रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतायत. कारणच तसं आहे ना.
आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी तिला दाखवायला आणतोय, याचा दोघांनाही खूप आनंद झालाय. आज तिची आणि त्याची दोघांचीही माफी मागून टाकायची असं त्यांनी ठरवलंय.
गेल्या तीन महिन्यांमध्ये काल रात्री पहिल्यांदा रवी मम्मी-डॅडींशी बोलला, “मी तिला घेऊन येतोय. कृपा करून या वेळी कसलाही घोळ घालू नका.”
गेले तीन महिने रवी घरात बोलतच नाहीये. सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपून राहतो. उठला की काहीतरी खाऊन घेतो आणि जो बाहेर पडतो तो रात्री उशिराच घरी परततो. त्याचे मम्मी-डॅडी गर्भश्रीमंत आणि आधुनिक विचारांचे आहेत. रवीच्या बँक अकाउंटला वेळच्या वेळी पैसे जमा करत राहतात.
आपल्यानंतर आपल्या संपत्तीचा वारस एकुलता एक रवीच असल्यानं त्याच्या भविष्याबद्दल दोघांनाही चिंता नाहीये. शिवाय दोघंही सुशिक्षित आणि फॉरवर्ड असल्यानं मुलाला ऊठसूठ उपदेश करणंही त्यांच्या स्वभावात नाही. त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे की मुलानं आपल्यापासून दूर जाऊ नये. त्यासाठी जे लागेल ते सगळं ते रवीला देत आलेत.
पण गेल्या तीन महिन्यांपासून दोघंही जाम टेन्शनमध्ये आहेत. रवीनं आपल्याशी बोलावं म्हणून खूप प्रयत्न करतायत. पण त्याचा राग जायची चिन्हं दिसत नसल्यानं हताश झालेत. पण झालंय काय त्याला रागवायला?
झालं असं की, तीनेक महिन्यांपूर्वी रवीचे मम्मी-डॅडी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. त्यातल्याच एका रविवारी रवीनं त्यांना फोन करून विचारलं, “तुम्ही एक-दोन दिवस अजून परत येणार नाहीत ना?”
“नाही, अजून थोडे दिवस इकडंच राहू.”
“ठीक आहे, मला आज-उद्या बंगल्यावर एकांत हवाय, म्हणून कन्फर्म केलं. परत आल्यावर बोलूच.”
रवीचा फोन झाल्यावर त्याच्या चावट डॅडींच्या डोक्यात निळा बल्ब पेटला. ते रवीच्या मम्मीला म्हणाले, “रवी बहुतेक कुणाला तरी बंगल्यावर घेऊन येणार आहे.”
“असेल काही तरी पार्टी-बिर्टी.” मम्मी
“अगं पार्टी-बिर्टी काही नाही. तरूण पोराला एकांत हवाय बंगल्यावर, म्हणजे नक्कीच दाल में कुछ काला है.”
यावर मम्मी खेकसली, “अहो काही काला-बिला नाही. तुमचा आपला उगीच चावटपणा आणि आणलं कुणाला बंगल्यावर तर आणू दे. तरूण पोरं नाही करणार मजा तर काय तुमच्यासारखे म्हातारे करणार?”
“अगं तसं नाही. त्याला करू दे की मजा. आपण पण करू जरा गम्मत.”
मम्मी चक्क लाजली आणि म्हणाली, “इश्श, हे काय आता भलतंच!”
“अगं तसली गम्मत नाही काय. आ पण रवीला सरप्राइज देऊन गंमत बघू.”
मम्मीला काहीच कळालं नाही. डॅडींनी हळू आवाजात तिला सगळा प्लॅन समजावला. सुरूवातीला नाही नाही म्हणत नंतर मम्मी पण तयार झाली.
इकडं ऑल क्लिअरचा सिग्नल मिळताच रवी मैत्रिणीला घेऊन बंगल्यावर आला. तो भव्य-दिव्य बंगला, उंची फर्निचर, महागडे टीव्ही, दिवे, कार्पेट, सगळं बघून मैत्रिणीचे डोळे दिपून गेले. हिला पटवण्यासाठी रवीनं भरपूर मेहनत घेतली होती. आज त्याचं फळ मिळायची वेळ आल्यानं त्याला अजिबात धीर धरवत नव्हता.
ती इकडं-तिकडं भारावून बघत असतानाच त्यानं तिच्या दंडाला धरून जवळजवळ ओढतच वरच्या बेडरूमकडं नेलं. बंगल्याचं मेन डोअर लॉक असल्यानं बेडरूमचं दार लॉक करण्यात त्यानं वेळ दवडला नाही. आपल्या भव्य बेडवर तिला ढकलून तो थेट कपडे न काढताच तिच्या अंगाशी झटू लागला. ती सुद्धा या दिवसाची वाट बघत असल्यानं त्याला पुरेपूर साथ देत होती.
रवीनं तिचा टाइट टी-शर्ट गळ्यापर्यंत वर उचलून थेट तिच्या छातीवर हल्ला चढवला. ब्रेसियरच्या वरूनच तिचे अर्धे-कच्चे आंबे पिळायला लागला. त्याच्या धसमुसळ्या हाताळणीनं उत्तेजित होऊन तिनंही आपला हात दोघांच्या मधून सरकवत त्याच्या पॅन्टवर आणला. तिच्या दोन डोंगरांमधल्या घळीत तोंड खुपसून रवी जोरजोरात चाटत-चावत-चोखत होता.
प्रचंड उत्तेजनेनं, “स्स्स्स्स… आह्… आह्… हाय्” असे आवाज काढत ती एक हात रवीच्या केसांतून फिरवत दुसर्या हातानं त्याच्या पॅन्टची चेन चाचपू लागली. चेन हळूहळू उघडत आपली लांबसडक बोटं आत घुसवणार तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा धाडकन् उघडला आणि “सरप्राऽऽऽइज” असं ओरडत रवीचे मम्मी-डॅडी आत घुसले.
“ईईईईईऽऽऽ“ असं किंचाळत रवीच्या मैत्रिणीनं त्याला आपल्या अंगावरून ढकलून दिलं. गळ्यावरचा टी-शर्ट खाली खेचला आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा लपवत बेडवरून उडी मारून थेट बाहेर पळत गेली.
“अरे अरे, जरा गंमत केली तुमची, यू कंटीन्यु, यू कंटीन्यु, ” असं ओरडत डॅडी तिच्या मागं पळत गेले. मम्मी तिथंच खिळून उभी राहिली होती. रवी बेडवर उताणा पडला होता, त्याचा शर्ट चुरगाळला होता. पॅन्टची चेन अर्धी उघडी होती. लाळेनं माखलेल्या उघड्या तोंडातून तो जोरजोरात श्वास घेत होता.
बास्, त्या दिवसापासून रवी मम्मी-डॅडींशी बोलतच नाही. त्यांना ‘सॉरी’ म्हणायचा देखील चान्स तो देत नाही. मम्मीनं तर सगळ्याचं खापर डॅडींच्या चावटपणावर फोडलंय.
डॅडींनासुद्धा मनापासून रवीची माफी मागायचीय, असं सगळं असताना, रवीनं काल ‘तिला घेऊन येतोय’ असं सांगितल्यामुळं दोघंही खुश झालेत. रवीनं त्याच्या बाजूनं तिला समजावून परत पटवलं असणार. आता आपण पण दोघांची एकदमच माफी मागून टाकू, असं मम्मी-डॅडींनी ठरवलंय.
“चल, मम्मी-डॅडी आतमध्ये वाट बघतायत.” रवीनं गाडीतून उतरत तिला हात दिला.
दोघं मम्मी-डॅडी बसले होते त्या हॉलमध्ये आले. तिनं हात जोडून दोघांना नमस्ते केलं. मम्मीनं उठून तिच्या जवळ जात डोक्यावरून हात फिरवला आणि खांद्याला धरून सोफ्यावर आपल्या शेजारी बसवून घेतलं.
‘कित्ती सुंदर आहे ना, कित्ती गोऽऽड आहे ना, वगैरे’ कौतुक सोहळा झाल्यावर चौघंही किचनमध्ये आले. जेवणाची सगळी तयारी झालेली होती. हसत-खेळत, गप्पा मारत चौघांनी जेवायला सुरूवात केली. सगळं सुरळीत चालू आहे हे बघून रवीनं मनातल्या मनात देवाचे आभार मानले.
तेवढ्यात एवढा वेळ शांत-शांत असलेल्या डॅडींनी घसा खाकरून बोलायला सुरूवात केली, “रवी बेटा, तुझा आनंद बघून आम्ही पण खूप खूष आहोत. ही संधी साधून आम्हाला तुम्हा दोघांची माफी मागायची आहे.”
बोंबला, आता हे काय नाटक? रवीचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं. शेजारी बसलेल्या त्याच्या मैत्रिणीला काहीच कळालं नाही.
“कसली माफी? कशाबद्दल बोलताय तुम्ही?” तिनं विचारलं.
“हे बघ बेटा, तुम्ही मोठ्या मनानं आम्हाला माफ केलं असेलही, पण आम्ही तुमची स्पष्ट शब्दात माफी मागत नाही तोपर्यंत आम्हाला अपराधीच वाटत राहणार.”
“जाऊ द्या ना डॅडी. कशाला जुने विषय काढायचे, जस्ट एन्जॉय, ” रवीनं डॅडींना आवरायचा प्रयत्न केला.
“असं कसं रवी, आम्ही समजू शकतो तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. खास करून तुला आमचा खूपच राग आला असेल ना बेटा?” डॅडी सुरूच होते.
“मला काहीच कळत नाहीये. तुम्ही कशाबद्दल बोलताय? रवी, काय चाललंय हे?” ती गोंधळून गेली.
“अगं काही नाही, डॅडी गंमत करतायत बहुतेक, ” असं म्हणून रवीनं डोळे वटारून डॅडींकडं बघितलं.
त्याच्याकडं साफ दुर्लक्ष करून ते तिला म्हणाले, “बेटा, गंमत तर आम्हाला त्या दिवशी करायची होती. पण सगळीच फजिती झाली.”
“कुठल्या दिवशी? कसली फजिती?”
तिच्या मनाचा मोठेपणा बघून डॅडींना भरून आलं. ते म्हणाले, “हे बघ, तू सगळं विसरून गेली असलीस तरी आम्हाला हे बोलणं भाग आहे. आज तरी आम्हाला माफी मागायची संधी दे. त्या दिवशी…”
“डॅडी, प्लीज.” रवीनं थांबवायचा प्रयत्न केला.
“बोलू दे त्यांना, रवी. हं सांगा मला काय झालं त्या दिवशी, डॅडी, ” तिला आता काय गडबड आहे ते जाणून घ्यायचंच होतं.
“थँक्स बेटा! त्या दिवशी रवीनं आम्हाला फोन करून सांगितलं की त्याला बंगल्यावर एकांत हवाय. आम्ही ओळखलं की तो नक्की त्याच्या मैत्रिणीला घेऊन येणार. आम्ही विचार केला जरा गंमत करू म्हणून आम्ही न सांगताच निघून आलो. गाडी बंगल्याच्या बाहेरच पार्क केली. आमच्या किल्लीनं मेन डोअर उघडलं. बेडरूमचा दरवाजा लॉक नव्हताच, त्यामुळं आम्ही थेट आत घुसलो तर…”
“ओह् नो, डॅडी प्लीऽऽऽज, ” असं म्हणून रवीनं आपलं डोकं दोन्ही हातांनी गच्च धरलं.
“तर काय? काय बघितलंत तुम्ही?” तिनं विचारलं.
“आम्ही आत येऊन ‘सरप्राइज’ असं ओरडलो तेव्हा रवी तुझ्या अंगावर होता. तुझा टी-शर्ट गळ्यापर्यंत उचललेला होता. रवीचं तोंड तुझ्या छातीत घुसलेलं होतं आणि तुझा हात त्याच्या पॅन्टच्या चेनमध्ये…”
‘खर्रऽऽऽ‘ असा आवाज करत खुर्ची मागं सरकवून ती उठली. खाली मान घालून बसलेल्या रवीच्या हनुवटीला धरून तिनं त्याचा चेहरा वर केला. काही कळायच्या आत फाऽऽऽड् असा आवाज झाला आणि ती तरातरा निघून गेली.
मम्मी-डॅडी अवाक् होऊन बघतच राहिले. आपल्या लालबुंद झालेल्या गालावरून हात फिरवत रवी रागानं डॅडींकडं बघत धुसफुसत होता.
“सांगितलं होतं ना घोळ नका घालू म्हणून. लावलीत ना परत वाट.”
“अरे पण, आम्हाला फक्त माफी मागायची होती. आम्हाला काय माहित तो प्रसंग आठवून तिला एवढा राग येईल.”
“अहो हिला कुठला तो प्रसंग आठवायचा?” रवी कळवळत म्हणाला, “त्या दिवशी किंचाळून पळून गेली ती वेगळीच होती, ही नव्हती!”