“बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?”
तिच्या पतीच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं.
जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरुणात पडले होते. बर्याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होती पण त्याला डिवचायला मज्जा यायची तिला. तो तर अंथरुणात पडल्या पासूनच तिच्यासाठी तयार होता.
“येते की, का येणार नाही.
“घोड्यांच्या टापांचा टपटप आवाज होत जेव्हा धूळ उडते, तेव्हा मला तुझी आठवण येते.
“रणगर्जना देत जोर जोराने ओरडत जेव्हा आम्ही शत्रू सैनिकांवर तुटून पडतो, तेव्हा तुझी आठवण येते.
“जेव्हा माझी तलवार शत्रू सैनिकाचं मांस चिरत रक्ताच्या चिळकांड्या उडवते, तेव्हा तुझी आठवण येते.
“एका पाठोपाठ एक शत्रू सैनिकाच्या डोळ्यातील प्राण ज्योत मावळताना पाहतो, तेव्हा तुझी आठवण येते.
“खराब रणनीतीमुळे जेव्हा आमची बाजू हरू लागते, तेव्हा तुझी आठवण येते.
“जेव्हा आमचे सैनिक पराक्रमाची पराकाष्ठा करून लढाईची बाजू पलटतात, तेव्हा तुझी आठवण येते.
“कित्येक वेळा वीतभर अंतराने भाला मागच्या सैनिकाच्या छाताडात जाऊन घुसतो, तेव्हा तुझी आठवण येते.
“लढाईच्या विजयानंतर जेव्हा आम्ही खजिना लुटतो, तेव्हा तुझी आठवण येते.”
त्याच्या बोलण्याने ती स्तब्धच झाली. तिचा पती लढाईच्या मैदानावरच्या गोष्टी कधीच सांगायचा नाही. त्याने एवढं सारं बोलल्यावर तिला काय उत्तर द्यावे हे कळेना. ती दूर गेलेली पुन्हा त्याच्या जवळ सरकली. त्याचं मस्तक स्वत:च्या मांडीवर ठेवून घेतलं आणि त्याच्या दाट केसांमधून बोटे फिरवत बोलू लागली.
“लढाईच्या मैदानावर मला आठवल्यावर तुम्हाला व्यत्यय नाही ना येत?”
परिवाराच्या काळजी पोटी कित्येक पराक्रमी योद्ध्यांनी लढाईच्या मैदानातून पळ काढण्याच्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या. त्यांची झालेली बदनामी व नाचक्की तिने पाहिली होती. तिच्या पतीची तशी अवस्था तिला पाहवली नसती.
“छे, व्यत्यय मुळीच येत नाही. उलट बळ मिळतं.” तो उठून बसला.
तिचा चेहरा त्याच्या तळहातात धरत, तिच्या नजरेला नजर देत तो म्हणाला,
“अशी अप्सरे सारखी पत्नी घरी असताना रण मैदानावर एखादा खुळा व्यक्तीच मृत्यू पडेल. उलट या सुंदर मुखड्यामुळे जिंकण्याचं बळ मिळतं.”
त्याच्या त्या स्तुतिने ती लाजून लाल झाली. तिने डोळे झाकत तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत लपवला. त्याने तिचे हात बाजूला सारत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. बराच वेळ न थांबता तो तिचे ओठ चाखत होता. त्याची जीभ तिच्या जिभेची चाळा करत होती. शेवटी तिनेच त्याला काही क्षणासाठी दूर सारलं.
“बेसावध असताना हल्ला करणं बरोबर नाही.” हाताने ओठांवरची लाळ पुसत हपापलेल्या छातीने श्वास घेत ती म्हणाली.
“आता तर सावध झालीस ना?”
त्याने तिला खाली झोपवले व तो तिच्यावर आला.
“करूया का मग लढाईला सुरूवात?” तो हसत म्हणाला आणि तिच्या शरीरावर तुटून पडला.
त्या रात्री त्यांच्या शयन कक्षात होणार्या घनघोर युद्धाचे आवाज दूरपर्यंत ऐकू जात होते, पण त्यांना कोणाची पर्वा नव्हती.