जिग्नेश एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला असतो. लग्न होऊन ५ वर्ष उलटली असतात. जिया त्याच ऑफिस शी एम्पलॉय तिच्याशी त्याचा प्रेम विवाह झालेला असतो. एकमेकांवर जिवा पाड प्रेम करणारी ही जोडगोळी लग्नाच्या ५ व्या वर्षी एकाच फ्लॅटमध्ये विभागली गेली होती. अर्थात त्यांच प्रेम आता तस फारस राहील नव्हत. दोघेही अजून त्याच ठिकाणी नोकरीला होते. प्रेम कमी होण्याच कारण एकच होत. मूल! अर्थात जिग्नेश याला मूल हव होत. पण जियाला ते नकोच होत. कारण मूल झाल तर त्याची देखभाल कोण करणार? शिवाय नोकरी सोडावी लागेल? शिवाय प्रेम विवाहला विरोध असल्याने जियाच्या आई वडीलानी त्यावेळीच जियाशी संबंध तोडले होते. त्यामुळे ते सुद्धा येऊ शकत नाही. आणि जिग्नेशचे आई वडील तर ४ वर्षापूर्वी अपघातात गेले. आणि ह्या मुलाच्या हट्टापाई दोघांत दररोज भांडण होत असे. कधी कधी ते विकोपाला ही जात असे. जिग्नेशच ड्रिंक करण्याच प्रमाण ही वाढल होत. ऑफिस मधून सुटल्यानंतर एकत्र घरी येणारी ही जोडी आता मात्र एकत्र जायची नाही. जिग्नेश तर जॉब नंतर बारमध्ये, नाहीतर मित्रांसोबत असायचा, रात्री उशिरा घरी जाण त्याच वाढल होत.अश्या प्रकारे दोघांचा संसार निरर्थक सुरू होता.
एक दिवस ऑफिस मधून सुटल्या नंतर जिग्नेश आपला मित्र सुमित सोबत बारमध्ये जातो. आणि मग दोघांची सुरू होते गप्पांची मैफिल आणि जोडीला असते दारू. जिग्नेश आज मात्र प्रमाणाच्या बाहेर ड्रिंक करतो.
जिग्नेश: साता जन्माची साथ, ते साथ फेरे, ती जन्म जन्माची सोबत ह्या सर्व आता मला अंधश्रद्धा वाटू लागल्या आहेत.
सुमित: तूला आता वाटू लागल्या आहेत. मला तर हे अगोदरच माहीत होत, आणि म्हणूनच मी अजून लग्न नाही केलं.
जिग्नेश: यू आर राईट माय ब्रो. तू खरंच ग्रेट आहेस. पण मी मूर्ख आहे. यार कसल सुखच नाही. फसलो यार लग्न करून.
सुमित: आता काही करू शकत नाही. जे आहे, जस आहे ते तसंच सुरू राहणार. आणि आयुष्यभर असंच सहन करत रहाव लागणार.
जिग्नेश: नाही सहन होत मला. मला नको आहे हे सर्व.
सुमित: ठीक आहे. शांत व्हो.
जिग्नेश: कसा शांत होऊ. मूल नको म्हणते हरामी… प्रत्येक वेळी स्वतची मनमानी करते. तिला हव तस वागते, आणि तू म्हणतो शांत होऊस. कसली मनशांती नाही.आणि त्यात काय मोठ मोठे लोक सांगून गेले म्हणे, संसारात खरी मनशांती असते.
सुमित: वेडा आहेस तू, संसारात खरी मनशांती नसते. खरी मनशांती तर तिकडे मिळते. आपल्याला हवी तेव्हा,
नेहमी प्रमाणे जिग्नेशच पिऊन रडगाण सुरू झाल होत.
सुमित: चल निघू.
जिग्नेश: एवढ्या लवकर…
सुमित: हो.
जिग्नेश : पण मला एवढ्या लवकर घरी यायच नाही.
सुमित: अरे घरी जायच नाहीच आहे.
जिग्नेश: मग.
सुमित: चल सांगतो.
जिग्नेश आता बिल पेड करतो. ते बाहेर येतात, रीक्षात बसून ते तिथुन निघतात. सुमित त्याला आता एका रेड लाईट एरियामध्ये घेऊन येतो.
जिग्नेश: ये पागल झाला का? कुठे घेऊन आलाय.
सुमित: तुला मनशांती हवी होती ना.
जिग्नेश: अरे पण.
सुमित: ती तुला इथे मिळेल.
जिग्नेश: अरे पण हे चुकीच आहे.
सुमित: काही चुकीच नाही. मी लग्न नाही केलं. पण शेवटी तृप्त होण्यासाठी इथेच याव लागत. म्हणजे मनशांतीसाठी इथेच येतो. आणि आज तूला आणल.
सुमित आता जिग्नेशला हाताला धरून आता घेऊन जातो. एकापेक्षा एक मुली, बाया बघून जिग्नेश शी मात्र पुरती उतरते.
सुमित आता आपल्या नेहमीच्या ठिकाणी प्रवेश करतो. व जिग्नेशला ही सांगतो तुला जी वाटते तिथे जा. जिग्नेश मात्र आता तिथेच विचारात राहतो. प्रत्येक स्त्री त्याला बोलावत असते. तो पूर्णत गोंधळतो. तो आता हळहळू पुढे सरसावतो. व अगदी शेवटच्या टोकाला जाता. तिथे एक बंद खोली असते. तो त्या ठिकाणी उभा राहतो. व त्या खोलीकडे एकटक बघत राहतो.
त्याच दरम्यान एक बाजूच्या खोलीतून बाई बाहेर येते.
बाई: ये चिकणे, वहा कया देख रहा है, वह कुछ भी माल नही है. असली माल तो यह है. बोल कितणा देगा.
जिग्नेश मात्र काहीच बोलत नाही, तो त्या बंद खोलीकडे बघत राहतो.
बाई: चल चल, टाइम की खोटी मत कर. आ ना है तो हा, नही तो निकल…
तेवढ्यात एक दूसरा माणूस येतो. त्या बाईशी सौदा करून आता जातो. जिग्नेश मात्र तिथेच उभा राहतो. त्या बंद खोलीकडे बघत. त्याच दरम्यान त्या बंद खोलीच दार उघडत. आणि एक मादक, रसाळ, जणू अप्सरा बाहेर येते. व त्याला इशारा करते. जिग्नेश क्षणभर ही विचार न करता, आत प्रवेश करतो.
त्या स्त्रीच सौन्दर्य पाहून त्याची सर्व नशा उतरते. तो एकटक तिच्याकडे बघत राहतो.
करिश्मा: फकस्त बघत राहणार की काही करणार…
तो आता भानावर येतो.
जिग्नेश: नाही… मी… आपल ते…
करिश्मा: बाई कधी बघितली नाय… होय… काय बाईला कधी केल नाय… शकल से तो शादी शूदा दीख रहा है.
जिग्नेश: हा…
करिश्मा: बिबी देती नही… कोई बात नही… मै देगि… चल आ…
ती आपल्या शरीरावरून साडी बाजूला करते… तो मात्र अजून तिच्याकडे बघत राहतो.
करिश्मा: पैसे का टेंशन मत ले… वैसे तो मे २००० हजार लेती है… पण तुझ्यासाठी १००० मे… चल मंजूर…
जिग्नेश: नाही… मी ते चुकून आलो…
करिश्मा: चुकून इथे कोणच येत नाय. सगळे आपली भूक भागावायला येतात…
जिग्नेश आता तिथुन उठतो. तशी ती त्याचा हात पकडते… व आपल्या अंगावर खेचून घेते.
करिश्मा: करिश्मा नाव माझ, आणि माझा करिश्मा दाखवल्या बिगर मी कुणास सोडत नाय…
ती आता तिच्या खिशातून वॉलेट बाहेर काढते… व त्यातून १००० रूपये घेते. तो थोडा विरोध करतो. पण तिच्या विरोधाला अजिबात जुमानत नाही…
करिश्मा: चल… पैसा भी मिला. अब…
तो आता पुनः बाजूला होतो. दरवाजा जवळ येतो. तशी ती पुनः त्याच्या जवळ जाते. व त्याला घट्ट मिठी मारते.
करिश्मा: कर ना… खूप दिवसापासून… एक गिरायक आल… ते पण असंच जाणार… ते बराबर नाय… बघ हव तस कर.
जिग्नेश: खूप दिवसांपासून म्हणजे?
करिश्मा: कुछ नही… करना है तो कर. नही तो निकल. फालतू का बडबड मत कर…
करिश्मा थोडी गोंधळते. आणि जिग्नेश तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत राहतो.
ती आता दरवाजा उघडते. व त्याला बाहेर काढते.
करिश्मा: कया मालूम कहा कहा से आते है…
जिग्नेश पुनः दरवाजाच्या बाहेर येतो. व त्या दरवाजाकडे एकटक बघत राहतो. तेवढ्यात पुनः ती बाई बाहेर येते. व जिग्नेशला बघते.
बाई: ये लंगूर… अब तक तू यही खडा है. कहा ना कुछ नही मिलेगा उधर, चल मेरे पास हा… २००० मे सौदा…
जिग्नेश आता काही न बोलता तिथुन निघतो. व पुनः बाहेर मुख्य रस्त्यावर येतो. सुमितला फोन करतो. तेवढ्यात सुमित बाहेर येतो.
सुमित: मग झाली का मन शांती.
जिग्नेश: नाही…
सुमित: काय?
जिग्नेश: म्हणजे हो.
सुमित: मग तूला सांगितल ना. खरी मनशांती तर इथेच आहे.
दोघेही आता तिथुन निघतात.
जिग्नेश आता आपल्या घरी येतो. जिया केव्हाची झोपलेली असते. तो आता आपल्या कडची चावीने लॉक उघडून आत जातो. फ्रेश होतो. व झोपायला आपल्या खोलीत जातो. पण त्याला कसली झोप लागत नाही. त्याला फक्त डोळ्यासमोर करिश्मा दिसत असते. आणि एवढी सुंदर मुलगी, संधि असून काही केल नाही. याची पण खंत त्याला होत होती. एकंदरीत तिथे घडलेला सर्व प्रकार ही त्याला थोडा विक्षिप्त वाटत होता.
सकाळ होते ९ वाजून गेलेले असतात. जियाने आता ऑफिसला जायच्या तयारीत असते. मात्र जिग्नेश अजून झोपलेला असतो. ती त्याला उठवते. पण तो झोपेत करिश्मा… करिश्मा अस बडबडत असतो. ती त्याला जोरजोरात हलवते. तसा तो गडबडून उठतो.
जिया: ही करिश्मा कोण?
जियाच्या तोंडी करिश्माच नाव ऐकल्यानंतर त्याची झोप उडते.
जिग्नेश: कोण करिश्मा?
जिया: हा प्रश्न मी विचारते तुला. ही करिश्मा कोण?
जिग्नेश: मला काय माहीत.
जिया: ठीक आहे. समजेल…
ती तडक तिथुन निघते. आणि ऑफिसला येते. जिग्नेश आता फ्रेश वगरे होतो. पण करिश्मा मात्र त्याच्या डोळ्या समोरून जात नसते. जिग्नेश ऑफिसला येतो. पण त्याच ऑफिसमध्ये सुद्धा लक्ष नसत. संध्याकाळ होते. ऑफिस सुटत. जिया आता निघते. पाठोपाठ जिग्नेश ही निघतो. तो थेट आता कालच्या ठिकाणी येतो. व पुनः त्या रूमकडे येऊन उभा राहतो. तेवढ्यात करिश्मा बाहेर येते. व त्याला इशार्याने आत बोलवते.
करिश्मा: वाटल होत मला… तू येणार…
जिग्नेश: म्हणजे?
करिश्मा: चल १००० दे. आणि सुरू कर…
तो तिच्याकडे बघत राहतो. ती पुन त्याच्या खिशात हात घालते. व १००० काढते. व सोफ्यावर जाऊन पडते.
करिश्मा: चल उतार कपडे… आणि सुरू कर.
जिग्नेश: नाही…
करिश्मा: काल पण काय केल नाय, आज पण नाय म्हणतो. काय हव काय तुला. येडा बिडा झाला का तू.
तेवढ्यात सुमितचा फोन येतो. पण तो फोन कट करतो. तेवढ्यात तिथे पोलिसांची धाड पडते. व तिथे सर्वांचा गोंधळ उडतो. पोलिसांची धर पकड सुरू होते. बाहेर झालेल्या गोंधळामुळे जिग्नेश बाहेर येतो. तेव्हा त्याच्या लक्षात येत. की पोलिसांची धाड पडली आहे. करिश्मा त्याला आत खेचून घेते. तो तिला बाहेर पळण्याची विनवणी करतो.
जिग्नेश: मला जाऊ दे. बाहेर पोलिसांची धाड पडली आहे. इथे कधी पण येतील.
तशी करिश्मा जोरजोरात हसू लागते. तो पुन दरवाजाकडे जातो.
करिश्मा: बाहेर गेला तर पकडला जाशील. त्यापेक्षा इथेच थांब.
जिग्नेश: का. इथे पोलिस येणार नाही.
करिश्मा: नाही येणार इथे पोलिस. पोलीसच काय कुणीच इथे येऊ शकत नाही.
जिग्नेश: म्हणजे?
करिश्मा: कारण ही खोली गेली कित्येक वर्ष बंद आहे.
जिग्नेश: व्हॉट नॉनसेस. काय बोलते तू.
हळूहळू बाहेरचा सर्व गोंधळ कमी होतो.
करिश्मा: आता पर्यन्त बर्याच वेळा इथे धाड पडली… पण ह्या खोलीत कुणीच आल नाही.
जिग्नेश : पण का?
करिश्मा: सांगितल ना. ही खोली गेली कित्येक वर्ष बंद आहे म्हणून…
जिग्नेश: मग मी कसा आलो. खोली बंद आहे तर.
करिश्मा: मी आणल तुला.
जिग्नेश: काय बोलते.
करिश्मा: चल आ… जादा सोच मत…
जिग्नेश : पण मला बाहेर जायच आहे.
करिश्मा: बाहेर गेला तर फालतूमध्ये पकडला जाशील. अब कुछ वक्त तुझे इसी बंद कमरे मे वक्त गुजारना होगा.
ती त्याला अंगावर खेचून घेते. तो सुद्धा आता पूर्णत तिच्या शरीरारवर वाहवत जातो. त्याला कश्याचे ही भान राहत नाही.तोंडातून सतत मन शांती हवी, मनशांती हवी, असे शब्द बाहेर निघत असतात. बर्याच वेळाने ते भानावर येतात.
करिश्मा: मग मिळाली का मन शांती.
जिग्नेश: बहुत… लेकिन अब लग रहा है. तुम बहुत बंधिया हो. खूप सुंदर आहेस तू. अस वाटत कायम तुझ्या सोबत या बंद खोलीत राहू.
करिश्मा: सच.
जिग्नेश: खरंच.
करिश्मा: चल निकल अभि. जादा टाईम बरबाद मत कर. बाहर माहौल गरम है. सांभालके जा.
जिग्नेश: ठीक है.
जिग्नेश आता बाहेर येतो. व बघतो तर सर्व एरिया शांत झालेला होता. झप झप पाऊले टाकत आता त्या एरियाच्या बाहेर येतो. रिक्शा करून तो घरी येतो. त्याला मन शांती मिळाली खरी, पण सतत विचारांच वादळ त्याच्या मेंदूत घोंगावत होत. पोलिसांची धाड पडली, सगळ साफ झाल पण त्या खोलीत कोणी का नाही आल? शिवाय करिश्मा म्हणते ती खोली कित्येक वर्ष बंद आहे? सगळ विचित्र वाटत होत. त्यात घरी आल्यानंतर करिश्मा वरून जिया त्याच्याशी हुज्जत घालते ते निराळ. या सर्वानी त्याच डोक सून्न झाल होत.
सकाळ होते. जिया ऑफिसला निघून जाते. जिग्नेश आता सुमितला फोन करून घरी बोलवतो. व कालचा सर्व प्रकार सांगतो. त्यावेळी सुमित ही त्याला वेड्यात काढतो. की पूर्ण एरिया पोलिसानी साफ केला, आणि त्यात तुम्ही सुटला हे कस शक्य आहे, अर्थात तुम्ही बाहेर पडला असता आणि तिथुन पळून गेला असता तर तुमची सुटका होण ठीक, पण तुम्ही आत असून तुम्हाला पकडल नाही, हे कस शक्य. तेव्हा जिग्नेश ही म्हणतो, मी पुनः जाईल, तेव्हा सुमित त्याला विरोध दर्शवतो, व सर्व माहोल गरम आहे. तो थंड झाला की जा. अस सांगतो.
काही दिवस उलटतात. करिश्मा आणि हे सर्व प्रश्न मात्र जिग्नेशच्या डोकीतून जायला तयार नाही. शिवाय ऑफिसमध्ये कामात लक्ष नाही, जिया सोबत बोलण नाही. एकट राहण असे प्रकार त्याचे सुरू झाले होते. रोज त्या ठिकाणी तो फेरी मारून यायचा, पण तिथे कुणीच नसायच. करिश्माच्या प्रेमात तो वाहवत चालला होता. पण कित्येक दिवस त्याची भेटच होत नव्हती. हळूहळू पुनः तिथे सर्व सुरू होत. आणि ते बघून त्याच्या मनाला दिलासा मिळतो. एक दिवस तो पुन तिथे जातो. पुन तीच वर्दळ, तीच मादक शरीर, वेगवगळे मुखातून आलेले किमती, यातून मार्ग काढत. पुन तो त्या बंद खोलीकडे येतो. व एकटक बघत उभा राहतो. जवळ जातो. तो दरवाजा वाजवतो. व करिश्माला आवाज देतो.
जिग्नेश: (दरवाजा वाजवून) करिश्मा! करिश्मा!
आतून काहीच रिस्पॉन्स येत नसल्याने तो पुन जोरजोरात दरवाजा वाजवू लागतो.
त्याच दरम्यान आजूबाजूच्या २ ते ३ जणी तिथे येतात. त्यात ती बाई सुद्धा असते.
बाई: ये चिकने… तू फिर आया. साला नौटंकी, एक तो पुरे धंदे की वाट लग गयी है.
शीतला: कौंन है ये.
बाई: कया पता. बार बार ईसी कमरे की तरफ जाता है.
शीतला: ये बाबा, तिथ कोण नाय. तो दरवाजा हमेशा बंद हाय.
जिग्नेश: कस श्यक आहे. मी स्वत २ वेळा आत जाऊन आलोय.
तसे सर्व जोरजोरात हसू लागतात, त्यांच हसण बघून जिग्नेश थोडा संतापतो.
बाई: पागल है. चल निकल.
जिग्नेश: नही. मी २ वेळा जाऊन आलोय इथे. मन शांती साठि… करिश्मा… आहे आत.
तशी त्या दोघी त्याला वेड्यात काढतात, व धक्के मारून शिवाय वॉलेट मधील असतील नसतील तेवढे पैसे घेऊन त्याला बाहेर काढतात. जिग्नेश मात्र मला करिश्माला भेटायच, मला तिच्याकडून मन शांती हव अस विनवणी करतो. तेव्हा ती बाई म्हणते.
बाई: मनशांती चाहिये तो हमारे पास आणे का. उसंके पास कयू. तस पण करिश्माला मरून १० वर्ष उलटली…
तिच्या ह्या उत्तराने त्याला पूर्णत घाम फुटतो. त्याला विश्वास ही बसत नाही. तो कसा बसा तिथुन घरी येतो. तो प्रचंड फ्रस्टेड झालेला असतो. तो आपल्या खोलीत जातो. व भरपूर दारू पितो. मात्र करिश्मा काही त्याच्या डोक्यातून जात नाही.
सकाळ होते. तो शांत पणे बसलेला असतो. तो अजूनही स्वतच्या विचारात असतो. सुटीचा दिवस असल्याने जिया ही घरी असते. ती आता टी. व्ही चालू करते. आणि सहज न्यूज चॅनल सुरू करते. त्याच दरम्यान एक न्यूज येते की कालच त्या रेड लाईट एरिया मधील करिश्मा सुलताणे मर्डर केसचा निकाल तब्बल १० वर्षानी लागला. प्रसिद्ध उद्योगपति रावसाहेब केळकर याचा मुलगा अविनाश केळकर याला करिश्माचा खून केल्या प्रकरणी शिक्षा झाली. स्क्रीन वर करिश्माचा फोटो ही असतो. ते बघून तो थक्क होतो. तो लागलीच तिथुन उठतो, व पुन रेड लाईट एरिया त्या ठिकाणी येतो. बघतो तर तिथे याच करिश्माची चर्चा सुरू असते. तिथे तो माहिती काढतो तेव्हा समजत. १० वर्षापूर्वी अविनाश केळकर यांनी तिला त्या खोलीत दारूच्या नशेत मारल होत. म्हणे ती सुंदर होती, पण त्या हैवानाला तिच्याकडून पुरेशी मन शांती मिळत नव्हती. आणि तिला तिच्या कडूनच हवी होती. हाच त्याचा हट्ट करिश्माच्या जिवावर बेतला. व आज केसचा निकाल तिच्या बाजूने लागला. व तिची ती खोली तिला जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त बंद ठेवण्यात आली होती. परंतु आज मात्र ती खोली करिश्मा सोबत मुक्त करण्यात आली होती. हे सर्व ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला करिश्मा सोबतच्या त्या २ भेटी आठवू लागतात. ते क्षण आठवू लागतात व त्या बंद खोलीत तीचाच आत्मा घुटमळत होता हे त्याच्या लक्षात येत. व आ पण सही सलामत सुटलो, याने काही अंशी का असेना मनाला ही मनशांती मिळते.
तो पुन घरी येतो. खूप मोठ्या संकटातून वाचलो ह्या भावनेने जियाला कडकडून मिठी मारतो. जिया मात्र अचंबित राहते. ह्या त्याच्या मिठीतच त्याला खर्या अर्थाने मन शांती
ची जाणीव होते. आणि संसारातच मन शांती आहे. त्याचीही.
समाप्त.
गावरान कथा
रत्नागिरी जिल्यातील घातावडे या गावात जयराम दिवेकर हा तगडा व तेजस्वी इसम शिक्षकाची नोकरी करीत होता त्याची हि कथा आहे. दिसायला अगदी तेजस्वी गोरापान भारदस्त शरीरयष्टीचा कोणीही पहिल्या नजरेत त्याला भुलून जाईल. असा हा जयराम काही दिवसातच शाळेत सर्वांचा प्रिय झाला. त्याच...