मी तिचे दोन्ही तळवे अधिक घट्ट पकडले आणि स्वतःचीच लाज वाटून हळुवारपणे बोललो, “वहिनी, मला तुझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी एवढं मोठं गुपित फक्त तुलाच सांगायचं ठरवलं.”
वहिनी माझ्या चेहर्यावर हात फिरवत म्हणाली, “मग कसला संकोच करत आहेस? मला सांग ना.”
माझ्या चेहर्यावरून वहिनीचा हात काढून पुन्हा तिचा हात माझ्या हातात धरला.
“वहिनी, ती साडी मला…”
माझं बोलणं संपण्याआधीच ड्रॉईंग रूममध्ये ठेवलेला वहिनीचा फोन वाजू लागला.
“आईचा फोन असेल. थांब, मी आत्ताच आले.” असे म्हणून वहिनीने माझ्या हातातून आपले हात वेगळे केले आणि पुन्हा माझ्या ओठावर एक हलके चुंबन देऊन ड्रॉईंग रूममध्ये गेली.
मी त्याच जागेवर हातावर हात ठेवून बेडवर बसलो आणि माझे वाढलेले श्वास नियंत्रणात आणू लागलो.
तेवढ्यात वहिनी झटपट पावलांनी बेडरूममध्ये आली आणि ड्रेसिंग टेबलचा ड्रॉवर उघडत मला म्हणाली, “मी लगेच आईला घेऊन येते. तू जरा तोंड धुवून घे आणि आराम कर.”
ड्रॉवरमधून दोन लाल रंगाचे कानातील टॉप्स काढून ते घालत ती पुढे म्हणाली, “मी अशी गेले आणि अशीच आले.”
आता माझी चिंता पूर्वीपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे मी वहिनीकडे काळजीपूर्वक पाहिलं. तिने टाईट फिटिंग असलेला लाल सलवार आणि पांढरी कुर्ती घातली होती. जी ना खूप घट्ट होती ना खूप सैल होती.
तिच्या बाह्या लहान होत्या आणि गळा मोठा होता. तिने एका लाल ओढणीने आपले स्तन झाकून घेतले होते. तिला या ड्रेसमध्ये पाहून, ती एका मुलाची आई आहे, असे कोणीही म्हणू शकत नव्हते.
वहिनी बेडरूममधून बाहेर पडताना वहिनी म्हणाली, “शेखर, तुला बरं वाटत नसेल तर माझ्या बेडरूममध्ये बसून राहा, पण दार आतून बंद कर. मी लगेच येते.”
मी दरवाजा बंद केला. मग मी आधी बसलो होतो पुन्हा त्याच जागी बेडवर बसलो आणि माझा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर आला.
त्या दिवशी रविवार होता. मी सकाळी जेवण वगैरे करून माझ्या बेडच्याकडेला पाय लटकवून बेडवर बसलो होतो. माझ्या हातात एका लाल रंगाची पॅडेड ब्रा आणि लाल रंगाची सुंदर गुलाबी रंगाची नाजूक पॅन्टी होती. बेडवर मी एक हिरवी रंगाची साडी, त्यावर लाल रंगाचा परकर आणि ब्लाउज मी काढून ठेवलेला होता.
मला ती साडी नेसायची होती. पण मी काहीशा काळजीत बुडालो होतो. मी मागे वळून त्या साडीकडे पाहिले. मग मी पुन्हा डोक्यावर दोन्ही हात ठेवून काहीतरी विचार करत उदासपणे बेडवर बसलो.
एक पुरूष जेव्हा स्त्रियांचे कपडे घालतो, तेव्हा त्याच्या मनात नेहमी द्वंद्व सुरू असते. कधी त्याच्यातील पुरूष त्याच्यावर अधिराज्य गाजवतो तर कधी त्याच्यातील स्त्री आपला हक्क बजावते.
पण हा तो काळ होता जेव्हा मी माझ्या मनातील स्त्रीला नीट समजू शकलो नाही. कदाचित मी मुद्दाम तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हतो आणि तिच्या भावना जबरदस्तीने दाबत होतो.
स्त्रियांच्या वासना दाबणे हे पुरूषांचे कामच असते! त्या द्वंद्वात माझ्यातील शेखर माझ्यातील स्त्रीवर म्हणजे शिखावर आपले पूर्णपणे वर्चस्व गाजवत होता. तो शिखाला त्याच्या शरीरावर कुठलाही अधिकार देण्यास तयार नव्हता.
माझ्या काही गरजा होत्या, ज्या फक्त शिखा पूर्ण करू शकत होती. माझ्या मनातील लैंगिक द्विधा आणि माझी अस्वस्थता फक्त साडी नेसून नटल्यावर शांत व्हायची. त्यामुळे मी तिला आपल्या मनात थोडीशी जागा दिली होती.
कदाचित याच कारणामुळे मी डोक्याला हात लावून उदास बसलेलो होतो. पुरूष असूनही मला स्वतः हून स्त्री व्हावंसं वाटत होतं.
मी माझ्या भिंतीवरील घड्याळात वेळ बघितली, बारा वाजले होते. मग माझा फोन उचलला आणि मेसेंजर उघडून कोणाला तरी मेसेज केला. मग मन वळवून माझ्या साडी आणि ब्लाउजकडे बघू लागला. तेवढ्यात मेसेंजरची नोटिफिकेशन आली.
‘कदाचित ४ नंतर.’
मी पण उत्तरात लिहिलं, ‘हो, चालेल!’
मेसेज केल्यानंतर मी समोरच्या ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहत माझे कपडे काढले. आता मी पूर्ण नग्न झालो होतो. दोन दिवसांपूर्वीच मी माझे पूर्ण शरीर वॅक्स केले होते. मी डोक्याचे केस, भुवया आणि पापण्या सोडल्या तर माझ्या शरीरावर एक केसही नव्हता.
काही वर्षांपूर्वी माझ्या छाती आणि कंबरेवरील लटकलेली चरबी पाहून एका जणाने मला फिमेल होर्मोन घ्यायची सल्ला दिली होती. त्याच्या सल्ल्यावर मी पण काही आठवडे ते घेतले आणि मला फरक जाणवला. आता चरबी लटकलेली दिसत नव्हती पण याउलट हाता-पायावरील केस गायब झाले होते आणि त्वचा गुळगुळीत झाली होती.
मग मी बाथरूममध्ये गेलो आणि क्लीन शेव्ह केले. मग मी सुगंधी साबणाने आंघोळ करून माझ्या चेहर्यावर आणि संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायझर लावले. त्यामुळे त्वचेत चमक आणि मुलायमपणा आला.
सडपातळ, गोरे आणि गुळगुळीत शरीर आणि गुळगुळीत छोटा चेहरा पाहून माझ्या मनात म्हणालो, “खरंच, किती नाजूक झालोय मी!”
हो, मी खरंच मुलींसारखा नाजूक झालो होतो, कदाचित, अजूनही आहे. एके काळी मी एक बलवान पुरूष होतो, तेव्हा मुली माझ्यासोबत डेट करू इच्छित होत्या. पण आता मी स्वतः एक नाजूक मुलगी झालो होतो, जी आता कुठल्या पुरूषासोबत डेटवर जाऊ इच्छिते.
पाच वर्षांपूर्वी मी माझे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण आता जेमतेम साडे पाच फूट उंची, सत्तावीसची कंबर, छातीवर आणि कंबरेभोवती जमा असलेली चरबी, या अवस्थेत माझे शरीर मुलीच्या शरीरासारखे घाटदार वाटत होते.
लहान वयात मी जिममध्ये हेवी वेट लिफ्टिंग केल्याने आता माझे रूंद खांदे आकुंचन पावले होते आणि खाली झुकले होते. हात बारीक झाले होते. पुरूष असूनही माझी पाठ इतकी लहान झाली होती की बॅकलेस ब्लाउज घातल्यावर खरंच आकर्षक दिसत होती.
(क्रमशः)