माझी अस्वस्थता वाढू लागली. आता मला वहिनीच्या ब्लाउजची मागची बाजू बघायची इच्छा होत होती. मी मनात म्हणालो, “वहिनी, फक्त एकदा, एकदा तरी मागे वळ…”
कदाचित वहिनीने माझ्या मनातलं ऐकलं आणि आपला पदर सारका करत ती थोडी वळली आणि माझे मन उत्साहाने भरले. वहिनीने अगदी तसाच ब्लाउज घातला होता, जसा मला घालायला आवडायचा.
तिची पाठ पूर्ण उघडी होती. त्या चौकोनी गळ्याच्या ब्लाउजला पाठीमागून आधारासाठी खाली दोन इंच पट्टी आणि वरच्या बाजूला खांद्याजवळ बांधायला दोन लांब बंध होते. तिच्या गळ्यात लटकलेले मंगळसूत्र ब्लाउजमधील स्तनांच्या घळीत विसावले होते.
दोन्ही हातात खाली वर दोन-दोन सोन्याच्या बांगड्या आणि त्यांच्यामध्ये डझनभर गडद गुलाबी बांगड्या सुंदर दिसत होत्या. मेकअप केलेले गुलाबी गाल, नखांना गुलाबी नेल पेंट, गडद गुलाबी लिपस्टिक, कानात सोन्याचे झुमके आणि कपाळावर एक गोल लाल लहान आकाराची टिकली, तिचे सौंदर्य खुलवत होते.
वहिनींनी केसांची वेणी केली होती. जी डाव्या खांद्यावरून तिच्या स्तनांना स्पर्श करत नाभीजवळ लटकत होती. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला समोर आलेल्या केसांच्या बटा ती हाताने परत परत कानामागे करायची. अशा वेशात ती एक परिपूर्ण स्त्री दिसत होती.
वहिनीचे नाव ‘रूपाली’ असेच नव्हते, तर ती खरंच सुंदर रूपाचीही मालकिन होती. तिला अशा प्रकारे काळजीपूर्वक निरखून पाहिल्यावर कोणालाही वाटू शकते की, तिच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट हेतू आहे. पण माझ्या वहिनीवर माझी वाईट नजर नव्हती!
मला फक्त तिने घातलेल्या साडी, ब्लाउज, दागिने आणि मेकअपचे आकर्षण होते. वहिनी आणि मी सारख्याच उंचीचे होतो. दोघांचे शरीर सुद्धा सारखेच गोरे, घाटदार आणि नाजूक होते.
तिने नेसलेली ती साडी माझ्यावर तितकीच खुलली असती, जितकी तिच्या अंगावर खुलत आहे. मी मनात वहिनीच्या जागी स्वतःची कल्पना करत होतो. मला पण तिच्यासारखे सुंदर दिसायचे होते.
अरेरे! मी आलो तेव्हा माझी नजर वहिनीच्या साडीकडे का गेली नाही? कदाचित माझ्या लग्नाबद्दल ऐकून मला धक्का बसला होता.
काही क्षणातच मला वहिनीच्या संपूर्ण रूपाचे दर्शन झाले आणि त्या रुपात स्वतःला पाहता यावं, अशी मी कामना केली. मी वहिनीच्या जागी स्वतःची कल्पना करण्यात मग्न होतो. तेवढ्यात आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष गेलं.
“तो कुठे ऐकतो? अशा मुलाला खरं कोणी आपली मुलगी देईल का? ते लोक आज आले नाहीत तर मी त्याच्यासाठी दुसरी कुठली मुलगी शोधणार नाही.”
“अहो आई, तुम्हाला भावजीचं लग्नच करायचं आहे ना, मग काय फरक पडतो त्यांनी यांना जावईच्या जागी सून म्हणून पसंत केलं तर? यांना क्लीन शेव्ह करून मुलीसारखं दिसायला आवडते तर निशाऐवजी आपण कुणालबद्दल विचारूया. ते लगेच होकार कळवतील.”
या वेळी वहिनीने मला चिडवलं यापेक्षा माझं लक्ष तिच्या त्या साडीकडेच जास्त जात होते.
आई काहीच बोलली नाही. भावना शून्य चेहऱ्याने ती सोफ्यावर बसून राहिली. वहिनी आणि माझ्यात असे प्रेमळ भांडण नेहमीच चालू असते. त्यामुळे ती कंटाळली होती.
पण आता मी गप्प बसलो नाही. मी सोफ्यावरून उठलो आणि वहिनीजवळ जात म्हणालो, “ठीक आहे वहिनी, पण या अवतारात ते मला पसंत करतील?”
वहिनी मागे वळून माझ्याकडे पाहत हसत म्हणाली, “आता काय मी तुला साडी नेसवू?”
“नाही तर काय? पाहुणे येणार आहेत, साडी पण चालेल.” मी मुलीसारखे डोळे मिचकावत, मान हलवत म्हणालो.
मग मी मुलीसारखा कंबर मटकवत वहिनीच्या जवळ गेलो आणि तिचा हात पकडून तिला तिच्या बेडरूमकडे नेऊ लागलो.
मुलीच्या स्टाईलमधलं माझं हे बोलणं ऐकून आणि चालणं पाहून वहिनी मोठ्याने हसू लागली आणि माझ्या मागे मागे येत म्हणाली, “काय ग लाडो, कुठली साडी नेसणार?”
हे ऐकून मी मागे वळालो आणि पटकन म्हणालो, “कुठली काय? तू नेसलेली हीच साडी काढ आणि लगेच मला नेसव. पाहुणे येतीलच इतक्यात.”
वहिनी जोरजोरात हसत होती, पण माझे बोलणे ऐकून तिचे हसू थांबले आणि आ वासून माझ्याकडे पाहू लागली. मग तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित हास्य उमटले.
मी पुढे काही बोलायच्या आधीच आई रागाने बोलली, “आता मस्करी पुरे! रुपाली, तू एका मुलाची आई झाली आहेस. थोडी तरी लाज बाळग.”
आईचा राग पाहून आम्ही दोघेही शांत झालो. वहिनीने डोळे वटारून मला गप्प राहण्याचा इशारा केला. माझ्यामुळे आई तिच्यावर चिडली होती त्यामुळे मी तिचा राग समजू शकत होतो. तसेही चूक माझीच होती, उत्साहाच्या भरात माझी जीभ घसरली आणि मी चुकून बोललो की, हीच साडी काढ.
वहिनी शांत झाली आणि स्वयंपाक घराकडे जात म्हणाली, “आई, तुम्ही खाली तयारी करा, मी फराळ आणते.”
यानंतर मुलीकडील लोक येईपर्यंत वातावरण गंभीर होते. मला भेटायला फक्त मुलीचे आईवडील आले होते. आईने मला त्या दोघांसमोर आणून बसवले. मग मुलीची आई मला एक एक करून प्रश्न विचारू लागली.
एकीकडे मी, शेखर, तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होतो, तर दुसरीकडे, माझीतील शिखा, तिची साडी, ब्लाउज, दागिने आणि मेकअप गुपचूपपणे निरखून पाहत होती. जणू तिला तिच्या सासरी तिच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असेल की नाही, याची ती खात्री करून घेत होती.
शेवटी त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलीला बघण्याची तारीख ठरवायला सांगितले. त्यांना मी आवडलो म्हणून आई खुश होती. पण मी मात्र एका विचित्र अवस्थेत अडकलो होतो.
आज सकाळी बाथरूममध्ये माझ्या क्लीन शेव्ह केलेल्या चेहऱ्याकडे बघून मी मुलीप्रमाणे माझी छाती चोळत होतो, माझ्या शरीराशी खेळत होतो. काही तासांपूर्वी वहिनीच्या जागी स्वतःची कल्पना करून साडी नेसण्याची कामना करत होतो.
पण आता काही वेळेपूर्वी मी एका मुलीच्या पालकांसमोर बसलो होतो. त्यांना त्यांच्या मुलीचे लग्न माझ्याशी करायचे होते, जो स्वतःच मुलगी होण्याचे स्वप्न पाहत आहे.
माझे लग्न आता त्या मुलीसोबत ठरले होते. मुलीच्या पालकांनी मला पसंत केले आणि पुढील भेट निश्चित केली, हे ऐकून मला आनंद झाला. तेवढ्यात आई येऊन माझ्या उजव्या बाजूला बसली आणि फोटो दाखवत म्हणाली, “ही बघ निशा, सुंदर आहे ना?”
“हो, आहे सुंदर.” मी रडवेल्या चेहऱ्याने म्हणालो.
कदाचित वहिनीला माझ्या मनातील उलथा पालथ कळली. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या गळ्यात हात घालून माझ्या डाव्या बाजूला बसली. बसताना तिच्या साडीचा पदर माझ्या मांडीवर पसरला आणि माझी नजर त्याच्यावर पडली.
वहिनीने आईच्या हातातून त्या मुलीचा फोटो घेतला आणि मला दाखवत म्हणाली, “भावजी, निशा किती सुंदर दिसत आहे, बघा. मला माहीत आहे, लग्नाचा निर्णय काही सोपा नाही, पण एकदा तिला भेटण्यात काय हरकत आहे?”
पण माझी नजर त्या फोटोकडे तेव्हाच गेली असती, जेव्हा माझे लक्ष माझ्या मांडीवर पडलेल्या वहिनीच्या साडीच्या पदरापासून दूर झाले असते. वहिनीला त्या मुलीचा फोटो माझ्या हातात द्यायचा होता आणि माझे हात फक्त एकदा बोटांनी वहिनीच्या साडीचा पदराला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले होते.
“वहिनी, एकदा तरी मला तुझ्या पदराला हात लावू दे, मला त्याचा स्पर्श अनुभवायचा आहे.” मी मनात म्हणालो.
सर्व हिंमत एकवटून मी हात पुढे केले. तेवढ्यात वहिनी म्हणाली, “अहो, भावजी, ऐकताय ना? एकदा बघा तरी!”
(क्रमशः)