‘आयचा घो ह्या पावसाच्या! धरण फुटल्यासारखा बदाबदा गळतोय! साला, कधी थांबणार कोणास ठाऊक?’ मनातल्या मनात मी धुंवाधार कोसळणार्या पावसाला दोष देत माझी कार ढकलत होतो.
मला जायचे होते त्या तालुक्याच्या गावाच्या अलीकडे अर्ध्या तासाच्या रस्त्यावर माझी कार बंद पडली होती. सगळीकडे सुनसान होते आणि एखादीच गाडी रस्त्याने जाताना दिसत होती.
आता काय करायचे ह्याचा मी विचार केला. पाऊस कधी थांबेल ह्याचे काही चिन्ह दिसत नव्हते आणि गाडी अशी येथेच उभी ठेवली तर आपोआप रिपेअर होणार नव्हती.
आधी मी विचार केला की गाडी तिथेच सोडून जवळपास कुठे एखादे गॅरेज किंवा मेकॅनिक भेटतो का हे चेक करूया. पण किती वेळ जाईल ह्याचा काही अंदाज नव्हता आणि तितका वेळ गाडी अशीच सुनसान जागी सोडून गेलो तर चोरीला जाण्याची भीती होती.
शेवटी मी ठरवले की गाडी स्वत:च ढकलत ढकलत होईल तितके दूर जावे आणि एखादे घर किंवा दुकान वगैरे लागले तर तेथे गाडी ठेवावी. मग मी गाडी न्युट्रलमध्ये टाकून एक दरवाजा उघडून स्टेअरींग धरत ढकलायला लागलो.
मी नियमित व्यायाम करणारा होतो त्यामुळे एकट्याने अशी गाडी ढकलायला मला जास्त कष्ट वाटत नव्हते. मी सकाळी माझी कार घेऊन मुंबईवरून निघालो आणि तेव्हा पासूनच रिमझिम पाऊस पडत होता. घाट चढून वर आल्या नंतर जो धुंवाधार पाऊस पडायला लागला ते एक क्षणही थांबायचे नाव घेत नव्हता.
संततधार पाऊस आणि ओलाव्यामुळे सगळीकडे धुके होते. काळ्याकुट्ट ढगांनी सगळीकडे अंधारी आली होती त्यामुळे दुपारचे चार वाजून गेले तसे रात्र झाल्यासारखे वाटत होते. सहाला तर मध्यरात्र उलटल्यासारखा अंधार सर्वत्र पसरला होता.
मेन हायवेवर गाड्यांची वर्दळ होती, गावे लागत होती. पण हायवे सोडून मी माझ्या गावाच्या जवळील तालुक्याच्या रस्त्याला लागलो तसे रस्त्याला एखादी दुसरी गाडी दिसत होती. त्यात माझी कार बंद पडली तेव्हा तिला ढकलत पुढे गेल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
आश्चर्य म्हणजे कुठेही गाव किंवा वस्तीची चिन्ह दिसत नव्हती. तालुक्याचे गाव अगदी जवळ होते पण एवढ्या पट्ट्यात एकही घर किंवा दुकान दिसत नव्हते. नियमित व्यायाम करून कमावलेली बॉडी आता कामाला येत होती.
एकट्याने कार ढकलत न्यायला मला जास्त त्रास पडत नव्हता आणि तेवढ्यात मला अंधारात घरासारखी आकृती दिसली! निरखून पाहल्यावर ते घरच असल्याची खात्री झाली आणि माझ्या त्रस्त मनाला दिलासा मिळाला. ते घर पुढे शंभर पावलावर रस्त्याच्या बाजूला पंचवीस एक फुट आत होते.
कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात कुठे खड्डा तर नाही ना ह्याची खात्री करून मी कार ढकलत रस्त्यावरून खाली उतरवली आणि त्या घराच्या दिशेने ढकलू लागलो. डांबराच्या रस्त्यावर कार ढकलायला मला त्रास पडला नाही पण आता रस्त्यावरून खाली मातीत उतरल्यावर मला ढकलायला त्रास पडू लागला.
कसेबसे जोर लावत मी कार ढकलत त्या घराजवळ पोहचलो. कारच्या हेडलाईटमध्ये पाहिले तर ते घर म्हणजे एक टपरीसारखे दुकान होते आणि अर्थात ते बंद होते. दुकानाचा ताला पाहून माझी सटकली आणि तोंडातून शिवी बाहेर पडली.
मला विश्रांतीसाठी काहीतरी आडोसा मिळाला ह्याचा आनंद होता पण बंद दुकान पाहून मी अजूनच वैतागलो. कार तशीच सोडून मी त्या दुकानाच्या मागच्या बाजूला गेलो आणि माझ्या लक्षात आले की दुकानाला लागूनच मागच्या बाजूला एक खोली होती. पण त्याच्या भोवती बऱ्यापैकी मोठे बंदिस्त अंगण दिसत होते.
अंगणाची भिंत पेंडेच्या सुक्या गवतापासून तयार केलेली चांगली सहा फुट उंचीची होती त्यामुळे आतले काही दिसत नव्हते. त्या अंगणाच्या भिंतीला वळसा घालून मी मागच्या बाजूला गेलो तेव्हा मध्यावर अंगणात शिरायचा दरवाजा दिसला. गवताच्या पेंडेचाच बनलेला तो दरवाजा उघडून मी आत शिरलो.
चांगले दहा-बारा फुटाचे अंगण पार करून मी खोलीच्या दरवाज्यात पोहचलो. दरवाज्याच्या वरील शेड खाली मी शिरलो आणि गेल्या तास दिड तासात प्रथमच मला पावसापासून एक आडोसा मिळाला.
पावसाच्या आडव्या तिडव्या मारापासून माझी सुटका झाली आणि जीव सुखावला! मी अंगावरील पाणी निथळत, माझे केस झटकत काही क्षण तेथेच तसा उभा राहलो. कपड्यावरील पाणी बऱ्यापैकी निखळून गेल्यावर मगच मी दरवाज्यावर थाप मारली आणि दार ठोकू लागलो.
काही क्षणानंतर कडी उघडल्याचा आवाज झाला आणि दरवाजा उघडला. घराच्या आत लावलेल्या कंदिलाचा प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात मला एक बाई दारात उभी असलेली दिसली.
म्हटले तर कंदिलाचा प्रकाश प्रखर नव्हता पण त्या मंद प्रकाशातही मला स्पष्ट दिसले की त्या बाईने वर फक्त टाईट ब्लाउज घातलेला होता आणि खाली पेटीकोट होता.
काही क्षण आम्ही दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांकडे पहात राहलो. मी कल्पना केली नव्हती की एक बाई अश्या अवस्थेत मला पहायला मिळेल आणि तिनेही बहुतेक एक अनोळखी पुरूष बाहेर असेल अशी अपेक्षा केली नसेल.
ती बाई पहिली भानावर आली आणि एका क्षणात दरवाज्यातून दूर झाली. ज्या स्पीडने ती गायब झाली त्याच स्पीडने ती पुन्हा दरवाज्यात अवतरली! फक्त आता तिने छातीवर टॉवेल घेतला होता.
“म.. मला वाटलं माझा नवरा आला. काय पाहिजे तुम्हाला?” तिने ओशाळत आपल्या उभारावरचा टॉवेल नीट करत विचारले.
“ते माझी कार बंद पडली आहे. तुमच्या दुकानाच्या पुढे आहे.” मी म्हणालो.
“अच्छा. तुम्हीच शिवी दिली मघाशी तिकडे.” तिने हसून म्हटले.
“स.. सॉरी हं.. ते.. मी कार ढकलून ढकलून वैतागलो होतो आणि तुमचे घर दिसले तर मनातून मी खुश झालो की आडोसा मिळाला. पण तुमच्या दुकानाचे बंद दार पाहून मला वैतागल्यासारखे झाले. म्हणून तोंडातून शिवी बाहेर पडली. सॉरी हं, मला माहीत नव्हते की तुम्ही आत ऐकाल म्हणून.” मी ओशाळत म्हटले.
“ठीक आहे हो. मला सवय आहे शिव्या ऐकायची.” तिने हसत म्हटले.
“सवय?” मी तिला सवय कशी विचारणार होतो पण म्हटले जाऊ दे आपल्याला काय करायचेय. तेव्हा मी फक्त विचारले, “येथे कुठे जवळपास रिपेअरींग गॅरेज किंवा मेकॅनिक भेटेल का?”
“काही नाही!” तिने पटकन उत्तर दिले, “मेकॅनिक तुम्हाला तालुक्याचा गावात मिळेल. पण तुम्हाला जाता येणार नाही. कारण तालुक्याच्या गावाच्या रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय. कालपासून सारखा पाऊस पडतोय. सगळे बंद आहे. लाईट नाय आणि काही नाय.”
‘बापरे!! मग आता मी काय करू? कुठे जाऊ आणि कसा जाऊ?’ मी काळजीच्या सुरात विचार करत स्वत:शीच म्हटले.
बाहेर धुंवाधार पावसाचा आवाज येत होता पण तरीही आम्हा दोघांच्या मध्ये एक निरव शांतता जाणवत होती. ‘आता काय करावे?’ असा प्रश्न आम्हा दोघांच्याही चेहर्यावर आणि मनात घोळत होता.
त्या बाईच्या चेहर्यावरील बदलते भाव पाहून मला वाटू लागले की कुठल्याही क्षणी दरवाजा खाडकन बंद केला जाईल. म्हणजे मी काय करायचे हे माझे मलाच ठरवावे लागणार होते. तरीही वेड्या आशेने मी त्या बाईकडे बघत होतो.
मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशातही ती बाई माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण करत माझ्या मनाचा ठाव घ्यायचा प्रयत्न करत होती. तिने हळूच विचारले,
“मुंबईचे का तुम्ही? कुठे निघालात?”
“हो मुंबईचाच. गावाला निघालो होतो. स्वत:च्या कारने. पण पावसाचे पाणी शिरले आणि कार खराब झाली. मेकॅनिक भेटला तर कार दुरूस्त करून पुढे जाऊ शकतो. पण मग पाऊस थांबेपर्यंत वाट बघावी लागणार.” मी खुलासा केला.
माझ्या बोलण्याचा तिच्यावर काही परिणाम झाला की नाही कळत नव्हते पण ती काही बोलतही नव्हती की दरवाजा बंद करतही नव्हती. तेव्हा काहीतरी ठरावे म्हणून मीच पुढे बोललो,
“नाही म्हणजे तुम्हाला संकोच वाटत असेल तर मी बाहेरच थांबेन. थोडा पाऊस उघडेपर्यंत तुमच्या ह्या छताखाली उभा राहतो. पावसात भिजून भिजून अंग जाम झालेय.”
माझ्या त्या बोलण्याचा तिच्यावर थोडा परिणाम झाला व काही क्षण विचार केल्यावर ती म्हणाली,
“नाही नको. या तुम्ही आत. मला कसला संकोच.” असे बोलून ती दरवाज्यातून बाजूला झाली आणि मी पटकन घरात शिरलो.
‘न जाणे पुन्हा तिने विचार बदलला आणि घरा बाहेर काढले तर?’ असा विचार करून मी लगबगीने आत शिरलो. मी आत आल्यावर तिने दरवाजा लावून घेतला आणि ती पुढे झाली.
मी झरकन घराच्या आत एक नजर फिरवली. ती एकच खोली होती जिच्यात डाव्या बाजूला एका कोपर्यात चूल बनवलेली होती आणि भिंतीवर मध्ये लाकडाच्या फळ्यांची मांडणी होती, जिच्यावर काही भांडी दिसत होती.
दुसर्या कोपर्यात पाण्याचे हंडे आणि एक पिंप दिसत होते. उजव्या बाजूला एका कोपर्यात दोन तीन पेट्या पडल्या होता आणि त्यावर दोन दोऱ्या या भिंतीवरून ते पलीकडच्या भिंतीवर बांधल्या होत्या, ज्यावर कपडे टाकलेले होते. बाईच्या कपड्याशिवाय त्यावर पुरूषाचेही कपडे दिसत होते.
समोरच्या भिंतीला एक दरवाजा दिसत होता जो बहुतेक त्या दुकानात उघडत होता. दरवाज्याच्या बाजूला भिंतीला अंथरुण पांघरुणाची चवड रचली होती. इतर कुठलेही फर्निचर घरात नावालाही दिसत नव्हते.
घराचे निरीक्षण करून झाल्यावर मी केस झटकून केसांचे पाणी काढू लागलो. म्हटले तर दरवाज्यात उभा राहून मी निथळत होतो आणि माझ्या अंगावरचे पाणी खाली ओघळत होते.
मला असेच हाताने केस झटकताना पाहून त्या बाईला काय वाटले कोणास ठाऊक? पण तिने आपल्या छातीवर घेतलेला टॉवेल पटकन काढला आणि मला देऊ केला.
तिने जसा टॉवेल काढला तसे माझी नजर तिच्या टाईट ब्लाउजमधील तितक्यात टाईट उभारावर गेली पण मी तिच्या उभाराकडे बघतोय हे लक्षात आले तर ती मला घराबाहेर हाकलेल म्हणून मी पटकन नजर फिरवली.
“थॅंक्यु हं. पण तुम्ही दुसरा टॉवेल दिला असता.”
मी पुढे बोलायला गेलो तर ती पटकन म्हणाली,
“दुसरा टॉवेल नाय माझ्याकडं. राहू द्या, पुसा अंग. चहा चालल का थोडा?”
“चालेल?? अहो दौडेल! मी तुम्हाला विचारणारच होतो की चहा मिळाला तर बरं होईल. चहाचे काही पैसे असतील तर ते देईन मी.” मी खुशीत म्हटले.
“अहो राहू द्या वो पैसे. तुम्ही पावणं आहात आमचं. पण हां चहामध्ये दूध नाही हाय. कोरा चहा मिळल, चालल ना?” तिने हसून पुन्हा विचारले.
“अहो कोरा तर कोरा! काहीतरी गरम घश्यातून खाली उतरलं पाहिजे. बाहेरून गारठलोय आणि आतूनपण. तेवढीच गरमी मिळेल अंगात.” मी मिश्किलपणे हसत मुद्दाम ‘गरमी’ शब्दावर जोर देत उत्तर दिले.
ती हसली आणि चुलीसमोर फतकल मारून बसत चहा करायला लागली. मी डोके पुसायच्या बहाण्याने गुपचूप तिचे निरीक्षण करायला लागलो. कंदिलाचा प्रकाश मंद होता पण आता त्या रूममध्ये माझी नजर सावरली होती तेव्हा मला सगळे स्पष्ट दिसत होते.