तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच चित्तवेधक वाटत होती.
जस जसा तो व्हिडीओ पुढे सरकत होता, तस तशी त्याच्या दुसर्या हाताची हालचाल वाढत होती. सरते शेवटी त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला. आता फक्त कानात आवाज येत होता. तो जोरात हालचाल करू लागला. त्याचा श्वास चढलेला होता. आता कोणत्याही क्षणी तो मोकळा होणार होता, तेव्हाच त्याच्या रूमचे दार उघडले!
दारात त्याची आई उभी होती. त्याच्या छातीत धस्स झाले. श्वास कोंडला गेला. कुणीतरी छातीवर भलेमोठे वजन ठेवावे, अशी त्याची छाती दुखू लागली. त्याने पटकन त्याची पॅन्ट ओढून घेतली. आईलाही आ पण चुकीच्या क्षणी आलो, याची जाणीव झाली. तिने पटकन दार लावून घेतले व बाहेर गेली.
या आठवड्याभरात ही तिसरी वेळ होती. आठवड्याभरात तो तीन वेळा आईला सापडला होता. त्याला स्वतःची लाज वाटत होती. त्याने मनातल्या मनात स्वतःला कितीतरी वेळा बंदुकीच्या गोळ्या घालून टाकल्या. आई गेल्यानंतर त्याने काही वेळ जाऊ दिला नंतर हळूच दार उघडले आणि चोरपाऊलांनी तो घराबाहेर पडला.
‘मी काही चुकीचं केलं नाही, हस्तमैथुन नैसर्गिकच आहे.’ तो स्वतःला समजावत होता. ‘नैसर्गिक असले म्हणून त्याचा इतका अतिरेक करावा का?’ त्याचे स्वतः शीच युद्ध चालू होते. एका बाजूने तो स्वतःच्या कृतीचे समर्थन करायचा आणि दुसर्या बाजूने तो स्वतःच्या कृतीची निंदा नालस्ती करायचा. ती कृती किती चुकीची आहे, हे स्वतःला समजून सांगायचा. त्याच्या मित्रांबरोबर ह्या बाबतीत बोलणे व्हायचे. इंटरनेटवर इकडे तिकडे त्याने बर्याच वेळा ऐकले होते की हस्तमैथुन करणे नैसर्गिक आहे, त्यात काही चुकीचे नाही.
‘हस्तमैथुन करायला मी कुठे नको म्हणतोय, पण मग पोर्न बघायची काय गरज आहे?’ त्याने स्वतःला प्रश्न विचारला आणि स्वतः त्याचे उत्तर द्यायला लागला, ‘पॉर्न बघणं कुठे चुकीचा आहे? पॉर्न बघितलं म्हणून काही नसतं होत.’ त्याने स्वतःच्या कृतीचे समर्थन करायचा प्रयत्न केला, पण नकळत त्यालाही जाणवत होते की त्याने आता सीमा ओलांडली होती.
तो आता बारावीच्या वर्षातली नीटची परीक्षा रिपीट करत होता. मागच्या वेळी हवा तसा स्कोर न मिळाल्याने त्याला चांगले कॉलेज मिळाले नव्हते. घरची परिस्थितीही बर्यापैकी होती, त्यामुळे त्याने परीक्षा रिपीट करायचे ठरवले होते. घरच्यांचीही त्याला साथ होती. पण नव्या शैक्षणिक वर्षाची कुठे सुरूवात झाली नव्हती, आणि आताच त्याला निराशेने ग्रासले होते.
चांगले नसले तरी मिळाले होते ते कॉलेज बरं होते. त्याचे सर्व मित्र मिळाले त्या कॉलेजला गेले होते. तो एकटाच मागे राहिला होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती चांगले कॉलेज मिळावे आणि त्याचाही चांगलेच कॉलेज मिळावे असाच अट्टाहास होता. म्हणून त्याने परीक्षा रिपीट करण्याचे ठरवले होते. पण आ पण घेतलेला निर्णय चुकला तर नाही ना? याची आता त्याला चिंता सतावत होती.
त्यामुळेच की काय आताशा त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्याचा बराच वेळ मोबाईलवर व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम, मूव्हीज आणि वेब सिरीज पाहण्यात जात असे. पण काही दिवसानंतर त्याला त्याचाही कंटाळा येऊ लागला. त्याला सर्व काही नीरस वाटू लागले. आ पण घेतलेला निर्णय चुकीचा आहे, आ पण कॉलेजला जायला हवे होते. सर्व काही असताना, सर्व काही सुख त्याच्या पदरी असताना, त्याला स्वतःचे आयुष्य नीरस वाटत होते.
‘या वेळी देखील स्कोर हवा तसा आला नाही तर काय करायचं?’ त्याला चिंता सतत सतवत होती. त्यामुळे त्याचा नीट अभ्यासही व्हायचा नाही आणि ती चिंता सतावू नये म्हणून तो काही ना काही करण्यात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळेच की काय त्याचे मोबाइलचे व्यसन भयंकर वाढले होते.
मोबाईलच्या बरोबरच तो पॉर्न व्हिडीओच्या देखील आहारी गेला होता. सतत पॉर्न पाहणे आणि हस्तमैथुन करणे हे त्याच्या सवयीचा भाग झाले होते. आताशा त्याला काळ-वेळ काही समजत नव्हते. स्वतःची वेगळी खोली होती, त्यामुळे त्याला प्रायव्हसी असायची. मात्र वेगळी खोली असूनही दार लावणे देखील त्याच्या डोक्यात येत नव्हते. थोडे फार काही झाले, काही आठवले, कुठे काही पाहिले की लगेच उत्तेजना जाणवायची आणि मग लगेच तो पॉर्न व्हिडीओ लावायचा आणि हस्तमैथुन करायचा.
मागच्या दोन तीन आठवड्यापासून तर त्याचे व्यसनच झाले होते. त्यामुळेच या आठवड्याभरात तो तीन वेळा त्याच्या आईला हस्तमैथुन करताना सापडला होता. एकदा बाथरूममध्ये आणि दोन वेळा त्याच्या खोलीत. त्यालाही आईचा सामना करताना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे पण काही इलाज नव्हता.
‘तिने अजून बाबांना सांगितले नाही म्हणून बरं!’ तो विचार करायचा आणि ‘आतापासून काही करायचं नाही’ असा मनाशी निर्धार करायचा. पण टिकेल तो निश्चय कसला? एका वेळी ठरवले तर तासाभराच्या आतच त्याचा निश्चय मोडायचा आणि पुन्हा एकदा तो दृढनिश्चय करायचा. दिवसातून सात-आठ वेळा त्याचे असेच चालायचे. रात्र दिवस त्याच्या डोक्यात हाच विषय रेंगाळत असल्यामुळे एक-दोनदा त्याला स्वप्न दोषही झाला होता.
‘हे वागणं बरोबर नाही लवकरात लवकर सुधारायला हवं!’ तो स्वतः शीच म्हणायचा आणि मग लगेच त्याचे दुसरे मन जोरात ओरडायचे, ‘काय चूक आहे या वागण्यात सर्व काही नैसर्गिक तर आहे.’ लगेच उत्तर तयार असायचे, ‘काही नैसर्गिक नाही यात!’
त्याने त्याच्या मित्रांसोबत बोलायचा प्रयत्न केला होता. पण जो-तो त्याच्या कॉलेजच्या जीवनात व्यस्त असायचा. पूर्वीसारखा बोलायला त्यांना वेळच मिळायचा नाही. तो एकटा पडत चालला होता. ट्युशनही असायची पण ट्युशनमधील सर्व चेहरे नवे त्याला अनोळखी वाटायचे. आपल्या सोबत काय होतेय? याचे त्याने बराच वेळ वैचारिक विश्लेषण केले आणि संध्याकाळ होत आल्यानंतर तो घराकडे परतला.
त्याचे वडील घरी आले होते. मोठी बहीण शहरातीलच कॉलेजला इंजिनियरिंग करत होती. तिघेही त्याची वाट पाहत बसले होते. त्याला नको ती शंका आली, ‘आईने बाबांना सांगितलं की काय?’ तो त्यांना न पाहिल्यासारखे करत त्याच्या खोलीकडे जायला निघाला, तेव्हाच त्याच्या वडिलांचा आवाज आला,
“इकडे ये तुझ्याशी बोलायचं आहे.”
शरमेने त्याची मान खाली झुकली होती. आता पुढे काय होणार? याची त्याला बर्यापैकी कल्पना होती. असे व्हायला नको होते, स्वतःच्या अब्रूचे काढले जाणारे धिंडवडे त्याला नको होते, पण वडिलांपुढे त्याचे काही चालायचे नाही. तो गुपचुप गेला आणि त्यांच्या समोर जाऊन बसला.
“तो मोबाईल काढून ठेव! तुला खरंच काही कळत नाही का?”
वडील जरा रागात होते. आई आणि त्याची बहीण किचनमध्ये गेल्या होत्या.
“एवढा कसा वासनेच्या आहारी गेला आहेस तू? निदान दार लावायचे तरी भान ठेवत जा! मान्य आहे, हस्तमैथुन अयोग्य नाही, पण करताना आजूबाजूच्या परिसराचं तरी ध्यान ठेवत जा. आणि तुला जर हस्तमैथुन करायचं असेल, तर ते पॉर्न वगैरे पूर्णपणे बंद कर. करायचंच असेल तर सर्व काही नैसर्गिकरित्या होऊ दे!”
त्याला वडिलांकडून हे अपेक्षित नव्हते. त्याला वाटले होते वडील त्याला भरपूर रागावतील, पण ते तर त्यांना रागात उपदेशाचे डोस देत होते. त्याच्या चेहर्यावरील आश्चर्य त्याच्या वडीलांपासून लपले नाही.
“हस्तमैथुन अयोग्य नाही पण त्यामुळे जर तुला दैनंदिन आयुष्यात अडचणी येत असतील तर ते कितपत योग्य आहे तूच ठरव. तुला खरंच कळतंय का पॉर्न पाहून तुझं किती नुकसान होतंय ते?”
तो शांतपणे ऐकून घेत होता. काही बोलण्याचा त्याला धाडस होत नव्हते.
“तू आईला तीन वेळा सापडला आहे, म्हणजे एकांतात तू हे सर्व किती वेळा करत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. तुझे ट्युशनमध्ये लक्ष नाही. अलीकडे झालेल्या टेस्टचे निकालही चांगले नाहीत. मी तुला बोलणार होतो पण उगाच कशाला तुला ताण द्या म्हणून मी बोललो नाही. यामुळेच निकाल कमी झाले असतील.”
त्याने गुपचूप मान हलवली.
“मोबाईल जप्त करणे योग्य नाही, मोबाईल तर तुला लागतोच. पण तुझं इंटरनेट मात्र बंद राहील आणि एक लक्षात ठेव पॉर्न पूर्णपणे बंद, तू जर मला किंवा घरातील कोणाला बघताना सापडला मग पुढच्या वेळी शिक्षा असेल!”
तो गुपचूप उठून खोलीत गेला. बरोबर मोबाईल होताच. वडीलांनी इंटरनेट असलेले सिम कार्ड काढून घेतले होते आणि मोबाईल त्याच्याजवळ दिला होता. तो आत गेला त्याने दार लावून घेतले. पुन्हा एकदा निराशेची भावना त्याच्या मनात दाटून आली. हृदयात खोल कुठेतरी एक मोठे भोक असल्यासारखे वाटू लागले.
त्याचे श्वास वाढू लागले. त्याचे हृदय जोराजोरात धडकू लागले. त्याने त्याच्या बॅगमध्ये असलेला पेन ड्राइव्ह काढला. ओटीजीमार्फत मोबाईलला जोडला. पेन ड्राईव्हमध्ये असलेला पॉर्न व्हिडीओ मोबाईलमध्ये कॉपी करून तो गादीवर आला.
क्षणार्धात तो पॅन्ट काढून आडवा झाला. त्याने कानात हेडफोन घातले. एका हातात मोबाईल आणि दुसर्या हातात त्याचे अर्धवट ताठरलेले लिंग! त्याने मोबाईलवर व्हिडीओ सुरू केला आणि तो पुन्हा एकदा हस्तमैथुन करू लागला!