगळी फाटक आणि हॉलचा दरवाजा लाऊन घ्यायला सांगितले.
“तुम्हाला एकट्याला बोर नाही होतं का होतं इथे?” ती
“सवय आहे एकटेपणाची!” अस म्हणत तो खुर्चीतून उठला!
“तुम्हाला हवं असेल तर बसा इथे. पुस्तके आहेत, सीडीज आहेत. वाचा ऐका! मला जरा आंब्याच्या बागेत जायचं आहे. फळं धरायला लागलीय!” त्याने पायात चपला सरकवल्या!
“खूप दूर आहे का बाग?”
“नाही इथे मागेच आहे हाकेवर आहे!” तो
“मी येऊ का?” ती
“तुमच्या घरची मंडळी किंवा राजेंद्र आले तर शोधत बसतील तुम्हाला!” तो
“दोन अडीच तास वेळ आहे अजून! चला!” म्हणत तिनेही चपला पायात सरकवल्या.