“हॅल्लो.”
८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला.
“हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय.. तू आलास स्कूलमधून?”
“हो पप्पा.”
“व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा’! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी.”
“पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे.. अंकल बरोबर.” असे बोलून मुलगा हसला.
“काय? कुठले अंकल??” पप्पांनी गंभीरपणे म्हटले.
“अहो पप्पा, ते अंकल ना नेहमी दुपारी येतात.” मुलाने माहिती दिली.
“अस्सं! आणि काय करतात ते बेटा?” पप्पांनी मुलाला विचारले.
“काय माहीत. अंकल येतात आणि मग मम्मी अन ते बेडरूममध्ये जातात. दरवाजा बंदच असतो.” मुलाने अजून माहिती पुरवली.
पप्पा विचारात पडले. मग अर्ध्या मिनिटानंतर ते मुलाला म्हणाले,
“ओके बेटा, आता मी सांगतो ते करायचे. फोन खाली टेबलवर ठेव. मम्मीच्या बेडरूम जवळ जा. दरवाजा वाजव आणि मोठ्याने ओरडून मम्मीला सांग. ‘पप्पा आले आहेत आणि कार पार्क करताहेत’ आणि मग काय होतेय ते मला येऊन सांग. ओके?”
“ओके पप्पा, थांबा हं..”
मग पप्पा वाट बघत राहतात. फोनमध्ये त्यांना धावपळीचे काही आवाज ऐकू येतात. मग फोन उचलला जाऊन मुलगा बोलते,
“ओके पप्पा, मी केले तुम्ही सांगितले तसे.”
“स्मार्ट बेटा! आता काय झाले ते सांग मला?”
“मी ना.. मी ना.. बेडरूमच्या दरवाज्याजवळ गेलो आणि तुम्ही सांगितले तसे मोठ्याने बोललो. मग मला ना.. आत आवाज ऐकू आला. मग दरवाजा उघडला आणि मम्मी नागडीच बाहेर आली. ती आत-बाहेर पळत होती. मग ती बेड जवळ धडपडली. तिचे डोके बेडला आपटले आणि ती खाली पडली. आणि मग ती तशीच पडून आहे, हलतच नाही. बहुतेक मम्मी मेली!”
“काय? आणि तो अंकल? तो कुठे आहे?”
“अंकल? तेपण नागडेच होते. त्यांनी घाईत कपडे घातले आणि बेडरूमच्या खिडकीतून खाली उडी मारली. मी खिडकीत बघायला गेलो तर ते खाली चुपचाप पडलेले दिसले. पप्पा, मला वाटतं तेपण मेले! आता पाचव्या मजल्यावरून उडी मारली तर ते मरणारच ना, पप्पा?”
पप्पा ते ऐकून वेडापिसे झाले! त्यांनी आश्चर्याने मुलाला विचारले,
“अरे पण बेटा, पाचव्या मजल्यावरून कसे? आपण तर पहिल्या मजल्यावर राहतो ना??”
“अहो पप्पा, असे काय बोलताय? आपण पाचव्या मजल्यावर राहतो ना?” मुलगा हसत म्हणाला.
“नो बेटा! वेट!! हा नंबर ‘६४४५ ३८६ ७५६’ आहे ना?”
“नाही. हा ‘६४४५ ३८६ ७६५’ आहे.”
“ओह! सॉरी.. राँग नंबर!”