उकाडा भरपूर होता. फॅन व कुलरच्या वार्याने काही तो कमी होत नव्हता.
“मी म्हणत होते एसी बसवून घेऊ. पण तुम्ही ऐकलं नाही माझं.” किचनमधून हातात एक वाटी घेऊन येताना ती बोलली व कुलरच्या वार्यात बेडवर त्याच्या शेजारी बसली.
“पैशाची अडचण होती, तुला पण माहिती आहे.”
तिने वाटीत काय आणले, हे पाहण्यासाठी त्याने मान झुकवून पाहिलं. ती चमच्याने आईस्क्रीम खात होती.
“तुमचा नवा मोबाईल घ्यायला अडचण नव्हती का?” ती लटक्या रागात म्हणाली, “तुमच्या मनाचच करता तुम्ही सगळं.”
त्याने ते सारं ऐकलं होतं पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला पण आईस्क्रीम खायचं होतं.
“मलाही आणायचं होतं ना?” तो बेडवरून उठत फ्रीजमधून आईस्क्रीम आणायला जात म्हणाला.
शिल्लक होतं ते सगळे आईस्क्रीम तिने घेतलं होतं पण ती काहीच बोलली नाही. तिने त्याला जाऊ दिलं. काही वेळातच तो परत आला.
“सगळं तूच घेतलं होय, मला थोडं तरी ठेवायचं की.” तो कुरकुर करत पुन्हा त्या कुलरच्या वार्यात तिच्या शेजारी बसला.
तिने चमच्या भरून आईस्क्रीम घेतलं आणि त्याच्या समोर मादकपणे हालचाल करत चमचा तोंडात ठेवला.
“आ पण दोघे एकातच खाऊ की?”
तिने तोंडातला चमचा काढत त्यात आणखी एक घास घेतला. तो चमचा त्याच्या समोर धरला. त्याने आ करत तोंड उघडले पण तो घासही तिनेच खाल्ला.
तो चिडून तिच्या हातातील वाटी काढून घ्यायचा प्रयत्न करू लागला पण ती हात लांबवत वाटी त्याच्यापासून दूर नेत होती.
“माझं आईस्क्रीम आहे, मी एकटीनेच खाणार.” ती त्याला चिडवत होती
“आत्ताच तर म्हणली होती, एकात खाऊ आणि आता म्हणतेय माझं?”
तो तिच्या अंगाला झटत आईस्क्रीम घ्यायचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्यापासून दूर दूर सरकत होती.
“मी खोटं बोलले.” ती हसली. “आधीच ही गर्मी असली. निदान आईस्क्रीम तरी खाऊ द्या मला.”
त्याने चिडून तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तिच्या हाताला ओढत वाटी हातात घ्यायचा प्रयत्न करत असताना वाटी तिच्या हातातून निसटली आणि ते थंडगार आईस्क्रीम दोघांच्याही अंगावर पडलं.
“तुला ना मला, घाल कुत्र्याला! सांडून ठेवलं ना सगळं.” ती जराशी चिडली होती.
“काळजी करू नको, मी आहे ना.” असं म्हणत त्याने \ तिच्या खांद्यावरून उरोजाकडे चाललेला आइस्क्रीमचा ओघळ त्याच्या जिभेने चाटला.
त्याच्या कृतीने ती सुरूवातीला दचकली आणि मग लाजून चूर झाली.
“काय करताय?” हळू आवाजात ती लाडिकपणे म्हणाली.
“उकाडा कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे.” तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.
“कोणती?”
“थंडगार पाण्याने अंघोळ करूया की… एकत्र?” शेवटच्या शब्दावर जरा जोर देत तो बोलला.
“तुम्ही पण ना, एसी असता तर असं झालं नसतं.” ती त्याच्याबरोबर बेडवरून उठत म्हणाली.
“म्हणून तर मी एसी बसवला नाही. दोघांना एकत्र अंघोळ करता येईल ना आता?” त्याने प्रत्युत्तर दिले व दोघेही बाथरूमकडे निघाले.
त्या वेळी थंड पाण्याच्या शॉवर खाली उभा राहून त्यांना उकाड्या बरोबर बर्याच गोष्टीचा विसर पडला.