“असं गोड बोलून फायदा नाही व्हायचा?” ती म्हणाली.
“का नाही होणार? गोड बोललं की सगळं काही साध्य होतं.”
त्याने एक हात तिच्या कमरेत घालत हळूच हिसका देत तिला जवळ ओढलं. दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची लट त्याने मागे सारली आणि स्वत:चे ओठ तिच्या जवळ नेऊ लागला.
“अशी ही मासोळी सहज गळाला लागणार नाही.”
त्याला कोणताच विरोध न करता तिने त्याला जवळ येऊ दिलं. मात्र जेव्हा त्याचे ओठ तिच्या ओठाच्या अगदीच जवळ आले तेव्हा तिने त्याला दूर ढकललं.
“कधीपासून जाळं घेऊन मासोळी मागे लागलोय, कधी ना कधी ती जाळ्यात अडकल्याशिवाय राहील काय?” तो एक पाऊल पुढे टाकत तिच्याजवळ पोहोचला. तिच्या कमरेत हात घालून तिच्या पोटावरून हळुवारपणे फिरवू लागला.
त्याच्या त्या स्पर्शाने ती मोहरून गेली. तो अलगदपणे दोन्ही हातांच्या बोटं तिच्या घाटदार पोटावरून फिरवत होता.
“कडकणाऱ्या विजेला कोणी पकडू शकत नाही.”
तिला त्याचा स्पर्श हवासा वाटत होता. तिच्या पाठीवर दबलेली त्याची छाती, मानेवर जाणवणारे त्याचे उष्ण श्वास तिला घायाळ करत होते.
“ढगांच्या कडकडाटातून तयार झालेली विज आकाशात कितीही चमकली, तरी तिला ओढ जमिनीकडे यायचीच असते.”
त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवरती टेकवले आणि हळूच उजव्या हाताची तर्जनी तिच्या नाभीत सारली.
तिने हलकासा उसासा टाकला. तो त्याला जाणवला नाही. निखार्यावर ठेवलेल्या लोण्याप्रमाणे तिथेच वितळून जावं, असं तिला वाटत होतं.
“वादळाला कवेत घ्यायला जाऊ नये माणसांनं.” तिने त्याचे हात सोडवायचा निष्फळ प्रयत्न केला.
“वादळ असलं म्हणून काय झालं, या वादळावर जीव आहे आमचा. कवेत घेऊ, अंगावर घेऊ, अंगाखाली घेऊ.”
त्याने जाग्या होणाऱ्या त्याच्या पुरुषत्वाला तिच्या पार्श्वभागावर दाबलं.
त्याचे ते शब्द ऐकून तिच्या पोटात खड्डा पडला. त्या पडलेल्या खड्ड्यातून फुलपाखरांचे जथेच्या जथे बाहेर पडले आणि तीचं सगळं मन त्या फुलपाखरांनी भरून गेलं. त्याच्या कठोरतेच्या जाणिवेने तिच्या तोंडून उसासा बाहेर पडला, या वेळी त्याला तो ऐकू गेला.
त्याने दाताने तिच्या मानेचा हलकासा चावा घेतला. तिच्या पार्श्वभागावर त्याची ताठरता अधिकच दाबली.
“तापलेल्या धरणीला पावसाची कितीही गरज असली तरीही ती आकाशाकडे विनवणी करत नाही. आकाशाला स्वत:लाच समजून घ्यावं लागतं आणि प्रेमाचा वर्षाव करावा लागतो.” तो म्हणाला.
त्याने तिला फिरवलं आणि तिच्या चेहर्यावरती चुंबनांचा वर्षाव करायला सुरूवात केली. अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून जाणाऱ्या जीवाप्रमाणे ती तडफडू लागली, तरीही तो चुंबनाचा पाऊस तिला आणखिनच हवासा वाटत होता.
कालांतराने त्याचे ओठ तिच्या चेहर्यावरून बाजूला सरकू लागले. आता ते तिच्या मानेवर, उरोजांच्या वरच्या भागावर रेंगाळत होते. तिचा श्वास चढत होता. छाती धपापत होती आणि छातीबरोबर तिचे उरोज. तिला आणखी संयम धरवत नव्हता, तरीही तिने शेवटचा प्रयत्न केला.
“मी तुम्हाला वरून ओळखीची वाटत असेल पण जितकं आत जाल तितका माझ्यामध्ये स्वत:ला हरवून बसाल. हे असे चक्रव्यूह आहे, ज्यातून बाहेर येणं अशक्य आहे. हे असं घनदाट जंगल आहे, ज्यामध्ये एकदा शिरला की तुम्हाला परत बाहेर यायचा रस्ता कधीच सापडणार नाही.”
तो क्षणभर थांबला. मान वर करून तिच्याकडे पाहू लागला.
“तुझ्यात गुंतायला, या चक्रव्यूहात अडकायला आणि या जंगलात हरवायला आवडेल मला.”
“बघा, विचार करा, परत नका म्हणू सांगितलं नाही म्हणून..”
“अशा गोष्टींचा विचार करायचा नसतो, मनात येतं ते करायचं असतं.”
आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवरती टेकवत तिला हाताने घट्ट मिठी मारली.